Tumgik
#करतायत”
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?
विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय?
विश्लेषण: हे ड्रॅगन फोर्स मलेशिया नेमके आहेत कोण? ते भारतीय वेबसाईट्स का हॅक करतायत? महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका का बसतोय? ड्रॅगन फोर्स मलेशिया (Dragon Force Malaysia) या हॅकर्स ग्रुपने जगभरातील हॅकर्सला भारत सरकारच्या मालकीच्या माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्याचं आवाहन केलं आहे. १० जून रोजी हॅकर्सच्या ग्रुपने ट्विटरवरुन भारतीय वेबसाईट्सवर सायबर हल्ले करण्याच्या मोहिमेला…
View On WordPress
0 notes
sattakaran · 6 months
Text
६ डिसेंबर भारतीय क्रिकेटसाठी खूपच खास, एकाच दिवशी ५ बडे खेळाडू साजरा करतायत वाढदिवस
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात
लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात
आरक्षणावरुन सुरू रणधुमाळी थांबवा- काँग्रेस पक्षाची सरकारकडे मागणी
आणि
साईबाबा संस्थानला दिवाळी सुटीत साडे सतरा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त
****
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांचं मनोबल वाढवण्यात येत आहे. त्यांची दिनचर्या सुरळित सुरू आहे, असं बचाव कार्यातल्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बचाव कार्याची माहिती घेत आहेत. सरकारच्या सर्व यंत्रणा, विविध राज्य सरकार बचाव कार्यात सहभागी आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आवश्यक यंत्र सामुग्री प्राप्त व्हावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाची भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएसवर आधारित मालमत्ता आणि यादी व्यवस्थापन प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. प्राधिकरणाच्या भविष्यातल्या गृहनिर्मिती आणि भूखंड हे व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेलं अतिक्रमण, आरक्षणनिहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज मार्गस्त केलं. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश आहे. हिंगोली जिल्ह्यातही आजपासून यात्रेला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून लाभापासून वंचित घटकापर्यंत याचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य विभागाचे अव्वर सचिव कौस्तुभ गिरी तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली इथं दिल्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अभियानाची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींना माहिती दिली. ते म्हणाले -
घरकुल योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, उज्ज्वला योजना, अशा ५४ योजनांमध्ये ज लाभार्थी आहेत, लाभ मिळालेल्या योजना कशा राबवल्या जातात यासंबंधी चर्चा केली. समाधानकारक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम या जिल्ह्याचे अधिकारी करतायत. त्यानंतर लोकांमध्ये आलो. काही लाभार्थी बोलले. एकंदरीत ज्या योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या अभियानाचा औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथं होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या अभियानात आठ रथ असतील, असं त्यांनी सांगितलं. डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे रथ आज ग्रामीण भागासाठी मार्गस्थ करण्यात आले.
****
दुधाला ३४ रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीनं शासन आदेश काढला असून हा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात आज २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनाद्वारे या आदेशाची होळी करण्यात आली.
****
राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली रणधुमाळी सरकारनं थांबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मराठा- इतर मागास प्रवर्ग वाद सरकार प्रायोजित असल्याचा आरोप केला. या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागं भारतीय जनता पक्षाची शक्ती असल्याचं ते म्हणाले. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राजस्थान, छत्तिसगडला ४५० रुपयांना गॅस मिळतो मग महाराष्ट्रात येवढा महाग का, अशी विचारना त्यांनी केली. आरक्षणावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानला दिवाळीच्या सुटीमध्ये १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत १७ कोटी ५० लाख ५६ हजारांहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. हा निधी रोख, धनादेश तसंच सोने, चांदीच्या स्वरुपात असल्याचं शिवा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं हाच पर्याय असल्याचं मत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपुरमध्ये `अॅग्रोव्हिजन` प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी देवव्रत बोलत होते. मुळात जमिनीची उगवण क्षमता लक्षात घेता निरनिराळ्या प्रयोगांचा विचार होणं अपेक्षित होतं. पण, अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांत मागच्या काळात झालेल्या प्रयोगांनी नापिकी अधिक आली, असं त्यांनी सांगितलं. रासायनिक शेतीमुळं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राची संरचना बदलावी लागेल असंही राज्यपाल देवव्रत यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारं पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जलसंपदा विभागाला लिहिलेलं पत्र समाजमाध्यमांवर सादर करताना त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. हे पत्र कोणत्या कारणांमुळं लिहिलं गेलं, याचा राज्य सरकारनं तातडीनं खुलासा करावा. राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विनाविलंब सोडावं, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आलं.
****
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर २-० असा सहज विजय नोंदवला. पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात भारताचा प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉय आणि जपानच्या कोडाई नराओका दरम्यानचा सामना होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या परभणी-वसमत मार्गावर खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीत दुकानांतलं सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या पथकानं ही आग आटोक्यात आणली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये शेतमालासह नजिकच्या एका हॉटेलमधलं सामान जळून खाक झालं.
****
गडचिरोली जिल्हा भयमुक्त होत असून, लॉयड मेटल्सबरोबरच जिंदाल आणि अंबुजा हे प्रमुख उद्योग देखील इथं मोठी गुंतवणूक करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा जिल्हा लवकरच राज्यात अव्वल स्थानी दिसेल, असा विश्वास त्यांनी आज गडचिरोली इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्यांनी आज उद्योग विभागाशी संबंधित एक आढावा बैठकही घेतली.
****
यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना मारहाणीच्या घटनेनं संतप्त झालेल्या अभियंत्यांनी पुसद आणि यवतमाळ कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात काळ्या फिती लाऊन ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार भावना गवळी यांनी आंदोलक अभियंत्यांशी चर्चा केली. मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी विभागीय कार्यालयानं पोलिसांशी पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला असून कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्यानं कामबंद आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेनं दिला आहे.
****
0 notes
happilyevr · 6 months
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले. 
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
Tumblr media
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
Tumblr media
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.  
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली. 
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना  झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले. 
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती. 
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत. 
Tumblr media
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
0 notes
satishsinnarkar500 · 2 years
Text
Mr. Ganesh Kashikar, Director, Alliance Panels & Switchgears Pvt. Ltd.
Developing and Producing effective electrical and mechanical product solutions
Alliance Panels & Switchgears, popularly known as APS, offers a wide range of medium voltage electrical products, having presence in the domestic and the international market. IECT representative Ashish Rajeshirke visited the stall of APS at the Expo of Ecam held at Pune and had a detailed discussion regarding business. A few excerpts are presented here for the benefit of readers.
Q 1: VCB हा साधारणतः इलेक्ट्रिक फिल्ड मधला महत्वाचा आणि मोठा सेक्शन आहे. You are into VCB and panel boards. तुम्ही काय सांगाल या प्रॉडक्ट बद्दल?
Ans : हे प्रॉडक्ट तस नवीन नाही. २५ वर्षांपूर्वी VCB लाँच झालं. ज्योती लिमिटेड, बडोदा यांनी हा मार्केट मध्ये आणला. याच्या आगोदर ऑइल बेस्ड होतं. जेव्हा इलेकट्रीसिटी सुरु असताना जर फॉल्ट आला, तर R,Y,B हे तीन पॉईंट्स असतात. ते ऑइल मध्ये असायचे. ऑइल खराब व्हायचं. ते सारखं चेंज करायला लागायचं आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ही टेकनॉलॉजी म्हणजे V,C,B. व्हॅक्युम सर्किट ब्रेकर. 
व्हॅक्युमच्या बॉटल्स असतात. त्या बॉटल मध्ये कॉन्टेन्टस असतात. कुठलाही फॉल्ट आला आणि रिले ने तो डिटेक्ट केला, तर तो फॉल्ट रिले सेन्स करतो. आणि कॉईलला देतो. आणि ब्रेकर ऑफ होतो. तो जेव्हा ऑफ होतो तेव्हा त्यातले व्हॅक्युम सेपरेट होतात. पण मीडिया व्हॅक्युम असल्याने ती आत extinguish होते. त्यामुळे ऑइल बदलणं वैगरे प्रकार होत नाहीत. मेंटेनन्स फ्री लाईफ आहे १० हजार ऑपरेशन किंवा ५ वर्षे. पुढे १०० ते १५० वर्षे याला काही पर्याय नाही.
Q 2: मधला कोविडचा जो पिरियड गेला. आता कोविंड नंतर मार्केट ची व व्यवसायाची काय परिस्थिती आहे??
Ans : इंडिया मध्ये इलेक्ट्रिसिटीची डिमांड खूप आहे. चायना आणि इंडिया मध्ये कम्पेअर केलं तर चायनाच मार्केट इंडियाच्या मार्केट पेक्षा १० पट जास्त आहे. आपल्याकडे कित्येक गाव अशी आहेत जिकडे अजून लाईट नाहीत. कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तुमचं जनरेशन झालं. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशनसाठी  सबस्टेशन लागतात. सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर असतात. त्याला हा ब्रेकर लागतो. मोदी साहेब जोरदार काम करतायत. ५ वर्षात कसर भरून काढतील.  
Let us hope for the best.. fingers crossed…
Q 3: सध्या प्रत्येक बिजिनेस मध्ये वेगवेळ्या अडचणीअसतात. आता नवीन टेक्नॉलॉजीज येतात. किंवा Online Transactions त्याच्याशी तुम्ही कस डील करता?
Ans : माझ्या बिजिनेसच्या रिलेटेड त्याचा काही फरक पडत नाही. पण ज्या ऑनलाईन ऑर्डर्स बऱ्याच प्रमाणात बघितल्या जातात. आमचं सगळं ई-मेल वर चालतं. Alliance सुद्धा सेवा पुरवतो. 
Q 4: हे सगळं करत असताना तुमचे टर्निंग पॉईंट्स किंवा माईल स्टोन्स किंवा कंपनीचा टर्निंग पॉईंट कोणता?
Ans : आताच आमचं महाराष्ट्र approval VCB Product जे आहे ते विकण्याआधी प्रत्येक स्टेजला टेस्टिंग करून मंजूर करावं लागतं. माझा २ वर्षांपूर्वी CPR झाला. पण माझ्याकडे मान्यता नसल्यामुळे मी बचत करू शकलो नाही. आता हे प्रॉडक्ट महाराष्ट्रात MSEB, BMC, आणि सिडको इथे Approve झालं आहे. कोणताही कॉन्ट्रॅक्टर प्रॉडक्ट साठी Apply करू शकतो.
Q 5: Any expansion plan in next 5 years?
Ans : Definitely, we are manufacturing around 10 nos. to 20 nos per year. पण आमची capacity जी आहे ती ३०० ची आहे. याच्यानंतर elecrama आहे. दिल्लीला खूप मोठं प्रदर्शन आहे. ते झाल्यानंतर जे मोठे कॉन्ट्रॅक्टर सध्या गोदरेज कडून घेतायत, L&T कडून घेतायत, आमची overscale असल्यामुळे आणि in house manufacturing असल्यामुळे चांगली कॉस्ट देऊ शकतो. प्रॉडक्ट देऊ शकतो. आणि आजकाल सगळे जाणीव झाले आहेत. तुम्हाला आधीचा अनुभव सांगतो. तेव्हा मी बर्लिनला पण एक्स्पोर्ट केलं होतं. सौदीला सुद्धा त्याच वेळी व्हिजिट केली होती. तेव्हा सौदीचे विचार होते, इंडियन प्रॉडक्ट म्हणजे एकदम बकवास प्रॉडक्ट. त्यावेळी युरोपमध्ये या प्रॉडक्टची कॉस्ट होती १८ लाख. 
 मात्र त्यावेळी ते हे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. पण आता सिनॅरिओ पूर्ण चेंज झालाय. आधी ते ऑइल वर अवलंबून असायचे. आता सगळ्यांकडेच ऑइल संपत चाललंय. कुवेत म्हणा, सौदी म्हणा, ओमान म्हणा. आता त्यांचा कल इंडिया कडे आहे. आता ते भारतीय उत्पादन खरेदी करण्यास इच्छूक आहेत. ही चांगली संधी आहे. UAE मध्ये Approval घ्यावं लागतं. पार्टनर घ्यावा लागतो. पूर्ण UAE मध्ये लाच तो निर्बंध आहे.
Q 6: Who are the main competitors in your industry?
Ans : There are many competitors. Gangal, Pascal. बाकीचे MNC आहेत. स्नायडर आहे.
Q 7: आता नवीन तरुण उद्योजक वेगवेगळ्या व्यवसायात उतरत आहेत. बिजिनेस कसलाही असो. तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल ?
Ans : साधारणता नवीन पिढी माझ्या बघण्यात जे आले ते visible मध्ये नसतात. लॅपटॉप, मोबाईल. पण माझ्या फॅक्टरीत जी मुलं काम करायला येतात, त्यांना मुळात फॅक्टरीत काम करण्यात इंटरेस्ट नाही. MBA ची मुलं fieldwork चांगलं करतात. कधी कधी नर्वस होतात. आता मी हे सर्व हॅन्डल करतो. पण माझी पुढची पिढी मुलगा, मुलगी त्यांना ह्यात रस नाही. मेन तोच प्रॉब्लेम आहे. आणि mechanical हा बेस आहे. सगळंच डिजिटल केलं तर कस चालेल?
Digitalisation important आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असत की तुम्ही जोपर्यंत ग्राउंड वर्क करत नाही, तोपर्यंत तुम्हाला success मिळणार नाही. सर्वात Best Mechanical आहे. Automobile sector मध्ये गाडी बनवायला तर कोणीतरी पाहिजे ना? सगळंच digital कस चालेल?
Q 8: एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून आमच्या कडून आमच्या सारख्या कंपन्यांच्या काय अपेक्षा आहेत?
Ans : चांगल्या मॅगझिन्स मध्ये प्रमोशन करावं. आमच्या सारख्या उत्पादकांना प्रमोट करावं.
Q 9: हा व्यवसायाचा भाग झाला. परंतु व्यवसायाच्या पुढे आपण आपले छंद कसे जोपासता? आपले काय छंद आहेत ?
Ans : व्यवसाय म्हणल्यावर माझं असं म्हणणं आहे की जो बिजिनेसमॅन आहे खरा, त्याने आपला पूर्ण वेळ व्यवसायासाठी न देता ५०% वेळ कुटुंबासाठी आणि स्वतःच्या शरीराला द्यायला हवा. मी फक्त ४ तास काम करतो आणि बाकीचा वेळ माझ्या शरीराला देतो. मला जे करायला आवडतं त्यासाठी देतो. जेव्हा मी मोकळा असतो तेव्हाच मला नवीन विचार सुचतात. तुम्ही १२ तास व्यवसाय करणार. नंतर पण तेच करणार. त्यासाठी तुम्ही माणसं ठेवली पाहिजे. जसा हा Alliance चा व्यवसाय मी सुरु केला. माझा एक मित्र आहे. He looks after everything. मला फक्त बसायचं आहे. तेवढा तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी वेळ मिळतो. माझं म्हणणं एवढंच आहे. प्रत्येकाने माणसं शिकवावी लागतात. 
0 notes
nandedlive · 2 years
Text
“मुख्यमंत्री शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा”
Tumblr media
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. (Political news) हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. याबाबत एक फोटो राष्ट्रवादीचे पदाधिकारी रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विट केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या चिरंजीवांना सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. आता यावर काँग्रेसने देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री झालेत शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा. अरे ते मुख्यमंत्री पद आहे की संगीत खुर्ची?, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने केलीये. दरम्यान,सत्ताधारी शिंदे गटाकडून आरोपानंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जो फोटो व्हायरल होत आहे. तो माझ्या कार्यालयातील आहे. यापाठिमागे कोणतेही हेतू नाही. अनावधाने ‘मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन’ हा फलक येथे आहे, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदेंनी दिलंय. मुख्यमंत्री झालेत शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा. अरे ते मुख्यमंत्री पद आहे की संगीत खुर्ची? pic.twitter.com/Wh65W0lCln — Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 23, 2022 Read the full article
0 notes
adeshgsworld · 4 years
Text
We The Consumer's of ENVIRONMENT .
ज्या नद्यांच्या किनाऱ्यावर आपली संस्कृती वाढली , उमलली , फुलली अशा भारतातील सर्व नद्यांना प्रणाम करून मी सुरुवात करतो .
आपल्या भारत देशाला पुर्वीपासुनच सोने की चिडिया म्हणुन म्हटलं जायचं ...
आणि ते गाणं पण होतं सोनु निगमचं
जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसहैरा वह भारत देश हैं मेरा
वह भारत देश हैं मेरा ...
आज तोच आपला देश , तिच आपली भुमी परंतु सोने की चिडीया काही वास्तवात दिसत नाही .
आणि डाँल- डाँल पर वृक्षांचा तर काही विषयच नहीं राहीला .
खरं तर जेंव्हा पर्यावरण हा विषय आपल्या समोर येतो तेंव्हा डोळ्यामोर चित्र उभं राहतं पर्यावरण म्हणजे नेमकं काय ?? पर्यावरण म्हणजे जलचक्र , पर्यावरण म्हणजे पाण्याचा प्रवाह , वातावरण , हवामान असे आपण अनेक समज गैरसमज करून घेतो .
पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .
ही व्याख्या माझी नसून रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ - डेसील डोरोव्हसकी यांची आहे .
अन त�� आंतरराष्ट्रीपर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली भौतिक शास्त्रानुसार घडणाऱ्या दृश्य - घटना होतं .य पर्यावरण मंडळाने देखील मान्य केली आहे .
सध्या आपण म्हणतोय पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललंय ...
पण खऱ्या अर्थाने संतुलन म्हणजे काय ?? अन ते बिघडत चाललंय म्हणजे काय याविषयी नीटसं कुणाला माहितीच नाहीये .
या बिघडलेल्या संतुलना मुळेच आज जाणवणारी चक्रीवादळे , महापूर , दुष्काळ , अतिवृष्टी ही कशाची द्योतके आहेत .
केरळ , बिहार , ओरिसा इथं आलेला प्रचंड महापूर आणि चक्रीवादळे .
अहो ते जाउद्या आपल्या महाराष्ट्रातच बघा ना ते सांगली ,सातारा ,कोल्हापुर ला आताच आलेला महापूर हे सर्व काय सांगतं - पर्यावरण किती बिघडलंय .
हे सर्व कशामुळे होतंय -
या सर्व गोष्टींना माणुसच जबाबदार आहे .
सध्या माणसाची जी प्रवृत्ती बनलीय , ओरबाडून खाण्याची .
महात्मा गांधीजींनी आपल्याला त्या काळात यंग इंडिया यामध्ये सांगितलं होतं ...
Their is enough in this world .
To fullfil single individual need .
But their can never be anything .
Which will fulfill single individual greed .
म्हणजे या जगामध्ये एवढं सारं आहे की प्रत्येक मनुष्याची गरज भागू शकेन .
परंतु अख्या जगाचं संचित जरी एकत्र केलं तर ते एक व्यक्तीचा लोभ नाही पुर्ण करू शकत .
पर्यावरणाच्या ह्रासाची कारणे -
1. वन संपत्ती व जंगलतोड -
वृक्ष तोडी मुळे जंगल चे सपाटीकरण होतंय .आपला पश्चिमघाटचं बघा ना -
सर्वाधिक जैवविविधतेने नटलेला .
पश्चिम घाट - जगाच्या 24 biosphere reserves पैकी एक असणारा .
अन आज काय होतंय तिथे हे राजकारणी , काही लोकं काळ्या पैशाची पॉवर दाखवून तिथे शेकडो एकर जमिनी विकत घेतायत .
आणि जंगलाचं सपाटीकरण करतायत , बंगलो पद्धती बांवतायेत .
आपल्या महाराष्ट्र सरकारचं च धोरण होतं -एकच लक्ष 3 कोटी वृक्ष , एकच लक्ष 5 कोटी वृक्ष ,
एकच लक्ष 11 कोटी वृक्ष पण हे केवळ फोटुपुरत मर्यादित राहू नये म्हणजे झालं .
2. जलप्रदूषण आणि उपाय योजना -
मराठवाड्यात जाणवणारा सततचा दुष्काळ , पाण्याची भीषण टंचाई ,अन इतरत्र होणारा महापूर .
3. कचरा प्रदूषण -
औद्योगिकीकरण व कारखानदारी मुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याचीगरज आहे .
केवळ मुंबई मध्येच दर दिवशी 10,000 घनमीटर एवढा कचरा उत्पन्न होतो .
पाण्या करीता सरकारचा जलयुक्त शिवार , अमीर खानचा - पाणी फौंडेशन हे उत्तम काम करतायेत .
कचऱ्याचे सेपरेशन ओला , सूका हे महत्वपूर्ण ठरतंय .
4. वायु व ध्वनी प्रदुषण -
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वायु आणि ध्वनी दोन्हीही प्रदूषण वाढतंय .
इंधनाचा वापर हा कमी करायला हवा .
5.अणू प्रदूषण -
अनु प्रदूषणामुळेच radiation सिकनेस सारखे परिणाम दिसतायत .
कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण वाढत आहे .
Green carbon ही संकल्पना राबवावयास हवी .
त्यामुळे अणुऊर्जेवर जाही बंधनं घाकण्याची कीरणोत्सारी उत्सर्जनामुळे करकरिगासाजे प्रमाण व��ढत आहे .आवश्यकता आहे .
याशिवाय अणू विषयी घेतल्या जाणाऱ्या विस्फोटक चाचण्या बंद करण्याची आवश्यकता आहे .
विपरीत परिस्थितीयो में कुछ लोग टूट जाते है .
तो कुछ लॉग रेकॉर्ड तिड देते है।
याच पद्धतीनं रेकॉर्ड तोडणारे तुम्हाला-आम्हाला अख्या महाराष्ट्रालाच नाही तर जगला ज्यांचा प्रचंड अभिमान आहे .
असे जे पर्यावरण तज्ञ काम करतात त्याना सॅल्युट असायला पाहिजे .
खरं तर त्यांच्यासाठी ग्रेट सॅल्युट .
यामध्ये प्रामुख्याने चिपळूण मधील एक NGO आहे तीच नाव सहयाद्री निसर्ग मित्र आहे .
त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील पोपटराव पवार असतील त्यांनी ग्रामीन भागाकरिता खूप मोठं योगफन दिलंय .
अमेरिकेमध्ये असणारा सियारा क्लब आहे .
शेवटी एवढंच वाटते ,आपल्या भारत देशाचंच एक वाक्य आहे ....
वसुध्येव कुटुंबकम ।।
याचप्रमाणे something give back to the siciety .
आपण जिथं राहतो , त्या आपल्या देश साठी , आपल्या पृथ्वीकरिता आपण काही तरी करण्याची गरज आहे .
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
3 notes · View notes
ksnewsnetwork · 2 years
Text
'भूतकाळ' खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते पूरातत्व शास्त्रज्ञांसारखे कठोर परिश्रम करतायत : क्लाईड क्रास्टो
‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते पूर��तत्व शास्त्रज्ञांसारखे कठोर परिश्रम करतायत : क्लाईड क्रास्टो
मुंबई : – पूरातत्व शास्त्रज्ञांसारखे ‘भूतकाळ’ खोदण्यासाठी भाजप कार्यकर्ते कठोर परिश्रम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप अनेक जुनी प्रकरणे उकरून काढून देशातील वातावरण कलुषित करण्याचे काम करत आहे. आताच ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमावरुन जोरदार राजकारण भाजप करत असल्याचे क्लाईड क्रास्टो म्हणाले. दरम्यान,  भाजप सध्या पूरातत्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
डोळ्याचं पारणं फिटेल... कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ
डोळ्याचं पारणं फिटेल… कोल्हापुरातील पंचगंगा नदीत मासे करतायत परेड, पाहा व्हिडीओ
कोल्हापूरची जीवनदायीनी पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे.
View On WordPress
0 notes
mazyagoshti · 3 years
Text
पृथ्वी २.० : भाग ३
उड्डाणाची सर्व तयारी झाली होती आम्ही सार्वजण सीटवर बसलो. त्या यानाची संपूर्ण सिस्टीम ही ऑटोम्याटीक होती फक्त काही निर्देशातच यान सज्ज झालं. गणती सुरु झाली आणि क्षणार्धात आम्ही उडू लागलो. फक्त काही सेकंदात त्या यानाने प्रकाशाचा वेग घेतला आणि यान पृथ्वीच्या वातावरणा बाहेर पडलं आम्ही काही मिनिटात सूर्यमाला पार केली. ते यान सुर्यमालेच्या टोकाला जाऊन थांबल. तिथे एक पोर्टल होता, तो त्यांनीच निर्माण केल होत. आमचा यान त्या पोर्टलच्या आत शिरलं काही मिनटात ते यान त्या पोर्टलच्या बाहेर पडल. आम्ही होतो एका दुसऱ्या दिर्घिकेत एका दुसऱ्याच विश्वात. तिथे देखील आपल्या सारखी एक ग्रहमाला होती. त्या ग्रहमालेत पृथ्वी सारखा एक ग्रह होता. त्याचा आकार आपल्या पृथ्वीएवढाच होता. तोच समुद्र, बर्फछादीत ध्रुव वृत्तावर भूपृष्ठ सर्वकाही अगदी पृथ्वी सारखाच होत. पण तिथला सर्व भूभाग हा एकत्र होता. त्यांच्या ग्रहाला एक चंद्र देखील होता. त्या ग्रहमालेत आणखी दोन ग्रह होते. पण त्यावर जीवसृष्टी नव्हती. होता तो खजिना साधन संपत्तीचा. आम्ही त्यांच्या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल. त्या यानने वातावरणात प्रवेश केला आणि सावकाशपणे जमिनीवर उतरले. आम्ही आता होतो त्यांच्या ग्रहावरती एका दुसऱ्या विश्वात. ते यान एका ठिकाणी उतरल होत. कुठे ते काही कळल नव्हत. यानाचे दरवाजे उघडले आम्ही याना बाहेर पडलो. आम्ही उतरलो ते त्यांच्या स्पेस स्टेशनवर . त्यांनी त्यांचे हेल्मेट काढले आणि मला धक्काच बसला ते अगदी हुबेहूब आपल्या सारखेच दिसत होते. दुसऱ्या ग्रहावर माणूस मी चक्राऊन गेलो. काही क्षणासाठी मला असं वाटल की मी पुन्हा पृथ्वीवरच आलोय की काय? कारण तिथल वातावरण देखील पृथ्वीसारखच होत. पण ती पृथ्वी नव्हती . तिथली हवा अतिशय शुद्ध होती, प्रदूषणाचा तिथे लवलेशही नव्हता. सर्वत्र हिरवळ, प्रसन्न वातावरण. तो ग्रह पृथ्वीसारखा पण पृथ्वी पेक्षा फार वेगळा होता. तिथली परिस्थिती ही फारच उत्तम होती. आम्ही एका बेटावर उतरलो होतो. त्यांचा तो बेस होता त्यांची सर्व याने तिथूनच उड्डाण घ्यायचे. मी त्यांच्या सोबत त्यांच्या स्पेस स्टेशन मध्ये गेलो. तिथे त्��ांच्या प्रयोगशाळेत विविध क्षेत्रात विविध विषयांवर संशोधन सुरु होत. ते आपल्या पेक्ष्या दहा पाऊले पुढे होते. आपण आता ज्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी त्यांनी सत्यात उतरवल्या होत्या. आम्ही चौघे एका सभागृहात गेलो. तिथे त्यांच्या ग्रहावरील प्रमुख मंडळी उपस्थित होती. ते एका मुद्द्यावर चर्चा करत होते. तेव्हा आम्ही तेथे गेलो. सर्वप्रथम आमचे तिथे स्वागत झाले. मग आम्ही देखील त्या चर्चेत सहभागी झालो. मला तिथ गेल्यावर कळल की पृथ्वीवरील काही मी एकटाच तिथे नव्हतो पृथ्वीवरील विविध देशातून आलेली माझ्या सारखी अजून माणसेही होती. त्यांना देखील माझ्यासारखे इथे या ग्रहावर आणले होते. आम्हा पृथ्वीवरील सर्व जणांना काहीच समजत नव्हत की हे सर्व काय घडतंय. त्यांचा प्रमुखांनी चर्चेला सुरुवात केली, ते म्हणाले, “तुम्हा पृथ्वी वरील सर्व जणांचे आमच्या या ग्रहावर हार्दिक स्वागत, तुम्हाला सर्वांना हाच प्रश्न पडला असेल की तुम्हाला इथे का आणलाय? आम्ही कोण आहोत? हे जे काही घडतंय याची तुम्ही कधी कल्पनाच केली नसेल, पण हे सत्य आहे. तुम्ही आमच्या बरोबर यायला तयार झालात ते पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि हाच या चर्चेच प्रमुख उद्देश आहे. पृथ्वीवरील सध्याची परिस्थिती ही फार वाईट आहे. मानवाचे जीवन हे धोक्यात आहे जर मानवाला आपली प्रजाती वाचवायची असेल तर मानवाला पृथ्वी सोडण्या वाचून पर्याय नाही. तुम्ही देखील हे जाणता. तुम्हाला लवकरात लवकर यावर काही तरी उपाय शोधायचा आहे, त्यासाठी आम्ही तुमची मदत करू.”, पण मला एक प्रश्न पडला होता की हे लोक आपली मदत का करतायत? पण जे काही घडत होत त्यामुले पृथ्वीवरील जीवन वाचणार होत म्हणून आम्ही सर्व पृथ्वीवरील लोक खुश होतो. मग त्यांनी एक प्लान तयार केला जणू काही ती आधीच तयार होता, आम्हाला तो सांगण्यासाठी तेथे बोलावलं होत. मला तर असं वाटत होत की तो त्यांनी पाठवलेला संदेश हा फक्त निम्मीत होता. तो काही माझा संदेश त्यांना मिळाल म्हणून त्यांनी पाठवलेला नव्हता तर तो त्यांची या योजनेचाच एक भाग होता. हे सगळं जणू काही आधीच ठरलं होत. त्या प्लान नुसार आम्हाला एका नव्या ग्रहावर पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती. त्या नवनिर्मितीची रचना आम्हाला करायची होती. त्यासाठी ते आम्हाला आवश्यक ती मदत करणार होते. त्यासाठी त्यांनी एक पृथ्वी सारखा ग्रह देखील शोधला होता. तेथली सर्व परिस्थिती ही पृथ्वी सारखीच होती तिथे जीवनासाठी योग्य परिस्थिती होती. आम्हाला फक्त एवढच करायचा होत, पृथ्वीवर जाऊन मानवी भ्रूण घेऊन यायचे होते. प्लान हा पूर्ण पणे तयार होता. आता फक्त आम्हाला कृती करायची होती. हा एक फार मोठा मिशन होता. हे जे काही घडत होत ते सर्व काही अकल्पित होत. पण त्यामुळे पृथ्वीवरील जीवन वाचणार होत. मानव जमात ही जिवंत राहणार होती आमच्या सर्वांचीच अवस्था सारखीच होती. पण आम्हा सर्वांचे ध्येय एकाच होते आम्हाला पृथ्वीवरील जीवन वाचवायचे होते. पण पृथ्वीच काय? ते काही ठरलं नव्हत. पृथ्वीवरील लोकांचे काय होईल हे आम्हाला सुद्धा ठाऊक नव्हत. आता सर्व तयारी झाली होती. आम्ही सर्वज पृथ्वीवर जाण्यासाठी सज्ज झालो. ही सुरुवात होती एक नव्या निर्मितीची. आता आमचा फक्त एकाच मिशन होत मिशन पृथ्वी. त्यांनी आमच्या सोबत एक यंत्र दिल होत ज्याच्या मदतीने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार होतो आणि एक एम्ब्रिओ केस दिली ज्यात आम्हाला भ्रूण आणायचे होते. आम्ही सर्वजण निघालो. आम्हाला ज्यांनी आणला होता त्यांनीच परत आम्हाला पृथ्वीवर आमच्या ठिकाणी म्हणजेच आमच्या घरी नेऊन सोडले. मी लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या सहकार्यांशी संपर्क साधला, मी त्यांना घडला सर्व प्रकार सांगितला पण त्यांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. मग मी त्यांना पटतील असे पुरावे दिले तेव्हा कुठे ते मला मदत करायला तयार झाले. त्यांच्या मदतीने मला ती मानवी भ्रूण मिळवायची होती. कारण मी ज्या संस्थेत काम करत होतो ती संस्था दुसऱ्या ग्रहावर स्थालांतर करण्यावर संशोधन करत होती. आमच्या संस्थेने पृथ्वीवर पूर्वतयारी म्हणून मानवी भ्रूण जपून ठेवले होते. आम्ही फक्त ग्रहाच्या शोधात होते. तो ग्रह आता मिळाला होता. तिथे पोहोचण्यासाठी ते परग्रही मदत करणार होते. आता पुढच काम माझं होत. मी ते भ्रूण मिळवले आणि ते त्यांनी दिलेल्या त्या केस मध्ये जपून ठेवले. माझ्याकडे त्यांनी दिलेला यंत्र होता त्याच्या मदतीने मी त्यांना संपर्क साधला आणि काम झाल्याचा संदेश दिला. पृथ्वीवरील इतर देशातील माझ्या सहकाऱ्यानी देखील त्यांचे काम पार पडले होते. त्यांनी देखिल तसा संदेश पाठवला होता. ते आता आम्हाला सर्वांना पुन्हा घ्यायला येणार होते. आम्ही सर्वांनी आमचे काम पार पाडले होते. त्यांनी आम्हाला पुन्हा एक दिवस दिला आमच्यासाठी कारण आता आम्ही जे पृथ्वीवरून जाणार होतो ते परत कधी येऊ हे काही माहित नव्हत. आम्ही सर्वांनी इथे पृथ्वीवर सर्व कामे मार्गी लावली आणि त्या सफरीसाठी तयार झालो.
0 notes
Text
‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅनने स्पर्धकांना सुनावले खडे बोल; चाहतेही करतायत कौतुक! Video Viral
‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅनने स्पर्धकांना सुनावले खडे बोल; चाहतेही करतायत कौतुक! Video Viral
‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅनने स्पर्धकांना सुनावले खडे बोल; चाहतेही करतायत कौतुक! Video Viral Bigg Boss 16: या आठवड्यात एमसी स्टॅनचं एक नवं रूप सगळ्यांनाच पाहायला मिळालं आहे. यावेळी त्याने आपल्या दमदार खेळीने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. Bigg Boss 16: या आठवड्यात एमसी स्टॅनचं एक नवं रूप सगळ्यांनाच पाहायला मिळालं आहे. यावेळी त्याने आपल्या दमदार खेळीने सगळ���यांचीच बोलती बंद केली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
पूजा चव्हाणच्या आयुष्यात एका व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग
पूजा चव्हाणच्या आयुष्यात एका व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग
मुंबई पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी – पूजा चव्हाणच्या आयुष्यात एका व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग होता… कोण आहे ती व्यक्ती? आणि पूजाशी त्याचं नेमकं नातं काय होतं? पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून धक्कादायक गौप्यस्फोट टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती आली आहे. पूजाच्या मृत्यूनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पूजाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याचा तपास पुणे पोलीस करतायत… अशावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
'आयुष्मान भव' मोहिमेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ; या मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही.
एसटी बस प्रवासासाठी आता रेल्वेच्या संकेतस्थळावरुनही आरक्षण करता येणार.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला तीन वर्ष मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी.
आणि
उद्या बैलपोळा; मात्र लंपीच्या पार्श्वभूमीवर नांदेड, हिंगोली पाठोपाठ बीड जिल्ह्यातही जनावरांच्या मिरवणुकीवर निर्बंध.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'आयुष्मान भव' या मोहिमेला प्रारंभ केला. देशाचा प्रत्येक नागरीक सुदृढ झाला, तर देश नक्कीच प्रगती करेल, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. आरोग्य सेवांची व्याप्ती वाढवणं, प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशातल्या सर्व नागरीकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यावेळी केलं.
****
आयुष्मान भव मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून दाखवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ही मोहीम राबवतांना सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी तसंच प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, अवयवदान जागृती मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेले नि:क्षय मित्र तसंच जिल्ह्यांना यावेळी गौरवण्यात आलं. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसंच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य या योजनांच्या कार्ड वाटपाला तसंच आरोग्य आधार ॲप, नर्सिंग होम नोंदणी ॲप तसंच समुदाय आरोग्य अधिकारी ॲपना यावेळी सुरुवात करण्यात आली.
****
हिंगोली इथं जिल्हा प्रशिक्षण केंद्रात 'आयुष्यमान भव' या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार संतोष बांगर, तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात चार लाख ९२ हजार ३२९ नागरिकांपैकी एक लाख २७ हजार ६२३ नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्डचं वाटप करण्यात आलं.
****
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या सामाजिक प्रश्नाकडे कोणीही राजकीय हेतुने पाहू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात परवा झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आपसातल्या चर्चेची एक ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही सरकारची स्पष्ट भूमिका असून, मराठा समाजाने अशा अपप्रचाराला बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -
सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही लोक जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मराठा समाजातल्या तरूणांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न किंबहुना सरकार आणि मराठा समाज याच्यामध्ये दुही कशी निर्माण होईल अशा प्रकारचा जे प्रयत्न करतायत, तेव्हा मला आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सांगायचं आहे, की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला, दिशाभूल करण्याच्या प्रकाराला बळी पडू नये. आणि जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही माझं आवाहन आहे, आपण अशा प्रकारचा कुठलाही खोडसाळपणा करू नये.
दरम्यान, आजच्या नियोजित जालना दौऱ्याबाबत विचारलं असता, शासनाच्या शिष्टमंडळाशी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू असून, चर्चेनंतर दौऱ्याबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या कुठल्याही भागातील महत्त्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी अडून राहणार नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामं प्राधान्याने पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
****
एसटी बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसी या रेल्वेच्या संकेतस्थळावरुनही आरक्षण करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे एसटीची सेवा रेल्वे प्रवाशांना देखील सोयीची होणार आहे. या करारामुळे रेल्वे आरक्षणाच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणंही शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
****
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेला तीन वर्ष मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२३-२४ पासून २०२५-२६ दरम्यानच्या या तीन वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देशभरात ७५ लाख नव्या गॅस जोडण्या दिल्या जाणार आहेत.
****
कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यावर तीस दिवसांच्या आत चल अचल संपत्तीची कागदपत्रं संबंधितांना परत करण्याची सूचना भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व वित्तीय संस्थांना दिले आहेत. ही कागदपत्रं परत करण्यास उशीर झाला, तर पाच हजार रुपये रोज या दराने बँकांनी संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे. येत्या एक डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सदरील कागदपत्रं गहाळ झालेली असल्यास, संपत्ती मालकाला त्याच्या दुय्यम प्रति मिळवून देण्यास बँक सहकार्य करेल, यासाठी बँकेला तीस दिवसांची अतिरिक्त मुदत मिळेल, मात्र मुदत संपल्यानंतरही कागदपत्र देण्यास विलंब होत असेल, तर संबंधितांना नुकसान भरपाई देणं बँकेला बंधनकारक असणार आहे.
****
बैलपोळा सण उद्या साजरा होत आहे. मात्र लंपी या गोवंशीय पशूंमध्ये आढळणाऱ्या चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर नांदेड तसंच हिंगोली पाठोपाठ बीड जिल्ह्यात पोळासणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास तसंच एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यांमध्ये १६८ ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रोग हा संसर्गजन्य असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध घालण्यात आले आहेत.
****
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास -सारथी या संस्थेचं औरंगाबाद इथं वसतिगृह सुरू करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीसाठी चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस या गावातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज नांदेड - हिंगोली  या राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला यावेळी देण्यात  आलं.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज ‘स्पोर्ट्स कार्निवल 2023’ क्रीडा महोत्सव घेण्यात आला. एकाच छताखाली विविध क्रीडा प्रकारांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
****
बीड इथं आज सुमारे तीनशे लीटर दूध भेसळीच्या संशयावरून नष्ट करण्यात आलं. माऊली मिल्क प्रॉडक्ट या संस्थेच्या दुधात सोडा आढळल्याने ही कारवा�� करण्यात आली. अन्न सुरक्षा आणि मानके, कायदा २००६ चे उल्लंघन करत असल्याच्या कारणावरून सदर संस्थेला दूधविक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
****
औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात गेल्या आठवड्यात जन्मलेल्या पांढऱ्या वाघाच्या एका बछड्याचा आज सकाळी मृत्यू झाला. मूत्रपिंडाच्या संसर्गानं या बछड्याचा मृत्यू झाल्याचं उत्तरीय तपासणीत निदर्शनास आलं आहे.
****
हिंदी राजभाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारीत केला जाणार आहे. त्यामुळे आमच्या केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी प्रादेशिक बातमीपत्र सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सहा वाजून पंचावन मिनिटांनी प्रसारीत होईल.
****
0 notes
kokannow · 3 years
Text
पवारांची चप्पल उचलणारे आज चंद्रकांतदादांवर टीका करतायत !
पवारांची चप्पल उचलणारे आज चंद्रकांतदादांवर टीका करतायत !
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर माजी खा. निलेश राणेंची टीका मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली होती. या टीकेचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. पवारांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
.. म्हणून नेटकरी करतायत ‘द कपिल शर्मा शो’वर बंदीची मागणी नेटकऱ्यांनी कपिल शर्माच्या शोवर बंदीची मागणी केली | #KapilSharma #Show #Boycott #ArnabGoswami http://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/boycott-kapil-sharma-show-trends-on-twitter-thanks-to-arnab-goswami-fans/?feed_id=12730&_unique_id=5f7b121f481a2
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करतायत : योगगुरु रामदेव बाबा
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करतायत : योगगुरु रामदेव बाबा
रत्नागिरी : प्रतिनिधी योग गुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर याच ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्झीट पोलमधून दिसतंय, काही लोकांना वाटलं होतं पाच राज्यांमध्ये बीजेपी रसातळाला जाईल पण तसं होत नाही आहे. सोशल…
View On WordPress
0 notes