Tumgik
airnews-arngbad · 22 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण.
नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत तर परभणी जवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावर��ा बहिष्कार मागे.
चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण;जालन्यात १२, बीडमध्ये १९ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले सात अर्ज बाद.
आणि
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांत आज काही प्रकार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघातल्या २०४ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड इथं ५२ पूर्णांक ४७ शतांश टक्के, परभणी इथं ५३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिंगोली इथं  ५२ टक्के, यवतमाळ वाशिम ५४ टक्के, तर अकोल्यात ५२ टक्के मतदानाची नोंद झाली.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्रावरील बॅलेट युनीट, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनीट आणि २५ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला, मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं.
परभणी लोकसभा मतदार संघातही २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरीत बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनीट कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार समोर आला. भैय्यासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बॅलेट युनीट तत्काळ बदलून देण्यात आलं. दरम्यान, या युवकाने मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
****
परभणी शहराजवळील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं, मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं. शहरात गुज��ाथी महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
परभणी लोकसभा मतदार संघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आले होते, यात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या केंद्राला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नव मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकाने मुंबईहून येत तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
आज पालघर लोकसभा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुशिला कांबळे, राईट टू रिकॉल पक्षाकडून अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदारसंघात आज ४१ अर्जांची विक्री झाली. यात भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या वतीने चार अर्जांची खरेदी केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज झाली. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते, यापैकी सात जणांचे अर्ज बाद झाले, तर ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
बीड इथून ७६ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ जणांचे अर्ज बाद ठरले, तर ५५ अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.
****
राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन आज रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर��न हा कार्यक्रम प्रसारित होईल.
                                   ****
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश आलं आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मुलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं आहे.
****
नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज अर्ज छाननी प्रक्रिये दरम्यान, भाजपाच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी, के.सी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गोवाल पाडवी यांनी मालमत्तेचं विवरण दिलं नसून ९० दिवसाच्या आतील बँकेच्या नोंदी देखील जोडल्या नसल्याचं, तसंच गावित दांम्पत्यांनं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं, हिना गावीत यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवला. भारतीय जनता पक्षानं, याविरोधात न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
****
बीड इथं येत्या रविवारी २८ एप्रिलला मतदार जागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी काढण्यात येणार असून या फेरीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून करण्यात येईल.
****
जनकल्याण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील गोडेगाव इथं येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित समारंभात बोरूडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून, आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना गेल्या ३१ वर्षापासून मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे
****
चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. उद्या सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८ पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
परभणी लोकसभा मतदारसंघात २१ पूर्णांक १७, नांदेड - २० पूर्णांक ८५, तर हिंगोली मतदारसंघात ११ वजायेपर्यंत १८ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं. वर्धा तसंच यवतमाळ - वाशिम मतदारसंघात १८ टक्के, तर अकोला, अमरावती आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी साडे सतरा टक्के मतदान झालं.
****
परभणी लोकसभा मतदार संघात २० वेगवेगळ्या ठिकाणच्या इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यान�� त्या बदलण्यात आल्या. नांदेड इथं गुजराथी हायस्कूलमध्ये महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.
****
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं. अमरावती इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, अकोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत, हिंगोली मतदारसंघात खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, तर बुलडाणा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदान केलं.
वाशिम जिल्ह्यातल्या उमरा इथं अंध तरुणांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलं.
****
राज्यात आज होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं, उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत, असं सांगितलं. त्याशिवाय, निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवारा��ा उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
दरम्यान, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातल्या शाळांमध्ये चुनाव पाठशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी रॅली तसंच चित्रकला, निबंधलेखन या सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार  ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
****
राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेड इथल्या शेतकरी कुटुंबातल्या नीलकृष्ण गजरे याने देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं काचिगुडा-हिसार - काचिगुडा विशेष गाडीच्या ३० जून पर्यंत एकूण १८ फेऱ्या मंजूर केल्या  आहेत. ही गाडी दर गुरुवारी काचिगुडा रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, मुदखेड, हिंगोली, अकोला, जोधपुर, बिकानेरमार्गे हिसार इथं शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हिसार इथून दर रविवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी सकाळी साडे सात वाजता काचिगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 day
Video
youtube
     آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں:  بتاریخ: 26  اپریل  2024‘ ��قت: صبح  09:00 تا 09:10    
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या ८ मतदारसंघांसह देशातल्या ८८ जागांवर मतदान.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत ५१ उमेदवारांकडून ७८ नामानिर्देशन पत्र दाखल.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस.
आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, महिलांना नोकऱ्यांत ५० टक्के आरक्षणाला प्राधान्य.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र असून एक कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, हिंगोली ��हरात लिंबाळा इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्याचं आज वाटप करण्यात आलं. कळमनुरी, वसमत या तहसील कार्यालयातही साहित्य वाटपाची लगबग आज दिसून आली.
परभणी मतदार संघात दोन हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीचं सर्व साहित्य आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात दोन हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ वाशिम मतदार संघात दोन हजार २२५ मतदान केंद्र असून एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सात हजार ७१९  अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन हजारांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार आहे. यामध्ये नऊ लाख ७० हजार ६६३ पुरुष मतदार तर नऊ लाख चार हजार ९२४ महिला मतदार आहेत. उद्या जवळपास दोन हजार ५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी पाच हजारांवर पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहतील.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या अकरा मतदारसंघाचा समावेश असून १३ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज  दाखल केला, तसंच पिपल्स पार्टी ऑफ इंडीयाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोडके आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत समावेश आहे.
दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८ जणांनी १४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. आजपर्यंत एकूण १९ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मतदारांना संबोधित केलं. दरम्यान, भुमरे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.
****
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान, धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नाव��नं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या स���कल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दाखवाव्यात, नाहीतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं ते यावेळी म्हणाले.
****
देशातली केंद्रीय सत्ता ही हुकूमशाहीकडं वाटचाल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथं अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते. देशातले ८७ टक्के नागरिक बेरोजगार असून महागाई देखील वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ-वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ऐकता येईल.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील २४ शाळा, महाविद्यालयातील जवळपास दोन हजार ४०० विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला.
****
नांदेडहून उद्या सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी साडेनऊऐवजी दुपारी तीन वाजता सुटेल. तर हुजूर साहिब नांदेड - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांऐवजी सायंकाळी सहा वाजता सुटेल. तसंच  पनवेलहून आज दुपारी अडीच वाजता सुटणारी पनवेल हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस साडेसात तास उशीराने म्हणजेच रात्री दहा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी सन २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.
****
नागपुर इथं येत्या २७ ते २९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाणांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवात २० ते २२ राज्यांतील शेतकरी, बियाणे संवर्धन करणारे शेतकरी तसेच संस्था बीजाईची विविधता, शेतमाल, साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात.
****
राज्यात आज मालेगाव इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या ठिकाणी पारा चाळीशीपार पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी इथं ३८ पूर्णांक पाच तर बीड इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपासपथक एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.
सक्तवसुली संचालनालय तसंच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळं त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. गुजरात राज्यात  दाखल असलेल्या गुन्हामध्ये मध्यस्थी म्हणून पोलिस निरीक्षक वारे याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये आधीच स्विकारले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर वारे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा नवापूरमधील संतप्त नागरीकांनी नवापूर पोलिस ठाण्याबाहेर जमत त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री नवापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
छत्रपती संभाजी नगर इथं शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, भुमरे यांनी काही वेळापुर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
****
मतदारांमध्ये मतदान जागृती होण्याकरता सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' हा सायक्लोथॉन उपक्रम बीड जिल्ह्यात, येत्या रविवारी २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन 'मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा', असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी स्वीपच्या माध्यमातून सेंट फ्रान्सिस माध्यमिक शाळेत काल मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आलं. या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. यावेळी  आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच शासकीय, खासगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, काल या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतला हा चौथा विजय तर गुजरात टायटन्सचा पाचवा पराभव ठरला आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अस�� हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतो��ा थंडावल्या;प्रचार सभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग
चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस;औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा
आणि
ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा आज थंडावल्या. या टप्प्यात परवा २६ तारखेला राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. देशातून आरक्षण कधीही संपवलं जाणार नसल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी देशात दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याची टीका केली.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जि��्ह्यात पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी आज वाशीम इथं रोड शोमधे सहभाग घेतला. विद्यमान खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी भोकर इथं सभा घेतली.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण सुरू असतांना भोवळ आली. त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले, गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशातून कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलिल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे संजय उत्तमराव जगताप, रयत शेतकरी संघटनेचे जियाउल्ला अकबर शेख, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या पंचशीला बाबुलाल जाधव यांनी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे वसंत संभाजी भालेराव यांच्यासह जे के जाधव, नितीन कुंडलिक घुगे, संगीता गणेश जाधव या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत २८ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी उद्या अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं, जाहीर केलं आहे.
****
जालना मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख, कैलाश गोरंट्याल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते
या मतदार संघातून इतर सात उमेदवारांनीही आज नामनिर्देशन पत्रं दाखल केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालना शहरातून प्रचार फेरी काढली. महापालिकेच्या मैदानावर एका सभेत ही फेरी विसर्जित झाली. दरम्यान, जालना मतदार संघात आज एकूण १४ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रं खरेदी केले. आजपर्यंत १०२ जणांनी २३४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
****
बीड लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बीड इथून आज नऊ उमेदवारांनी १६ अर्ज घेतले आहेत.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं आज भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी भेट दिली. या वायुसेना डेपोला गेल्या ८ मार्च रोजी प्रेसीडेंट कलर्स सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल चौधरी यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी चौधरी यांनी या डेपोचा इतिहास सांगणाऱ्या आणि महत्त्वाचे टप्पे दाख��णाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली, आणि वायु दलाच्या सैनिकांशी संवाद साधला. वायुसेना परिवार संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी या देखील यावेळी उपस्थित होत्या. सेना अधिकाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाचं ध्येय अंतर्गत नऊ संकल्पावर काम करत असणाऱ्या ४१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी या या कार्यशाळेला उपस्थित होते.
****
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत जनजागृती पर शपथ देण्यात आली, तसच भित्तीपत्रक प्रदर्शनही भरवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवा होत असलेल्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचा हक्क बजावण्याच्या आवाहन मतदारांना केलं आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असून, सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करण्याचं आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, आवश्यकतेनुसार कुलरची तसंच प्रतिक्षालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी चाकाची खुर्ची तसंच रॅम्पची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, जिल्‍हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं आज निधन झालं, ते ७८ वर्षाचे होते त्यांना १९९६ साली 'दशद्वार ते सोपान' या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार तर 'कंदीलाचा उजेड' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य उत्��ृष्ट वाड:मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून चिंतन, विविधा, साहित्य सौरभ अशा अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कवी, गझलकार आणि प्रसिद्ध वक्ता म्हणून ते प्रसिद्ध होते.
****
यवतमाळ इथं एका अप्रिय घटनेप्रकरणी धुळे इथं आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. संबंधित समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव आणि मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथल्या जव्हेरी बाजार परिसरातून आज महसूल गुप्तचर विभागाने नऊ किलो सोनं आणि १६ किलो चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेल्या या सोनं-चांदी प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा आज संपत आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकर इथं सभा घेणार आहेत. तत्पूर्वी नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, महाविकास आघाडीमध्ये योग्य ताळमेळ असून, मित्रपक्षाचे कार्यकर्ते सोबत काम करत असल्याचं सांगितलं.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. तर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आज होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. 
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल, तसंच बीड लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी २७ तारखेला कोल्हापूर इथं जाहीर सभा घेणार आहेत. कोल्हापूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली शहरात आज पहाटे मतदान जनजागृती संदर्भात रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार, यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व नागरीकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली.
****
नाशिक जिल्ह्यात अंध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचल्यावर सहायकांच्या मदतीने मतदान करता येईल यासाठी मशिनवर ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरवण्यात येणार आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड ही संस्था ब्रेल लिपीतल्या मतपत्रिका तयार करुन देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
****
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था - एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला, ‘सनफ्लावर्स वेअर फर्स्ट वन टू नोज’ या चित्रपटाची फ्रान्स मध्ये होणाऱ्या ७७व्या कान चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. संस्थेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. १५ ते २४ मे दरम्यान होणार्या या महोत्सवामध्ये स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव, मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चीनमध्ये शांघई इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्व चषक स्पर्धा २०२४ मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिने महिला कंपाउंड पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत दुसरा क्रमांक मिळवला. आदिती स्वामीने ७०४ गुणांसह आठवा, तर परनीत कौर आणि अवनीत कौर या अनुक्रमे ७०३ आणि ६९६ गुणांसह १४ आणि २३ व्या क्रमांकावर पोचल्या. या खेळाडूंमुळे भारतीय महिला संघ एकूण दोन हजार ११८ गुणांसह पात्रता फेरीतला सर्वोत्कृष्ट संघ ठरला आहे.
****
भारतानं जागतिक ॲथलेटिक्स साखळी स्पर्धेसाठी १५ खेळाडुंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी चार आणि पाच मे रोजी बहामास मध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुरुष, महिला आणि मिश्र गटात हे स्पर्धक ४०० मीटर रिले प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 24 April-2024
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۴؍ اپریل  ۲۰۲۴ء؁
وقت: ۱۰:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
                پیش ہے خاص خبروں کی سرخیاں:
                ٭             پارلیمانی انتخابات کے د وسرے مرحلے کی تشہیری مہم آج ختم ہوگی؛ 26 اپریل کو ر ائے دہی۔
                ٭             مہایوتی اور مہاوِکاس اگھاڑی کے سرکردہ قائدین کی جانب سے تشہیری مہم تیز ۔
                ٭             چوتھے مرحلے کے انتخابات کیلئے کاغذاتِ نامزدگی داخل کرنے کا کل آخری دن ؛ جالنہ سےمہایوتی کے امیدوار راؤ صاحب دانوے کا امید واری پرچہ د اخل۔
اور۔۔۔٭     مراٹھواڑہ میں کل بجلی گرنے سے تین افراد کی موت ۔
***** ***** *****
                اب خبریں تفصیل سے:
                 پارلیمنٹ کے عام انتخابات کے دوسرے مرحلے کی تشہیری مہم کا آج آخری دن ہے۔ اس مرحلے میں 26 تاریخ کو رائے دہی کی جائےگی۔ ان میں ریاست کے ہنگولی، ناندیڑ، پربھنی، بلڈانہ، امراوتی، اکولہ، وردھا او ر ایوت محل-واشم پارلیمانی حلقے شامل ہیں۔ ان تمام انتخابی حلقوں میں سبھی سیاسی جماعتوں کے اہم رہنما اور قائدین انتخابی تشہیر ی جلسے کر رہے ہیں۔
                بی جے پی رہنما اور مرکزی وزیر داخلہ امیت شاہ نے کل اکولہ میں عظیم اتحا د کے امیدوار اَنوپ دھوترے کے تشہیر ی جلسے سے خطاب کیا۔ اس موقع پر انہوں نے وضاحت کی کہ ملک میں کوئی بھی حکومت درج فہرست ذاتوں اور قبائل سمیت دیگر پسماندہ طبقات کے ریزرویشن کو ختم نہیں کر سکے گا۔ امت شاہ آج امراوتی میں عظیم اتحاد کی امیدوار نونیت رانا کیلئے بھی تشہیری جلسوں سے خطاب کریں گے۔
                وزیر اعلیٰ اور شیوسینا کے سربراہ ایکناتھ شندے نے کل پربھنی ضلعے کے پاتھری میں عظیم اتحا د کے امید وار مہادیو جانکر کیلئے تشہیر ی مہم چلائی۔ اس دوران انھوں نے کہا کہ وہ بلالحاظِ مذہب و ملت او ر ذات پات کی تفریق کیے بغیر راستوں پر اُترکر ترقیاتی کام کر رہے ہیں۔ بی جے پی رہنما اورمرکزی وزیر بھاگوت کراڑ نے بھی کل پربھنی شہر میں پیدل ریلی نکال کر مہادیو جانکر کے حق میں تشہیر کی۔
                کانگریس پارٹی کے ریاستی صدر نانا پٹولے نے کل ناندیڑ میں مہاوکاس اگھاڑی کے ��میدوار وسنت راؤ چوان کی تشہیری مہم کے تحت ناڑیشور میں ایک جلسہ عام سے خطاب کیا‘ جبکہ شیوسینا ادھو بالاصاحب ٹھاکرے پارٹی کے صدر ادھو ٹھاکرے نے کل پربھنی میں مہا وِکاس اگھاڑی کے امیدوار سنجے جادھو کے تشہیری جلسے سے خطاب کرتے ہوئے بی جے پی کو تنقید کا نشا نہ بنایا اور کہا کہ بی جے پی کے پا س بولنے کیلئے کوئی موضوع نہیں ہے اس لیے وہ ہماری خاند انی سیاست پر اعتر اض کررہی ہے۔
***** ***** *****
                پارلیمانی انتخابات کے چوتھے مرحلے کیلئے کاغذاتِ نامزدگی داخل کرنے کی مہلت کل 25 تاریخ کو ختم ہورہی ہے او ر 26 تاریخ کو موصولہ امیدواری پرچوں کی جانچ ہو گی جبکہ 29 تاریخ تک امیدواری عریضے واپس لیے جا سکیں گی۔ چوتھے مرحلے میں اورنگ آباد، جالنہ، بیڑ، نندوربار، جلگاؤں، راویر، ماول، پونے، شرور، احمدنگر اور شرڈی پارلیمانی حلقے شامل ہیں۔
***** ***** *****
                جالنہ حلقۂ انتخاب سے عظیم اتحاد کے امیدوار راؤ صاحب دانوے نے کل اپنا امید واری پرچہ داخل کیا۔ اس حلقے میں اب تک 10 امیدواروں نے 16 کاغذات نامزدگی جمع کرائے ہیں۔ گزشتہ روز 11 خواہشمندوں نے 24 امیدو ار ی پرچے حاصل کیے جبکہ مجموعی طور پراب تک 88 امیدواروں نے 210 کاغذات نامزدگی حاصل کیے ہیں۔
                اورنگ آباد پارلیمانی حلقہ میں کل گیارہ امیدواروں نے اپنے امید واری عریضے جمع کیے۔ ان میں بھارتیہ یوا جن ایکتا پارٹی کے رویندر بوڑکھے، بہوجن مہا پارٹی کی امیدوار منیشا عرف مندا کھرات اور دیگر آزاد امیدوار شامل ہیں۔ اسطرح اب تک اورنگ آباد حلقۂ انتخاب میں  19 امیدواروں نے 27 کاغذاتِ نامزد گی داخل کیے ہیں۔
                بیڑ لوک سبھا حلقے میں کل پانچ خواہش مندو ں نے بطورِ آزاد امیدوار اپنے پرچۂ نامزدگی داخل کیے۔ اب تک اس حلقے میںمہاوکاس اگھاڑی کے بجرنگ سونونے سمیت 15 امیدواروں نے کاغذاتِ نامزدگی داخل کیے ہیں۔ اسی طرح اس حلقے میں گزشتہ روز 14 امیدواروں کی جانب سے 35  امیدواری پرچے حاصل کرنے کی اطلاع ہمارے نمائندے نےدی ہے۔
                 احمد نگر لوک سبھا حلقے سے راشٹروادی کانگریس شرد چندر پوار پارٹی کے امیدوار نیلیش لنکے نے کل اپنا پرچہ نامزدگی داخل کیا۔
***** ***** *****
                ناگپور پارلیمانی حلقے سے عظیم اتحاد کے امیدوار نتن گڈکری کی تشہیری ریلی میں اسکولی طلبہ کی شرکت سے متعلق متعلقہ اسکولوں کے ڈ ائریکٹر وں کیخلاف کارروائی کے احکامات دئیے گئے ہیں۔انتظامِ عامہ محکمے نے اس معاملے میں ناگپور کے محکمۂ تعلیم کے افسران کو آگاہ کیا ہے۔ دریں اثنا اس معا ملے میں گڈکری کے خلاف کب کارروائی ہوگی اس طرح کا سو ال کانگریس ترجمان اَتل لونڈھے نے کیا ہے۔
***** ***** *****
                بارامتی لوک سبھا حلقۂ انتخاب میں ایک آزاد امیدوار کو ’’بگل‘‘ انتخابی نشان دینے سے متعلق راشٹروادی کانگریس شردپوار گر وپ نے مرکزی انتخابی کمیشن سے شکایت کی ہے۔ راشٹرواد ی کانگریس شرد پوار کو انتخابی کمیشن نے بگل بجانے والا آدمی نشان دیا ہے۔ بار امتی لوک سبھا حلقۂ انتخاب میں اس پارٹی کی ا میدوار سپر یہ سولے بھی اسی نشان پر انتخاب لڑرہی ہیں۔ اس حلقے میں د وسرے امیدوار کو کمیشن نے بگل انتخابی نشان دینے سے متعلق پارٹی نے ناراضگی ظاہر کی ہے، جبکہ کمیشن نے یہ اعتراض خارج کردیا ہے۔
***** ***** *****
                ریاست کے پارلیمانی انتخابی حلقوں کے امیدواروں کی معلومات‘ انتخابات میں حصہ لینے کے ان کے مقصد اور مقامی سیاست کا جائزہ لینے کیلئے آکاشوانی نے ایک پروگرام ’’لوک نِرنئے مہاراشٹراچا‘‘ شروع کیا ہے ۔اس پروگرام کی آج کی قسط میں سانگلی لوک سبھا حلقے کا جائزہ پیش کیا جائےگا۔ شام سوا سات بجے یہ پرو گر ام ممبئی آکاشوانی مرکز سے نشر کیا جائے گا۔
ؕ***** ***** *****
یہ خبریں آکاشو انی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
                چھترپتی سمبھاجی نگر، بیڑ، جالنہ اور ہنگولی ضلعوںمیں کل غیر موسمی بارش ہوئی۔ اس د و ر ان بجلی گرنے سے چھترپتی سمبھاجی نگر ضلعے میں دو اور ناندیڑ ضلع میں ایک شخص کی موت ہو گئی۔ کنڑ تعلقہ کے موضع رِٹھی میں راؤ صاحب نیل نامی جواں سال مزدور کی موت واقع ہوئی‘ جبکہ اجنتا میں طوفانی بارش سے بچنے کیلئے درخت کے نیچے ٹھہرے ہوئے کسان پر بجلی گرنے سے اس کی موت ہو گئی۔ اسی طرح ناندیڑ ضلعے کے کنوٹ تعلقہ کے اِرےگاؤں میں ایک شخص بجلی کے سبب ہلاک ہوگیا۔ ضلعےکے کئی علاقو ں میں پیر کی شب بھی ژالہ باری کے ساتھ غیر موسمی بارش ہوئی تھی۔
***** ***** *****
                ریاست میں مختلف مقامات پر مذہبی یاتر ائوں عقیدت مندو ں کی بھیڑ کو مدِنظر رکھتے ہوئے محکمۂ اغذیہ و ادویات نے اشیائے خو رد و نوش میں ملاوٹ کی جانچ مہم شر وع کی ہے۔ کل اس مہم کے د ور ان ناسک ضلع میں واقع مشہور شکتی پیٹھ وَنی میں دو ہزار کلو ملاوٹ شدہ مٹھائی ضبط کی گئی۔ اس مٹھائی کی قیمت تقریباً پانچ لاکھ 83 ہزار روپے ہونے کی وضاحت اس سے متعلق خبر میں کی گئی ہے ۔ سپت شرنگی قلعے کے روپ وے کامپلیکس علاقے میںواقع دکانوں پر یہ کارروائی کی گئی۔
***** ***** *****
                بیڑ پارلیمانی انتخابی حلقے کی انتخابی افسر دیپا مدھوڑ منڈے کا انٹرویو آج صبح گیارہ بجے آکاشوانی بیڑ مرکز سے نشر کیا جائے گا۔ اس انٹرویو میں ضلع انتخابی افسربیڑ پارلیمانی حلقے میں انتخابات کے سلسلے میں انتظامیہ کی جانب سے کی گئی تیاریوں، ر ائے دہی فیصد کو بڑھانے کیلئے ضلع انتظامیہ کی مختلف بیداری سرگرمیوں کے بارے میں معلومات دیں گی۔
***** ***** *****
                دھاراشیو میں کل بیداریِ رائے دہندگان سائیکل ریلی نکالی گئی اور تصویری نمائش کا اہتمام کیا گیا۔ ضلع کلکٹر سچن اومباسے کے ہاتھوں دونوں ہی پر وگراموں کا افتتاح عمل میں آیا۔ اسکولی طلبہ کی سائیکل ریلی نے پورے شہر میں گشت کرتے ہوئے عو ام سے را ئے دہی کرنے کی اپیل کی۔ ضلع میں رائے دہندگان کو حقِ رائے دہی سے متعلق بیدار کرنے کیلئے ہر اسکول کے طلبہ اپنے سرپرستوں کو جذ باتی خط لکھ کر را ئے دہی کرنے کی اپیل کررہے ہیں‘ اسی طرح انسانی زنجیر بناکر ا ور نکڑ ناٹک جیسی سرگرمیوں کے ذریعے حقِ رائے دہی کا پیغام دیا جارہا ہے۔
***** ***** *****
                انسپکٹر جنرل آف الیکشنز نرنجن کمار نے غیر جانبدار انہ اور خوف سے پاک ماحول میں پارلیمانی انتخابات کے انعقاد کیلئے سبھی سے تعاون کرنے کی اپیل کی ہے۔وہ کل لاتور ضلع کلکٹر دفتر میں امیدو ار وںکے اجلاس سے خطاب کررہے تھے۔ اس موقع پر انتخابی اخراجا ت شعبہ کے انسپکٹرسنجیب بینرجی نے امید واروں کو متعلقہ رجسٹر میں اپنے انتخابی اخراجا ت کا اندراج کرنے کی ہدا یت دی۔
***** ***** *****
                بزرگ ادیب رشی کیش کامبڑے نے خیال ظاہر کیا ہے کہ انسانی دنیا کتابوں کی معرفت پہچانی گئی ہے۔کل عالمی یومِ کتاب کے موقع پر چھترپتی سمبھاجی نگر میں مرا ٹھواڑہ سا ہتیہ پریشد کے ہال میں وہ خصوصی اجلاس سے خطاب کررہے تھے۔ پریشد کے صدر کوتِک رائو ٹھالے پاٹل نے مراٹھی کتب کی تفصیلی تار یخ بیان کی۔ اس کے بعد پروفیسر مہیش کھرات کی صدارت میں منعقدہ مشاعرہ میں 15  شاعروں نے اپنی اپنی تخلیقات پیش کیں۔
***** ***** *****
                جالنہ میں ضلع کلکٹر ڈاکٹر شری کرشن پانچاڑ کی صدارت میں کل قبل از خریف ہنگام کا جائزاتی اجلاس منعقد ہوا۔ اس موقع پر انہوں نے کسانوں کو بیج، کھاد اور دیگر زرعی اشیاء بروقت اور معقول مقدار میں فراہم کرنے کیلئےمنظم منصو بہ بندی کرنے کی ہدایت کی۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
                آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر:
                ٭             پارلیمانی انتخابات کے د وسرے مرحلے کی تشہیری مہم آج ختم ہوگی؛ 26 اپریل کو ر ائے دہی۔
                ٭             مہایوتی اور مہاوِکاس اگھاڑی کے سرکردہ قائدین کی جانب سے تشہیری مہم تیز ۔
                ٭             چوتھے مرحلے کے انتخابات کیلئے کاغذاتِ نامزدگی داخل کرنے کا کل آخری دن ؛ جالنہ سےمہایوتی کے امیدوارراؤ صاحب دانوے کا امید واری پرچہ د اخل۔
اور۔۔۔٭     مراٹھواڑہ میں کل بجلی گرنے سے تین افراد کی موت ۔
***** ***** *****
                اس کے ساتھ ہی علاقائی خبریں ختم ہوئیں۔
                 ان خبروں کو آپ AIR چھترپتی سمبھاجی نگر یوٹیوب چینل‘ پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔
***** ***** *****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करणार नसल्याचं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ स्पष्ट केलं आहे. नाशिक इथं काल झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीकडे निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक पक्षात अनेक उमेदवार आहेत, त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार आपण करू असंही भुजबळ यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने काल ��ार पिस्तुल, दोन कट्टे, १८ काडतुसे आणि एक मॅगझीन असा तीन लाख ४०  हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला. शस्त्र तस्करास अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
****
दिशाभूल करणार्या जाहिरातींबाबत आपण गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. दिशाभूल करणार्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल पतंजली आयुर्वेदच्या प्रलंबित अवमान प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, इतर अनेक कंपन्यांच्या दिशाभूल करणार्या जाहिरातींकडे लक्ष वेधलं. न्यायालयानं याचिकाकर्त्या भारतीय वैद्यकीय संघाटनेला सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या अनैतिक पद्धतींच्या तक्रारींबाबतही सावध केलं आहे.
****
मध्यम श्रेणीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचं काल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणानं कमांडची परिचालन क्षमता सिद्ध केली असून, नवीन तंत्रज्ञानाचं प्रमाणीकरण केल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्या���ह गारपिट झाली. यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. चिखली तालुक्यात शिरपूर इथं वीज अंगावर पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने शासकीय वाहनांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 days
Video
youtube
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2024 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र
0 notes
airnews-arngbad · 4 days
Video
youtube
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केंद्राचे दिनांक 23.04.2024 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस
महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचाराला वेग
जालना मतदार संघातून महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आणि
हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा उद्या अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षांचे दिग्गज ��ेते आणि स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आहेत.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शहा यांची उद्या अमरावती मध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. भाजप नेते, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होत आहे.
सांगली इथे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात दहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ९६ मतदारसंघात येत्या १३ मे ला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. या मतदारसंघात आत्तापर्यंत १० उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. आज एकूण ११ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली तर आजपर्यंत ८८ जणांनी २१० उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज दिवसभरामध्ये अकरा उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर केले. यामध्ये भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र भास्कर बोडखे, बहुजन महा पार्टीच्या उमेदवार मनीषा उर्फ मंदा खरात, आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत या मतदार संघात १९ जणांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड इथून आज पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासह १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या मतदार संघातून आज चौदा उमेदवारांनी पस्तीस अर्ज घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत फेरविचार करणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आज भुजबळ यांना उमेदवारीचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी करण गायकर यांना, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
नागपूर मतदार संघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारफेरीत शालेय विद्यार्थ्यांना सहभागी केल्याप्रकरणी संबंधित शाळा संचालकांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सा��ान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात नागपूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. दरम्यान, या प्रकरणात गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर, माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधांची जाहिरात प्रसिद्ध केल्या प्रकरणी पतंजलीनं दाखल केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज तिसऱ्यांदा फेटाळला. न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना येत्या ३० एप्रिलला व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या इतर कंपन्यांविरोधात केंद्रसरकारनं आतापर्यंत कोणती कारवाई केली, असा प्रश्नही न्यायालयानं विचारला आहे. रुग्णांना हेतुपूर्वक महाग औषधं लिहून देणाऱ्या ॲलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं करावी, अशी सूचनाही न्यायालयानं केली.
****
दिल्लीच्या कथित मद्यघोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अकरा एप्रिलपासून अटकेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के.कविता यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं येत्या सात मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केंद्रीय अन्वेषण संस्था - सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.
याच प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीही न्यायालयानं सात मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यानंतर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केजरीवाल यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.
****
हनुमान जन्मोत्सव आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सुपारी हनुमान तसंच जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरांसह ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
मुंबईच्या जुहू चौपाटीवर हनुमान जयंतीनिमित्त वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी हनुमानाची दहा फूट उंच प्रतिकृती साकारली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची प्राचीन परंपरा आजही पाळण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातही हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं, तसंच जागोजागी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या रविवारपासून सुरू असलेल्या चैत्र पौर्णिमा यात्रेत आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
****
धुळे शहरातल्या श्री एकवीरा देवी ���ात्रा उत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीनं या मंदिरालगत उभारण्यात आलेल्या मतदान जनजागृती कक्ष आणि मदत केंद्राचं आज धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.
****
वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज वाशीम शहरात दीड किलोमीटर अंतराच्या मानवी साखळीतून मतदार जागृती करण्यात आली. या मानवी साखळीमध्ये जिल्हा प्रशासनातल्या दोन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध शाळांचे विद्यार्थी, सामाजिक संघटना, लोककलावंत आणि स्थानिक सहभागी झाले होते.
****
धाराशिव इथं आज मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली तसंच आणि पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केलं. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सायकल फेरीनं संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेलं भावनिक पत्र, तसंच विद्यार्थ्यांची मानवी साखळी, पथनाट्य, आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे.
****
लोकसभा निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते.
****
हुजूर साहिब नांदेड - रायचूर- हुजूर साहिब नांदेड ही एक्सप्रेस गाडी येत्या सव्वीस मे पर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, नांदेड -हजरत निजामुद्दीन दिल्ली या विशेष गाडीला ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज प्रक्रियेला वेग;औरंगाबाद इथून महायुती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
उस्मानाबाद इथून चार तर लातूर इथून तीन उमेदवारांचे अर्ज मागे
गुजरातमध्ये सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय
आणि
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश याला कॅनडातल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याला आता वेग आला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दिवसभरात चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्ष��ेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खैरे यांची प्रचार रॅली काढण्यात आली.
महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संदिपान भुमरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, आज १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली असून आतापर्यंत ११४ उमेदवारांनी २१९ अर्जांची उचल केली आहे.
बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, या मतदार संघात आज तीन वाजेपर्यंत १४ उमेदवारांनी २६ अर्जांची उचल केली आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आजही २२ जणांनी २३ उमेदवारी अर्ज घेतले. आतापर्यंत ७७ जणांनी १८६ अर्ज घेतले आहेत, तर आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला. हिना गावित यांनी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी तर शिर्डी लोकसभा मतदार संघात आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर राहता इथं झालेल्या प्रचार सभेला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील सांनी संबोधित केलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे ३१ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या उमेदवारांना चिन्ह वाटपही आज करण्यात येत आहे.
लातूर मतदार संघातून छाननीअंती वैध ठरलेल्या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी आज माघार घेतली, आता २८ उमेदवार या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्यासह अकरा जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता या मतदार संघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पैलवान चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजीत सिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी परस्परांच्या आचारसंहिताभंगाच्या तक्रारीवरून खुलासा करण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. मुंबई इथल्या तेरणा वैद्यकीय महाविद्यालय इथं रुग्णांवरील उपचारादरम्यान शासकीय योजनेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी एका खाजगी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावरून अर्चना राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रतिनिधींनी हा मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती त्यावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
****
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अनेक विकास ��ामे होत असतील तर या सरकारला का पाठिंबा देऊ नये, अशी भावना अंतुले यांनी व्यक्त केली. आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज निवडणूक जाहीरनामा जाहीर केला. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अठरापगड जाती तसंच बारा बलुतेदारांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा जाहीरनामा, राज्यासह देशाच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आज त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला, तर उर्वरित उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या एका १४ वर्षीय लैंगिक अत्याचार पीडित मुलीच्या गर्भपाताला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. २८ आठवड्यांचा हा गर्भ काढून टाकण्यासाठी मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठातांना डॉक्टरांचं एक पथक नियुक्त करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे, तर या गर्भपातासाठी तसंच उपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च राज्य सरकार वहन करणार आहे. गर्भपाताच्या कायद्यानुसार विवाहिता, दिव्यांग, अल्पवयीन तरुणी किंवा अत्याचार पीडितांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे, मात्र या प्रकरणात १४ वर्षीय बालिकेच्या शारीरिक तसंच भावनिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानं, न्यायालयानं गर्भपाताची परवानगी दिली आहे.
****
भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश यानं कॅनडा इथं झालेल्या कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेशने आज झालेल्या १४व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली आणि १४ पैकी नऊ गुणसंख्येच्या बळावर विजय मिळवला. यानंतर विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी सर्वांत तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी गुकेशचे अभिनंदन केलं आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी येत्या शनिवारी २७ तारखेला होणार आहे. निवडणूक संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी ही माहिती दिली. निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून ही तपासणी केली जाणार आहे. निवडणूक काळात तीन वेळा नोंदवही तपासणी केली जाणार असल्याचंही याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे निवडणूकीच्या अनुषंगानं सुरू असलेल्या तपास मोहिमेत गावठी बनवाटीचे दोन पिस्तूल, एक खंजीर तसंच सात जणांकडून तलवारी जप्त करण्यात आल्या. तसंच जुगार अड्यांवर छापे घालून पोलिसांनी ९१ हजार ६१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड इथं गोदावरी नदीपात्रात हजारो मासे मृत आढळले आहेत. बंदा घाट परिसरात आज हे चित्र दिसून आलं. जून २०२० मध्येही असा प्रकार घडला होता.
****
0 notes
airnews-arngbad · 5 days
Video
youtube
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.04.2024, यवतमाळ जिल्हा वार्तापत्र
0 notes
airnews-arngbad · 5 days
Video
youtube
     آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں:  بتاریخ: 22  اپریل  2024‘ وقت: صبح  09:00 تا 09:10    
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राज्यातल्या अकरा मतदारसंघांत ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध
देशात आता स्मार्ट खेड्यांची गरज - नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
पक्ष प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळणार नाही- उद्धव ठाकरे
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघाचं बंगळुरू संघासमोर २२३ धावांचं आव्हान
****
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे. या टप्प्यासाठी राज्यातल्या अकरा मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. अर्ज छाननीमध्ये रायगड लोकसभा मतदार संघात २१, बारामती- ४६, उस्मानाबाद- ३५, लातूर- ३१, सोलापूर- ३२, माढा इथं ३८ अर्ज वैध ठरले आहे. त्याच बरोबर सांगली इथं २५ अर्ज तर सातारा- २१, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- ९, कोल्हापूर- २७ आणि हातकणंगले मतदारसंघात- ३२ अर्ज वैध ठरले असल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे.
****
देशात आता `स्मार्ट` शहरांची नव्हे तर `स्मार्ट` खेड्यांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांना आता अन्नदाता होण्यासोबत ऊर्जादाता, इंधनदाता बनवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. देशामध्ये इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉलचे पंप उघडण्यात आल्यास प्रदूषणापासून मुक्ती मिळेल आणि सोबत देशाचा इंधनावरचा खर्च कमी होईल, असं त्यांनी नमूद केलं. शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर व्हावा. मराठवाडा, विदर्भात कापूस, संत्रा, सोयाबीन या पीक उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले जात असल्याचं गडकरी म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच खासदार अशोक चव्हाण यांनी मनोगतं व्यक्त केली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची देगलूर इथंही प्रचार सभा झाली त्यावेळी विकासासाठी भाजपच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली असली तरी आपण प्रचारगीतातून हे शब्द वगळणार नाही, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. यासाठीचा न्यायालयीन लढा आपण लढू, असंही ते मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. काही दिवसांपूर्वी आपण मशाल चिन्हासाठीचं प्रचारगीत बनवलं होतं. मध्यप्रदेश आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तर, सत्ता आल्यास सर्वांना मोफत अयोध्या दौरा घडवण्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. हे प्रकार धर्माच्या आधारावर मत मागण्याचा प्रचार नाही का, अशी विचारणा आपण निवडणूक आयोगाकडे केली होती, असं ठाकरे म्हणाले. त्याबाबतचं स्मरणपत्रही आपण पाठवलं होतं पण अद्याप निवडणूक आयोगानं यावर आपल्याला उत्तर दिलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं.
****
भारत आज पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि आपल्याला आता लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनायचं असेल तर हे सरकार पुन्हा यायला हवं, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल इथं सभा घेतली, त्यावेळी नड्डा बोलत होते. मजबू�� आणि स्थिर सरकार होतं म्हणून आपण ३७० कलम हटवू शकलो, तीन तलाक रद्द करू शकलो. आता आपल्याला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवायचा असेल तर भाजप पुन्हा सत्तेत यायला हवं, असंही नड्डा यांनी यावेळी नमूद केलं.
****
जगातले प्रमुख उद्योगपती एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे कारण त्यांना आता देशात सरकार बदलणार असल्याचा अंदाज आला असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत या संदर्भातलं निवेदन केलं.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावीर जयंतीनिमित्त क्रांती चौक-पैठण गेटमार्गे गुलमंडी अशी मिरवणूक काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातही बोईसर, पालघर शहर तसंच सांगली शहरातही महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
****
आज नागरी सेवा दिन आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाता संघानं निर्धारित २० षटकांत सहा बाद २२२ धावा केल्या. त्यात कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३६ चेंडुंमध्ये ५० धावा तसंच फिलीप्स सॉल्टच्या १४ चेंडुंमध्ये ४८ धावांचा समावेश होता. आतापासून थोड्या वेळापुर्वी पर्यंत बंगळुरू संघानं तीन षटकांत एक बाद पस्तीस धावा केल्या आहेत.
आजचा दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.
****
नांदेडमध्ये आज नवमतदार आणि शाळकरी खेळाडुंनी मतदान जनजागृती ‍फेरी आणि उपक्रमामध्ये सहभाग घेतला. शहरातले मान्यवर, खेळाडू, शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी या फेरीमध्ये सहभागी झाले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते `मतदान करणारचं` या `सेल्फी पॉइंट`चं यावेळी उद्घाटन करण्यात आलं.
****
लातूर लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनातर्फे 'स्वीप' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूरच्या सायकल संघटनेतर्फे मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. 'सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' असा संदेश याद्वारे देण्यात आला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय इथं ही फेरी सुरू झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरुन पुन्हा कार्यालयात फेरीचा समारोप झाला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या सेालापूर लेाकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी आर्जांच्या छानणी काल झाली. यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसंच सेालापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. माढा लोकसभेसाठीच्या चार उमेदवारांचे आठ तर, सोलापूर लोकसभेच्या नऊ उमेदवारांचे दहा उमेदवारी अर्जही अवैध ठरले. या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.
****
बालसाहित्य लिहिणाऱ्यांनी नव्या पिढीच्या संकल्पना समजून घेण्याबाबत जागरुक राहायला हवं, अशी अपेक्षा नामवंत कवी प्रा. दासू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन काल पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथं झालं, त्यावेळी वैद्य बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी या संमेलनाचं उदघाटन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दिवंगत संजय उबाळे अर्थात बुध्दप्रिय कबीर यांच्या ५५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावरचं `कॉम्रेड, जयभीम` या डॉ. श्यामल गरूड लिखित काव्यात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सुभाष लोमटे, प्रा.राम बाहेती, मंगला खिवंसरा, प्रा.दिलीप महालिंगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू वाल्मिक सरवदे यांनी यावेळी मनोगतं व्यक्त केली. बुद्ध लेणी परिसरातल्या विहारामध्ये झालेल्या या प्रकाशानाला दिवंगत बुद्धप्रिय कबीर यांचा मित्र परिवार उपस्थित होता.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी इथं उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत २१ लाख रुपये किंमतीपेक्षा अधिक रकमेचा बनावट, विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातली ही कारवाई असल्याचं कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
मुंबई-पुणे जलद महामार्गावर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण मोटार अपघातामध्ये एका पोलिस उप निरीक्षकचा मृत्यू झाला. सूरज चौगुले असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ते मुंबईच्या विक्रोळीमधील पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
****
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातल्या मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं वेगानं सुरू असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रीक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. पैकी आतापर्यंत ४ लाख ६४ हजार ३७४ मेट्रीक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४५.४४ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे दिनांक ३१ मे पर्यंत नाल्‍यातील गाळ काढण्‍याचं काम पूर्ण केलं जाईल, असंही मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. जागतिक स्तरावर सध्याच्या युध्द्जन्य परिस्थितीत भारताच्या तिर्थंकरांची शिकवण अधिकच महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विश्वशांतीसाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे तसंच महावीर यांच्याविषयी युवा पीढीचं समर्पण बघता देश योग्य दिशेनं मार्गस्थ असल्याचा विश्वास वाटतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
महावीर जयंती निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-यु.जी.सी.च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर येत्या दहा मे पर्यंत ही नोंदणी आणि बारा मे पर्यंत शुल्क जमा करता येईल, असं युजीसीनं म्हटलं आहे. येत्या १६ जुन रोजी ही परीक्षा होणार असून संशोधन गौरववृत्ती, सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसह विविध विषयांत विद्यावाचस्पती -पी.एच.डीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपुर्ण बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अन्य वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या, १८००-२२१-९५० या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर १८ एप्रिलपर्यंत ७ हजार ३१२ लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक, म्हणजे १ हजार ५७५ दूरध्वनीची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे. या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी २४ तास मनुष्यबळ नियुक्त  करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड, हिंगोली लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. या मतदार संघामध्ये येत्या २६ तारखेला मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार ६२ मतदान केंद्रावर मतदान हो��ार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचं दोन फेऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १०८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचंही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
गुंतवणूकदारांची पाचशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत शोधमोहीम राबवली. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग अॅप आणि वेबसाइटवरून बेकायदा ऑनलाइन ट्रेडिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विविध कागदपत्रं, डिजीटल उपकरणं यात जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे तीन कोटी रुपये असलेली बँकखाती गोठवण्यात आली असून यामध्ये क्रिप्टोकरंसी तसंच सोन्याच्या नाण्यांसह ३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने रंगणार असून यातला पहिला सामना  कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बंगळूरू  यांच्यात कोलकाताच्या  ईडन गार्डन मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.
****
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचारी सभेतर्फे करण्यात आलं आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्र्यांकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधिज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच वीजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes