Tumgik
#त्याचं
Text
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं…
महामार्गाचं उद्घाटन, त्याच मंचावरून फडणवीसांनी पंतप्रधानांना पुढच्या विकासकामाच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं… नागपूर : आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
View On WordPress
0 notes
igamravati · 1 year
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
shrikrishna-jug · 6 days
Text
निसर्ग सृष्टीचं सादरीकरण.
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले.लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा – मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे.जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतलं बचावकार्य आज सकाळी साडेदहा वाजेदरम्यान संपवण्यात आलं. मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी आज पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. जवळपास ६३ तास चाललेल्या या बचावकार्यात ९१ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेट्रोल पंपाच्या अनुषंगाने फलकासंदर्भातल्या परवानग्या तपासण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले. शहरात असणाऱ्या अशा पद्धतीच्या सर्व जाहिरात फलकांची तपासणी करण्यात येत आहे. तसंच सर्व बेकायदेशीर फलकांविरोधात कारवाई सुरु असून, सर्व फलकांना स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, १३ मे रोजी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
यंदाच्या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परिक्षा सीयुईटीत काल ७५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. काल एकाच दिवशी झालेल्या परिक्षेसाठी, ३७९ शहरात दोन हजार १५७ परिक्षा केंद्रांवर एकूण ११ लाख ४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. दरम्यान, दिल्ली केंद्रासाठी काल होणारी ही परिक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून आता ही परिक्षा २९ मे रोजी होईल.
****
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषि विभागामार्फत विभाग आणि प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक��ष सुरु करण्यात आला आहे. ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी ही माहिती दिली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं, खतं, किटकनाशकं आदींबाबत उदभवणाऱ्य़ा अडचणींचं निराकरण व्हावं, तसंच काळाबाजार आणि साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने हा कक्ष सुरु करण्यात आला आहे.  
****
राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाळला जात आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेत विविध जनजागृतीपर कार्यक्रम होत आहेत. नागरिकांनी घरात कोणतेही साठविलेलं पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये, पाणी साठवणुकीचं भांडं आठवड्यातून एकदा रिकामं आणि कोरडं करुन भरावं तसंच डेंग्यू ताप टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केलं आहे. डेंग्यु संदर्भात इंडिया फाईट डेंग्यू हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार करण्यात आलं असून या ॲप्लिकेशनचा नागरिकांनी वापर करावा,  डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्याची कामं लोकसहभागातून हाती घ्यावीत असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. अशा कामांना शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना त्यांनी दिल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार असून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचा संकल्प प्रत्येकानं करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. वृक्षलागवड या चळवळीला लोकचळवळीचं स्वरुप येणं गरजेचं आहे. यासाठी माय गार्डन, माय प्राईड मोहीम राबविण्यात येईल. तसंच स्वयंसेवी संस्थांनी शहरी भागात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची संकल्पना राबवावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात आज आणि उद्या जोराचे वारे, वीजा, गारपीटींसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  
****
यंदाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक दरम्यान, भारतीय सांकेतिक भाषा आणि ऑडिओ वर्णनात्मक समालोचन प्रदान करण्यासाठी इंडिया साइनिंग हँड्स प्रायव्हेट लिमिटेडसह अनेक खाजगी क्रीडा वाहिनींच्या सहकार्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी, सरकारच्या सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
****
व्हिएतनाम इथं सुरु असलेल्या आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुसरं पदक प्राप्त झालं आहे. सीता, हर्षा सिंघा आणि उषा धामणस्कर या तिन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुमसे खेळ प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून दिलं. या खेळाडूंनी ३० गुणांची कमाई करत पदक प्राप्त केलं. १४ मे रोजी मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अरुणाचल प्रदेशच्या रुपा बायोर हिनं पुमसे गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. ही स्पर्धा १८ मेपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
thedhananjayaparkhe · 2 months
Text
Title: "The Enigma of Bhakti Marg: Unraveling Path Pride"
Part 1: Poetic Content Limericks: कष्टदायक आहे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग सुखदायक सार्ग। गीतेत शिरावे, कर्मयोग तयार करे, मोक्षासाठी भक्तीचा मार्ग।। निर्गुणाची उपासना करण्यात, मोक्ष मिळवणं अत्यंत कठीण। भक्तिमार्गाचं श्रेयस, साधतांना उत्तम लागतं, भगवंत सांगतो त्याचं रहस्य।। अनेक पंथांचे नेमके आहे, भगवंताचं श्रेयस ह्याचं आहे। संतांच्या गोष्टींना लक्षात घ्या, भगवंतावर निश्चित भार टाका, पंथाभिमान…
View On WordPress
0 notes
nirannjan17 · 3 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तय��री जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उप��िल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
smenayetk11 · 5 months
Text
Top Birthday Wishes For Wife In Marathi
Tumblr media
When it comes to celebrating your wife's birthday in Marathi, finding the perfect words to express your love and appreciation can make the occasion even more meaningful. Marathi, a beautiful language spoken in Maharashtra, India, is a wonderful way to bring a personal touch to your birthday wishes. So, why not surprise your wife with heartfelt Marathi birthday wishes that will make her day extra special? Marathi birthday wishes for your wife offer a unique way to convey your love and make her feel cherished. With a rich history and cultural significance, Marathi is a language that holds a special place in the hearts of many. Whether you choose a poetic expression, heartfelt message, or a simple phrase, your birthday wishes in Marathi will speak directly to your wife's heart, leaving a lasting impression on her special day. Looking for the perfect birthday wishes for your wife in Marathi? Celebrate her special day with heartfelt messages that will make her feel loved and cherished. Whether you want to express your love, gratitude, or wishes for a joyful year ahead, we have compiled a collection of top birthday wishes in Marathi that will surely delight your wife. Make her feel special on her birthday with these heartfelt messages.
Tumblr media
Source: unsplash.com
Unique Birthday Wishes for Your Wife in Marathi
Your wife's birthday is a special occasion to celebrate the amazing person she is and to show your love and appreciation for her. If your wife speaks Marathi, surprising her with heartfelt birthday wishes in her native language can make the day even more special. Marathi is a beautiful language spoken by millions of people in Maharashtra, India, and it holds a deep cultural significance. When it comes to expressing your love and wishes for your wife's birthday in Marathi, you can choose from a variety of heartfelt messages, poems, and quotes that capture your emotions. Whether you want to express your profound love, appreciation, or simply wish her a happy birthday, there are numerous options to choose from. Let's explore some unique birthday wishes for your wife in Marathi that are sure to make her feel loved and cherished on her special day. One beautiful way to express your love and admiration for your wife on her birthday is by saying, "तुझ्यासाठी मी जीवन घेतले, जीवन झाले सुंदर असेल तरी एकच वचन पाहिलंस या." This translates to "I chose a life for you, and if life is beautiful, it is because of you." This heartfelt message showcases the deep love and gratitude you have for your wife.
Tumblr media
Source: unsplash.com
Frequently Asked Questions
Here are some commonly asked questions about top birthday wishes for wife in Marathi: 1. How can I wish my wife a happy birthday in Marathi? To wish your wife a happy birthday in Marathi, you can say "वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" which translates to "Happy birthday wishes, heartfelt birthday wishes!" Alternatively, you can also use phrases like "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझं सौभाग्य तुमचं प्रमाणतो!" which means "Heartfelt birthday wishes, you are my true happiness!" These personalized messages will surely make her feel loved and cherished on her special day. 2. What are some romantic birthday wishes I can send to my wife in Marathi? Here are a few romantic birthday wishes you can send in Marathi: 1. "तुमचं वाढदिवस आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं दिवस. तुमच्याकडून जे प्रेम आणि आनंद मिळेल त्याचं अनंत आहे." Translation: "Your birthday is the most beautiful day in my life and the most important day in my life. The love and joy I receive from you are infinite." 2. "तुमचं वाढदिवस घेतलंय त्यामुळे माझं रोजचं वाढतंय. तुमच्या प्रेमाने कोणतेही दुःख आणि कष्ट मला वाटत नाही. तुमचं वाढदिवस असेल तर जरा वेगळंच." Translation: "Your birthday makes my everyday life better. I don't feel any sorrow or hardship with your love. If it's your birthday, then let's make it a little different." 3. Can you suggest some funny birthday wishes for my wife in Marathi? Of course! Here are a few funny birthday wishes you can share with your wife in Marathi: 1. "तुमचं वाढदिवस आपल्याला ते आहे, जेव्हा प्रेमही आपल्याला कोणतंही सोंटं देतंय तेव्हा आपल्याला अवघड वस्त्र घालावं लागतंय. पण ही वस्त्र आपण खाली पोहोचवणं जरा विसरु नका!" Translation: "Your birthday is when love plays pranks on us and makes us wear funny clothes. But don't forget to send those clothes down!" 2. "तुमचं वाढदिवस आहे, माझ्यासह अशी कोणतीही हुंकार वाहावी न बायको birthday status editing wife birthday whatsapp status When it comes to celebrating your wife's birthday in Marathi, here are some heartfelt wishes that will make her day extra special. Share your love and appreciation with these top birthday wishes: 1. My dearest wife, on your birthday, I wish you abundant happiness, good health, and success in all your endeavors. You are the light of my life and the reason for my smile. May your special day be as beautiful as you are. Happy birthday! 2. Today is the perfect day to express my gratitude for all the love and care you bring into my life. You are not only my wife but also my best friend. I am truly blessed to have you by my side. Wishing you a fantastic birthday filled with joy and laughter. 3. Happy birthday to the woman who stole my heart and makes every day worth living. Your love is my strength and inspiration. May this birthday bring you immense happiness and unforgettable memories. I love you more than words can express. 4. On your special day, I want to remind you how much you mean to me. You are the anchor that keeps me grounded and the wings that lift me higher. Today and every day, I am grateful to have you as my wife. Happy birthday, my love! 5. As we celebrate your birthday, let's cherish the beautiful moments we have shared together and look forward to creating many more. You bring so much joy and love into my life, and I am forever grateful to have you as my wife. Have a wonderful birthday! Earn $100-$1000 Weekly Using Easiest Copy-Paste Income Method   Read the full article
0 notes
igamravatirange · 6 months
Text
सुख जवापाडे, दुःख पर्वताएवढे
आज पेपर वाचलेच नाहीत. दुःख हे दुःखदच राहू देणार. त्याच्यावर कसलीही फुंकर घालणार नाही. ते हळूहळू कमी होत जाईल. मुलाबाळांचे चेहरे पाहून वाईट वाटतं. त्यांचा हिरमोड झालेला बघवत नाही. ही परिस्थिती हताशपणे बघण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. वाड्यातलं कुणीतरी गेल्यासारखं सुतक पाळायचं. ज्या कुणाला विश्लेषण करायचे पैसे मिळतात त्याचं ऐकायचं नाही. भारतीय संघाच्या लायनीत व्हर्च्युअली सुन्न होऊन उभं राहायचं. मटेरियल किडेमकौड्यांच्या दुनियेतून बाजूला होऊन खेळाडूंच्या मनःस्थितीशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा.
खेळाच्या दलालांचा पालापाचोळा बाजूला करून पाहिला तर शेवटी खेळणारी आपलीचं पोरं ती. इतके दिवस घराच्या हॅालमध्ये या ना त्या कारणाने टीव्हीतून डोकावणारी, म्यूट दाबला की मूकपणे जाहिराती करणारी, अपेक्षांचं ओझं खांद्यावर वागवत लवकर पोक्त झालेली, आपल्याला गेम समजतो असा आव आणून फुशारक्या मारणारी.
बाळांनो, सांभाळून राहा. तुम्हाला उसाचा रस काढायच्या चरख्यात पिळून पिळून तुमचं चिपाड होईपर्यंत सरकवणारी ही व्यवस्था आहे. यशापेक्षा अपयश हाच स्पर्धेचा नॅार्म असतो. एकमेकांना धरून राहा.
इतके दिवस आमची मान सतत उंचावत ठेवून खेळाचा निखळ आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.
-जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
0 notes
cinenama · 7 months
Text
स्वत:च्या 'दरे'वर लक्ष; मात्र जिल्ह्याकडे 'का' होतेय मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष?
सातारा (महेश पवार) :सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याला झुकते माप देतील अशी अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी फक्त त्याचं मुळं गाव असलेल्या दरे गावाकडे आणि परिसरातील विकास कामाकडे जास्त लक्ष दिल्याची चर्चा जनमानसात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे एक ना अनेक दौरे झाले मात्र त्यांनी साताऱ्यात जिल्ह्यांचे ठिकाणी म्हणून…
View On WordPress
0 notes
suryaiesh-blog · 8 months
Text
��ुर्वापार काळापासुन माणसां माणसांमध्ये जिंकणे व पराभव करणे असेच चालत आलेले आहे..
परंतू समोरच्यांचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंकणे हाच आपला सर्वात मोठा माणुसकीचा विजय असतो..
Tumblr media
1 note · View note
Text
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला Sulochana Chavan Passed Away: लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनाला चटका लावणारी बाब म्हणजे ज्या दिवशी दुपारी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्याच संध्याकाळी त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन ठाण्यामध्ये सन्मानित करण्यात येणार होते. Sulochana Chavan Passed…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 9 months
Text
Pradip त्याच्या शेतात गेलेला असतो…
विहिरीच्या काठावर बसलेल्या एका बेडकाशी त्याचं भांडण होतं.
बेडूक : तुला बुद्धी नाहिये!
Pradip : आहे!
बेडूक : नाहिये!
(असं म्हणून बेडूक विहिरीत उडी मारतो.)
Pradip : अरे! नाहिये!, तर नाहिये!
एवढ्यासाठी विहिरीत जीव द्यायची गरज नव्हती.
1 note · View note
shrikrishna-jug · 4 months
Text
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर नशीब पूर्णपणे काल्पनिक आहे.
त्यादिवशी मी श्री.समर्थांना म्हणालो,“ह्याचं नशिब चांगलं आहे त्याचं नशिब वाईट आहे अशा प्रकारच्या बोलण्यात आपण सहजगत्या भाग घेतो.पण “नशिब”हा खरोखरच काय प्रकार आहे ह्याचा डोळसपणे कधीच विचार करत नाही.“तुम्हाला काय वाटतं?”असा सरळ सरळ प्रश्न केला. ते मला म्हणाले,“मानवी मनाने, इतिहासाच्या ओघात, अंतिम घटनांचं त्वरीत स्पष्टीकरण देण्यास तयार केलेलं नशिब हा प्रकार एक उदाहरण समजायला हरकत नाही.पण नशिबाची…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट-भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १९ रुपये कपात
आणि
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. शिवसेनेनं आज तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं, राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं आज आकाशवाणीवरुन प्रसारण होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरुन हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी रिक्त पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
दरम्यान, मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांच्या कोठडीत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं त्याचं नाव असून, त्याने चादरीच्या तुकड्याने स्वच्छतागृहात गळफास घेतल्याचं समोर आलं. कोठडीत झालेल्या या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गेल्या १४ एप्रिलला हा गोळीबार झाला होता.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९ रुपयांनी घट झाली आहे. आजपासून ही दरकपात लागू झाली. आता या सिलिंडरची मुंबईत किरकोळ विक्री किंमत प्रतिसिलिंडर एक हजार ६९८ रुपये ५० ��ैसे असेल. दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उद्यमशील, पुरोगामी, आणि कष्टाळू नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, तसंच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू या, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळच्या भाषणातून केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
****
हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी परेड सादर करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्याहस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
****
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. विश्वात आर्थिक आणि सामाजिक अधिकार प्राप्तीसाठी श्रमिकांच्या बलिदानाची आठवण अर्थात श्रमिकांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठीचा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो.
****
आकाशवाणीच्या महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मौसमी चक्रवर्ती यांचा माहिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक व्यापक अनुभव आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
0 notes
bandya-mama · 9 months
Text
Bandya त्याच्या शेतात गेलेला असतो…
विहिरीच्या काठावर बसलेल्या एका बेडकाशी त्याचं भांडण होतं.
बेडूक : तुला बुद्धी नाहिये!
Bandya : आहे!
बेडूक : नाहिये!
(असं म्हणून बेडूक विहिरीत उडी मारतो.)
Bandya : अरे! नाहिये!, तर नाहिये!
एवढ्यासाठी विहिरीत जीव द्यायची गरज नव्हती.
0 notes
nirannjan17 · 9 months
Text
कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा,आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे..पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे..!
"सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
N_D_PATIL_22
0 notes