Tumgik
#माझा अधिकार
rebel-bulletin · 2 years
Text
‘माझी झेडपी, माझा अधिकार’
‘माझी झेडपी, माझा अधिकार’
जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांविषयी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या नागरिक अभिप्राय प्रणालीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीचा सामान्य नागरिकांना प्रतिक्रीया किंवा सूचना देण्यासाठी उपयोग करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावर ‘विशेष मोहिम’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 07 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं उमेदवारांच्या प्रचारासंबंधी परवानगीचं निवेदन स्विकारण्यासाठी सुविधा उमेदवार संकेतस्थळ उपलब्ध केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यनमातून प्रचार कालावधीचं महत्व लक्षात घेत रॅली आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरो-घरी जाऊन प्रचार,  हेलीकॉप्टर, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येते. हे संकेतस्थळ म्हणजे स्वतंत्र, नि :ष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रीयेसाठी लोकतांत्रिक सिद्धांतांनुसार सर्व पक्ष-उमेदवारांना समान सुविधा उपलब्ध करुन देत आहे.
लोकसभा निवडणूकिची अधिसूचना जारी झाल्यापासून फक्त वीस दिवसांतच यातून आयोगाकडे  ७३ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. ज्यामधून ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले तर दहा हजार अर्ज रद्दबातल करण्यात आले तर काही अर्ज प्रक्रीयाधीन आहेत.
****
आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुक राहण्यासाठी या दिनाचं आयोजन करण्यात येतं. 'माझं स्वास्थ्य-माझा अधिकार' अशी यावर्षीची संकल्पना जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यु.एच.ओ.तर्फे मांडण्यात आली आहे. अजुनही जगातील साडेचार अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून जास्त लोक आरोग्य विषयक सुविधा आणि देखभालीपासून दूर असल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज याद्वारे अधोरेखीत करण्यात आली आहे.
सध्या, जीवन शैलीशी निगडीत आजार विशेषत: युवा पिढीत झपाट्यानं वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे जीवन शैलीत योग्य बदल आणि योगासारख्या आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करुन आजारांना दूर करता येईल असं नवी दिल्लीच्या एम्स -अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील प्रोफेसर डॉक्टर रीमा दादा यांनी आकाशवाणीशी बोलतांना नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुर शहरात उद्या सायंकाळी चार वाजता निवडणूक जाहीर सभा आयोजित केली आहे. लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची ही महाराष्ट्रातील पहिलीच जाहीर प्रचार सभा असणार आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार-माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती जाहीर केली.
****
नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण-उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांसह शहरातील ठाणे अधिकारी, विविध धर्मांचे धर्मगुरू, एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या श��लेय विद्यार्थ्यांचीही यात मोठ्या संख्येन उपस्थिती होती.
****
पुणे जिल्ह्याच्या मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेलच्या ग्रामिण आणि शहरी भागात आज मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. शहरातील एका शाळेत आयोजित तृतीय पंथीयांची बैठक, तसंच नविन पनवेलच्या एका प्रभागात पथनाट्याद्वारे मतदारांना मतदानाचं महत्व पटवून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, कोल्हापूर इंथ मतदार जनजागृतीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'रन फॉर व्होट' या लोकशाही दौडच आज सकाळी आयोजन केलं होतं. या दौडमध्ये सहा हजाराहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
****
मणिपुरमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्‍तपणे राबविलेल्या तपासणी अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असल्याची माहिती मणिपुर पोलिसांनी दिली. मणिपुर पोलिसांसह सुरक्षा दलांनी राज्यातील डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमधील संवेदनशील भागात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायफल, पिस्तुल, हॅड ग्रेनेड, बॉम्ब, डेटोनेटर, बुलेट प्रूफ जॅकेट, वॉकी टॉकीसह इतर साहित्य जप्त केले आहे. ही शस्त्रास्त्रे जप्त केल्यानंतरही सुरक्षा दलांचं अभियान सुरूच राहणार आहे.
****
आईपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडीयन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता होईल. तर अन्य दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्पोर्ट सिटी मैदानावार लखनऊ सुपर जायंटस आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात खेळला जाईल.
स्पर्धेची सध्याची गुणतालिका बघता, खेळलेले चारही  सामने जिंकून राजस्थान रॉयल्स संघ आठ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर,खेळलेले तीनही सामने गमावल्यानं मुंबई इंडीयन्स संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. ३१६ धावा फटकावणारा रॉयल चॅलेन्जर्स बेंगरुळूचा फलंदाज विराट कोहली ऑरेंज कॅपसाठी अग्रेसर आहे. तर,आठ बळी टीपणारा राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल पर्पल कॅपसाठी अग्रेसर आहे. नेट रनरेटचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स प्रभावी असल्याचं दिसत असून पंजाब किंग्ज यात सर्वात पिछाडीवर आहेत. 
****
कझाकस्‍तानच्‍या अस्‍ताना इथं आयोजित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्‍पर्धेत भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि एम. तरुण यांनी महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे.
****
0 notes
gajananjogdand45 · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/my-health-my-right-collectors-call-to-celebrate-world-health-day/
0 notes
namdevkbajgirebjp · 10 months
Text
Tumblr media
Outward Number-PAN Number-DYNPB6115B/ Appointment Number-4317082 दिनांक -1 जानेवारी 2017
प्रति,
नाव - ..................................
..........................................
..........................................
..........................................
..........................................
विषय - जय हिंद क्रांती की सेना...- या राष्ट्रीय राजकीय पक्षाकडून ................................................... म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
संदर्भ - लोक प्रतिनिधित्व अधिनियम- 1951 धारा 29(क) अधिन राहून नेमणूक करण्यात आली आहे.
आदरणीय,
महोदय,
वरील विषयी तुम्हाला माझ्या 'जय हिंद क्रांती की सेना...-, या राष्ट्रीय राजकीय पक्षाकडून भारतीय लोक प्रतिनिधित्व अधिनियम -1951धारा 29 (क) अनुसार अधीन राहून तुम्हाला माझ्या राष्ट्रीय राजकीय पक्षाकडून नेमणूक करण्यात येत आहे.
भारतीय इन्कम टॅक्स अधिनियम-1961, नुसार 80GBB,80GBC राष्ट्रीय राजकीय पक्षासाठी असलेला टॅक्स माझ्या कडून पूर्णतः केली आहे.
तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारतीय सरकारमध्ये किंवा भारतीय स्थापित सरकार मध्ये तुम्हाला अधिकार आहेत. भारतीय निवणूक आयोगामध्ये निवडून आलेले सदस्य किंवा माझा 'जय हिंद क्रांती की सेना...-,हा राष्ट्रीय राजकीय पक्ष पंजीक्रत असल्यामुळे तुम्हाला नियमानुसार अधिकार आहेत.
हा राष्ट्रीय राजकीय पक्षाकडून भारतीय सरकार मजबूत, धर्म,नियम,अन्याय,अत्याचार, न्याय देण्यासाठी तत्पर सेवेत असेल.
तुमची सदस्यता जीवनभरासाठी असेल, उच्च पद हे त्यांच्या कार्यानुसार दिले जातील आणि प्रमोशन केले जातील, उच्च पद असलेली भारतीय सरकारमध्ये निवडून आलेले सदस्यांची सदस्यता किंवा उच्च पद असलेले पदाधिकारी यांची सदस्यता चार वर्षाची असेल, पुन्हा ते पद उच्च पदात वाढले जाईल,हि स्वयंचलीत प्रक्रिया आहे. भारतीय राष्ट्रिय गठण भारतीय जनता पक्षा बरोबर आहे.
सलग्न प्रत,
-संस्थापक,
-संस्थापक सचिव,
-अध्यक्ष
-अध्यक्ष सचिव,
- कोषाध्यक्ष
-उच्च कार्यकारी समिती,
-कार्यकारी सदस्य
संस्थापक
उपपंतप्रधान भारत🇮🇳नाव -नामदेव किशन बाजगिरे
(यंत्र अभियंता) भारतीय राष्ट्रिय राजकीय पक्ष
जय हिंद क्रांती की सेना...-
ठिकाण - लिंबोटी,
तालुका - लोहा,
जिल्हा - नांदेड 431708,
पोस्ट - डोंगरगाव
मोबाईल नंबर -🇮🇳9049593355
WhatsApp group for information join Link 'Jay Hind Kranti Ki sena...-,
https://chat.whatsapp.com/IdXTyawrCTy0korUSpVFKc
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची
“तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला”; खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची अमरावती : अमरावतीमधील एका हिंदू तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिचा बळजबरीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच तरुणीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह राजापेठ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
Tumblr media
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाकडून संजय राठोड यांनीही शपथ घेतली. राठोड यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यावर बोलायचं काम नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला नाहीतर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही असंही फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही असा टोलाही फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांना लगावला. ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील आशा पक्षाने आशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न आहे. पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचे ट्विट करावे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. राठोड यांच्या मंत्रीपदावरून चित्रा वाघ संतापल्या दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलें जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंग…जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. Read the full article
0 notes
pramodpatilcops · 2 years
Photo
Tumblr media
भारतीय असंतोषाचे जनक, केसरी या वृत्त्तपत्रातून ब्रिटिशांना स्वराज्य हा माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय या सारख्या अनेक माथळयाखाली लेखन करून जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण करणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन (at Bhayandar, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/Cgs92XOv_ja/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mhlivenews · 2 years
Text
’माझी झेडपी, माझा अधिकार’ - महासंवाद
’माझी झेडपी, माझा अधिकार’ – महासंवाद
जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांविषयी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या नागरिक अभिप्राय प्रणालीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीचा सामान्य नागरिकांना प्रतिक्रीया किंवा सूचना देण्यासाठी उपयोग करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावर ‘विशेष मोहिम’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
*नकारात्मक प्रभाव*
असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘स��सर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?
तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..
तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
*उदा.* माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं,
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...
*ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.*
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार ��हे.
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
13) मी निरोगी आहे,
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.
*याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल*
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.
आणि हीच एका दृष्टीने
*“लॉ ऑफ अट्रॅक्शन”*
ची दणदणीत सुरुवात असेल!..
*ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो.*
0 notes
nashikfast · 2 years
Text
माई….!
माई…ए माई…उठ ना… अगं किती वाजले ? माई…ए माई…उठ ना… अगं किती वाजले ? तू इतका वेळ कधीच झोपून राहत नाहीस… एक हाक मारली तरी ‘ओ रे बेटा’ असं म्हणून सादेला प्रतिसाद देणारी तू…. ! इतक्या हाका मारून सुद्धा ओ का देत नाहीस… ? आज अशी अचानक पणे शांत का झालीस ? तू रागावली आहेस का माझ्यावर ? खरं सांगू रागवायचा अधिकार आज माझा आहे, आम्हा सर्व लेकरांचा आहे… सर्वांना असं उघड्यावर टाकून तू जाऊच कशी शकलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyabharatnews · 3 years
Text
जयंती विशेष: जानिए स्वतंत्रता संग्राम में योगदान देने वाले बाल गंगाधर तिलक के बारे में खास बातें
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज 'स्वराज यह मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे लेकर ही रहूंगा' इन पंक्तियों को पढ़ते और सुनते ही बाल गंगाधर तिलक की याद आ ही जाती है। ऐसे उत्साह और जोश भरने वाले बाल गंगाधर तिलक का आज जन्मदिन है। उन्हें लोकमान्य का अर्थ है लोगों द्वारा स्वीकृत किया गया नेता। बाल गंगाधर तिलक को हिंदू राष्ट्रवाद का पिता भी कहा जाता है। लोकमान्य तिलक के नाम से भी जाना जाता है। बाल गंगाधर तिलक का जन्म 23 जुलाई 1856 को हुआ था। वे एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाज सुधारक, वकील और स्वतंत्रता सेनानी थे। घरवाले और उनके मित्र संबंधी यह आशा कर रहे थे कि तिलक वकालत कर धन कमाएंगे और वंश के गौरव को बढ़ाएंगे, परंतु तिलक ने प्रारंभ से ही जनता की सेवा का व्रत धारण कर लिया था। वे भारतीय स्वतंत्रता संग्राम के पहले लोकप्रिय नेता थे। इन्हें हिन्दू राष्ट्रवाद का पिता भी कहा जाता है। बाल गंगाधर तिलक को ब्रिटिश राज के दौरान स्वराज के सबसे पहले और मजबूत अधिवक्ताओं में से एक माना जाता है। बाल गंगाधर तिलक ने उस दौरान मराठी भाषा में नारा दिया था- 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' यानी 'स्वराज यह मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं इसे लेकर ही रहूंगा' जो उस समय बहुत प्रसिद्ध हुआ था।
Tumblr media
लोकमान्य तिलक ने जनजागृति का कार्यक्रम पूरा करने के लिए महाराष्ट्र में गणेश उत्सव तथा शिवाजी उत्सव सप्ताह भर मनाना प्रारंभ किया। इन त्योहारों के माध्यम से जनता में देशप्रेम और अंगरेजों के अन्यायों के विरुद्ध संघर्ष का साहस भरा गया। तिलक के क्रांतिकारी कदमों से अंगरेज बौखला गए और उन पर राष्ट्रद्रोह का मुकदमा चलाकर छ: साल के लिए 'देश निकाला' का दंड दिया और बर्मा की मांडले जेल भेज दिया गया। इस दौरान तिलक ने गीता का अध्ययन किया और गीता रहस्य नामक भाष्य भी लिखा। तिलक के जेल से छूटने के बाद जब उनका गीता रहस्य प्रकाशित हुआ तो उसका प्रचार-प्रसार आंधी-तूफान की तरह बढ़ा और जनमानस उससे अत्यधिक आंदोलित हुआ। उन्होंने मराठी में 'मराठा दर्पण व केसरी' नाम से दो दैनिक समाचार पत्र शुरू किए जो जनता में काफी लोकप्रिय हुए। जिसमें तिलक ने अंग्रेजी शासन की क्रूरता और भारतीय संस्कृति के प्रति हीनभावना की बहुत आलोचना की। तिलक ने ब्रिटिश सरकार को भारतीयों को तुरंत पूर्ण स्वराज देने की मांग की, जिसके फलस्वरूप और केसरी में छपने वाले उनके लेखों की वजह से उन्हें कई बार जेल भेजा गया। देश के इस वीर स्वतंत्रता सेनानी का निधन 1 अगस्त 1920 को मुंबई में हुआ। Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.****
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित
राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाची सूचना दाखल, दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा 
देशद्रोही संबोधल्याबद्दल विधानपरिषदेत विरोधकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल
आम्हीच शिवसेना असल्याचा एकनाथ शिंदे गटाचा घटनापीठासमोरील सुनावणी दरम्यान दावा
पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी
घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून सुरु
आणि
बॉर्डर-गावस्कर मालिकेत तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची भारतावर ४७ धावांची आघाडी
****
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल बाधित झालं. काल सकाळी कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना, राऊत यांनी, विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. विधीमंडळाच्या अवमानावर बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणाचा गांभिर्यानं विचार व्हावा, तथ्य तपासून योग्य तो निर्णय विधीमंडळानं घ्यावा, असं मत व्यक्त केलं. नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाकडून अतुल भातखळकर तसंच भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दाखल केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊतांवर कारवाईच्या मागणीसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं होतं.
याप्रकरणी दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...
“प्रस्तूत सूचनेअन्वये उपस्थित करण्यात आलेली बाब अत्यंत गंभीर असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकुल परिणाम करणारी तसेच विधीमंडळातील सन्माननीय सदस्यांचा, संपूर्ण सभागृहाचा व एकूणच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान ठरत असल्याचे माझे प्राथमिक मत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून बुधवार दिनांक आठ मार्च २०२३ रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन.’’
विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर यांनी कारवाईची मागणी केली. राऊत यांचं विधान हे विधीमंडळाचा अपमान करणारं असून, सर्व सदस्यांनी याचा एकमताने निषेध करून असा अपमान खपवून घेणार नसल्याचा संदेश, विधिमंडळानं देणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य समर्थनीय नसल्याचं सांगत, हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी केलं, हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करत असल्याचं सांगत, यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलं, मात्र संबंधितांना अटकेसंदर्भातला अधिकार राज्यसरकारचा आहे, त्यामुळे सदस्यांनी ती मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्याचा सल्ला उपसभापतींनी दिला. त्या म्हणाल्या...
“एकूण सगळ्यांच्या भावना पाहिल्या. मी यामध्ये माझा निर्णय दिलेला आहे की मी तपासून घेते आणि उद्या सकाळी मी हक्कभंगाच्या संदर्भामधला माझा निर्णय जाहीर करते. हे देखील स्पष्ट केलेलं आहे, की अटक करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून जी मागणी करताय ती तुम्ही माननीय गृहमंत्र्यांच्याकडे मागणी करू शकता. तो माझा अधिकार घेणं स्वतःच्या हातामध्ये एखाद्या खासदाराला मला योग्य वाटत नाही. पण हक्कभंगाबद्दलचा निर्णय मी घेईन.’’
दरम्यान, सरकारच्या चहापानाला उपस्थित न राहणाऱ्या विरोधकांना देशद्रोही संबोधल्याबद्दल विधानपरिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काल उपसभापती निलम गोर्हे यांच्याकडे हा हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यांमध्ये नितेश राणे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आणि आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे.
हक्कभंग समितीकडून संजय राऊत यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. संबंधित व्यक्ती सभागृहाबाहेरील असेल तर त्याला तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते, किंवा समज देऊन सोडून दिलं जाऊ शकतं.
****
नाशिकमधल्या गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी, कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्काळ अटकेची कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात येतील, अशी माहिती, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
दरम्यान, विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चेला सुरवात झाली. प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. प्राध्यापक राम शिंदे यांनी या आभार प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. घरगुती गॅसचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या, शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, अशा मागण्या विरोधकांनी यावेळी केल्या.
****
राज्याच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायाल���ात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात काल सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. पक्षात फूट पडल्याचं आपण म्हटलं नाही किंवा आम्ही कुठल्या पक्षात सहभागी झालेलो नाही किंवा नवा पक्षही स्थापना केलेला नाही. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. आम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नव्हता, त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहू नये असं आमचं मत होतं, असं त्यांनी न्यायालयात सांगितलं. निवडणूक पूर्व आघाडी भाजपासोबत असताना निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करणं अयोग्य असल्याचं आमचं म्हणणं असल्याचं कौल म्हणाले.
संविधानाच्या १० परिशिष्टानुसार विरोधी गटानं पूर्वीच्या पक्षावर दावा केला किंवा नवा राजकीय पक्ष स्थापन केला तरी काही फरक पडत नाही, शिंदे गटालाही हा नियम लागू होतो.  असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
बहुमत चाचणीचा राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असा दावा कौल यांनी केला. जेव्हा बहुसंख्य आमदार सरकारवर विश्वास नसल्याचं सांगतात, तेव्हा बहुमत चाचणीशिवाय कोणता पर्याय असतो, असा सवालही त्यांनी केला.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. याठिकाणी गेल्या २६ तारखेला सरासरी ५० टक्के मतदान झालं होतं. जिल्हा प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होणार आहे
****
घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार १०३ रुपयांवर पोहोचली आहे. तर, मुंबईत एलपीजीचे दर एक हजार १०२ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातल्या २३ हजार १९ शाळांमधून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २५ मार्चपर्यंत चालणारी ही परीक्षा राज्यात ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल ही माहिती दिली.
****
राज्य शासनानं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचं नामांतर केल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळानं देखील अधिकृतरित्या या दोन जिल्ह्यांची नावं बदलली आहेत. महामंडळानं काल यासंदर्भात पत्रक जारी केलं असून, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्यवर्ती बसस्थानकांचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं केल्याचं सांगितलं आहे. राज्यातल्या सर्व परिवहन महामंडळांच्या विभाग नियंत्रकांनी ज्याठिकाणी औरंगाबाद आणि उस्मानाबाद असं नावं असेल, त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव देण्याचे निर्देश मंडळानं दिले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात लिगो प्रकल्पासंदर्भात, केंद्रीय अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह, पृथ्वीविज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या भेटी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पासंदर्भात लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती, खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.
****
महावितरणनं मागणी केलेली ३७ टक्के वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी, काल छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज महानगर इथल्या, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर - मसिआच्या कार्यालयासमोर, वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. महावितरण कंपनीनं ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी प्रस्तावित केलेली वीज दरवाढ अन्यायकारक असून, त्यानं राज्याची उद्योग भरारी रोखली जाणार आहे. तसंच सर्व सर्वसामान्य घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांचं कंबरडं मोडणारी ही दरवाढ असेल. प्रस्तावित दरवाढ रद्द करून दिलासा देण्याची मागणी मसिआच्यावतीनं करण्यात आली.
****
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत इंदूर इथं सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं भारतावर ४७ धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निवड केली. मात्र भारताचा पहिला डाव १०९ धावांवरच आटोपला. सुरुवातीच्या तासाभरातच भारताचा  निम्मा संघ तंबूत परतला. दिवसअखेर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चार बाद १५६ धावा झाल्या होत्या. भारतातर्फे रविंद्र जडेजानं ४ बळी घेतले.
****
कुसुम महोत्सवाला कालपासून नांदेड इथं प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्‌घाटन झालं. देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर उद्यापर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं साजरा होणाऱ्या ४२४व्या नाथषष्ठी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना तत्पर सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं, अशी सूचना, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे. काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहर सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, यात नागरिकांनी देखील पुढाकार घेण्याचं आवाहन भूमरे यांनी यावेळी केलं.
****
बीड इथं काल महिला आयोगाच्या जनसुनावणीला जिल्ह्यातील तक्रारदार पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी नियुक्त तीनही पॅनल समित्यांनी तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. सदर तक्रारींवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना करुन संबंधित विभागांकडे पाठवण्यात आल्या. सुमारे साठ तक्रारींची दखल काल घेण्यात आली. यानंतरही महिला तक्रारदारांनी मोठया संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय तसंच शासकीय विश्रामगृह इथं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेऊन निवेदनं तसंच तक्रारी सादर केल्या.
****
शेतकऱ्यांकडे फायदेशीर शेती करण्यासाठी उच्च कृषी तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचं मत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं आयोजित कृषि महोत्सव आणि बचत गटातल्या महिलांनी  उत्पादित केलेल्या वस्तुचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतमालावर आधारित उद्योग उभारावेत तसंच उत्पादनाच्या विक्रीवरही भर द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं. हा महोत्सव चार दिवस सुरु राहणार आहे. 
****
छत्रपती संभाजीनगर शहरात जी-20 बैठकीनिमित्त करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचं नुकसान करणाऱ्या चारचाकी चालकाला ८२ हजार ९८४ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातल्या सेव्हनहिल उड्डाणपुलावरच्या रस्ता दुभाजकावर ठेवण्यात आलेल्या शोभिवंत झाडांसह सिमेंट आणि फायबरच्या कुंड्या कार चालकांनं धडक देऊन नुकसान केलं. फरार चालकाविरोधात जवाहन नगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
****
दौंड न���झामाबाद दौंड ही रेल्वे गाडी येत्या २६ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात बेलापूर पुणतांबा स्थानकादरम्यान उद्‌भवलेल्या तांत्रिक कारणांमुळं ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्याचं नांदेडच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. 
दक्षिण मध्य रेल्वेने होळी निमित्त काचीगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे धावणार आहे. चार मार्चला ही गाडी काचिगुडा इथून तर सात मार्चला बिकानेर इथून सुटणार आहे.
****
0 notes
digimakacademy · 4 years
Text
I challenge Mamata Banerjee and Rahul baba, to find out a provision from CAA that can take citizenship away from anyone in this country: Amit Shah msr 87 | CAA : भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही : शाह
I challenge Mamata Banerjee and Rahul baba, to find out a provision from CAA that can take citizenship away from anyone in this country: Amit Shah msr 87 | CAA : भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही : शाह
[ad_1]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसवाल्यांनो कान उघडे ठेवून नीट ऐका, तुम्हाला जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देऊनच शांत बसणार आहोत, भारतावर जेवढा अधिकार माझा तुमचा आहे तेवढाच अधिकार पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध व ख्रिचन शरणार्थींचा देखील आहे. मध्य…
View On WordPress
0 notes
mvartalive · 5 years
Photo
Tumblr media
बंडखोर ब्लॉग : आजकालच्या मुली, लग्न आणि भावनांचा बाजार ! Written By Suraj Mokashi आपणा सर्वांना वाटत असेल की ‘स्त्री’ जातीवर समाजाने खूप अन्याय केलेत, हो हे आधीच्या पिढ्यांपुरतं मान्यही केलं पण आताच्या पालकांना माझा साधा सवाल आहे की सध्या मॉडर्न होता होता आपल्याला जे संस्कार आपल्या पूर्वजांकडून मिळाले ते आपण आपल्या मुलींना(काही अपवाद सोडले)तर देतोय का? आपण निदान ह्याचातरी विचार करतोय का? आपली संस्कृती किती लयास चालली आहे, मी इथे कापडे, राहणीमान याबाबत बोलत नाहीये. कालानुरूप त्यात बदल होणारंच, त्यात वावगं काहिच नाही. लग्न…लग्न हे आताच्या मुलींना बंधन वाटू लागलं आहे. ‘वुमन एम्पोवरमेन्ट’ च्या नावाने काही मुलींना एवढं उर्मट बनवून ठेवलं आहे की, त्या जराही कॉम्प्रोमाईझ करायला तयार होत नाही आहेत. थोडं काही बिनसलं की लगेच घटस्फोट देणे किंवा सासु-सासऱ्यांसोबत जरा काही वाजलं की सेपरेट राहायचं, चालले माहेरी रहायला अशी धमकी देणे असं सर्रास घडत आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला मुलीच चुकीच्या असतात. पुरुषांमध्येही वाईट गुण आहेतच की पण त्यांना लाईनवर कसं आणायचं हे तुमच्या हातात असतं आणि निसर्गाने अशी अद्भुत देणगी तुम्हाला दिलेली आहे. अशावेळी टोकाचा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही निदान हा देखील विचार करत नाही की लग्न तोडल्याने फक्त तुम्हालाच त्रास होत नाही तर तुमच्यासोबत दोन फॅमिली मधील मेंबरनाही याचा मानसिक त्रास होतो. आणि कशाही प्रकाराचा मानसिक त्रास हा शारीरिक त्रासापेक्षा काकणभर अधिक वेदनादायी असतो. असे काही वागण्यापेक्षा जर तुमचं कोणावर प्रेम असेल तर मग ते आपल्या पालकांना सांगा. नाही मानले तर पटवून  द्या त्यांना, थोडा वेळ जाईल पण नक्कीच समजून घेतील ते. पण विनाकारण सगळं मनात ठेवून दुसऱ���यासोबत लग्न करून अथवा जर नवीन नाते जोडण्याच्या कंडिशन मध्ये लग्नाला होकार देऊन नंतर भर मांडवात लग्न तोडून आपल्या पालकांसमवेत दुसऱ्या कोणाची लाईफ, त्याच्या फॅमिली चे स्वप्न उध्वस्त करून त्यांना मानसिक त्रासाच्या खोल डोहात बुडवू नका. गेल्या जमान्याच्या मानाने आता निदान तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावाच. “Find Until You Didn’t Get Best”. ( सविस्तर लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला किंवा फेसबुक पेज ला भेट द्या) #maharashtravarta #surajmokashi #marathimuli #ajkalchyamuli #maharashtra #maharashtriantradition #indiantradition #maharashtrawarta #arthaat #arthat https://www.instagram.com/p/BxfYHrLAhdt/?utm_source=ig_tumblr_share&igshid=17hvyljzbbkfc
0 notes
pramodpatilcops · 2 years
Photo
Tumblr media
भारतीय असंतोषाचे जनक, केसरी या वृत्त्तपत्रातून ब्रिटिशांना स्वराज्य हा माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय या सारख्या अनेक माथळयाखाली लेखन करून जनतेला ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण करणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन (at Bhayandar, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/Cgs9sxDPCvG/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
राजर्षी शाहूछ्त्रपती यांच्या स्मृतीस सादर प्रणाम..!!! राजर्षी श्री शाहू छ्त्रपती महराज कोल्हापूर यांचा पोवाडा - शाहीर पिराजीराव सरनाईक, कोल्हापूर चौक १ला कोल्हापूरच्या छत्रपतिंचा शाहीर हा आला । शाहू राजाचा गातो पोवाडा जन्मशताब्दिला। आधी मनू त्या शिवाईला । एक मुजरा भगव्या झेंड्याला । दुसरा मुजरा या जरी पटक्याला । पायावर डोई शिवाजीच्या । मराठ्याच्या हो महिपतीच्या । भोसले कुळीच्या छ्त्रपतिच्या ॥ मुजरा मानाचा माझा । शाहू महाराजांना । करवीर छ्त्रपतिंना ॥धृ॥ शाहू जन्मशताब्दि महोत्सव समारंभाच्या महा मंगल दिना । पोवाड्याच्या रुपाने फूल ना तरी एक पाकळी वाहूनी चरणा । वंदितो त्यांना । मुजरा मानाचा माझा । शाहू महाराजांना ॥ राजर्षी शाहू छ्त्रपति । करवीराधिपती । श्रेष्ठ नृपती । मानवी जाणविले अधिकार । गरिबांसाठी कळकळणार । राजा नव्हे शेतकरी मी म्ह्णणार । सुद्याम्याचे पोहे आवडीने फार । जसा श्रीकृष्ण हसत खाणार । तसा शाहू प्रभू आमचा दिलदार । शेतक-याची झुणका भाकर खाणार । जनतेला झाला प्राणाहून प्यार । म्हणून प्रभू शाहू देव अवतार ॥ (गद्य) देवाच्या ठिकाणी भेदभाव नसतो, तसा शाहू महाराजांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता म्ह्णूनच पूर्वापार चालत आलेल्या स्वार्थी रुढीवर त्या��नी पहिला घाव घातला. त्या रुढी पहा ! चाल : लगट ब्रांम्हण विद्या शिकणार । क्षत्रियांच्या हाती तरवार । वैश्यांना धंदा व्यापार । शुद्रांनी करावा रोजगार । त्यांत अतिशुद्र असणार । गावाची घाण काढणार । प्राचीन कालापासून वर्ण हे चार ॥ चाल : कटाव भेदभाव असा पाहून । छत्रपती शाहू राजानं ॥ अस्पृश्याना जवळ घेऊन । माणुसकी दिली समजून ॥ गुलामीचे पाश तोडून । केला उध्दार शाहू राजांन ॥ चाल : जी जी जी फासे-पारधी मांगगारुडी ठेवले नोकरीला ॥ अस्पृश्यतेच्या काळीमा धुवून टाकिला ॥ देव देवळे खुली केली हो हरीजनाला ॥ माणसाने माणुस पहा दूर ठेवलेला ॥ जवळच काय महारांजी घेतले पंक्तिला ॥ माणुसकी विसरलेल्या अंध:श्रध्दाळू जनतेला ॥ शाहू महाराजांनी माणुसकीचा धडा शिकविला ॥ मिळावणी मानव हीच एक जात । खरी जगतात । ठेवा ध्यानात । उच्च नीच भेद नाही कसला । सम-समान हक्क सकला । शाहू महाराजांचा विचार असला ॥१॥ चौक २ रा (गद्य) समाजातील विषमता नष्ट होण्यासाठी शिक्षण हा मुळ पाया आह. म्ह्णुन शाहू महाराजांनी चाल : लगट बहुजन समाज हा आपला । अंधारात आहे पडलेला । मूळ कारण घ्यावे ध्यानाला ॥ अज्ञानीपणा हा भवला । तेव्हा शिक्षण पाहिजे सर्वाला। असे वाटून शाहू राजाला । प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी पाया घातला ॥ खाली #comments मध्ये पूर्ण वाचा 🇮🇳🚩😎 (at Nagpur) https://www.instagram.com/p/BxIGWZ0Auea/?utm_source=ig_tumblr_share&igshid=12espbjgqycmc
0 notes