Tumgik
#ब्रिटनची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस बकिंगहॅम पॅलेसने एका निवेदनात म्हटले आहे, “आज दुपारी बालमोरल येथे राणीचे शांततेत निधन झाले,” The post ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस appeared first on द वायर मराठी. बालमोरल (स्कॉटलंड): ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी आणि सात दशके राष्ट्राची प्रमुख म्हणून भूमिका असलेल्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह 600 कंपन्या चिंताग्रस्त झाल्या; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे कारण
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह 600 कंपन्या चिंताग्रस्त झाल्या; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे कारण
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ सीडीया ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंड बालमोरल प्रासादात निराकरण. त्या ९६ वर्षांच्या. राणी एलिझाबेथ यांनी ७हून अधिक दशके ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटीश वसाहती राष्ट्रप्रमुख पदाधिकारी. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळली व्यक्ती हा विक्रमी राणी एलिझाबेथ यांच्या नावावर आणि ब्रिटनमधील सैनिकांना राणी एलिझाबेथ यांच्या व्यक्तीला राजसिंहासनावर कोणीही ओळखले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
यूरोप पेटले!
Tumblr media
लंडन : ब्रिटनमध्ये तापमानाने पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा तांडव पहायला मिळत आहे. या उष्णतेचा त्रास आता दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३९ अंशांवर पोहोचला असल्याने नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम जाणवू लागला असून आरोग्यासाठी हे हवामान घातक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान ४०.२ वर पोहोचले होते. ब्रिटनमध्ये पारा आजपर्यंत कधीच चढला नव्हता. सध्याचे तापमान पाहता ते १०४.४ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे २०१९ मधील १०१.६ अंशाचा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यामुळे हा दिवस आतापर्यंत देशातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या अनेक भागांतून वेगवेगळ्या वेळी तापमानाची नोंद केली जात आहे. त्यामुळे खरा आकडा खूप मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. लंडनमध्ये रात्रीचे तापमानही २६ अंश सेल्सिअस नोंदवले जात असून लंडनचे हवामान बहुतेक रात्री थंडकिंवा आल्हाददायक असते, परंतु यावर्षी त्यात मोठा बदल झाला आहे. ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात तांडव सुरू असल्याने नागरिक नाराज आहेतच, पण वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांच्या मते, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही. रेड अ‍ॅलर्ट जारी सध्याची परिस्थिती अशी आहे की, कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अ‍ॅलर्ट जारी करावा लागला आहे. सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अ‍ॅलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या कडक उन्हापासून वाचण्यासाठी पाच जणांनी नदीच्या साहाय्याने दुस-या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात : बायडन जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असणा-या अमेरिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. सोबतच अमेरिकेला हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा करत यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा पसरत असताना हवामान बदलाचा सामना करण्याबाबत बायडन यांनी भाष्य केले. बायडन म्हणाले की, अमेरिकेतील १०० दशलक्ष लोक सध्या अत्याधिक उष्णतेचा सामना करत आहेत. हा हवामान बदल एक स्पष्ट आणि सध्याचा मोठा धोका आहे. हवामान आपत्तींना तोंड देण्यासाठी यूएस पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २.३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह कृती कार्यक्रमाची घोषणा करत असल्याचं बायडन म्हणाले. बायडन म्हणाले की, आपल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपली राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात आहे आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला ही तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे. ही एक प्रकारची आणीबाणी आहे आणि मी त्याकडे त्यादृष्टीने पाहीन. अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कार्यकारी अधिकारांचा वापर हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करेन, असेही ते म्हणाले. Read the full article
0 notes
digimakacademy · 3 years
Text
७० वर्षानंतर समुद्रातून काढला १४ अब्ज रुपयांचा भारताचा खजिना
७० वर्षानंतर समुद्रातून काढला १४ अब्ज रुपयांचा भारताचा खजिना
इंग्रज येण्यापूर्वी भारतात ‘सोन्याचा धूर’ निघत होता असे म्हटले जात होते. इंग्रजांनी भारताची लूट करत ब्रिटनची तिजोरी भरली. ही लूट किती असेल याचा अंदाज यावा अशी एक घटना समोर आली आहे. पुरात्व खात्याच्या तज्ज्ञांना २०११ मध्ये जलसमाधी घेतलेल्या एमएस गॅरसोप्पा जहाज सापडले होते. या जहाजातून १४ अब्ज रुपयांची चांदी काढण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एसएस गॅरसोप्पा जहाजातून कोलकातामधून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू; ब्रिटन- भारत विमानसेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द.
·      ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा करण्याची वीज ग्राहक अधिकार नियमात तरतूद.
·      काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन.
·      अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी.
·      मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा.
·      सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा मयुरी राजहंस यांना ‘रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार’ तर महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी अकादमीच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना ‘डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार’.
आणि
·      केशर आंब्याच्या ब्रँडिंगसाठी ‘महाकेशर आंबा बागायतदार संघा’ची स्थापना.
****
राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पाच जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. राज्यात होणाऱ्या विवाह समारंभात कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, केंद्र सरकारनं ब्रिटनची विमानसेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केली आहे. आज रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. आज रात्रीपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानप्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. अशा प्रवाशांची विलगीकरणाच्या पाचव्या अथवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. युरोपातून आलेल्या प्रवाशांमध्ये नव्या विषाणूची लक्षणं दिसल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना केली जाणार आहे.
****
सरकार ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकार निर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा मंत्री सिंह यांनी काल केली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना शक्तीशाली बनवत आहे. आपल्या अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची सर्वांना माहिती असली पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना सेवा देतांना निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं ऊर्जा मंत्री सिंह यांनी सांगितलं.
****
अनुसूचित जाती जमातींसाठी सूचवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी अनुसूचित ज���ती जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत केलेल्या सूचना रास्त असून, सरकारचा घटकपक्ष म्हणून आम्ही कायम या समाजघटकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहोत, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते या भेटीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ९३ वर्षाचे होते. व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोविडची लागण झाली होती, त्या संसर्गातून ते बरे होऊन घरी परतले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्होरा हे मध्यप्रदेश विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले होते. त्यांनी दोन वेळा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद तसंच उत्तर प्रदेशचं राज्यपाल पदही भूषवलं होतं. ते चार वेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन अमरावतीचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केलं आहे.  
****
मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकानं काल प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यात निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यात शेकटा, गाजीपूर, निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव, मुरमी, वरखेड या ठिकाणी या पथकानं पाहणी केली.
जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी, बाजार वाहेगाव, रोशनगाव तसंच जालना तालुक्यातल्या नंदापूर इथं या पथकानं काल पाहणी केली. नुकसानग्रस्त कपाशी पिकासह द्राक्ष तसंच मोसंबी बागा आणि पडझड झालेल्या विहिरींची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना बाजार समितीमधील धान्य बाजाराला भेट देऊन सोयाबीन, कापूस, मका, मूग आदी पिकांची आवक आणि दराबाबतही पथकानं माहिती जाणून घेतली.
दुसऱ्या पथकाने काल उस्मानाबाद तालुक्यात पाटोदा आणि केशेगाव इथं पाहणी केली. केशेगाव इथं अतिवृष्टीमुळे भिंत फुटून वाहून गेलेला साठवण तलाव, तसंच नुकसानग्रस्त शेताची तर पाटोदा इथं खरडून गेलेल्या शेतीची तसंच नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमानुसार शेतजमीन दुरुस्ती तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी, या मागणीचं निवेदन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पथकाकडे सादर केलं.
दरम्यान, हे पथक आजपासून २६ तारखेपर्यंत राज्यात सोलापूर, पुणे, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. २६ डिसेंबरला नागपूर इथं आढावा बैठक घेऊन हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.
****
उत्तरेतल्या शीत लहरीमुळे मराठवाड्यात पारा खाली घसरला असून, काल सकाळी परभणीत पाच पूर्णांक सहा दशांश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. औरंगाबाद मध्येही काल या हंगामातलं सर्वात निचांकी नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात धुळे जिल्ह्यात काल सहा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक मध्ये काल नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
शेतकरी प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची काल विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि राज्यसभेचे भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी इथं भेट घेतली. अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल, मात्र अण्णांचं वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबून नये, या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी विनंती या नेत्यांनी त्यांना केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं खासदार डॉ. कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात काल दोन हजार ८३४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९९ हजार ३५२ झाली आहे. काल ५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ८०१ झाली आहे. काल सहा हजार ५३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८९ हजार ९५८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक २४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५९ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २०४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन, परभणी जिल्ह्यात दोन, तर बीड जिल्ह्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५९ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४६, नांदे�� २९, लातूर २६, जालना २१, उस्मानाबाद १५, परभणी सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले.
****
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे यंदाचे डॉ रखमाबाई राऊत आणि डॉ भीमराव गस्ती पुरस्कार काल जाहीर झाले. बीड जिल्ह्यात ब्रह्मनाथ येळंब इथल्या मयुरी राजहंस यांना रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार तर महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी अकादमीच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार देण्यात येणार आहे. मयुरी राजहंस या ब्रह्मनाथ येळंब इथं तमाशा कलावंतांच्या मुलामुलींसाठी वसतीगृह चालवतात, सध्या या वसतीगृहात ४६ मुलंमुली राहात आहेत. डॉ पार्वती दत्ता यांनी महागामी अकादमीच्या माध्यमातून अभिजात संगीत आणि नृत्य परंपरा जिवंत ठेवत, या कलांना व्यापक जनाधार मिळवून दिल्याबद्दल त्यांना संस्थेचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप असून, येत्या तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी औरंगाबाद इथं समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे.
****
मराठवाड्यातल्या केशर आंब्याच्या ब्रँडिंगसाठी आंबा बागेच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महाकेशर आंबा बागायतदार संघाची स्थापना केली आहे. यामाध्यमातून मराठवाड्यासह राज्यात महाकेशर आंबा लागवडीसाठी काम करणार असून, याच नावाने यापुढे ब्रँडिंग करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा यांनी दिली.  
****
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला काल सकाळी वर्णी महापूजेनं प्रारंभ झाला. तहसीलदार विपिन पाटील यांनी योगेश्वरी देवीची सपत्निक विधीवत महापूजा केली. मंदिरात आराध बसण्याची परंपरा यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच खंडित झाली आहे. २९ डिसेंबरला नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
****
कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे.
****
सियाचीन इथं सीमेवर गस्त घालत असताना गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान शहीद झाले. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा हाडगा इथले सैनिक नागनाथ लोभे आणि सातारा जिल्ह्यातल्या चिंचनेर निंब इथल्या सुजित किर्दत यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रविवारी २१ तारखेला ही घटना घडली. त्यांचा पार्थिव देह आज उमरगा इथं आणण्यात येणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या भिवपूर इथले सैनिक गणेश गावंडे हे काल पुणे इथं कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं शहीद झाले. मागील पंधरा वर्षांपासून ते मराठा बटालीयनमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या भिवपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात महसूल विभागानं काल १२५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला. या वाळूचं बाजारमूल्य सुमारे १० लाख रुपये आहे. जप्त केलेली वाळू तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात येत आहे.
****
लातूर शहरातून संकलित होणाऱ्या हजारो टन कचऱ्यावर वरवंटी परिसरात प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल या प्रकल्पाला भेट देऊन कचरा संकलन, विघटन, सेंद्रिय खत निर्मिती, कचरा व्यवस्थापन आदी कामाची पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.
****
0 notes
indialegal · 3 years
Text
Boris Johnson News: बोरीस जॉन्सन यांचा दौरा रद्द करा; काँग्रेस नेत्यानं केली मागणी - cancel Boris Johnsons Invitation; Demands Prithviraj Chavan | Maharashtra Times
Boris Johnson News: बोरीस जॉन्सन यांचा दौरा रद्द करा; काँग्रेस नेत्यानं केली मागणी – cancel Boris Johnsons Invitation; Demands Prithviraj Chavan | Maharashtra Times
मुंबईः ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंड करोनाच्या नव्या प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. काही दिवसांपूर्वी हा विषाणू आढळला होता. या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. हा नवा प्रकार समोर आल्यानंतर अनेक राष्ट्रांनी उड्डाणांवर व विमान प्रवासांवर निर्बंध आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्राकडे मोठी मागणी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
ब्रिटिश कंपनीकडून भारतात 4 हजार चार्जिंग स्टेशन?  देशभरात मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित : 2 हजार जणांना रोजगाराची शक्यता वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ब्रिटनची इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेवा पुरविणारी कंपनी ‘ईओ चार्जिंग’ पुढील तीन वर्षात भारतामध्ये 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन निर्माण करणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पहिल्या निशुल्क चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनाच्यावेळी  ईओ चार्जिंगची भारतातील एकमेव वितरण कंपनी याहवी इंटरप्रायजेसचे सीईओ संदीप यादव यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतातील सादरीकरणानंतर कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. मार्च 2022 पर्यंत गुजरातमध्ये 300 पेक्षा अधिक स्टेशन असतील. तर यात 40 स्टेशन एकटय़ा अहमदाबादमध्ये असणार आहेत. कंपनीने डिसेंबरपासून रितसर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे काम हाती घेतले असून, आत्तापर्यंत देशभरात 20 स्टेशन सुरू केली आहेत. कंपनी घरगुती, मध्यम आणि मोठय़ा अशा तिन्ही प्रकारच्या चार्जिंग पॉईंटसाठी उपकरणे आणि सेवा पुरविते. बॅटरीवर चालणाऱया वाहनांसाठी आणि कंपनीच्या सेवेच्या प्रसारासाठी सुरुवातीला सर्व चार्जिंग स्टेशन निशुल्क असणार आहेत. #tarunbharatnews #britishcompany #charging #chargingstation (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7knMv1B9Cy/?igshid=1hrwfi7177dzo
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Photo
Tumblr media
सिरियावर अमेरिकेचा हल्ला वेब ग्लोबल : सीरियन वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांवर लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने शनिवारी हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यास हे हल्ले करण्यात आल्याचा सामरिक तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून शीतयुद्धासारखी निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रात्री व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केले. 'सीरियाचे हुकूमशाह बशर अल असाद यांच्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत हल्ले करण्याचे आदेश मी काही वेळापूर्वी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत', असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करत सीरियातील विविध ठिकाणी हल्ले केले आहेत. असाद यांच्या राजवटीला पाठिंबा देणाऱ्या रशिया आणि इराण या दोन देशांवरही ट्रम्प यांनी कडाडून टीका केली. 'निष्पाप पुरुष, महिला आणि लहान मुलांची सामूहिक हत्या करणाऱ्या राजवटीशी संबंध ठेवताना काही वाटत कसे नाही, असे मला इराण आणि रशिया या दोन्ही देशांना विचारायचे आहे', असे ट्रम्प त्या भाषणात म्हटले. दरम्यान, अमेरिकी लष्कराच्या सज्जतेनंतर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनीही त्���ांच्या लष्कराला हल्ल्याचे आदेश दिले. 'सीरियातील गृहयुद्धात हस्तक्षेपासाठी किंवा तेथील राजवट उलथवून टाकण्यासाठी हे हल्ले नाहीत', असेही मे यांनी सांगितले. 'संहारक रासायनिक शस्त्रे निर्माण करण्याची सीरियाची क्षमता संपविण्यासाठी फ्रान्सने या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनची साथ दिली आहे', असे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केले. 'येथील एक वैद्यकीय प्रयोगशाळा आणि लष्करी तळावर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी हल्ले केले आहेत', असे सीरियातील मानवी हक्क आयोगाच्या निरीक्षकांनी सांगितले. सीरियाच्या लष्करानेही याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली आहे, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे सोडत अमेरिका आणि मित्र देशांच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचा हल्ला जवळपास एक तासभर चालू होता.हा हल्ला संपल्यानंतर असंख्य नागरिक दमास्कसच्या रस्त्यांवर जमा झाले. सीरिया, रशिया आणि इराणचे झेंडे फडकावित त्यांनी निदर्शने केली. सीरियातील सरकारी वाहिनीवरून ही निदर्शने थेट प्रसारित केली गेली.
0 notes
kokannow · 5 years
Text
रोल्स रॉईसला दंड
नवी दिल्ली: भारतीय कंपन्यांचे कंत्राट मिळवताना मध्यस्थामार्फत सुमारे ७५ कोटींची लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने आज ब्रिटनची रोल्स राॅइस कंपनी आणि भारतातील उपकंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ४,७०० कोटींच्या कंत्राटांसाठी ही लाच दिली गेली होती. ‘एचएएल’, ‘ओएनजीसी’ आणि ‘गेल’च्या अज्ञात अधिकाऱ्यांना सुमारे १०० कोटींची लाच दिल्याचा रोल्स राॅइसवर आरोप आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकमानस : ब्रिटनची अर्थव्यवस्था गाळात जाण्याची भीती
लोकमानस : ब्रिटनची अर्थव्यवस्था गाळात जाण्याची भीती
लोकमानस : ब्रिटनची अर्थव्यवस्था गाळात जाण्याची भीती हिवाळय़ात अनेकांसमोर वीज बिल भरावे की अन्न खरेदी करावे, हा प्रश्न निर्माण होणार असे दिसते. ‘ट्रसट्रसती जखम!’ हा अग्रलेख (७ सप्टेंबर) वाचला. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस यांची निवड झाल्यामुळे ‘टोरी पक्षाच्या श्रीमंतांनी निवडलेल्या बाई’ अशी भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे. लिझ ट्रस राजकारण करण्यात आणि वारा पाहून पाठ फिरवण्यात पटाईत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
क्वीन एलिझाबेथ II च्या मृत्यूचा निरोप दुर्मिळ दुहेरी इंद्रधनुष्य बकिंघम पॅलेसवर दिसला व्हिडिओ पहा
क्वीन एलिझाबेथ II च्या मृत्यूचा निरोप दुर्मिळ दुहेरी इंद्रधनुष्य बकिंघम पॅलेसवर दिसला व्हिडिओ पहा
राणी एलिझाबेथ II मृत्यू: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या वयाच्या ९६ वर्ष अंतिम निर्णय. बंकिंग पॅलेसने अधिकृतपणे माहिती दिली आहे. स्कॉटलँडमध्ये गुरुवारी ८ सप्टेंबरला त्यांचा शेवटचा श्वास होता. प्रदीर्घ काळापासून त्यांची प्रकृती खराब होती मात्र शेवटीस काल त्यांची प्राणज्योतवली. महाराणी एलबेथ यांच्या लढून लोकशाही झाॅल, कलाकार अशा अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. पण प्रत्यक्ष निसर्गाने देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन झालं आणि अवघ्या जगातून हळहळ व्यक्त झाली. राणी एलिझाबेथ या दुसऱ्या महायुद्धापासून ते २१व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. सर्वच स्तरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणीची प्रकृती चिंताजनक.. डॉक्टरांच्या देखरेखीत ९६ वर्षाय एलिझाबेथ
Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणीची प्रकृती चिंताजनक.. डॉक्टरांच्या देखरेखीत ९६ वर्षाय एलिझाबेथ
Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणीची प्रकृती चिंताजनक.. डॉक्टरांच्या देखरेखीत ९६ वर्षाय एलिझाबेथ ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ (Britain queen Elizabeth) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ९६ वर्षीय क्वीन एलिझाबेथ तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. राणी एलिझाबेथ सध्या स्टॉकलँडमध्ये आहेत.  शाही  कुटूंबातील अन्य लोक येथे दाखल होत आहेत. ब्रिटनची महाराणी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विश्लेषण : लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान… विजयाची कारणे, परिणाम आणि त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती?
विश्लेषण : लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान… विजयाची कारणे, परिणाम आणि त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती?
विश्लेषण : लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान… विजयाची कारणे, परिणाम आणि त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती? ट्रस यांच्याकडे जेमतेम २ वर्षे आहेत. या काळात त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे कडवे आव्हान पेलायचे आहे. -अमोल परांजपे भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान होण्याची आशा सध्या तरी मावळली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांचा लिझ ट्रस यांनी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
ब्रिटनला मागे टाकून भारताची घोडदौड.. बनला जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचबरोबर ब्रिटनची आर्थिक क्षेत्रात घसरण होऊन तो ६ व्या स्थानावर घसरला आहे. ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचबरोबर ब्रिटनची आर्थिक क्षेत्रात घसरण होऊन तो ६ व्या स्थानावर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; ‘या’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; ‘या’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; ‘या’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का न्युयॉर्क – अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत स्वप्नवत वाटचाल कायम राखली आहे. तिने दुसऱ्या फेरीच्या लढतीत द्वितिय मानांकित ऍनेट कोंतावेटवर 7-6, 2-6, 6-2 अशी मात केली. या स्पर्धेत मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका गुरुवारीही कायम राहिली. ब्रिटनची 11वी…
Tumblr media
View On WordPress
0 notes