Tumgik
#प्रतिभेचा
Text
Nagnath Kottapalle : स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे
Nagnath Kottapalle : स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे
Nagnath Kottapalle : स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे मुंबई :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. कोत्तापल्ले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार-'मन की बात'च्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
आणि
रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं मोदी म्हणाले. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची  संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवासाची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं.
****
दरम्यान, देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायत नगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
कल 26 तारीख को माननीय प्रधानमंत्रीद्वारा 554 स्टेशन्स और 1500 से उपर रेल्वे ओव्हरब्रीज या अंडरपास इनका शीलान्यास, जहां पे पुरे हो गये है, वहां पे उद्‌घाटन किया जायेगा। नांदेड डिवीजन में ये 52 जगह पे आयोजन है। यहां हमारे पास चार स्टेशन्य है जिनका फाऊंडेशन स्टोन लेइंग माननीय प्रधानमंत्री द्वारा किया जायेगा, जिसमे हिमायतनगर, भोकर, मानवतरोड और रोटेगाव हैं। इसके अलावा 19 आर ओ बी आय यु पी ज्‌ है।
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण असावे तसंच याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत. यांसदर्भात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकं याविषयांवर यावेळी चर्चा होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधीपक्षांनी घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे-पाटील यांनी आता आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली. शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतचे पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे, भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता दत्तात्रय शिनगारे, नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी ४६ धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह, महिला अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शस्त्र प्रदर्शन आणि सर्प माहिती शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
vinodtawde · 1 year
Photo
Tumblr media
कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेला संवेदनशील कल्पकतेची जोड लाभली होती. त्या प्रतिभेचा साज ल्यालेल्या अनमोल कविता साहित्यप्रेमींच्या हृदयाचा नेहमीच ठाव घेत राहतील. मराठी साहित्याचा मानबिंदू, साहित्यिकांचे प्रेरणास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र आदरांजली.
1 note · View note
rebel-bulletin · 1 year
Text
गोंदिया जिल्ह्यातील १७ आदिवासी विद्यार्थी जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण
गोंदिया,दि.14 : जिल्हयाच्या इतिहासात प्रथमच जेईई (मुख्य परीक्षा) सारख्या कठीण पात्रता परिक्षेत जिल्हयातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कुल, बोरगाव/बाजार येथील १७ आदिवासी विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन यश संपादीत केले व आपल्या प्रतिभेचा झेंडा रोवला आहे. यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) व्दारा घेण्यात आलेल्या जेईई पात्रता परिक्षेचा निकाल मंगळवारी ०७ फेब्रुवारी  रोजी जाहीर झाला. अभियांत्रिकी…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
darshanpolicetime1 · 1 year
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ३०  :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठी भाषेच्या…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year
Text
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ३०  :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठी भाषेच्या…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
आगामी युग महिलांचे, पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कणकवली: विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले. पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल परळ मुंबई येथे ‘जागर स्त्रीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kulkarnidsuraj26 · 4 years
Photo
Tumblr media
FB 0866- Use your eyes to see the needs, and use your talents to meet them. गरजा पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांचा वापर करा आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांना पूर्ण करण्यासाठी करा. Good #MorningNutrition https://www.instagram.com/p/B7fBEbch9fk/?igshid=1q184cyowdqpa
1 note · View note
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्यांना, यापुढील  १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याची  संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक बनणार असल्याचं मोदी म्हणाले. जेवढ्या जास्त संख्येनं युवक-युवती मतदान करतील त्याचे परिणाम देशासाठी तेवढेच लाभदायक ठरतील असंही ते म्हणाले. आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम थांबवावा लागणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक आणि देशाच्या यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या सामाजिक संपर्क माध्यम संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रीया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्दे यू-ट्यूब शॉर्टच्या  स्वरुपात छोट्या चित्रफिती सादर करण्याबाबतही पंतप्रधानांनी आवाहन केलं. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मीती पारितोषिक देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहिर केलं. आठ मार्च या दिवशी असलेल्या अंतरराष्ट्रीतय महिला दिनाचा उल्लेख करत मोदी यांनी देशाच्या विकास यात्रेत महिला शक्तीच्या योगदानाला नमन करण्याची ही एक संधी असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी यावेळी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची  संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. कृत्रिम बुद्धीमत्ता-ए.आय.च्या वापरातून भ्रमणध्वणीवर वाघांच्या वावराबाबत मिळणारी माहिती याबाबतही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवा-याची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचं सांगून मातृभाषेसाठी देशाच्या विविध भागात काम करणा-या व्यक्तिंचीही माहिती दिली.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२चे विविध कृषी पुरस्कार जाहिर झाले आहेत. जिल्ह्यामधील बाजी उम्रदच्या श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतच्या पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीच्या उदयसिंग सुखलाल चुंगडे यांना २०२०-२१ साठीचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहिर झाला आहे. २०२२साठीचा हा पुरस्कार बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे यांना जाहिर झाला आहे. २०२२मधल्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सूचिता दत्तात्रय शिनगारे, उद्यान पंडित पुरस्कारासाठी नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं जालना जिल्हा कृषी विभानं म्हटलं आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या प्रारंभ होत आहे.या अधिवेशनात पुरवणी मागण्या,त्यावरील चर्चा तसंच पुरवणी यासह लेखानुदान विनियोजन विधेयकं,शासकीय विधेयकं यांवर चर्चा होईल. आवश्यक खर्चाची तरतूद असणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडणी - त्यावरील चर्चा आणि त्याची मंजुरी या अधिवेशनात  होणार आहे.
****
बीड इथं आयोजित महा संस्कृती महोत्सवानिमित्त आज पतंग महोत्सव झाला. शहरातल्या पोलीस मुख्यालय क्रीडांगण इथं या महोत्सवास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे उपस्थित होत्या. महिलांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.
****
येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी थोड्या वेळापुर्वी पर्यंत इंग्लंडनं आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद ५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने पहिल्या डावात ३०७ धावा केल्यानं इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे. आज सकाळी भारतानं आपला पहिला डाव कालच्या सात बाद २१९ धावसंख्येवरुन पुढं सुरू केला. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनं चार षटकार आणि सहा चौकारांसह आकर्षक ९० धावां केल्या. शोएब बशीरनं पाच तर हार्टलीनं तीन गडी बाद केले.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अम्लान प्रतिभेचा सजग आविष्कार
अम्लान प्रतिभेचा सजग आविष्कार
अम्लान प्रतिभेचा सजग आविष्कार अंजली कुलकर्णी मलिका अमर शेख हे मराठी स्त्रीवादी कवितेतील प्रथम नाव आहे. १९७९ साली आलेला मलिका यांचा ‘वाळूचा प्रियकर’ हा कवितासंग्रह म्हणजे १९७५ साली सुरू झालेल्या स्त्रीवादी चळवळीचा पहिला मराठी काव्यात्म उद्गार. या संग्रहात मलिका यांनी स्त्री म्हणून जाणवणाऱ्या वैयक्तिक आणि सार्वत्रिक पातळीवरील स्त्रीजीवनाच्या कोंडीवर, घुसमटीवर भाष्य करून विद्रोहाचा एक धारदार सूर…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ९ महिलांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान
मुंबई, दि. 9 : विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ सन्मान प्रदान करण्यात आले. पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल, परळ येथे ‘जागर स्त्रीच्या आत्मभानाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 October 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा. ****
राज्यात विधानसभेच्या २८८, तर हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. याचबरोबर राज्यातल्या सातारा आणि बिहारमधल्या समस्तीपूर या दोन लोकसभा आणि १७ राज्यांतल्या ५१ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार असून, मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. राज्यात एकूण ३ हजार २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात २३५ महिलांचा समावेश आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम अशा सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे.
हरियाणामधे भाजपा आणि काँग्रसमधेच मुख्य लढत दिसत असून, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया पार्टी, बसपा सारख्या पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी उभे आहेत. एकूण एक हजार १६९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १०५ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
****
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्तीकर विभागाच्या तपास पथकानं मुंबईतून २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. मुंबईतल्या ३६ संवदेनशील मतदार संघांत शीघ्र कृती दलाच्या तुकड्या प्राप्तीकर विभागानं तैनात केल्या आहेत. दरम्यान, अमरावती जिल्हयात विविध ठिकाणी भरारी पथकानं काल रात्री २० हजारांच्या मुद्देमालासह, १४ लाख रूपये जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड-हिंगोली मार्गावर हिवरा पाटी इथं आचारसंहिता तपसाणी पथकानं दोन लाख ३३ हजार १५९ रुपये किमतीचा मद्याचा साठा काल जप्त केला. मद्याची ही १०० खोकी, नांदेडहून माहूर इथं नेली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
राज्यात कालपासून परतीच्या पावसानं सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सातारा, सांगली, अमरावतीसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड, हिंगगोली, परभणी, उस्मानाबाद या ठिकाणी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. मराठवाड्यात एकूण २१ मंडळांत अतिवृष्टी झाल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात काल दुपारपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी आज पहाटे पावसाची तीव्रता वाढली असून, गोदावरीसह गिरीजा, शिवना, दुधना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बहुतांश गावांत वेचणीअभावी राहिलेला कापूस परतीच्या पावसात भिजला आहे. गंगापूर तालुक्यातल्या गोदावरी काठच्या गावांतल्या पिकांना पुराचा फटका बसला आहे. पैठण तालुक्यातही जायकवाडी परीसरात ढगाळ वातावरण कायम असून पावसाची शक्यता आहे. गंगापूरसह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री परिसरात शहरात पावसाचा जोर कायम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. देगलूरनंतर काल रात्री नांदेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वसरणी मंडळात ८९ मिलीमीटर व तुप्पा मंडळात ८७ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे कापणी केलेल्या, तसंच कापणीला आलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
इथला विष्णुपुरी प्रकल्प आज सकाळी साडेसात वाजता पूर्ण क्षमतेनं भरला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक पाहून बंधाऱ्याचा एक दरवाजा सकाळी उघडण्यात आला आहे.
बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना प्रशासनानं सावधगिरीच्या सूचना दिल्याचं विष्णुपुरी प्रकल्पाच्या शाखा अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटेपासून कुठं मध्यम, तर कुठं रिमझिम पाऊस सुरू आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांत पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीनसह झेंडूच्या फुलांचं नुकसान झालं आहे. काही गावांत रात्रीपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकांत पावसाचं पाणी जमा झाल्यानं पिकाचं नुकसान झालं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सेलू शहर मंडळात १५७, तर देऊळगाव मंडळात १६५ मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुधना आणि थुना या नद्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर कुपटा, वालूर, चिकलठाणा, पाथरी, हादगाव आणि कातनेश्वर या मंडळांतही अतिवृष्टी झाली आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन, तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी काल नवी दिल्लीत संवाद साधला. कलावंतांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग देशउभारणीच्या कार्यासाठी करावा, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित चार माहितीपटांचं प्रकाशनही मोदी यांनी केलं.
****
दक्षिण अफ्रिकेविरूध्द झारखंडमधल्या रांची शहरात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच गडी बाद ३७७ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा द्विशतक केल्यानंतर बाद झाला. अजिंक्य रहाणेनं ११५ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
****
0 notes