Tumgik
#टाकसाळ
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ब्रिटनमध्ये यंदाचा गणेशोत्सव ठरणार ऐतिहासिक; ब्रिटिश सरकारची टाकसाळ आणणार बाप्पाची प्रतिमा असलेले गोल्ड बार
ब्रिटनमध्ये यंदाचा गणेशोत्सव ठरणार ऐतिहासिक; ब्रिटिश सरकारची टाकसाळ आणणार बाप्पाची प्रतिमा असलेले गोल्ड बार
ब्रिटनमध्ये यंदाचा गणेशोत्सव ठरणार ऐतिहासिक; ब्रिटिश सरकारची टाकसाळ आणणार बाप्पाची प्रतिमा असलेले गोल्ड बार ब्रिटनमध्ये बाप्पाच्या स्वागताची खास तयारी केली आहे. ब्रिटनमध्ये शाही टाकसाळीकडून (रॉयल मिंट) गणपती बाप्पाच्या प्रतिमेचा छाप असलेला सोन्याची लगड अर्थात गोल्ड बार तयार करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये बाप्पाच्या स्वागताची खास तयारी केली आहे. ब्रिटनमध्ये शाही टाकसाळीकडून (रॉयल मिंट) गणपती…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१३ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 'आयुष्मान भव' या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षा साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. आरोग्य सेवांची व्याप्ती वाढवणं, प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
दरम्यान, शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं उद्घाटन काल नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातल्या हरणखुरी इथल्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रियेवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टिका केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. विविध विभागातली अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना, या सरकारने शासकीय कंत्राट भरतीचा शासननिर्णय काढून, राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच केली आहे. कंत्राटी भरतीमुळे आरक्षण संपवण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
****
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाला बीडच्या रुग्णवाहिका चालकांनी पाठिंबा दिला आहे. बीड शहरातले २० तर गेवराई तालुक्यातले दहा रुग्णवाहिका चालक काल सायरन वाजवत जालन्याला रवाना झाले.
****
नांदेड जिल्ह्यात नांदेड - मालेगाव रस्त्यावर काल अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली. बस मध्ये ३० ते ४० प्रवासी होते, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणीही कायदा - सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करु नये, नागरीकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी, असं आवाहन अर्धापूरच्या पोलिस निरीक्षकांनी केलं आहे.
****
मराठवाडा कामगार कायदा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी विधीज्ञ गंगाधर गाडीवान यांची तर सचिवपदी विधीज्ञ अभय टाकसाळ यांची निवड झाली आहे. औरंगाबाद इथं संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
****
0 notes
vishal-lalwani-blog · 2 years
Photo
Tumblr media
आज १८ एप्रिल जागतिक वारसा दिवस.. पृथ्वीवर जशी काळानुरूप नैसर्गिक स्थित्यंतरं घडत असतात तशा अनेक मानव निर्मित घटकांतही परिवर्तन होत असते. त्यात कला व सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच ऐतिहासिक क्षेत्रातही बदल घडतात. मानवाने आपल्या संस्कृतीचे मापदंड गणल्या जाणाऱ्या कलाकृती निर्माण केल्यास त्यांना ऐतिहासिक महत्त्वासोबतच धार्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान मिळते. त्यातील काही कलाकृती गावाच्या राज्याच्या राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके बनतात. गडकोट, कमानी, राजवाडे, महाल ऐतिहासिक मंदीरे विजयस्तंभ, चित्रे इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. आई रेणुका माता तथा राजमाता अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चांदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रंगमहाल रंगमहाल ते रेणुका माता मंदिर मध्ये असणारे भुयार डोंगरावर असणारी ऐतिहासिक टाकसाळ राजदेरवादी किल्ला इंद्रायणी किल्ला धोडप किल्ला प्राचीन रेणुकामाता मंदिर गावातील जुने दगडी वेश्या चौक अश्या कितीतरी गोष्टीचा समृद्ध इतिहास आपल्या गावाचा आहे... लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबरच गावाच्या ह्या वैभवाचे योग्य संवर्धन करणे हे शासनासहीत आपल्या सारख्या प्रत्येक चांदवडकराचे कर्तव्य आहे, याची समाज मनाला जाण देण्यासाठी 'युनेस्को'तर्फे १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी #जागतिक_वारसा_दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपल्या जवळ असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे, वस्तूंचे कलाकृतींचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प करूया व अजून यात काय भर टाकता येईल याचा विचार करूया... #WorldHeritageDay #विशाल_चांदवड (at चांदवड़) https://www.instagram.com/p/CceyGQjLnPx/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
जेष्ठ कम्युनिस्ट नेते व अखेरचा लाल सलाम, स्वातंत्रसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन एक धगधगती मशाल विझली
जेष्ठ कम्युनिस्ट नेते व अखेरचा लाल सलाम, स्वातंत्रसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन एक धगधगती मशाल विझली
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला जिल्हा प्रतिनिधी दीपक गवई अकोला दि. 01 डिसेंबर :- महाराष्ट्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते व स्वातंत्र सैनिक कॉ. मनोहर टाकसाळ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी काल म़गळवार 30 नोव्हेंबर रोजी निधन झाले. कम्युनिस्ट पक्ष व चळवळ पोरकी करुण निघून गेलेत ते कामगार कष्टकरी चळवळीचे धग धगती मशाल होते.! त्यांचे भारतीय स्वातंत्र मोठे योगदान होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 70…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २८ सप्टेंबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
भारतीय लष्कराने पाक - व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या घटनेला आज सहा वर्षं पूर्ण झाली. २०१६ मध्ये आजच्याच दिवशी ही लष्करी कारवाई करण्यात आली होती. उरी हल्ल्यामध्ये १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याच्या ११ दिवसांनंतर, भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठ्या संख्येनं दशतवाद्यांना ठार करण्यात आलं.
****
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला असून, त्यांना आदरांजली वाहिली आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आजहोणार आहे. मुंबईत प्रभादेवी इथं रविंद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
****
ग्रामीण विकास मंत्रालयानं विकसित केलेल्या, देशभरातल्या खेडेगावांतल्या विहिरींच्या पाणीपातळीची माहिती देणार्या 'जलदूत' या ॲपचं लोकार्पण, काल नवी दिल्लीत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालं. या ॲपद्वारे देशभरातल्या विहिरींची, मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात, अशी वर्षातून दोनदा पाणीपातळी मोजता येईल.
****
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. काल नवी दिल्लीत २०१८-१९ चे पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा भगतसिंग यांची जयंती आज विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रात, सामाजिक कार्यकर्ते विधिज्ञ अभय टाकसाळ यांचं, ‘शहीद भगतसिंग यांचा सामाजिक दृष्टीकोन’, या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघानं काल यजमान गुजरात संघावर ४६-२२ अशा गुणफरकानं विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघानं सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे इथल्या खासगी निवासस्थानासह सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे मारले. अनिल परब यांच्या दापोली इथल्या रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या धर्तीवर राज्यांनीही गती शक्ती बृहत् आराखडा तयार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यासाठी राज्यपातळीवर विभाग गठीत करावेत, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल प्रगती मंचाची बैठक झाली. आठ प्रकल्प आणि एका कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रासह १४ राज्यांशी संबंधित असलेले हे आठ प्रकल्प ५९ हजार ९०० कोटी रुपये खर्चाचे आहेत.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कोविड १९ महामारीच्या आव्हानात्मक काळात भारतीय माध्यमांच्या भूमिकेचं कौतुक केलं. १७ व्या आशिया माध्यम परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय माध्यमांनी कोविडच्या काळात कोविड जागरूकता संदेश, महत्त्वपूर्ण सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांचा मोफत सल्ला देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली. दूरदर्शन आणि आकाशवाणीनं तत्पर कव्हरेज, गावोगावच्या बातम्या आणि सार्वजनिक आरोग्यावर कार्यक्रम आयोजित करुन कठीण काळात सार्वजनिक सेवेच्या सरकारी आदेशाचं वितरण केलं, असं ठाकुर म्हणाले.
****
औरंगाबाद शहरातल्या बापू नगर आणि पैठणगेट भागातला पाणी प्रश्न तातडीनं सोडवावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल महानगरपालिकेवर पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मुबलक पाणी, पाण्याचा सहा ते सात दिवसांचा खंड कमी होत नाही, दुषित आणि कमी दाबाने पाणी हे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत वारंवार पदयाञा काढून आंदोलन करण्याचा इ���ारा कॉम्रेड अभय टाकसाळ आणि महिला आंदोलकांनी यावेळी प्रशासनाला दिला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 December 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०१ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्यातील प्राथमिक शाळा आजपासून सुरू, मात्र औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात शाळा बंदच राहणार.
·      नांदेड जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय
·      बारा खासदारांच्या निलंबनावरुन संसदेचं कामकाज काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही बाधित
·      देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया
·      मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याचं आश्वासन, महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण
·      राज्यात ६७८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ३६ बाधित
आणि
·      औरंगाबाद शहरातले जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं निधन
****
राज्य सरकारनं प्राथमिक शाळा आजपासून सुरू करायला परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू होत आहेत, मात्र काही प्रमुख शहरांमध्ये शाळा आजपासून सुरू होणार नाहीत. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाची भिती, तयारीचा अभाव ही कारणं देत शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
म���ंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात, १५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर महापालिकेनंही १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे. तर नांदेड जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निणर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.
उस्मानाबाद, बीड आणि सातारा जिल्ह्यात मात्र आजपासून शाळांमधले वर्ग सुरू होणार आहेत. राज्यातल्या निवासी आश्रमशाळा सुद्धा आजपासून सुरू होणार आहेत.
****
बारा खासदारांच्या निलंबनावरुन संसदेचं कामकाज काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसीही बाधित झालं.
लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कामकाजावर बहिष्कार घातला. गदारोळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली, तसंच यापुढे लोकसभेचं कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, या गदारोळातच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेतन आणि सेवा शर्ती सुधारणा विधेयक २०२१, आणि सहायक पुर्नप्रजनन तंत्रज्ञान नियमन विधेयक २०२० लोकसभेत सादर करण्यात आलं.
राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेली मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. या मुद्यावरुन गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
दरम्यान, निलंबित केलेल्या १२ विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबद्दल माफी मागितली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
****
वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत सांगितलं. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेत असल्याचं राय यांनी सांगितलं.
****
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. कोविड काळात आपण अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत, प्रयोगशाळाही उभारल्या आहेत. हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात असून, संशयित रुग्णांचं जिनोम सिक्वेंसिंग केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी, सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करावी, अशा सूचना केंद्र शासनानं दिल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य शासनांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवरही कडक निगराणी आवश्यक असून, संक्रमण झाल्याचं स्पष्ट झाल्यास, तातडीनं नामांकित जीनोम सिक्वन्सिंग प्रयोग शाळांमध्ये, त्यांच्या लाळेचे नमुने पाठवावेत, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. राज्य समन्वय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या या प्रयोगशाळांशी समन्वय साधून, जिनोमिक विश्लेषणाचे निष्कर्ष तातडीनं मंत्रालयात पाठवावेत असं ही या पत्रात नमूद केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्���ांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याचं आश्वासन, महाविकास आघाडी सरकारनं पूर्ण केलं आहे. राज्यात १० जिल्ह्यांमधले ३४ जण या आंदोलनात मृत्यूमुखी पडले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले सहा, बीड ११, लातूर चार, पुणे आणि जालना जिल्ह्यातले प्रत्येकी तीन, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातले प्रत्येकी दोन, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. या सर्व कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रूपये मदत देण्याचं आश्वासन यापूर्वीच्या सरकारनं दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र १५ कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये एवढीच मदत देण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारनं या १५ कुटुंबियांना उर्वरीत पाच लाख रूपये, आणि अन्य १९ कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्यासाठी, दोन कोटी ६५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत.
****
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत एक हजार ५८४ पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
वर्ग एक ते वर्ग चार मधल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबतची आढावा बैठक काल घेण्यात आली. राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळेच ही मोठी पदभरती करणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी राजकीय तसंच अन्य विषयांवर चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणार नाहीत, अशी भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली असल्याचं, संजय राऊत यांनी सांगितलं.
बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
****
ज्येष्ठ सनदी अधिकारी देवाशिष चक्रवर्ती यांनी काल सीताराम कुंटे यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार स्वीकारला. कुंटे सेवानिवृत्त झाल्यामुळे पुढील आदेशापर्यंत चक्रवर्ती यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे. कुंटे यापुढे मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून कार्यरत राहतील.
****
राज्यात काल ६७८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३५ हजार, ६५८ झाली आहे. काल ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ९९७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९४२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद आठ, बीड सात, जालना सहा, उस्मानाबाद चार, तर नांदेड जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
येत्या सहा डिसेंबर - महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबईत कोविडचं सावट असल्यानं चैत्यभूमीवर जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनानं निर्बंध घातले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घरी राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या नेतेमंडळी आणि मान्यवरांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेलं असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असं यामार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातले जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं काल निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे राज्य सचिव तर काही काळ राष्ट्रीय परिषदेचे ते सदस्य होते. दलित अत्याचार विरोधी संघर्ष समिती तसंच महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. भारतीय खेत मजदूर युनियनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांनी काही काळ काम केलं. आज सकाळी कॉम्रेड टाकसाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळांवर ज्येष्ठ नागरिक  आणि गरोदर महिलांना परवानगी देण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या  अटीच्या अधिन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शासकीय कार्यालयात आणि परीसरात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. या उपाय योजनांची जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पायमल्ली करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणी शहरातल्या गांधी पार्क, वसमत रोड, काळी कमान दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि पेट्रोलपंप आदी ठिकाणी जिल्हाधिकारी आंचल गोयल तसंच महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी काल सकाळी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येकाची लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी केली.
दरम्यान, शहरात सर्व पेट्रोलपंपावर लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. आजपासून कोविड लस न घेतलेल्यांना पेट्रोल पंपावर प्रवेश नाकारण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातही ५ डिसेंबरनंतर लसीकरणाचे पुरावे सादर केल्याशिवाय धान्य न देण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ औरंगाबाद इथं उभारण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची घोषणा
** प्रसिद्ध नाटककार, नाट्य समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांचं निधन
** ई-ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्याचा महाराष्ट्रात अव्वल क्रमांक
आणि
** स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या व्याख्यानमालेचं उद्या उद्धाटन
****
देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ औरंगाबाद इथं उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली आहे. २०१९ मध्ये डॉ कराड हे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ राजेश रगडे यांच्याशी झालेल्या चर्चेत पर्यटन विद्यापीठाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. डॉ रगडे आणि डॉ माधुरी सावंत यांनी हा प्रस्ताव तयार करून आज डॉ कराड यांच्याकडे सादर केला. त्यावेळी कराड यांनी पर्यटन विद्यापीठ उभारण्याबाबत घोषणा केली.
 दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई इथं क्रीडा प्रशिक्षण केंद्रासह मराठवाड्यात आधुनिक क्रीडा सुविधांच्या निर्माणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसंच औरंगाबाद इथं केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यात येईल, असं आश्वासन डॉक्टर कराड यांनी दिलं आहे. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कराड बोलत होते. गेल्या सहा दशकांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना डॉ. कराड यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
प्रसिद्ध नाटककार, नाट्य समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारं व्यक्तीमत्व गमावलं अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पवार यांचं यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ च्या साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचं प्रथम पारितोषिकही मिळालं होतं. २०१४ मध्ये  झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं.
****
इतर मागासवर्ग- ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालढकल केल्याचा, आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी औरंगाबाद इथं आज एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं. आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणण्याचं हे सरकारी षडयंत्र असून निवडणुकांअगोदर आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरीत्या न सोडवल्यास त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा इशाराही सावे यांनी दिला आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक बोलंत होते. तो अहवाल सीबीआयच्या नोंदीतील आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे असंही मलिक म्हणाल्याचं वृत्तसंस्थेचं वृत्त आहे.
****
औरंगाबाद इथं बॅकांच्या खाजगीकरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. शहरातल्या भाकपच्या खोकडपुरा शाखेच्या वतीने आज या मोहीमेला सुरवात करण्यात आली. यावेळी शाखासचिव मनिषा भोळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ उपस्थित होते.
****
राज्य शासनाच्या ई-ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती तसंच जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधी ई - ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने खर्च करायाचा आहे. परभणी जिल्ह्याने यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती तसंच जिल्हा परिषद या तीनही स्तरावर राज्यात आघाडी मिळवली आहे. राज्यातल्या २८ हजार ८८९ ग्रामपंचायतीपैकी परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव ग्रामपंचायतीने, राज्यभरातल्या ३५२ पंचायत समित्यांपैकी गंगाखेड पंचायत समितीने तर राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांपैकी परभणी जिल्हा परिषदेने सर्वप्र��म ईग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीद्वारे देयकं अदा केली आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्यावतीने येत्या ३ सप्टेंबरपासून आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचे उद्या सकाळी ९ वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उप��्थिती राहणार आहे. इंग्रजाचे देशात आगमन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, १०० भागांच्या व्याख्यानमालेतून दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे. याच कार्यक्रमात औरंगाबादच्या वृत्तविभागाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे या ई- पुस्तकाचे प्रकाशन मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी या ई पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत.
****
टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबलटेनिसमधे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविना पटेल हिचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेलं ऑलिंपिक पदक देशातील युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडवण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार याने दोन पूर्णांक सहा मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकलं आहे.
//********//
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** डीआरडीओकडून विकसित कोविड प्रतिबंधक औषधाच्या आपात्कालीन वापराला औषध महानियंत्रकांची परवानगी
** कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांकडून राज्यसरकारची प्रशंसा
** औरंगाबाद इथं आज १७ कोविडग्रस्तांचा मृत्यू; तर बीड जिल्ह्यात नवे एक हजार ३३९ रुग्ण  
आणि
** राज्यात प्रथमच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचं ८० खाटांचं कोविड सुश्रुषा केंद्र
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ ने विकसित केलेल्या कोविड प्रतिबंधक औषधाच्या आपात्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांवर उपचारासाठी हे औषध प्रभावी ठरेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डीआरडीओनं गेल्या वर्षी एप्रिलपासून या औषधाची चाचणी सुरू केली होती. ऑक्टोबर महिन्यात ११० तर डिसेंबर महिन्यात २२० रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली. ‘टू डीऑक्सी डी ग्लुकोज’ नावाच्या या औषधामुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारते आणि कृत्रीम प्राणवायूची गरज कमी होते. महाराष्ट्रासह एकूण नऊ राज्यातल्या रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली असून, ग्लुकोज आधारित या औषधाची देशांतर्गत उत्पादन प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड संदर्भातल्या राष्ट्रीय धोरणात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाचा कोविड चाचणी बाधित असल्याचा अहवाल आवश्यक नसेल. एका शहरातला रहिवासी दुसऱ्या शहरातही उपचार घेऊ शकेल. ओळखीच्या पुराव्याशिवायही रुग्णाला उपचार देणं रुग्णालयांना बंधनकारक असेल. या उपचारांमध्ये औषधोपचार, प्राणवायू पुरवठा आणि अशा अत्यावश्यक उपचार सुविधांचा समावेश असेल. यासोबतच कोणताही रुग्ण आवश्यकता नसेल, तर रुग्णालयात दाखल होऊ शकणार नाही. सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत
****
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसरकारची प्रशंसा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरध्वनी द्वारे पंतप्रधानांना राज्यात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्याला प्राणवायू पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारकडून अधिक बळ मिळावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केल्या जात असलेल्या नियोजनाची माहितीही ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
****
राज्यात आज तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस, द्रवरुप प्राणवायू घेऊन पहाटे ३ वाजता नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली. ओडिशाच्या अंगुलहून द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूने भरलेले टँकर घेऊन ही रेल्वे आली, या टँकरपैकी ५६ मेट्रीक टन प्राणवायूचे ४ टँकर उतरवण्यात आले. गेल्या महिन्यातही, दोन ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या राज्यात आल्या होत्या.
****
देशातील कोविड १९ ची परिस्थिती हातळण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. प्राणवायू, रेमडिसिवीर औषधी, आणि कोविड प्रतिबंधात्मक लसींचा  तुटवडा  म्हणजे जनतेवर होत असलेला अन्याय आहे असं मलिक म्हणाले. केंद्र सरकार जाणूनबुजून अन्याय करतय की सरकारला काम करता येत नाहीये, असा सवाल मलिक यांनी केला आहे. कोविड लस, प्राणवायू आणि रेमडेसिवीर लवकरात लवकर उपलब���ध करुन देण्याची मागणी मलिक यांनी केली.
****
देशात आतापर्यंत १६ कोटी ७१ लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.काल दिवसभरात ३० राज्य आंणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १८ ते ४४ वर्षे वयाच्या २ लाख ९६ हजार २८९ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. देशमुख यांनी आज मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारा बद्दल माहिती घेतली त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले
****
राज्यात ग्रामीण भागात पसरत चाललेल्या कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी, ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांशी राज्य कृती दल थेट संपर्क साधणार आहे. देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ८४९ झाली आहे. दरम्यान, जिल्हाभरात आज ५८४ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५२ हजार १६९ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ६४० रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ४४ हजार ६७५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज एकूण १७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या ७, जालना तसंच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या ८ रुग्णांचा समावेश आहे.
****
बीड मध्ये आज एक हजार ३३९ नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक ३२७ रुग्ण हे बीड तालुक्यातले असून अंबाजोगाई इथले २४२, परळी १३६, केज २१०, धारुर ९६, माजलगाव ६०, शिरुर ६२, पाटोदा ७४, गेवराई ५४, आष्टी १९ आणि वडवणी इथल्या ५९ जणांचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीनं ८० खाटांचं कोविड सुश्रुषा केंद्र सुरु केलं आहे.असं केंद्र उभारणारी राज्यातली ही पहिली बाजार समिती आहे.आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते या आज  केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना असे केंद्र उभारण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं होतं.
****
औरंगाबाद इथं महावितरणच्या कोविडबाधित कर्मचाऱ्यांसाठी हर्सूल इथल्या प्रशिक्षण केंद्रात १० रुग्णखाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या हस्ते या कक्षाचं आज सकाळी उद्घाटन करण्यात आलं. कोविडची लागण झालेल्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या आणि राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी, हा कक्ष सुरू केला असल्याचं, महावितरणकडून सांगण्यात आलं.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी परभणी इथल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कोविड सुश्रुषा केंद्राला आज भेट दिली. यावेळी रुग्णांना आणखीन चांगले उपचार कसे देता येतील तसेच त्यांना औषधी बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना टाकसाळे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.या केंद्रात २६४ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दु. मो. लोणे लहानकर यांचं नांदेड इथं अल्पशा आजाराने निधन झालं. ते ७८ वर्षे वयाचे होते. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील लहान गावचे असलेले लोणे यांचे घुगऱ्या, गोधडी, हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
****
गेल्या सुमारे दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत असलेल्या देशभरातील ३० जिल्ह्यांच्या यादीतून आता पुणे- मुंबईचं नाव वगळण्यात आलं आहे. या यादीत आता राज्यातल्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पुणे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात आज दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. रिश्टर स्केलवर २ पूर्णांक ९ तीव्रतेचा पहिला धक्का १ वाजून ५५ मिनिटांनी बसला तर दुसरा तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का लगेचच १ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावाजवळ असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//*********//
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकार भरीव काम करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
** यापुढे फक्त धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारची गुंतवणूक - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती  
** नवापूर तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झालेल्या सुमारे आठ हजार कोंबड्या आतापर्यंत नष्ट
** औरंगाबाद मनपा शाळेतल्या १० विद्यार्थ्यांच्या उपग्रहांचं अवकाशात प्रक्षेपण
आणि
** टेनिसपटू अंकिता रैना हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश
****
आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकार भरीव काम करत असल्याचं प्रतिपादन कें���्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक गावापर्यंत आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे. देशात २२ एम्स रुग्णालयं उभारली जात असून यातली १८ पूर्ण झाली आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा जागा वाढवल्या जात आहेत. स्थानीय भाषेत प्रवेश परीक्षा देऊन मुलं वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, असं शहा यांनी नमूद केलं. कोविड काळात भारतातला मृत्यू दर संपूर्ण जगात कमी होता, हे मोठं यश असल्याचंही शाह म्हणाले.
****
यापुढे फक्त धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. आज मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपने घेतलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता, मात्र, त्यात सुसूत्रता नव्हती. जनतेचा पैसा अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने गुंतवला पाहिजे. त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.
गरिबांना सुरक्षा, युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्योजकांना नवं अवकाश देत, देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी नागरिकांचा पैसा वापरला गेला पाहिजे असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा समाजवादाचं जोखड झुगारून देणारा अनेक अर्थांनी दिशादर्शक, आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते आज सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते. ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करुन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, मात्र मराठा समाजाने आता पुन्हा एकजूट होवून सरकारवरती दबाव निर्माण केल्या शिवाय आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गावात आता उपोषणाला बसण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करुन समाजावर अन्याय केला आहे, सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्यूची लागण झालेल्या सुमारे आठ हजार कोंबड्या आतापर्यंत नष्ट करण्यात आल्या आहेत. नवापूर तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे ८ लाख ७४ हजार ५९८ कोंबड्या आहेत, यापैकी ३१ हजार ८३३ कोंबड्या आतापर्यंत दगावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या कोंबड्याच नष्ट करण्यात येत आहेत. कोंबड्या नष्ट करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची १२ पथकं कार्यरत आहेत, प्रत्येक पथकात ५ जणांचा समावेश आहे. संसर्ग केंद्रापासून १ किलोमीटर  त्रिज्येत क्षेत्र बाधित क्षेत्र आणि १० किलोमीटर त्रिज्येत क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.
****
जगातील हवामान बदलामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहन आता बंद करावी लागतील, यापुढे फक्त  इथेनॉल आणि सीएनजी वर चालणारी वाहने  वापरात आणावी लागतील, असं मत कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात मीरज इथं बांबू लागवड चर्चासत्रात ते बोलत होते. वातावरणात कार्बन वाढवणाऱ्या बाबी आपण टाळल्या पाहिजेत, असं पटेल यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही नियुक्ती केली. विद्यापीठाने सादर केलेल्या सर्वसमावेशक सम्यक योजनेला मान्यता देणं, राष्ट्रीय तसंच जागतिक पातळीवर होत असलेला शैक्षणिक विकास जाणून घेणं तसंच त्याचा मागोवा घेणं आणि त्या बदलानुरूप राज्यात शिक्षण पध्दतीमध्ये यथोचित धोरण आणि कार्यतंत्र विकसित करणं, या आणि इतर कार्यांसाठी हा आयोग कार्यरत असेल
****
मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना  अभिवादन केलं. अर्धांगिनी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भक्कम साथ दिली, ‘महामानव’ म्हणून बाबासाहेबांच्या जडणघडणीत माता रमाईंचं योगदान सर्वाधिक असल्याचं, उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे दिवंगत सरचिटणीस र.ग.कर्णिक यांना औरंगाबाद इथं कामगार कर्मचारी संघटनेतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालय परिसरात कंत्राटी कामगारांच्या उपोषण स्थळी झालेल्या या श्रद्धांजली सभेत, संघटनेचे महासचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी कर्णिक यांच्या कार्याला उजाळा दिला. कर्णिक यांच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचं टाकसाळ यांनी सांगितलं
****
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सूर्यकांत महाडिक यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांपैकी भारतीय कामगार सेना प्रमुख संघटना आहे.
****
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंजअंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळेतल्या १० विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह आज अवकाशात झेपावले. रामेश्वरम् इथल्या प्रक्षेपण केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. औरंगाबाद इथं प्रियदर्शिनी इंदिरा नगर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी हे प्रक्षेपण थेट पाहिलं. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,   आणि असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थांकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे.
****
जालना जिल्ह्यात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ३७० झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोविड संसर्ग झालेले नवे २९ रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोविड बाधितांची एकूण संख्या आता १३ हजार ८८० झाली आहे. दरम्यान, कोविडमुक्त झालेल्या २६ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ३५६ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. बाधित असलेल्या १५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज कोविड बाधित चार नवे रुग्ण आढळले, तर २ जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७७६ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६७३ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात लागलेल्या आगीच्या कारण���ंची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती गठित केली आहे. या समितीने तीन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लाकडी सामानास ६ फेब्रुवारीच्या रात्री अचानक आग लागल्यानंतर दवाखान्यात मोठा हलकल्लोळ उडाला होता.
****
भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत अंकिता आपल्या रुमानियन साथीदारासोबत, महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत खेळेल. कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट खेळण्याचा मान मिळवणारी अंकिता,  तिसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. या आधी निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांना हा मान मिळाला आहे. अंकिताची महिला एकेरीच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्याची प्राथमिक संधी थोडक्यात हुकली असून, स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एखाद्या खेळाडूनं माघार घेतली तर त्या जागी खेळण्याची संधी अंकिताला मिळू शकते.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आला. आज दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात, सहा बाद २५७ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत ९१, चेतेश्वर पुजारा ७३, शुभमन गिल २९, कर्णधार विराट कोहली ११ तर अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर बाद झाला. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ३३ तर रविचंद्रन अश्विन ८ धावांवर खेळत होते. भारत सध्या ३२१ धावांनी पिछाडीवर आहे.
****
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकांत महाडिक यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं. शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांपैकी भारतीय कामगार सेना ही एक प्रमुख संघटना आहे.
****////****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      शुक्रवारी मतदान झालेल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी.
·      कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यास कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार.
·      राज्यात नवे ३ हजार ८१ कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १९२ रुग्णांची नोंद.
·      उस्मानाबाद जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना.
·      विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळे शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ - संयुक्त किसान मोर्चाची टीका.
आणि
·      नाशिक इथं गुटखा आणि सुगंधीत तंबाखूसह सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक.
****
गेल्या शुक्रवारी मतदान झालेल्या राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. ३४ जिल्ह्यातल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी, सुमारे ७९ टक्के तर मराठवाड्यातल्या तीन हजार ८८१ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८० टक्के मतदान नोंदवलं गेलं होतं. या ग्रामपंचायतींमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ५८२, बीड १११, नांदेड ९०७, परभणी ४९८, उस्मानाबाद ३६८, जालना ४४७, लातूर ३८३, तर हिंगोली जिल्ह्यातल्या ४९५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, शासनातर्फे निर्देश जारी करण्यात आले आहेत. गर्दी होईल असा कोणताही कार्यक्रम, सभा, मिरवणूक, जल्लोष करण्यावर सक्त प्रतिबंध करण्यात आले आहेत. याबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही, पोलिस प्रशासनानं दिला आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जर आज आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांना काल १७ जानेवारी या हुतात्मा दिनी अभिवादन करताना मुख्यमंत्री बोलत होते. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं, हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, या हुतात्म्यांना अभिवादन केलं. कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं पवार म्हणाले. सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही बेळगाव सीमा भागातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.  
****
बर्ड फ्लू विषाणूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही, असं पशुसंर्वधन, दुग्धविकास आणि मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं एका बैठकीत बोलत होते. बर्ड फ्लू विषाणूची बाधा पक्ष्यांकडून मानवाला होत नाही. यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करतांना भीती बाळगू नका. मात्र पक्षांची विष्ठा संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या, पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी वापरलेली भांडी स्वच्छ धुऊन घ्या, मेलेल्या पक्ष्यांना हात लावू नका, मरतुकीबाबत जिल्हा आणि विभागीय नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचं आवाहन केदार यांनी केलं आहे.  
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतरांना लस टोचून घेण्यासाठी आवाहन केलं, मात्र, त्यांनी स्वत: लसीकरण का करून घेतलं नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे दोघेही आघाडीचे कोविड योद्धे आहेत. त्यामुळे त्यांनीही लस टोचून घेतली, तर लसीकरणाबाबत विश्वासार्हता निर्माण होईल, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल ३ हजार ८१ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ९० हजार ७५९ झाली आहे. काल ५० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ४३८ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल दोन हजार ३४२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार ४६९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १९२ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३८ नवे रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात ३२, बीड ३१ नांदेड ३४, परभणी २१, उस्मानाबाद १४, जालना १३, तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे नऊ रुग्ण आढळून आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची सूचना, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणाची काल आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, यापुढील भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, तसंच जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. असे निर्देश टोपे यांनी दिले.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि कर्करोग रुग्णालयात कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याची मागणी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सचिव अभय टाकसाळ यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन टाकसाळ यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सादर केलं. ३६० पदांवर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं.
****
देशातले विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याची टीका, संयुक्त किसान मोर्चाचे मुख्य संबोधक राकेश टिकैत यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कशाप्रकारे आवाज उचलतो, याकडे देशातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असल्याचं, टिकैत यांनी सांगितलं. येत्या २६ तारखेला दिल्लीत टॅक्ट्रर रॅली काढण्यावर संयुक्त किसान मोर्चा ठाम आहे, मात्र १९ तारखेला होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या उच्चस्तरीय बैठकीत, यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती टीकैत यांनी दिली.  
****
मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारची भूमिका निष्काळजीपणाची असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे, ते काल भाईंदर इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यात विकासाचा बोजवारा उडाला असून, सामाजिक संतुलन बिघडलं असल्याची टीका दरेकर यांनी केली.
****
प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना २०१८ साली, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यांनी मुस्तफा खान यांच्या निधानाबद्दल, शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना, खान साहेब हे फक्त चांगले गायकच नाही, तर एक चांगले व्यक्ती सुद्धा होते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला बौद्ध धम्म हा जगात शांतीचं प्रतीक आहे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. आठवले सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या कराळी गावात बुद्ध विहाराचं उदघाटन त्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष राजा ओव्हाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जांनुसार, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाकरता आवश्यक प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी, येत्या वीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेनंतर, कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचंही, सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना” जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी, थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी, २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण कर्जमाफी करण्यात येत असून, शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२१ ही आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
यामधे जे लोक दोन वर्षापेक्षा जास्त थकित असतील त्यांच्या मुद्दलावरती फक्त वीस टक्के रक्कम भरून त्यांना कर्जमुक्त होता येते. तर या संधीचा सर्वांनी लाभ घ��यावा असे आम्ही आवाहन करतो.
****
राजस्थान मधून सापुतारा मार्गे नाशिक इथं येणारा गुटख्याचा मोठा साठा काल नाशिक पोलिसांनी जप्त केला. दिंडोरी तालुक्यात वणी इथं दोन कंटेनर अडवून तपासणी केली असता, यामधून सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी दोन्ही कंटेनर, प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधीत तंबाखू असा सुमारे एक कोटी २४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेसह पर्यटन विकासाची कामं मार्गी लावण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिलं आहे. उदगीर तालुक्यात हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर काल वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांनी पर्यटन विकासासह अन्य मागण्या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.
****
हिंगोली शहरात भाजी मंडई परिसरातल्या काही दुकानांना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास आग लागली, या भीषण आगीमध्ये तीन दुकानं भस्मसात होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं. या आगीची झळ परिसरातल्या इतर दुकानांनाही बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महापालिका आणि नगरपालिकेतल्या नगरसेवकांना निवृत्ती वेतन मिळावं, अशी मागणी नाशिक इथं काल झालेल्या नगरसेवकांच्या परिषदेत करण्यात आली. महापालिका तसंच नगरपालिकांमध्ये नगरसेवकांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जादा अधिकार आहेत, हा असमतोल दूर करण्याची मागणीही या परिषदेत करण्यात आली. कायद्यातल्या या संदर्भातील त्रुटी दूर करण्याचं आवाहन, या परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर पा���ील यांनी केलं. राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक मोठ्या संख्येनं या परिषदेला उपस्थित होते.
****
उस्मानाबाद इथं न्यायालयीन कामकाज मराठीतून करण्यावर भर दिला जाईल, असं न्यायाधीश ए. ए. शिंदे यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस बी तोडकर, साहित्यिक तसंच चित्रकार राजेंद्र अत्रे यांच्यासह कौटुंबिक न्यायालयातले कर्मचारी विधिज्ञ तसंच पक्षकार यावेळी उपस्थित होते. न्यायालयीन तसंच प्रशासकीय कामकाज जर मराठीतून झालं तर लोकांना ते अत्यंत सोयीचं होईल, असं मत अत्रे यांनी यावेळी व्यक्त केलं. २७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवाड्यात कौटुंबिक न्यायालयात विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात बेलकुंड इथल्या संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखान्याला जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल भेट देऊन, येत्या मार्च महिन्यात चाचणी गळीत हंगाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. कारखान्यात वेगवेगळे नवीन प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत, या कामासाठी आर्थिक अडचण भासणार नाही, याची ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.स्मिता अवचार यांची ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने सदर नियुक्ती करण्यात आली असून, पुढील आदेशापर्यंत प्राध्यापिका अवचार या प्रभारी संचालक म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
****
भाजपचे परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांचं काल पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं, ते ५१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी परभणीतल्या वैकुंठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी, फरदड निर्मूलन मोहीम राबवावी असं आवाहन, कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. गुलाबी बोंडअळीला फरदडीमुळे खाद्य उपलब्ध होतं, त्यामुळे या महिना अखेरीस सर्व कापसाचं पीक काढून नष्ट करावं, गुलाबी बोंडअळीचं जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी फरदड नष्ट करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.  
****
क्रिकेट
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ब्रिस्बेन इथल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात, चार बाद १३० धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव काल ३३६ धावांवर संपुष्टात आला. सामन्यात ऑस्ट्रेलिया सध्या १६३ धावांनी आघाडीवर आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेच्या गाळ्यांचा काल प्रथमच ई- लिलाव करण्यात आला. या लिलावास शहरातील व्यावसायिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सात दुकानांच्या लिलावातून पालिकेला २३ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात ३६ लाख ३० हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती, महापालिकेकडून देण्यात आली.
****
तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव इथल्या मधू राजेंद्र राऊत या विद्यार्थिनीची, आसियान इंडिया हॅकेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेमध्ये दहा देशातले विद्यार्थी सहभाग घेणार असून, मधू ही भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान आजपासून १७ फेब्रुवारी पर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून रस्ता सुरक्षा जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन; औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा शुभारंभ.
·      शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा निर्णय अन्यायकारक - शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची टीका.
·      कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत.
·      दिव्यांग सहाय्यक उपकरणं मोफत वाटपासाठीच्या ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण.
·      पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं काल राज्यभरात निदर्शनं.
·      वीरशैव साहित्याचे अभ्यासक, शांतितीर्थ स्वामी यांचं निधन; आज चाकूर इथं अंत्यसंस्कार.
आणि
·      राज्यात काल ४ हजार २५९ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २७४ रुग्णांची नोंद.
****
महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते. एक हजार ६८०कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख गृहीत धरुन तयार केली जात आहे. या योजनेच्या कोनशिलेचं अनावरण आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारक, शहरालगत मिटमिटा परिसरात सफारी पार्क, तसंच औरंगाबाद शहरातल्या १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केली असल्याचं सांगितलं.
प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो, पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सकाळीच मी सूचना देऊन आलेलो आहे या शहराच्या गुंठेवारी बाबतीमध्ये आणि तो ही प्रश्न लवकरात लवकर मी तुम्हाला सोडवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मग गुंठेवारीचा प्रश्न असेल, सिडकोतल्या घरांचा प्रश्न असेल, मालकी हक्काचा प्रश्न असेल सूचना दिलेल्या आहेत.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारकात फक्त बाळासाहेबांचा पुतळा नसेल, तर हे स्मारक पाहून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडेल, असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले –
शिवसेना प्रमुखांचं स्मारक त्यांच्या या लाडक्या शहरामध्ये होतंय. पण नुसता पुतळा नाही उभा करणार. जे शिवसेना प्रमुखांनी प्रत्यक्ष त्यांच्या हयातीमधे संभाजीनगरला दिलं तेच प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रीयत्व सांगणारे विचार ते देणारं ते स्मारक असेल. नुसता पुतळा नसेल. तर त्यांचे विचार तिकडे गेल्यानंतर एक बाहेर पडणारं माणूस त्याला एक हिंमत मिळेल, त्याला आत्मविश्वास येईल. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हे त्याच्यामुळे कळेल.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची गेल्या आठवड्यात पाहणी केली, आणि येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत शिर्डीपर्यंतचा टप्पा पूर्ण करण्याची सूचना आपण संबंधितांना दिली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात स्मरण करून दिलं. औरंगाबाद शहरात काल शुभारंभ झालेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपण कधीही येऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पैठण शहराचाही पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले –
भाग्य मिळत असेल श्रीखंड्या होण्याचं आणि माझ्या कावडीनं जर का कोणाच्या घरामधे पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल, तर तेही पुण्य मी म्हणेल त्याला सुध्दा एक भाग्य लागतं. नाथांची आठवण काढल्यानंतर संदीपान म्हणाले साहेब आमच्याकडे काय? पैठणला पाणी नाही. म्हणलं थांबा जरा कावड घेऊन तुमच्याकडे पण येतो. तुमच्याही पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि सोडवणार.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या या समारंभाला राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाणीपुरवठा योजनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विमानतळ परिसरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला थकीत पगाराच्या मागण्यांचे फलक दाखवले. राज्य कामगार कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अभय टाकसाळ याच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी काल पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं.
व्हिडियोकॉन ग्रुप एमप्लाईज युनियनच्या वतीनंही काल उद्योगमंत्री तथा पालकमंत्री देसाई यांना निवेदन देण्यात आलं. वेतनाच्या मागणीसाठी हे कामगार गेल्या ४७३ दिवसांपासून साखळी उपोषण करत असल्याकडे पालकमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं.
****
माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा राज्य शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं केली आहे. या निर्णयाचा सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत असल्याचं, संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी म्हटलं आहे.
मान्यताप्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित शाळांमधले नाईक, पहारेकरी, रात्रीचे पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील, असं शिक्षण विभागानं आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.
हा शासन निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणे अपेक्षित होतं, असं खांडेकर यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून या यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याची टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या २५जानेवारीपासून होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी सरकारने सर्व याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन आरक्षणासाठी सुसंगत रणनीती आखावी, अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी सात किंवा नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी सरकारनं करायला हवी होती, असंही मेटे यांनी नमूद केलं.
****
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत असून, अधिवेशनात दोन दिवस कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते, गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना आज सायंकाळी चहापानासाठी आमंत्रित केलं आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ पैकी आठ नावांवर आक्षेप घेत दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, ही आठ नावं निव्वळ राजकीय पार्श्वभूमीचे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावरची पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार असून, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठीच्या ‘महाशरद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण काल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड इथून सहभागी झाले. या माध्यमातून २९ लाख दिव्यांगापर्यंत विविध सहाय्यक उपकरणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या ‘ई-बार्टी’ या मोबाईल अँपचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं.
****
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल राज्यभरात शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदो��नं करण्यात आलं.
औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. लातूर इथं जिल्हा प्रमुख नामदेव चाळक यांच्या नेतृत्वात, बीड इथं युवानेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत, हिंगोली इथं जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात तर परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातही परंडा, कळंब, उमरगा इथं शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत केलेल��या कथित आक्षेपार्ह विधानाचा या सर्वच ठिकाणी निषेध करण्यात आला. लातूर इथं दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारुन दहन करण्यात आलं. जालना इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. नांदेड इथंही दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.
नंदुरबार आणि शहादा शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या ढकलत नेत, तर सोलापुरात सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यवतमाळ, अमरावती, बुलडाणा इथंही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून इंधन दरवाढीविरोधात निदर्शनं केली.
****
अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक, शांतितीर्थ संगय्या स्वामी चाकूरकर यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं रेणुका विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी यांनी कपिलधार मासिकाचे संपादक म्हणून काम करतानाच, वीरशैव साहित्यातली असंख्य हस्तलिखितं, पोथ्या, पुस्तिका, ओव्या, अभंग, आरत्या, पदं तसंच भारूडांचा मोठा संग्रह केला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वाराणसी इथं झालेल्या चौथ्या वीरशैव साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं, त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना काशी महापीठाचा ‘डॉ चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर अआज सकाळी लातूर जिल्ह्यात चाकूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी इथं गोपीनाथ गडावर काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबीराचं उद्धाटन केलं. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार मोनिका राजुळे, आमदार चित्रा महाले पाटील यांच्यासह हजारो मुंडे समर्थकांनी काल गोपीनाथगडावर मुंडे यांना अभिवादन केलं.
लातूर आणि औसा इथं गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं, आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्य सरकारनं कालपासून सुरू केलेली शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणजे मनरेगातून ग्रामविकासाच्या औसा पॅटर्नची राज्यव्यापी आवृत्ती असल्याचं, आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. १३ ऑक्टोबर रोजी औसा इथं जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत औसा पॅटर्नची संकल्पना मांडली होती, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. जुन्या विहिरींचं मनरेगाअंतर्गत पुनर्भरण करता यावं यासाठी लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
राज्यात काल चार हजार दोनशे एकोणसाठ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख शहात्तर हजार सहाशे नव्व्याण्णव झाली आहे. काल ८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार एकशे एकोणचाळीस झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार नऊशे एकोणपन्नास रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख त्रेपन्न हजार नऊशे बावीस रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ७३ हजार पाचशे बेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २७४ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात काल तीन कोविडग्रस्तांचा, औरंगाबाद जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा, तर जालना, लातूर आणि परभणी इथं प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ५७ कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ५८, बीड ५३, लातूर ३८, जालना २७, परभणी २४, उस्मानाबाद १५ तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे कोविडबाधित रुग्ण आढळले.
****
कर्करोग प्रतिबंधासाठी अधिक संशोधन आणि नवीन निदान पद्धतींचा शोध घेणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात 'न्यू इलेक्ट्रा वर्सा एचडी' या अत्याधुनिक यंत्राचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यंत्राद्वारे कर्करोगाच्या अतिसूक्ष्म गाठी शोधता येणार असून, कोणत्याही दुष्परिणामांशिवाय, सोप्या पद्धतीने कर्करोगाचं निदान होणार आहे
****
कोविड महामारीचा सामना करण्यासाठी देशभरातल्या धार्मिक, सामाजिक, तसंच स्वंयसेवी संस्थानी जे सेवा कार्य केलं, ते जगातल्या इतर कोणत्याही देशात झालेलं नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे. लातूर इथं संघाच्या जनकल्याण समितीअंतर्गत संवेदना प्रकल्पाच्या बहुद्देशीय इमारतीचं उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. संवेदना प्रकल्पाला १४ वर्ष पूर्ण होत आहेत, या १४ वर्षातल्या ठळक घटनांचं लिखाण करुन ठेवण्याची सूचनाही भैयाजी जोशी यांनी यावेळी केली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 October 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.०० ****
·      पुलवामा हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
·      केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी संबंधित कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचं राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन.
·      देशात कोविड १९ संसर्गाचे रुग्ण बरं हो��्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर.
आणि
·      लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असल्याशिवाय राज्य पुढे जात नाही - खासदार संजय राऊत.
****
गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात निमलष्करी दलाच्या ४० जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दु:ख झालं नसल्याचं ते म्हणाले. गुजरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दौडमध्ये सहभागीं झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. पुलवामामधल्या दुर्घटनेवर सबंध देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले होते, असंही ते म्हणाले. जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात आल्यानंतर आता विरोधी पक्ष उघडे पडले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दहशतवादाचा सामुहिक सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्या विरोधात एकजूट करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.  
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना १४५ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं जगातल्या सर्वात उंच पुतळा असलेल्या ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फेरीची पाहणी केली. यानिमित्तानं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यावर्षीचं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचं पुष्प गुंफणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हे व्याख्यान प्रसारित करण्यात येणार आहे. सरदार पटेल हे देशाचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९५५ पासून आकाशवाणीवर या व्याख्यानाचं प्रक्षेपण करण्यात येतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती आणि प्रसारणमंत्री पियुष गोयल यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.
****
केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी संबंधित कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर या आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, महात्माजींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच मार्गानं आम्ही जात असून, सर्व धर्मसमभावाची प्रार्थना करून हे आंदोलन करत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी विरोधी तर नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूनं असल्यानं आम्ही त्याचा विरोध करत आहोत, हा सत्याग्रह शेतकरी, कामगार, बहुजन आणि गरिबांसाठी असल्याचं थोरात यावेळी म्हणाले.
****
देशात कोविड १९ संसर्गाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ४८ हजार २६८ नवे रुग्ण आढळले असून ५९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत या संसर्गातून एकूण ७४ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात सध्या केवळ सात पूर्णांक १६ दशांश टक्के एवढेच बाधीत रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. आतापर्यंतची देशातल्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४८ हजार २६८ झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तसेच लोकांमधील आजाराच्या संक्रमणाचे दुपटीचे प्रमाण होण्याचा कालावधी देखील वाढत आहे. आता लोकांमधील संक्रमण दुप्पट होण्याचा कालावधी हा १५७ दिवसांपर्यंत वाढला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी हे लोकांच्या घरोघर जाऊन रुग्णांची माहिती गोळा करत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या आंबेलोहोळ इथं एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक हजार ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३८ हजार ४३ झाली असून केवळ ५४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या विषाणू संसर्गाच्या रुग्णवाढीची संख्या कमी होत असून आतापर्यंत ३६ हजार ४२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज १९ जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले. यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ४०५ झाली आहे. आज २३ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. सध्या ३०० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनात सरदार वल्लभभाई पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपाल कोशारी यांनी एकता दिनानिमित्त कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित पोलीस जवानांसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्याही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ.रामराव महाराज यांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या मताचा मी आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण तसंच समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी घातक भूमिका तयार होताना दिसत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्येही चांगला संवाद असायला हवा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  
****
अखिल भारतीय काँग्रेस व्यापारी संघ - आयटक या देशातल्या पहिल्या केंद्रीय कामगार संघटनेला आज १०० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त औरंगाबाद शहरातल्या खोकडपूरा इथल्या कार्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅडव्होकेट मनोहर टाकसाळ यांच्या हस्ते आयटकच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आले.
****
परभणी तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नदी काठावरील गावातील आणि अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्यासाठी गावांची सर्वेक्षण यादी तयार करण्यात आली होती. या यादीत आसोला, कारेगाव, टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, साडेगाव, मिर्झापूर, वाडीदमई, तट्टूजवळा, ताडलिंबला, पांढरी पोरजवळा, पाथरा, ब्रह्मपुरी, ब्राह्मणगाव, पारवा, कौडगाव, जांब या नवीन सतरा गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज खानापूर चित्ता इथं वाळू चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकांविरुध्द कारवाई करत वाळू आणि ट्रॅक्टर असा १७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसंच वाळू वाहतूक करणारे आणि रेती मालक अशा सहा जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीनं आजचा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळण्यात आला. धुळे जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले तसंच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना यावेळी विरोध करण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 October 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.०० **** ** अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यशासनाकडून १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर ** माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ** केंद्र सरकारचं धोरण राज्याला आर्थिक अडचणीत आणणारं - परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांचा आरोप आणि ** औरंगाबाद इथं एका कोविड बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू **** अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्यशासनानं १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यामध्ये फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर तर जिरायती तसंच बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये जाहीर करण्यात आली आहे, कमाल दोन हेक्टर शेतीसाठी ही मदत दिली जाणार आहे. दहा हजार कोटी रुपयांच्या या पॅकेजमध्ये नुकसानग्रस्त भागातल्या रस्ते- पूल दुरुस्तीसाठी २ हजार ६३५ कोटी, नगर विकास ३०० कोटी, महावितरण ऊर्जा २३९ कोटी, जलसंपदा १०२ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा एक हजार कोटी तर कृषी-शेती-घरांसाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले एक हजार ६५ कोटी रुपये तसंच पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले ८०० कोटी रुपये, अद्यापही मिळालेले नाहीत, केंद्र सरकारकडून सध्या ३८ हजार कोटी येणं बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. **** माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. खडसे यांनी यावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात, भारतीय जनता पक्षात ४० वर्ष काम केल्यानंतरही झालेल्या अन्यायाबद्दल खंत व्यक्त केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात खडसे यांच्या पक्षप्रवेशानं खानदेशात पक्षकार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना, कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. **** पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा, यासाठी शासन सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली. राज्य शासनाने २०१९ मध्ये नवीन औद्योगिक धोरण केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं निश्चित केलं आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावा, असं राज्य शासनाच्यावतीनं उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. **** मुंबईत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेस्ट गाड्यांना पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेस्ट गाड्यांमधे प्रवाशांनी मास्क घालणं, बस गाड्यांचं निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर आदीं शासनानं दिलेल्या सूचना आणि नियमांचं पालन करून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी जारी केलेल्या पत्रात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन - बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांना बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असल्याचं सांगितलं आहे. **** आणि आता ऐकू कोविड जनजागृतीअंतर्गत महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी केलेलं आवाहन **** कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अजून टळला नसून यावर मास्क हेच सध्या प्रभावी औषध असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलं आहे. जमीयत उल उलमाए हिंदच्या वतीनं आज औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविलयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. सुमारे ३०० जणांना यावेळी कोविड योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आलं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाई��, त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संबोधनाचा अनुवाद प्रसारित केला जाईल. या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण केलं जाईल. मन की बात कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा सतरावा भाग असेल. **** केंद्र सरकारने राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी केला आहे. ते आज परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सेलू आणि मानवत तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या पाहणीनंतर मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत, परभणी जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याप्रमाणे १०८ कोटी १५ लाख रुपये एवढी नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचं मलिक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या पॅकेजच्या निकषानुसारच मदत केली जाईल. कोणीही मदतीविना राहणार नाही, असा दिलासा मलिक यांनी दिला. **** बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालं आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत. देऊळगावा राजा इथं विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. **** औरंगाबाद शहरातल्या समर्थ नगर मधल्या ७५ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या एकूण मृतांची संख्या एक हजार ४८ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार १०४ झाली असून एक हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. पीडितेची प्रकृती सुधारत असून तिला आर्थिक सहाय्य मिळावं याकरता विधी सेवा प्राधिकरणकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या गुन्ह्यासंदर्भात आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. **** राज्यातील शासकीय अभ्यासिका सुरु कराव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासिकेसमोर आंदोलन केलं. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 September 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.०० **** ** मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; प्रकरण घटनापीठाकडे वर्ग ** मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांकडून अटक ** वकिलांच्या विविध मागण्यांसाठी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सचं ठिकठिकाणी आंदोलन ** औरंगाबाद जिल्ह्यात पाच तर जालना जिल्ह्यात चार कोविडबाधितांचा मृत्यू आणि ** खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ केल्यास शिक्षकांचं वेतन सरकारने द्यावं - खासदार फौजिया खान यांची मागणी **** मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली, मात्र ज्यांना आतापर्यंत या कायद्यानुसार शिक्षण किंवा नोकरी मिळालेली असेल, त्यांच्या लाभांना धक्का बसणार नाही, असंही स्पष्ट नमूद केलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग कायदा तयार केला होता, मात्र गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं या कायद्यानुसार मिळणारं १६ टक्के आरक्षण न्याय्य नसल्याचं सांगतानाच, शिक्षणात १३ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नसावं, असं नमूद केलं होतं. या निर्णयाला तसंच संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं आज ही स्थगिती देत, हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करत असल्याचं सांगितलं. दरम्यान, हा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षानं दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलताना, आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली. हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याचा तसंच कायदेशीर दृष्टीनं पूर्ण तयारी करण्याचा सल्ला आपण महाराष्ट्र विकास आघाडीला वेळोवेळी दिला होता, असं पाटील यांनी नमूद केलं. **** अभिनेत्री कंगना रानौत हिच्या विधानांना अनावश्यक महत्त्व देऊ नये, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांचं काम लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून माहिती आहे, अशा विधानांना लोक फारसं महत्त्व देत नाहीत, असं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयातल्या बेकायदा बांधकामावर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या संदर्भात कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून न्यायालयानं उत्तर मागितलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे. मात्र बृहन्मुंबई महागरपालिकेनं आज सकाळी कंगनाच्या या कार्यालयातल्या बेकायदेशीर बांधकामाची तोडफोड केली. या कारवाईचा भाजप आमदार आशिष शेलार यांनी निषेध केला आहे. कंगनाच्या बंगल्यावर कारवाई करण्यात तत्परता दाखवणारी महापालिका, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानापासून काही अंतरावर असणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. **** अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. रियाला अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने काल अटक केली, न्यायालयाने तिला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार तिची भायखळा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह या प्रकरणी अटकेत असलेल्या इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. **** रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात भिलवले इथं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसबाबत संशयितपणे चौकशी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांची रायगड पोलीस सध्या कसून चौकशी करीत आहेत. या तिघांनी ठाकरे फार्महाऊसच्या परिसरात घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचं वृत्त आहे. या तीनही संशयितांना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली. **** इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सच्या विविध मागण्यांसाठी या संघटनेच्या सदस्य वकिलांनी आज विविध ठिकाणी आंदोलन केलं. औरंगाबाद इथं जिल्हा न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सरकारनं न्यायालयीन कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरु करावं अन्यथा वकिलांना दरमहा पंधरा हजार रुपये सन्मानधन द्या, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मागण्यांचे फलक हाती घेऊन अनेक वकील सहभागी झाले होते. यामध्ये वकील हा न्यायदानासाठी महत्त्वाचा घटक असल्यानं सर्वांना कोविड योद्ध्याचा दर्जा देऊन ५० लाखाचं विमा संरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं द्यावं, वकीलांची बैठक व्यवस्था सन्मानपूर्वक पूर्ववत सुरु करावी आणि न्यायालयीन आवारात वावरण्याची सन्मानपूर्वक व्यवस्था असावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. लातूर इथंही आज भारतीय वकील संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली. कोविड संक्रमित वकील आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना उपचारासाठी ५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली, संघटनेच्या परभणी तसंच हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने वकीलांच्या न्याय मागण्यांसंदर्भात जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना निवेदन देण्यात आलं. बीड इथंही न्यायालयासमोर आंदोलन करण्यात आलं. **** औरंगाबाद जिल्ह्यात आज पाच कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत याविषाणू संसर्गानं ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४६५ झाली आहे. **** जालना जिल्ह्यात आज चार कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गाने झालेल्या एकूण मृतांची संख्या आता १६१ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात १२० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६ हजार ३६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ७२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २७० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या १ हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** अहमदनगर जिल्ह्यात आज ९५ नवे कोविडग्रस्त रूग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या २७ हजार २०४ झाली आहे. जिल्ह्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५ पूर्णांक ४३ शतांश टक्के झालं आहे. सध्या तीन हजार ५६६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. **** टाळेबंदीच्या काळात खासगी शाळांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ केल्यास शिक्षकांचं वेतन सरकारने द्यावं, अशी मागणी राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यां��ी केली आहे. त्या आज परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत, खासगी शाळांमधल्या शिक्षकांचं वेतन हे विद्यार्थ्यांच्या शुल्कातून होत असतं, शिक्षकांना वेतन न दिल्यास त्यांना देखील आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल, त्यामुळे खासगी शाळेतल्या शिक्षकांचं वेतन सरकारने द्यावं, असं त्या म्हणाल्या. केंद्र सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण चांगलं असून, त्यांची अंमलबजावणी व्यापक झाली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आपल्या संस्थेची जुनी इमारत वापरण्याचा प्रस्ताव प्रशासनाला दिला असल्याचंही खासदार फौजिया खान यांनी यावेळी सांगितलं. **** औरंगाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका आणि पोलीस दलाच्या वतीनं संयुक्त कारवाई केली जाणार आहे. औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची पोलीस मुख्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज महापालिका समोरच्या दुकानांची पाहणी केली. यावेळी चार दुकानात कोविड-19 च्या निर्देशांचं पालन केलं जात नसल्याचं निर्दशनास आल्यानं त्यांनी या दुकान मालकांवर कारवाई करत दंड आकारण्याचे आदेश दिले. **** वैद्यकीय प्रवेशासाठीची सामाईक पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटी-नीट येत्या १३ तारखेला होत आहे. या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातल्या परभणी, पाथरी, जिंतूर, सेलू, आणि गंगाखेड आगारातून बस सोडण्यात येणार आहेत. परभणी इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यात ही परीक्षा औरंगाबाद, लातूर आणि नांदेड इथल्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातले किमान दोन हजार विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसची व्यवस्था व्हावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली होती. **** लातूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येणारी सिंमेट रस्त्याची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर इथल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार धीरज देशमुख, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गांची कामं पूर्ण करताना ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामंही वेळेत पूर्ण करावीत, असं देशमुख म्हणाले. **** परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अन्य दोघांना स्थानिक न्यायालयानं दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. साडेचार लाख रुपये लाच स्वीकारताना स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अव्वल कारकून श्रीकांत करभाजने, अभियंता अब्दुल हकीम अब्दूल खय्युम यांना काल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. स्वाती सूर्यवंशी यांच्या घराची विभागाच्या पथकानं काल रात्री उशीरा झडती घेतली. त्यावेळी त्यांच्या घरात नऊ लाख ३१ हजार रुपये रोख रक्कम पथकास सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** मराठी चित्रपट सृष्टीतल्या काही कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव, विजय पाटकर, अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव आदींचा समावेश आहे. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात, पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं. ****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 December 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप; लोकसभेत ११६ टक्के तर राज्यसभेत १०० टक्के कामकाज  नागरिकत्व सुधारणा विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यास काँग्रेसचा विरोध  जिल्हा परिषदांमधलं गट आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत आणल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि  उस्मानाबाद तसंच नांदेड जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण जाहीर **** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. हिवाळी अधिवेशनात संसदेचं कामकाज समाधानकारक राहिल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. अधिवेशन काळात लोकसभेत ११६ टक्के तर राज्यसभेत शंभर टक्के कामकाज झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये एका जाहीर सभेत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काल अखेरच्या दिवशी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, या गदारोळातच हिवाळी अधिवेशनातल्या कामकाजाचा आढावा घेत, कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही सभापती व्यंकय्या नायडू यांना या गदारोळामुळे शून्यकाळ आणि त्यानंतर प्रश्नकाळही स्थगित करावा लागला, दुपारी एक वाजता सदनाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभापतींनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, संसद भवनावरच्या दहशतवादी हल्ल्याला काल अठरा वर्ष झाली. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना काल संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं. **** नागरिकत्व सुधारणा विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यास, काँग्रेस पक्षानं विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, या मुद्यावर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं सांगितलं. राज्याचे आदिवासी विकास आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री नितीन राऊत यांनी, या विधेयकाची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असं सांगितलं. काल मुंबईत पीटीआयशी बोलताना राऊत यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्ष यासंदर्भात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शेलार यांनी केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत २५ नोव्हेंबर २०१९ पासून १०६ प्रकरणात ३५ लाख आठ हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण ४९५ प्रकरणात मदत करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे. **** पुण्यातल्या गहुंजे सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करावा, अशी मागणी राज्य महिला आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडे एका पत्राद्वारे केली आहे. या दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळलेला असताना, फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नाही, असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. फाशी देण्यात झालेल्या दिरंगाईमुळे या गुन्हेगारांची फाशी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता, मात्र दिरंगाईमुळे फाशी रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे, याकडे आयोगानं लक्ष वेधलं. **** राज्यातल्या पाच जिल्हा परिषदांमधलं गट आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत आणून त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम राबवावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं काल दिलेल्या या निर्णयामुळे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचं गट - गण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेल्यानं, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षभर निवडणूक कार्यक्रम रखडला होता. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं या पाचही जिल्हा परिषदांसाठी सात जानेवारीला मतदान आणि आठ जानेवारीला मतमोजणीची घोषणा केली होती. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** उस्मानाबाद इथल्या नियोजित ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ कवी, पद्मश्री डॉ. ना धो. महानोर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. महानोर यांनी संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारलं असून, त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातल्या प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. **** औरंगाबाद महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर विजय औताडे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. तत्कालीन युतीच्या शासनानं शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीची एक हजार ६८० कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. या योजनेला महाराष्ट्र विकास आघाडी शासनानं स्थगिती दिल्याच्या कारणावरून तसंच शहरातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत युतीच्या बाजुनं कौल देऊन मतदान केलं होतं. मात्र, मतदारांचा विश्वासवास घात झाला या कारणामुळे मनपा आयुक्तांकडे राजीनामा दिल्याचं औताडे यांनी सांगितलं. **** उस्मानाबाद तसंच नांदेड जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण काल जाहीर करण्यात आलं. उस्मानाबाद अनुसूचित जाती प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव, तुळजापूर, भूम, लोहारा - सर्वसाधारण महिला, परंडा, वाशी - सर्वसाधारण पुरुष, कळंब - इतर मागास महिला तर उमरगा पंचायत समितीचं सभापती पद इतर मागास पुरूष प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी, अर्धापूर, हदगाव पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्ग महिलेसाठी राखीव झालं आहे. मुदखेड, देगलुर - अनुसूचित जमाती, धर्माबाद, बिलोली - नागरिकांचा मागास प्रवर्ग, हिमायतनगर, माहूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नांदेड, कंधार, भोकर, किनवट - सर्वसाधारण महिला, तर लोहा, नायगाव आणि मुखेड पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी राखीव झालं आहे. **** औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी काल जालना इथं नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांशी संवाद साधला. या बैठकीत दानवे यांनी, नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्याचं एक निवेदन यावेळी दानवे यांना दिलं. **** नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात जालना जिल्ह्यातल्या १०८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या गावांमध्ये ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या २५५ गावांमधल्या दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभांची कामे पूर्ण केली असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९८ लाख रुपयांचं अनुदान जमा करण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. **** लातूर शहरात महानगरपालिकेनं नियुक्त केलेल्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारानं ३० दिवसांमध्ये कामांमध्ये सुधारणा न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तातडीनं बैठक बोलावून, कंत्राटदारांना कामांत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. शहरांतर्गत किमान आठ ठिकाणी कचरा विलगीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरु करणं, तसंच शहरातलं कचरा व्यवस्थापन पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. **** परभणी पोलीस दलाच्या २६ व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमघ्ये नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या चार जिल्ह्यातले पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत. कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धांचा सोमवारी पारितोषिक वितरणानं समारोप होणार आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथला रेणुका साखर कारखाना सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं सेलू कॉर्नर इथं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. गळीत हंगाम सुरु करण्यात यावा, २०१८-१९ च्या गळीत हंगामात ऊसाला दोन हजार ३०० रुपये भाव द्यावा, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. **** नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ काल ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं डाव्या लोकशाही आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. कॉम्रेड राम बाहेती, अश्फाक सलामी, अभय टाकसाळ यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. जमीअत ए उलमा ए हिंद संघटनेकडून गंगापूर तसंच परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तहसील कार्यालयासमोर मूक मोर्चा तसंच धरणे आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि भोकर इथंही या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. ***** ***
0 notes