Tumgik
#ग्राहकांचा
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या ३५ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं आयएनएस कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. आयएनएस कोलकाता जहाजाने प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे ४० दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं.
****
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोईत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. 
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजलीवाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या तीन महान क्रांतीकारकांना२३ मार्च १९३१ रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारने कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
****
अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं  असून, लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या एसबीओए शाळेच्या वतीने मतदान जनजागृती विषयक तीन स्तरीय उपक्रम राबवले. शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक फेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृती विषयी पालकांना आवाहानात्मक पत्रं लिहिली. तसंच शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
****
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यांमध्ये केलेल्या प्रगती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाला देखील यवेळी मंजुरी दिली असल्याचं आर बी आयनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या  आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदी वर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सह जिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.
****
पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये आता अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किंदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १०, २१ - १४ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 10 months
Text
पालेभाज्या महागल्याने ग्राहकांचा मोर्चा कडधान्यांकडे…..रिपोर्ट !
https://bharatlive.news/?p=113079 पालेभाज्या महागल्याने ग्राहकांचा मोर्चा कडधान्यांकडे…..रिपोर्ट ...
0 notes
cinenama · 11 months
Text
'या' स्कुटरने पार केला तीन कोटींचा टप्पा...
पणजी: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री करणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा या स्कूटर ब्रँडने ३ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करत भारतीय दुचाकी उद्योगात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या लक्षणीय कामगिरीवरून एचएमएसआयचे भारतीय दुचाकी क्षेत्रातील बळकट स्थान तसेच देशात अत्याधुनिक, विश्वासार्ह, दर्जेदारी दुचाकी वाहने पुरवण्याची बांधिलकी दिसून येते. २००१ मध्ये…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
jagdamb · 1 year
Text
ग्राहकांचा आनंद हेच आहे आमच्या कामाचे
पहिले आणि एकमेव प्राधान्य !!
#Promotional_Video !!
पाहून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुमच्याही Product तसेच सेवेच्या अश्या प्रकारच्या जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा !
📲Mob No. :
90 494949 38
8626 020202
#जगदंब #व्यवसायवाला
#jagdamb #vyavsaywala
#BusinessStrategy
#PoliticalStrategy
#DigitalMarketing
#LovekeshRameshKachi #promotion
#JagdambCreative
#SocialMediaMarketing
#Video
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल; ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
नवी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच नवी मुंबईत करण्यात आले आहे. प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल होत असून अनेक स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या मालास मोठ्या व्यापाऱ्यांकडून आणि घाऊक विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे ८ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनाला नवी मुंबई, पनवेल, मुंबई आणि ठाणे येथील रहिवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. उमेद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nageshspeaks · 1 year
Photo
Tumblr media
देशात ५ जी सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली, तेव्हापासून ग्राहकांना अधिक सेवा मिळण्याची आशा असताना लाखो ग्राहकांना कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत आहे. याचवेळी फोनवर बोलत असताना अचानक फोन बंद होण्यासह इंटरनेटची गती पहिल्यापेक्षा तुलनेत कमी झाल्याने ग्राहक प्रचंड संतापले आहेत. देशात ५ जी सेवा १३० शहरांमध्ये पोहोचली आहे. मात्र, ग्राहकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रार केल्यांतर दूरसंचार विभागाला अखेर जाग आली असून, ट्रायने अविरत आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. कंपन्यांनीही सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही सेवा पूर्वरत होण्यासाठी अनेक महिने लागणार असल्याचे बोलले जाते. https://www.instagram.com/p/Cn1ZEutN9XN/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
darshaknews · 2 years
Text
Hero MotoCorp ने Passion XTEC लाँच करण्याची घोषणा केली, जाणून घ्या पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये
Hero MotoCorp ने Passion XTEC लाँच करण्याची घोषणा केली, जाणून घ्या पाच महत्त्वाची वैशिष्ट्ये
नवी दिल्ली. Hero MotoCorp ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत नवीन पॅशन XTEC मोटरसायकल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. नवीन घोषणेसह, दुचाकी उत्पादक कंपनी आपली ‘XTEC’ श्रेणी वाढवत आहे. नवीन पॅशन XTEC ड्रम आणि डिस्क या दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाईल. त्याच्या ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 74,590 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 78,990 रुपये आहे. एका दशकाहून अधिक काळ ग्राहकांचा हिरो पॅशन ब्रँडवर…
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या भारनियमन सुरू असून दिवसेंदिवस विजेचा तुटवडा निर्माण होत असल्याने महावितरणने आता वीज थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्यास सुरुवात केली असून गेल्या महिन्याभरात पर्यंत 4980 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे मात्र ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला यात बहुतांश व्यक्ती हे किरकोळ थकबाकीदार असून लाखोच्या पुढचे देखील थकबाकीदार जिल्ह्यात आहेत मात्र केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या भारनियमन सुरू असून दिवसेंदिवस विजेचा तुटवडा निर्माण होत असल्याने महावितरणने आता वीज थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्यास सुरुवात केली असून गेल्या महिन्याभरात पर्यंत 4980 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे मात्र ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला यात बहुतांश व्यक्ती हे किरकोळ थकबाकीदार असून लाखोच्या पुढचे देखील थकबाकीदार जिल्ह्यात आहेत मात्र केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 November 2023
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल
राज्यशासनाकडून धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विविध महाविद्यालयांना, चर्चासत्रं, परिषदा तसंच कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर
      आणि
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वेची लातूर ते पंढरपूर दरम्यान आठवडाभर विशेष गाडी
****
यंदा दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं निदर्शनास आलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स-सी ए आय टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भरतिया आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. यामध्ये फक्त लक्ष्मीपूजनापर्यंतच्या उलाढालीच्या नोंदी असून, पाडवा तसंच भाऊबीजेनिमित्त होणाऱ्या उलाढालीच्या नोंदींचा यात समावेश नाही. चिनी बाजारपेठेतून वस्तू आयात करण्याचं प्रमाण यंदा शून्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा स्पष्ट परिणाम असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ‘सीएआयटी’ने या दिवाळीत देशभरात राबवलेल्या “भारतीय उत्पाद-सबका उस्ताद” या मोहिमेला ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला उद्या १५ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या यात्रेला प्रारंभ होईल. राज्यात या यात्रेचा शुभारंभ नंदूरबार इथं राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्यपाल राज्यस्तरीय आदिवासी गौरव दिन सोहळ्यातही उपस्थित राहणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उद्या देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणूण साजरी करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृति, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेऊन हा दिवस आदर, सन्मान आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे.
****
राज्यशासनानं धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. राज्यात खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. यात धान दोन हजार १८३ रुपये प्रतिक्विंटल, अ दर्जाचं धान दोन हजार २०३ रुपये, संकरित ज्वारी तीन हजार १८० रुपये, मालदंडी ज्वारी तीन हजार २२५ रुपये, बाजरी दोन हजार ५०० रुपये, मका दोन हजार ९० रुपये, तर नाचणी तीन हजार ८४६ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. नऊ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत धान, तर एक डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे.
****
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राने देशात पहिलं स्थान पटकावून शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ आणि ‘कुसुम’ योजनेअंतर्गत, राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्राने ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित करून देशात पहिलं स्थान पटकावलं आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात ऊर्जा विभागाचं कौतुक केलं आहे.
****
येत्या २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे, प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी ही माहिती दिली. रेषा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र, या संकेतस्थळावर, ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागवण्यात येत आहे. प्रदर्शनातल्या उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची पंधरा पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहे.
****
शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षा एकाचवेळी  १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
****
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज देशभरात बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पंडित नेहरुंना अभिवादन करण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ  शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज तर भाऊबीज उद्या साजरी होत आहे. या निमित्त परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने बस तसंच रेल्वे स्थानकांचा परिसर फुलून गेला आहे. या सणांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून नागरिकांची गर्दी झाल्याचं काल दिसून आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संशोधन आणि विकास कक्षेच्या वतीनं, विविध महाविद्यालयांना, चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. एकूण ३३ महाविद्यालयांना प्रत्येकी पाच लाख रूपये आणि विद्यापीठाच्या मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरातल्या सात विभागांना, दोन लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाला, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा माहिती कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र वायकर यांनी काल मंजुरी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी येत्या २९ नोव्हेंबरला मुलाखती घेण्यात येणार आहेत.
****
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वने लातूर ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २० ते २७ नोव्हेंबर दरम्यान आठवडाभर चालणारी ही गाडी लातूर इथून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूर इथं त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर इथून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि लातूर इथं त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी हरंगुळ, औसा रोड, कळंब, धाराशिव, बार्शी मार्गे धावणार आहे.
****
संत नामदेव महाराजांच्या ७५३ व्या जयंती महोत्सवाला येत्या १७ तारखेपासून हिंगोली जिल्ह्यात नरसी इथं प्रारंभ होत आहे. या निमित्तानं गाथा पारायण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन संत नामदेव मंदिर संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
पाणी वाटपासंदर्भात न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही मराठवाड्यावर पाणी वाटपात अन्याय होत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याला विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल नांदेड इथं एका कार्यक्रमात बोलत होते. याबाबत सरकारला विचारणा करायला हवी, मात्र सरकार हा प्रश्न गांभी��्या��े घेत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या इतर राज्यातल्या शिधापत्रिकाधारक नागरिकांनी, एक देश एक शिधापत्रिका या योजनेअंतर्गत आपल्या परिसरातल्या रास्त भाव दुकानातून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य प्राप्त करुन घ्यावं, असं जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी म्हटलं आहे. संबंधितांनी आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तसंच कामठा बुद्रुकचे माजी सरपंच सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. कामठेकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी १० वाजता नांदेड इथं नगीनाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
बीड इथं काल अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर कीर्तन आंदोलन केलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करावं, पीक विमा देण्यात यावा, यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
परभणी इथं काल राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वयाची अट शिथील करून नियमित सेवेत समावेश करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या २५ तारखेपासून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
****
बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या बीड प्रीमियर लीगला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत जिल्ह्यातले १२ संघ सहभागी झाले आहेत, येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेतले साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत, त्यानंतर उपांत्य तसंच अंतिम सामने होणार आहेत. या स्पर्धेचं यंदा हे सहावं वर्ष आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अग्रलेख : लोकानुकूल..
अग्रलेख : लोकानुकूल.. कोलकाता शहराचे नाव कलकत्ता असे ह��ते तेव्हाची गोष्ट. त्या काळी तिथे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते. ‘उत्तम सेवेसाठी चढे दाम’ हे मान्य करायचे, तर ‘आधी ग्राहकांचा अभ्यास करा’ हेही मान्य असावे लागते. रेल्वेला ते कळते आहे का? मुंबईच्या उपनगरांत लोकांनी आंदोलन केल्यावर रेल्वेने निर्णय बदलला, असे का व्हावे? कोलकाता शहराचे नाव कलकत्ता असे होते तेव्हाची गोष्ट. त्या काळी…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
महावितरणची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप, ग्राहक म्हणतात की ?
नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या भारनियमन सुरू असून दिवसेंदिवस विजेचा तुटवडा निर्माण होत असल्याने महावितरणने आता वीज थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्यास सुरुवात केली असून गेल्या महिन्याभरात पर्यंत 4980 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे मात्र ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला यात बहुतांश व्यक्ती हे किरकोळ थकबाकीदार असून लाखोच्या पुढचे देखील थकबाकीदार जिल्ह्यात आहेत मात्र केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tanajirao-koratkar · 2 years
Text
आजचा दिवस ग्राहकांचा आहे, सुजाण ग्राहक असेल तर फसवणूक होण्याची शक्यता कमीच. लक्षात ठेवा अमिषांना भुलू नका, फसू नका.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!!!
#sharadPawar
#ajitdadapawar #SupriyaSule #Rohitpawar #ncpspeaks #AjitPawar #AjitPawarSpeaks #ncppune #NCPPCMC #ncpmaharashtra #AmolKolhe #jayantpatil #dilipwalasepatil #ArunLad #SharadLad #prashantjagtap
Tumblr media
0 notes
darshaknews · 2 years
Text
ग्राहकाने ओलाला टेकडाउन नोटीस पाठवली, डेटा सोशल मीडियावर प्रकाशित झाला
ग्राहकाने ओलाला टेकडाउन नोटीस पाठवली, डेटा सोशल मीडियावर प्रकाशित झाला
न��ी दिल्ली. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा त्रास कमी होत नाहीये. आता गुवाहाटीमधील एका ग्राहकाने कंपनीला टेकडाउन नोटीस पाठवली आहे. वास्तविक, ई-स्कूटरच्या अपघातात ग्राहक जखमी झाला. यानंतर त्यांनी ई-स्कूटरमधील त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केला. यानंतर ओलाने स्पष्टीकरण देताना ग्राहकांचा टेलीमेट्री डेटा सोशल मीडियावर शेअर केला. याआधी एका ग्राहकाने स्कूटरच्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years
Text
महत्त्वाची धोरणे प्रतिबिंबित करणाऱ्या महाराष्ट्र दालनास आयआयटीएफमध्ये उत्तम प्रतिसाद
महत्त्वाची धोरणे प्रतिबिंबित करणाऱ्या महाराष्ट्र दालनास आयआयटीएफमध्ये उत्तम प्रतिसाद
नवी दिल्ली , २४ : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ)  विद्युत धोरण, स्टार्टअप व हस्तकलांच्या वस्तूंनी सज्ज महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे . महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्‍पनेवर सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
पॉल्सी सी फूड व चिकन सेंटर कणकवलीवासियांच्या सेवेत दाखल
पॉल्सी सी फूड व चिकन सेंटर कणकवलीवासियांच्या सेवेत दाखल
फ्रेश मासे मिळण्याचे कणकवलीतील एकमेव ठिकाणफ्रोजन माशासह चिकनचे विविध प्रॉडक्ट ही उपलब्धपहिल्या दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : आता तुम्हाला मिळणार आहेत ३६५ दिवस समुद्रातील फ्रेश मासे व फ्रेश चिकन एकाच जागी. कणकवली शहरात जिल्ह्यातील पहिले असलेले पॉल्सी सी फूड व चिकन सेंटरचा शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला आहे. कणकवली शहरात पहिलेच असलेले हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes