Tumgik
#गढवी
Text
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?
केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती? अहमदाबादः गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघाचे निकाल काही वेळातच हाती येतील. तत्पुर्वी एका मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. यंदाच्या विधानसभेत आम आदमी पार्टीचीच सत्ता येईल असा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या उमेदवारांकडे… आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले तर गुजरातमध्ये इसुदान गढवी हे मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल पुन्हा शपथ घेणार
हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या हातातून सत्ता निसटली, काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत
हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा, औरंगाबाद स्पर्धेत
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु असल्याची राज्य सरकारनं दिली उच्च न्यायालयाला माहिती
म्हाडाच्या नोकरभरतीत बनावट उमेदवार बसवून परिक्षा देणाऱ्या ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीडसह नऊ जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश
घनसावंगीमध्ये उद्यापासून ४२वं मराठवाडा साहित्य संमेलन
आणि
औरंगाबादमधल्या वंदे मातरम सभागृहाचा आज लोकार्पण सोहळा
****
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला असून येत्या सोमवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल हे पुन्हा शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. गुजरातमध्ये भाजपला सलग सातव्यांदा सत्ता मिळाली आहे. एकूण १८२ पैकी भाजपनं १५६ जागांवर विजय मिळवला आहे. आतापर्यंत एकाच पक्षानं मिळवलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. दुसरीकडे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाला पाच जागा मिळाल्या तर चार अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले इसुदिन गढवी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र एकूण मतांपैकी १४ टक्के मतं पक्षाला मिळाल्यामुळे, आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या हातातून सत्ता निसटली असून या राज्यात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी ४० जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे २५ उमेदवार विजयी झाले आहेत. या राज्यात तीन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
पाच राज्यात झालेल्या एक लोकसभा आणि सहा ‍विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही काल मतमोजणी पार पडली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव विजयी झाल्या आहेत. राज्यातल्या विधानसभेच्या दोन जागांपैकी एक भाजपला तर दुसरी राष्ट्रीय लोकदलाला मिळाली आहे. बिहारमधल्या एका जागेवर भाजप, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस तर ओडिसात बिजू जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे.
****
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. लोकांनी विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देतानाच, विकास चांगल्या गतीनं कायम राहावा, अशी इच्छाही व्यक्त केली आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले…
‘‘बीजेपी को मिला जनसमर्थन इसलिए भी महत्तवपूर्ण हे ,क्योंकी ये ऐसे समय मे आया है, जब भारत अमृतकाल मे प्रवेश कर चुका है. ये दिखाता है की आने वाले पच्चीस साल सिर्फ और सिर्फ विकास की राजनिती के ही हैं. भाजपा को मिला जनसमर्थन नए भारत के आकांक्षाओ का प्रतिबिंब है, भारत के युवाओकी युवा सोच का प्रकटीकरण है. भाजपा को ��िला समर्थन गरीब, दलित, वंचित, पीछडे आदिवासीयोके सशक्तीकरण के लिए है.’’
****
हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशचे नागरिक, पक्षाचे नेते, आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. गुजरातच्या जनादेशाचा आपण स्विकार करत असून, लोकशाही प्रक्रियेत जय -पराजय होत असतात, असंही खरगे म्हणाले. ते म्हणाले...
‘‘हिमाचल प्रदेश मे हम जीते है इसलिए में सभी वहां के लोगो को, मतदाताओको धन्यवाद देता हूं. जीते है तो ये खुशी की बात हैं, मुझे बडी खुशी हो रही हैं. लेकीन आगे अभी हमारा लंबा सफर है उसके लिए क्या करना हैं डिटेल्स से बात करेंगे.’’
****
गुजरातचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी दिल्ली महानगर पालिका आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाच उदाहरण दिलं. राजकारणात पोकळी असते, गुजरातची पोकळी भाजपानं भरून काढली आणि दिल्लीची पोकळी आम आदमी पार्टीनं भरून काढली आहे. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजेत, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
****
हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरवल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या कंपनीला राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, औरंगाबाद आणि  नागपूर, असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाबाबत केंद्राच्या दबावामुळे  महाराष्ट्राचे मंत्री गप्प बसणार असतील तर अर्थ काय? असा प्रश्न काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला. महापुरुषांचा अपमान, सीमावाद अशा विविध विषयांवर भूमिका मांडण्यासाठी काल महाविकास आघाडीनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या सगळ्यांच्या विरोधात येत्या १७ तारखेला महाराष्ट्रद्रोही हल्लाबोल या मोर्चाचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कर्नाटक बँकेच्या मुद्यावर आपल्या काळात कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा जुना डाव असल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्तीवेतन कर्नाटक बँकेमार्फत करण्याच्या आदेशावरून विरोधकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. सीमा वादावरून सुरू झालेल्या संघर्षात तेल ओतून अशांतता माजवण्याचा हा कट असून,  कर्नाटक बँकेसोबत यासंबंधीचा करार ठाकरे सरकारनेच केला होता, ही बाब जाणीवपूर्वक लपवली जात आहे,  असं पक्षानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. यासंदर्भात ८ डिसेंबर २०२१ रोजीच ठाकरे सरकारकडे कर्नाटक बँकेनं अर्ज केला होता आणि २१ डिसेंबर २०२१ रोजी कर्नाटक बँकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. महाविकास आघाडी सरकारनं बंधन बँक,  इक्विटास स्मॉल फायनान्स बँक,  करूर वैश्य तसंच साऊथ इंडियन बँकेसही परवानगी दिली होती, असं या पत्रकात म्हटलं आहे.
****
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात अशांतता निर्माण करण्यामागे एक षडयंत्र दिसत असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. काल ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही राज्य सरकारांना शांतता तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे, तरीही त्यांच्याबद्दल भ्रामक प्रचार केला जात आहे, असंही फडनवीस  यावेळी म्हणाले.
****
राज्यात तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होणार असुन, ३ हजार १��० तलाठी आणि ५१८ मंडळ‍अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे भरण्यात येणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.
****
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबानं बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या कथित आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारतर्फे काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी ठाकरे कुटुंबानं भष्ट्राचार करुन बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला असून यासंबंधीची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण -म्हाडाच्या नोकरभरतीत बनावट उमेदवार बसवून परिक्षा देणाऱ्या ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिक्षेच्या निकालानंतर म्हाडानं १ हजार ६६३ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावलं असता त्यावेळी ६० उमेदवार संशयित आढळून आले. याप्रकरणी १५० पानांचा अहवाल तयार करण्यात आला असून म्हाडानं चौकशी समिती तयार केली आहे. ही नोकरभरती सरळ सेवा भरतीद्वारे केली जाणार होती, मात्र कोविडमुळं एका आयटी कंपनीच्या माध्यमातून राज्यात १०६ केंद्रावर लेखी परिक्षा घेतली गेली होती. गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, जालना, नाशिक, पुणे, कोल्हापूर  आणि नागपूर इथल्या उमेदवारांचा समावेश आहे.
****
४२वं मराठवाडा साहित्य संमेलन उद्यापासून जालना जिल्ह्यात घनसावंगीमध्ये होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्धाटन होणार असून साहित्यिक शेषराव मोहिते हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. संमेलनाच्या दोन दिवसात कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद, मराठवाडा, राज्य आणि जिल्हा अशा तीन स्तरावरील कवींचं संमेलन, बाल मेळावा, प्रकट मुलाखत आदि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वाता��्यक्ष माजी आमदार शिवाजी चौथे यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इथं नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित चर्चासत्राचं उद्धाटन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतिश देशपांडे यांनी दिली आहे. दोन एकर परिसरात वंदे मातरम सभागृहाची चार मजली इमारत असून यामध्ये दोन सभागृह, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं हे वंदे मातरम् सभागृह असणार आहे. 
****
सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहणं आवश्यक असल्याचं मत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जीवनरेखा प्रतिष्ठान एकात्मीक व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे शरीरासाठी हानिकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात हिंगोलीत काल भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या चित्तेगाव परिसरात होणाऱ्या तबलिगी इज्तेमा शांततापूर्ण आणि सुविधायुक्त वातावरणात व्हावा यांसाठी जिल्हा प्रशासन नागरिकांना मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे. काल चित्तेगाव इज्तेमा स्थळाची पाहणी त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व मुस्लीम बांधवाना इज्तेमासाठी आवश्यक असलेली मदत जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल, असं यावेळी सांगितलं.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या
हिमाचल प्रदेश बद्दल जाणून घ्या
गड्डी समाजातील लोक स्वतःला गढवी राज्यकर्त्यांचे वंशज समजतात. गड्डी जमातीच्या लोकांची वेगळी भाषा, संस्कृती, राहणीमान आणि पेहराव अशी त्यांची वेगळी ओळख आहे. या समाजातील लोकांनी आपला वारसा आणि जुनी संस्कृती आजही जपली आहे. हिमाचल प्रदेश आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देशात एक वेगळी ओळख आहे. देशात पाश्चात्य सभ्यतेचा रंग सर्वांच्या डोक्यावर चढला आहे, पण हिमाचलमध्ये राहणाऱ्या गड्डी जमातीवर त्याचा काहीही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishal-dass-05 · 2 years
Text
Tumblr media
#SelfieWithBook
गुजरात के लोकप्रिय गायक सागर दान गढवी को
संत रामपाल जी महाराज
द्वारा लिखित पवित्र पुस्तक "जीने की राह" भेंट की गयी
निःशुल्क पुस्तक मंगाएं।
अपना नाम, पूरा पता हमें WhatsApp करें:
+91 7496801825
1 note · View note
mykrantisamay · 2 years
Text
‘आप’ नेता ईसुदान गढ़वी पर महिला से छेड़छाड़ का आरोप, पुलिस ने लिया हिरासत में
‘आप’ नेता ईसुदान गढ़वी पर महिला से छेड़छाड़ का आरोप, पुलिस ने लिया हिरासत में
गांधीनगर,गुजरात भाजपा की महिला कार्यकर्ता के आम आदमी पार्टी (आप) नेता ईसुदान गढवी पर शराब के नशे में छेड़छाड़ करने के आरोप के बाद पुलिस ने उन्हें हिरासत में ले लिया है| पुलिस अब ईसुदान गढ़वी का गांधीनगर के सिविल अस्पताल में मेडिकल जांच करवाएगी और उसके बाद ही आगे की कार्यवाही करेगी| घटना है गुजरात प्रदेश भाजपा मुख्यालय कमल की| जहां पेपर लीक मामले को लेकर आप के प्रदेश प्रमुख गोपाल इटालिया समेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indoreknnnews · 3 years
Text
गुजरात प्रदेश यूथ कांग्रेस के पूर्व उपाध्यक्ष निखिल सवाणी आम आदमी पार्टी में शामिल
गुजरात प्रदेश यूथ कांग्रेस के पूर्व उपाध्यक्ष निखिल सवाणी आम आदमी पार्टी में शामिल
गुजरात प्रदेश यूथ कांग्रेस के पूर्व उपाध्यक्ष निखिल सवाणी ने आम आदमी पार्टी (आप) का दामन थाम लिया है। कांग्रेस अध्यक्ष के साथ अनबन के चलते सवाणी को कांग्रेस पार्टी से निलंबित कर दिया था। उधर, आम आदमी पार्टी के पोस्टर से छेड़छाड़ को लेकर भाजपा को चेताया है। आश्रम रोड स्थित आप के कार्यालय पर सवाणी सोमवार दोपहर पहुंचे। यहां आप के गुजरात प्रभारी व विधायक गुलाब सिंह यादव, आप नेता ईशु दान गढवी ने सवाणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samra-gadhvi-blog · 4 years
Link
કરોડીયા ગામ ના બાળ કવિ મોહન રામભાઈ ગઢવી દ્વારા વીર શહીદ માણશી ગઢવીની જીવન શૈલી વિશે ટુંકમાં પરિચય આપવાનો પ્રયાસ કરેલ છે Editing by - SG editing Speak by - mohan rambhai gadhvi Yt channel - Samra gadhvi official वीर शहिद माणसीभाई गढवी नी पुण्यतिथि आजे ता.22-09-20 ऐटले वीर शहिद माणसीभाई गढवी नी 16 मी पुण्यतिथि  आजना दिवसे ता.22-09-2004 ना रोज माणशीभाई गढवी शहीद थया हता. तो आजे तेमना विशे टूंकमां माहिती आपवानो नानकडो प्रयास करेल छे. वीर शहीद माणशी गढवीनुं टुंकमां परिचय नाम :- गढवी माणशी पितानुं नाम :- गढवी राजदेभाई मातानुं नाम :- सुमाबाई शाखा :- सेडा जन्म तारीख :- 14-02-1979 जन्म स्थळ :- झरपरा-कच्छ पत्त्नीनुं नाम :- सोनलबेन शहीद तारीख :- 22-09-2004 स्थळ :- पुंच सरहद जम्मू काश्मीर *वीर शहीदनी वधारे माहिती   https://ift.tt/33SUXZ4 *वीर शहीद माणशीभाई गढवीने कोटी कोटी वंदन* *संदर्भ :- कच्छना चारण रत्नों मांथी लेखकश्री :- आशानंद गढवी झरपरा-कच्छ*           *वंदे सोनल मातरम्* Keywords Veer Shahid manshi gadhvi ni varsik 16 mi viranjli, veer sahid manshi gadhvi, zarpara, sahid ne 100 100 salam, sahid manshi gadhvi no tunk ma parichay #veer_sahid_manshi_gadhvi #veer_sahid #16_mi_viranjli #samra_gadhvi_official
0 notes
thegandhigiri · 3 years
Text
इस वजह से अहमदाबाद पहुंचे केजरीवाल, बीजेपी में मची खलबली
इस वजह से अहमदाबाद पहुंचे केजरीवाल, बीजेपी में मची खलबली
अहमदाबाद: सूरत महानगर पालिका चुनाव में 27 सीट जीतने के बाद आम आदमी पार्टी (Aam Admi Party) काफी उत्साहित है। हाल ही में सूरत भाजपा के करीब 300 कार्यकर्ता आम आदमी पार्टी में शामिल हुए हैं। Read This: प. बंगाल में आज से पहले BJP की इतनी बेज्जती कभी नहीं हुई इसके अलावा गुजराती पत्रकार ईश्वरदान गढ़वी के सोमवार को केजरीवाल की उपस्थिति में आम आदमी पार्टी में शामिल होने की अटकलें लगाई जा रही है। गढवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aapnugujarat1 · 5 years
Text
गुजरात में २० गायकों ने थामा भाजपा का दामन
गुजरात के जाने माने लोकगायक हेमंत चौहाण, श्यामल, सौमिल मुंशी, बंकिम पाठक, संगीता लाबडिया सहित करीब २० गायकों ने सोमवार को भाजपा का दामन थाम लिया । डॉ बीसी रॉय अवार्ड से सम्मानित विख्यात लीवर ट्रांसप्लांट सर्जन डॉ आनंद खख्खर ने भी भाजपा की सदस्यता ली है । भाजपा की ओर से चलाए जा रहे सदस्यता अभियान के तहत बड़ी संख्या में गुजराती ल��कगायक भाजपा में शामिल हो चुके हैं । महिला लोकगायक गीता रबारी, किंजल दवे, एश्वर्या मजूमदार के बाद अब वरिष्ठ लोकगायक हेमंत चौहाण, बंकिम पाठक, भावनाबेन लाबडिया, संगीता लाबडिया, बिहारी हेमूभाई गढवी, किरीटदान गढवी, श्यामल, सौमिल मुंशी, विक्रम पंचाल, सुखदेवसिंह झाला तथा गुजराती फिल्म अभिेनेता शैलेष गोस्वामी, अभिनेत्री झीलबेन जोशी आदि ने सोमवार को भाजपा प्रदेश कार्यालयश्रीकमलम पहुंचकर पार्टी की सदस्यता ग्रहण की । अपोलो हॉस्पिटल चेन्नई के मशहूर लीवर ट्रांसप्लांट सर्जन डॉ आनंद खख्खर भी केसरिया खेस पहनकर भाजपा में शामिल हो गए हैं । उनके नाम एक हजार से अधिक लीवर ट्रांसप्लांट का रिकार्ड हैं । तमिलनाडु सरकार ने उन्हें ट्रेंडसेटरअवार्ड से सम्मानित किया, जबकि २०१७ में राष्ट्रपति डॉ बीसी रॉय अवार्डसे सम्मानित कर चुके हैं । लोककलाकार व डॉ आनंद का कहना है कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी व गृहमंत्री अमित शाह के नेतृत्व में भारत वैभव के शिखर पर पहुंच रहा है तब वे भी इस नेक काम में उनके साथ हैं । जम्मू-कश्मीर से अनुच्छेद ३७० हटाने का भी समर्थन करते हुए डॉ आनंद ने कहा कि यह सब राजनीतिक इच्छाशक्ति व निर्णय क्षमता से ही हो सका है । Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 December 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 08 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत, तर आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा.
गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल येत्या १२ डिसेंबर पुन्हा शपथ घेणार.
महाविकास आघाडीची केंद्र आणि राज्य सरकार विरोधात येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा.
नाशिक जिल्ह्यात, त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.
आणि
४२वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या शनिवारी घनसावंगीमध्ये होणार.
****
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. आम आदमी पक्षाला या निवडणुकीत फारसं यश मिळालं नसलं तरी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरातमध्ये भाजपला सलग सातव्यांदा सत्ता मिळाली आहे. एकूण १८२ पैकी आतापर्यंत भाजपनं १४१ जागांवर विजय मिळवला आहे, तर आणखी १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची दाणादाण उडाली असून पक्षाला आतापर्यंत केवळ १५ जागांवर विजय मिळाला तर दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. आम आदमी पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले इसुदिन गढवी यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र एकूण मतांपैकी १४ टक्के मतं पक्षाला मिळाल्यामुळे, आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्ष- राष्ट्रीय लोकदल युतीच्या हातातून सत्ता निसटली असून या राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी आतापर्यंत ३९ जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत तर  सात जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. या राज्यात तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
पाच राज्यात झालेल्या एक लोकसभा आणि सहा ‍विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही आज मतमोजणी पार पडली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव विजयी झाल्या आहेत. विधानसभेच्या दोन जागांपैकी एक भाजपला तर दुसरी राष्ट्रीय लोकदलाला मिळाली आहे. बिहारमधल्या एका जागेवर भाजप, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस तर ओडिसात बिजू जनता दलाचा उमेदवार विजयी झाला आहे.
****
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय प्राप्त केल्याने राज्यात जल्लोष सुरू झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी पक्षाचा विजय मिठाई वाटप करुन साजरा केला. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल हे पुन्हा शपथ घेणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हिमाचल प्रदेशचे नागरिक, पक्षाचे नेते, आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ते आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. गुजरातच्या जनादेशाचा आपण स्विकार करत असून, लोकशाही प्रक्रियेत जय -पराजय होत असतात, असंही खरगे म्हणाले.
****
गुजरातचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी दिल्ली महानगर पालिका आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाच उदाहरण दिलं. राजकारणात पोकळी असते, गुजरातची पोकळी भाजपाने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी आम आदमी पार्टीने भरून काढली आहे. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजेत, असं ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधि���ारी आणि अधिकारी उपस्थित होते.
****
कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या मतांमध्ये विभागणी झाली, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये मिळाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यातील जनतेमध्ये शिंदे- फडणवीस सरकार बद्दल असंतोष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे, सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे, या सर्व बाबींच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीनं येत्या १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाविकास आघाडीच्यावतीनं केंद्र आणि राज्य सरकार विरोधात येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची आज मुंबईत यासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र द्रोहीच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद, राज्यातून उद्योग पळवले जात आहे. गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचं श्रेय असल्याचं ठाकरे म्हणाले. या विरोधात सर्व महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येत या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजीत पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.
****
नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी बेकायदेशीर खोदकामाला पायबंद बसणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि इगतपुरी तालुक्यातल्या काही भागांचा यात समावेश आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह वाघेरा, वरस विहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचुर्ली आदी गावांचा परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ब्रह्मगिरी परिसरात खोदकाम करण्याचे प्रकार वाढल्यानं पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करत ब्रह्मगिरी बचाव समिती स्थापन केली होती.
****
४२वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या शनिवारी १० डिसेंबरला जालना जिल्ह्यात घनसावंगीमध्ये होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्धाटन होणार असून साहित्यिक शेषराव मोहिते हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. संमेलनाच्या दोन दिवसात कथाकथन, विविध विषयांवरील परिसंवाद, मराठवाडा, राज्य आणि जिल्हा अशा तीन स्तरावरील कवींचं संमेलन, बाल मेळावा, प्रकट मुलाखत आदि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती स्वाताध्यक्ष माजी आमदार शिवाजी चौथे यांनी दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ६० टक्के मुलांना पहिली गोवर लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. आता १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी या कालावधीत लसीकरणापासून वंचित सर्व बालकांना विशेष मोहीमेद्वारे गोवर लस देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ताप आणि पुरळ असलेल्या व्यक्तींचे रक्तजल नमुने घेण्याचं काम सुरु आहे.
****
औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचा लोकार्पण सोहळा उद्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर इथं नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित चर्चासत्राचं उद्धाटन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतिश देशपांडे यांनी दिली आहे. दोन एकर परिसरात ही चार मजली इमारत असून यामध्ये दोन सभागृह, एक आर्ट गॅलरी ॲम्पिथिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं हे सभागृह आहे. 
****
लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात हिंगोलीत आज भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक आणि इतर कार्यक्रम शांततेत पार पडावेत, त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये, शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कंधार आणि माळाकोळीच्या पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात समन्वय वाढवण्याच्या दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या सूचना.
राज्यात औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतल्या ‘मंथन-वेध भविष्याचा’ शिबिराला प्रारंभ.
पत्रकार ईशुदान गढवी आम आदमी पक्षाचे गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित.
मुंबईत हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याच्या धमकीनंतर पोलिस यंत्रणा सतर्क.
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तावर तर न्युझीलंडचा आयर्लंडवर विजय.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय असून तो वाढवण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. कोल्हापूर इथं आयोजित राज्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आण��� पोलीस अधीक्षक उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यात बेकायदेशीर लिंगनिदान, गुटखा पान मसाला विक्री याबाबत कडक निर्णय लागू करण्यात आले असून कर्नाटक राज्यातही सदर नियम लागू करावेत असं उस्मानाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितलं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सीमावर्ती भागातील वाळू उत्खनन, स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमध्ये परस्पर समन्वय आणि गुन्हेगारांच्या माहितीची देवाणघेवाण करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेत दिशादर्शक फलक लावावेत या निर्णयावरही या बैठकीत एकमत झालं.
****
राज्यात औद्योगिक गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प येणार असल्याचं सांगत, आगामी काळात होणाऱ्या सामंजस्य करारांची शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात औद्योगिक धोरणात बदल झाला असून यामुळं विदेशी गुंतवणूकही वाढणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळं औरंगाबाद, ठाणे, रायगड, इथं उद्योग येतील याचबरोबर प्रवाशांच्या फायद्यासाठी आरेमध्ये कार शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यात आगामी काळात नैसर्गिक शेती मोहीम राबवण्यात येईल, यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालूक्यातल्या नंदूर इथल्या आवताडे साखर कारखाना प्रकल्पाच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्यात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळं आज ऊस कारखानदारी अस्तित्वात असल्याचं सांगत रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी गेल्या ९ वर्षात जवळपास एक हजार रुपयांनी वाढला असून आपण मुख्यमंत्री असतांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. साखर उत्पादनासोबतच इथेनॉल निर्मितीमुळे कारखानदारीला स्थिरता मिळाली असून निर्यातीबाबतचे नियम, अनुदान, कर्जाचं पुनर्वसन असे अनेक निर्णय केंद्रानं घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आमदार समाधान आवताडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना उभारला असून याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना आणि कामगारांना होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत यासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या मराठी चित्रपटानं मराठीचं स्थान मोठं केलं, यासोबतचं श्यामची आई, पिंजरा यांसारख्या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय असून ही परंपरा आपण कायम ठेवू तसंच नाट्य मंदिरं उत्तम करुन ही रंगभूमी निश्चित संपन्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि सह कलाकारांचा सन्मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं मंथन-वेध भविष्याचा या शिबिराचं आज उद्घाटन झाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पक्षावर जेव्हा टीका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे, असा होतो. राज्यात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्यानं सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सातत्यानं टीका होत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. सत्ता असताना आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले, हे जनतेला सांग��्याची गरज आहे. ही कामं पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायला हवीत असं आवाहनही पाटील यांनी यावेळी केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्तानं जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं घेण्यात येणाऱ्या सभेला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. यापूर्वी धरणगावमध्ये झालेल्या सभेत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं प्रशासनानं युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना भाषणबंदी तसंच जिल्हा बंदी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही आमदार आदित्य ठाकरे यांच्या येत्या ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड इथे नियोजित सभेला नगरपरिषदेनं परवानगी नाकारली आहे.त्यामुळे त्यांची ही सभा रद्द झाल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. शहरातील महावीर चौकात ठाकरे यांची ही सभा होणार होती. याच दिवशी शिवसेना बाळासाहेबांची पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे. दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे नगर परिषदेनं ही परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सभा रद्द झाली असली तरी ठाकरे यांचा दौरा रद्द झालेला नाही, ते बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं शिवसेनेच्या पक्ष सूत्रांनी सांगितलं.
****
आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये पत्रकार ईशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पक्षाचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. सध्या गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत.
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वी केजरीवाल यांनी मोबाईल क्रमांक देऊन जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यानुसार गढवी यांना सर्वाधिक पसंती मिळाल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे.
****
मुंबईत हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाला आल्यानंतर या परिसरातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या दूरध्वनीनंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रकल्प परीसर पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सदरील दूरध्वनी उल्हासनगरहून आला असल्याचं तपासात समोर आलं असून पोलिस दूरध्वनी करणाऱ्या इसमाचा पोलिस शोध घेत आहेत.
****
कोविड लसीकरणावरून भेदभाव केल्यामुळं दाखल याचिके प्रकरणी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतल्या मुलुंड इथल्या कनिष्ठ न्यायालयानं समन्स जारी केलं आहे. या तिघांनाही ११ जानेवारीला प्रत्यक्ष किंवा वकिलांमार्फत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात सामाज��क कार्यकर्ते अंबर कोईरी यांनी याचिका दाखल केली होती. लस उत्पादक कंपन्यांचा फायदा करण्यासाठी सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या हेतूने हे लसीकरण सक्तीचे केल्याचा आरोप कोईरी यांनी दाखल याचिकेत केला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवरील दुभाजके तोडून जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार करणाऱ्या हॉटेल, ढाबा चालकांवर आणि व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पाचोड, करमाड इथल्या १५ व्यावसायिकांवर शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा चार धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारीत २० षटकांत आठ बाद १६८ धावा केल्या. उत्तरादाखल अफगाणिस्तानचा संघानं २० षटकांत सात बाद १६४ धावा केल्या. त्याआधी सकाळी झालेल्या अन्य एका सामन्यात न्युझीलंडनं आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
गुजरातमध्ये 'आप'ने नवी टीम जाहीर केली, इसुदान गढवी यांच्याकडे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीसपदाची जबाबदारी
गुजरातमध्ये ‘आप’ने नवी टीम जाहीर केली, इसुदान गढवी यांच्याकडे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीसपदाची जबाबदारी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या नेत्याने 850 हून अधिक पदाधिकाऱ्यांसह नवीन संघटनात्मक रचना जाहीर केली आहे. त्याच वेळी, गुजरात आपचे नेते इसुदान गढवी यांची आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर इंद्रनील राजगुरू यांच्याकडे राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आम आदमी पार्टीने गुजरातचे नेते इसुदान गढवी यांची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
गुजरात निवडणूक 2022: गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, कैलाश गढवी यांचा 'आप'मध्ये प्रवेश, माजी आमदार मणिलाल वाघेला यांचा भाजपमध्ये प्रवेश
गुजरात निवडणूक 2022: गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, कैलाश गढवी यांचा ‘आप’मध्ये प्रवेश, माजी आमदार मणिलाल वाघेला यांचा भाजपमध्ये प्रवेश
कैलास गढवी ‘आप’ आणि माजी आमदार मणिलाल वाघेला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कैलास गढवी म्हणाले की, गुजरातमधील भाजप सरकार लोकांना आरोग्य आणि शिक्षण सुविधा तसेच सुरक्षा आणि रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. त्याचवेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच वाघेला यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत त्याला दिशाहीन पक्ष म्हटले. गुजरात (गुजरात) काँग्रेस नेते कैलास गढवी (कैलास गढवी) रविवारी आम आदमी पक्षात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aapnugujarat1 · 7 years
Text
जय की शिकायत में रोहिणीसिंह सहित ७ के विरूद्ध समन्स जारी
जय की शिकायत में रोहिणीसिंह सहित ७ के विरूद्ध समन्स जारी
नई दिल्ली के ध वायर नाम के न्यूज पोर्टल में भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह के पुत्र जय शाह और इस कंपनी के बारे में लिखे गये विवादित और आर्टिकल के बारे में जय शाह ने यहां की मेट्रोपोलिटन कोर्ट में पोर्टल के रिपोर्टर रोहिणीसिंह सहित ७ आरोपियों के विरूद्ध मानहानि की शिकायत दर्ज की गई है, यह केस में आज मेट्रोपोलिटन न्यायाधीश एसके. गढवी ने रोहिणीसिंह सहित ७ आरोपियों के विरूद्ध आईपीसी की धारा-५००…
View On WordPress
0 notes