Tumgik
#जाब
kanpur-business · 3 months
Text
तैयार हो
Tumblr media
हो जाऔ
0 notes
Text
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी पुण्यात स्कूलबस दामटवली, जाब विचारताच नको तिथे स्पर्श
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी पुण्यात स्कूलबस दामटवली, जाब विचारताच नको तिथे स्पर्श
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी पुण्यात स्कूलबस दामटवली, जाब विचारताच नको तिथे स्पर्श crime news : तू हे काय करतोय? आम्हाला काही झालं असतं तर? असा जाब शालेय विद्यार्थिनींनी विचारला असता आरोपी बस चालक मुलींच्या अंगावर धावून गेला. हात पकडून चुकीच्या पद्धतीने खांद्याला स्पर्श केल्याचा आरोप आहे. crime news : तू हे काय करतोय? आम्हाला काही झालं असतं तर? असा जाब शालेय विद्यार्थिनींनी विचारला असता आरोपी बस…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत, ध्यान मंडपात मौन आणि ध्यानधारणेला कालपासून सुरूवात केली. उद्या एक जूनपर्यंत ते इथं ध्यान करणार आहेत.
****
सुरक्षा दलांनी छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात विविध ठिकाणाहून १६ नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी ११ जणांना गोरना पडियारपारा परिसरातून, तर पाच जणांना भुसापूर परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलांची हालचाल रोखण्यासाठी अडथळा आणणं, स्फोट घडवून आणणं, असा घटनांमध्ये या नक्षलवाद्यांचा समावेश होता.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दरानं वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेनं काल चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला. एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं या अहवालात नमूद आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. पुण्याच्या स्थानिक न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी कलम २०४ अन्वये हे आदेश दिले. मार्च २०२३ मध्��े लंडन इथल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निराधार विधानं केल्‍याचा आरोप सावरकर कुटुंबियांनी केला होता.
****
भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. 
****
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, गुन्हेगारी अपघात, अंमलपदार्थांचा विळखा वाढतो आहे, मात्र अशावेळी काही मंत्री परदेशवारीवर गेले आहेत, अशी टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. पुणे अपघात आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दल येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचंही ते म्हणाले.
****
0 notes
marmikmaharashtra · 25 days
Link
https://marmikmaharashtra.com/speak-now-the-sengaon-panchayat-samiti-does-not-have-the-minutes-of-the-gram-sabha-of-any-village-exposing-a-serious-issue-through-right-to-information/
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
kamlakar-das · 5 months
Text
Tumblr media
पूर्ण परमात्मा ही पूजा के योग्य आहे उसका वास्तविक नाम कबीर कबीर परमेश्वर तथा तीन मंत्र ओम के नाम का जाब करने से पूर्ण मोक्ष होता है नाम को देने की अधिकारी केवळ संत रामपाल जी महाराज
1 note · View note
mhlivenews · 8 months
Text
जनरल मोटर्सप्रश्नी MIDC बंद करण्यापेक्षा मंत्र्यांना जाब विचारा,जयंत पाटलांचा शेळकेंना सल्ला
पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsuniversal-in · 9 months
Text
ग्राम रोजगार सेवक वेलफेयर एसोसिएशन की बैठक सम्पन्न
Tumblr media
सिद्धार्थनगर। ग्राम रोजगार सेवक पंचायत मित्र वेलफेयर एसोसिएशन सिद्धार्थनगर इकाई की बैठक इटवा ब्लाक सभागार में बुधवार को सम्पन्न हुई। जिसकी अध्यक्षता जिला संरक्षक राजेश चतुर्वेदी ने किया तथा संचालन इटवा ब्लाक अध्यक्ष राम तीरथ गिरी ने किया। ग्राम रोजगार सेवक पंचायत मित्र वेलफेयर एसोसिएशन सिद्धार्थनगर इकाई की बैठक बैठक को मुख्यातिथि के बतौर सम्बोधित करते हुए संगठन के प्रदेश अध्यक्ष कुलदीप द्विवेदी ने कहा कि एकता संघर्ष समिति द्वारा ट्वीटर अभियान से लेकर 04.10.2023 को जिला पर तिरंगा यात्रा निकला जायेगा और कलेक्ट्रेट में मा० जिलाधिकारी को ज्ञापन दिया जायेगा। जिले के सभी ब्लाक अध्यक्ष व समस्त रोजगार सेवक इसकी पूरी तैयारी कर लें और मा० मुख्यमंत्री जी के सम्मान में यात्रा का आयोजन किया जायेगा। मा० मुख्यमंत्री जी ने लखनऊ में मनरेगा के कर्मचारियों को एच०आर०पालिसी तथा मनरेगा कर्मचारियों को जाब चार्ट में ग्राम्य विकास में जोडा जाय, रोजगार सेवकों की सेवा समाप्ति में श्रम उपायुक्त की सहमति होगी, आकस्मिक अवकाश, चित्किसा अवकाश की घोषणा मा० मुख्यंमंत्री जी ने किया था। लेकिन अधिकारियों के हीला हवाली से अभी तक शासनादेश जारी नहीं किया गया है। उसी क्रम में 04.10.2023 को नौगढ ब्लाक से जिलाधिकारी कार्यालय तक तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है। बैठक को सम्बोधित करते हुए जिला संरक्षक राजेश चतुर्वेदी ने कहा कि ग्राम रोजगार सेवकों का ग्राम प्रधानों द्वारा उत्पीडन अगर बन्द नहीं हुआ तो संगठन आन्दोलन करने हेतु बाध्य होगा। इसी तरह एक मामला नौगढ ब्लाक में चल रहा है। प्रधान द्वारा जो आरोप लगया गया वह पूरी तरह से गलत है। खण्ड विकास अधिकारी द्वारा जिले पर रिपोर्ट प्रेषित है। अध्यक्षों का 03 वर्ष पूर्ण हो चुका है। ऐसे में लोक सभा के पहले सभी ब्लाकों में ब्लाक अध्यक्षों की बैठक को सम्बोधित करते हुए जिला महामंत्री अमरेश यादव ने कहा कि सभी ब्लाक का चुनाव जल्द कराया जाये और नई कार्यकारणी का गठन भी किया जाए। सदस्यता अयान चलाया जाय जिससे संगठन हमारा सक्रिय हो और लोकसभा का चुनाव देखते हुए नई कार्यकारणी का गठन भी किया जाए। बैठक में अखिलेश मौर्य, राम प्रकाश मिश्रा, आनन्द प्रकाश तिवारी, राजकुमार चौधरी, विजय दूबे, वीरेन्द्र कुमार, रामसुभग, नवल किशोर, सदानन्द यादव, राम तीरथ गिरी, मनोज पाण्डेय, आलोक पाण्डेय, सतीश, अमरेश यादव आदि ब्लाक अध्यक्षगण उपस्थित रहे। Read the full article
0 notes
journalist27 · 11 months
Text
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य,व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे,
दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी आपल्या कानावर पडली.आपले मायबाप सरकार ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे,हे आपण सारे आजवर अनुभवत आलो आहोत.ग्रामीण भागातील शांळामध्ये पुरेसे शिक्षक नाहीत,वर्गखोल्या नाहीत,विद्यार्थ्यांना पिण्यासाठी धड पाणी नाही,मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत.इ.समस्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजल्या आहेत.यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात देशाने सर्वांगीण प्रगती केली.विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण जी कामगिरी केली,त्याचे दृष्यपरिणाम आपण काल अनुभवले.आपले चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावले.पुढच्या महिन्यात ते चंद्रावर उतरेल असा अंदाज आहे.आपल्या शास्त्रज्ञानी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.आज आपली अनेक मुलं इस्रो व अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
हे सांगण्यामागचा उद्देश असा कि ही जी सर्वांगीण प्रगती साध्य होण्यामागे केवळ शिक्षण ही एकमेव व्यवस्था आहे.पण ती अधिक सक्षम व्हावी,यादृष्टीने गेल्या ७५ वर्षात सरकारकडून प्रामाणिकपणे प्रयत्नच झाले नाहीत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रत्येक सरकारने लक्ष दिले,ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र कायम उपेक्षित राहिला.२१ व्या शतकात आता ग्रामीण भागही कात टाकू लागला आहे.पण त्यास योग्य ती गती मिळालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसाबसा धडपडतोय,पण सरकारकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात येत नाही.
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला.सुमारे ७५ लाख रु.चे बिल थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.या बिलापोटी सरकार जे अनुदान देते ते २०१९ पासून देण्यात आले नाही,असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.लाखो कोटी रु.चे अंदाजपत्रक असलेले आपले राज्य सरकार ७५ लाख रु.देऊ शकत नाही,ही बाबच मुळात शरमेची आहे.हे केवळ पालघर जिल्ह्यातच अस घडलं नाही तर इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.पुणे-७९२,सातारा-३१३,जळगाव-२४८,कोल्हापूर-१४८ एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विजेची बिले भरली नाहीत,म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.याव्यतीरिक्त अन्य जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले याची कोट्यवधी रु.ची वीजबिले वेळेवर भरणारे सरकार शाळांची वीजबिले भरत नाही,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.उन्हाळ्यात या मुलांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नाही.एकीकडे खोक्याचा वारेमाप वापर सुरू असताना,आमदार,खासदार मंत्र्यांना वीजबिलात भरमसाठ सवलती दिल्या जातात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र घामाघूम होत शिकतोय,हे चित्रच मुळात आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
आजही अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःच्या मालकीच्या वास्तू नाहीत,अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षक एकाच वर्गात दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात.अपुरा शिक्षक वर्ग,वर्गखोल्या नाहीत,वीजपुरवठा खंडित,अशा स्थितीत मुलं शिकणार कशी ? यावर एकाही सरकारने आजवर उपाययोजना करणे टाळले.त्यामुळे ग्रामीण भागात साक्षरतेचा वेग आता मंदावला आहे.विद्यार्थ्यांची गळती,हे फार मोठे संकट असून ते रोखण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिक्षण विभाग संवेदनशील नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.दुसरीकडे खाजगी शाळांचे पीक मात्र जोमात आले आहे.जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे खाजगी शाळा बेडकासारख्या फुगत चालल्या आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था का होतेय ? याचा विचार होण्याची गरज आहे.विजबिलापोटी देण्यात येणारे अनुदान रोखणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.गावागावात शिक्षण समित्या कार्यरत आहेत.या समित्यांच्या सदस्यांनी गावातील सरपंच व ग्रामसेवकाना थकीत वीज बिलसंदर्भात जाब विचारायला हवा होता.वास्तविक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्यांनी या ज्वलंत समस्येचा आजवर पाठपुरावा केला असता तर अशी नामुष्कीची पाळी आली नसती.
एकीकडे आपण चंद्रावर पाय ठेवण्यासाठी अब्जावधी रु.खर्च करतो,तर दुसरीकडे शाळांची विजबिले वर्षानुवर्षे भरत नाही,याची सांगड कशी घालायची ? जी अवस्था जिल्हा परिषद शाळांची तीच अवस्था आश्रमशाळा व अंगणवाड्याची आहे.मग अस वाटत कि चंद्रावर जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च कशासाठी ? आज २१ व्या शतकात ग्रामीण भागातील जनतेला कुपोषणमुक्त जीवन,पाणी,
शिक्षण,आरोग्य व दोन वेळचे जेवण,यासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.हे विदारक चित्र बदलण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत,आणि पुढेही होतील,असे वाटत नाही.पालघर जिल्ह्यात विक्रमगड म्हसेपाडा या आदिवासी पाड्यावरील चिमुकली वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडते,हे कसले लक्षण आहे.या व्यवस्थेला आपण प्रगल्भ लोकशाही व्यवस्था म्हणावे का ? मंत्र्यांच्या दालनावर सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रु.खर्च करत असते,पण ग्रामीण भागातील शाळांची विजबिले भरण्यास टाळाटाळ करते.या व्यवस्थेत सुधारणा होईल," सबका साथ,सबका विकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल,अशी शक्यता नाही.आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत.आपला देश,आत्मनिर्भर व डिजिटल इंडिया होण्याच्या मार्गावर आहे,असा डिंगोरा सतत पिटला जातो,पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव काय आहे ? यावर सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे.आजवरच्या प्रत्येक सरकारचा केवळ शहरी भागावर फोकस राहिला,त्यांना खरा " भारत खेड्यात," आहे,हे महात्मा गांधी यांचे म्हणणे कधीच पटले नाही.त्यामुळे पाच ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आपण जी स्वप्ने पाहत आहोत,ती व्यर्थ आहेत.ग्रामीण भागातील निरक्षरता कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी दमदार पावले उचलत नाही,तोवर ग्रामीण भागातील तरुणाईला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही.
Tumblr media
1 note · View note
rahulmarathiblog · 11 months
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 11 months
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता जाब विचारून दाखवा? राऊतांनी दिलं आशिष शेलारांना चॅलेंज
राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता जाब विचारून दाखवा? राऊतांनी दिलं आशिष शेलारांना चॅलेंज
राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता जाब विचारून दाखवा? राऊतांनी दिलं आशिष शेलारांना चॅलेंज मुंबई – महाविकास आघाडीकरून राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.  यावरून संजय राऊत यांनीही भाजपावर सडकून टीका केली आहे. १९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे, त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल, असे ते म्हणाले. …
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 11 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्य��
दिनांक ११ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत-२०४७ संदर्भात तरुणांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी आजपासून विशेष अभियान
विवाह समारंभांसह भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक
काँग्रेस पक्षाचा आज नागपूर इथं विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा
केंद्रीय पथक आजपासून राज्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर
आणि
उदगीर इथं राज्यस्तरीय शालेय डॉज बॉल स्पर्धेला प्रारंभ
****
विकसित भारत-२०४७ साठी देशातल्या तरुणांकडून कल्पना जाणून घेण्याच्या मोहिमेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून प्रारंभ होत आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. यानिमित्तानं सर्व राज्यांच्या राजभवनांमध्ये होणाऱ्या एक दिवसीय कार्यशाळांसाठी, सुमारे ७०० विद्यापीठांचे कुलगुरू आणि संस्थांचे प्रमुख एकत्र येणार आहेत. विकसित भारत संकल्पनेत विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा समावेश केला जाणार असल्याचं सुब्रह्मण्यम यांनी यावेळी नमूद केलं.
****
विवाह समारंभांसह भोजन व्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी काल गडचिरोली इथं ही माहिती दिली. अन्नधान्यातली भेसळ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं बळकटीकरण करण्यासाठी विभागातली ७५० रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहितीही आत्राम यांनी यावेळी दिली.
****
काँग्रेस पक्षातर्फे आज नागपूर इथं विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट संदेशात सांगितलं.
****
देशात नोकरीच्या शोधात असलेले चांगले उमेदवार आणि चांगल्या कंपन्यांची कमतरता नाही, पण या दोघांची एकमेकांशी गाठ घालून देणारा मंच, नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात नमो महारोजगार मेळाव्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. या मेळाव्यात ११ हजार ९७ लोकांना प्रत्यक्ष नोकरीवर रुजू होण्याची नियुक्तीपत्र देण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसह कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांसंदर्भात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली असून, गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल सामाजिक माध्यमावर जाहीर केलेल्या संदेशातून त्यांनी ही माहिती दिली.
****
कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच फेरविचार होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिलेल्या पत्रामुळे याबाबत लवकरच निर्णय होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, निर्यात बंदी विरोधात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले आहेत. तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले तर, संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा सहकार उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी दिला आहे.
****
ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा असल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेला साथ देण्याची गरज, राऊत यांनी व्यक्त केली.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची काल लातूर जिल्ह्यात औसा, किल्लारी इथं सभा झाली, आज त्यांची अंबाजोगाई इथं अंबा साखर कारखाना परिसरात सभा होणार आहे.
****
राज्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथक आजपासून आढावा घेणार आहे. हे १२ सदस्यीय पथक जालना, बीड, धाराशिव, आदी जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करेल, त्यानंतर १५ डिसेंबर रोजी हे पथक पुण्यात बैठक घेऊन केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे.
दरम्यान, हे पथक येत्या १३ आणि १४ डिसेंबरला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात हे पथक वाशी, लोहारा आणि धाराशिव तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देऊन पिण्याचं पाणी, पिक परिस्थिती, चारा आणि गुरांच्या छावण्या या संदर्भात पाहणी करणार आहे. जिल्ह्यातल्या उर्वरित पाच तालुकेही दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं काल राज्यस्तरीय शालेय डॉज बॉल स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी करीता प्रत्येक विभागामधून पाच खेळाडूंसह ५१२ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उदगीर, जळकोट भागात खेळ संस्कृती रुजवण्यासाठी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न असून, उदगीर शहरातल्या जिल्हा परिषद मैदानावर तालुका क्रीडा संकुल नऊ कोटी रुपयांच्या निधीतून उभं करत असल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी संस्कृती महोत्सवाचा काल समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ गायक पंडित श्याम अण्णासाहेब गुंजकर यांना मराठवाडा संस्कृती भूषण पुरस्कार, तर राज्य शासनाच्या गड किल्ले संवर्धन समितीचे सदस्य संकेत कुलकर्णी यांना युवा संस्कृती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव आणि पूर्णवाद रत्न डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
साहित्यातून विश्व शांती निर्माण झाली पाहिजे, माणसं जोडता आली पाहिजेत, अशी अपेक्षा प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केली आहे. ते काल नांदेड जिल्ह्यात उमरी इथं आयोजित १८ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात संमेलनाध्यक्ष या नात्याने बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं, या संमेलनाला साहित्य रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला कालचा डरबन इथला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. या मालिकेतला दुसरा सामना उद्या खेळवला जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यानच्या तिसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करत १२७ धावांचं लक्ष्य दिलं, भारतीय महिलांनी ते १९व्या षटकात पूर्ण केलं. तीन सामन्यांची मालिका इंग्लंडनं दोन - एकनं जिंकली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर इथं उस्मानपुरा भागात पोहोचली. या ठिकाणी नागरिकांनी विशेषत: महिलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी विकसित भारत संकल्पाची सामूहिक शपथ घेण्यात आली.
**
नांदेड जिल्ह्यात काल गुट्टेवाडी, कालका, रामपूर, देऊळगाव, लिंगापूर या गावात या यात्रेने नागरिकांना योजनांची माहिती दिली. आज ही यात्रा लोणी खुर्द, धानोरा, हुनगुंदा, शिळवणी, चिंचोली, अंबुलगा, आदी ठिकाणी भेटी देणार आहे.
**
विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेत वंचित नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करण्याचं आवाहन, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलं आहे. लातूर महापालिका क्षेत्रात सोनानगर इथं काल या यात्रेत ते बोलत होते.
**
शासनाच्या योजनांच्या परभणी इथल्या लाभार्थी सरोजा कच्छवे आणि लातूर इथले लाभार्थी दिलीप गोरे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत आकाशवाणीला माहिती दिली.
****
नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर कसारा घाटात काल सायंकाळी मालगाडीचे सात डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे अनेक रेल्वे गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या, तर राज्यराणी आणि देवगिरी एक्सप्रेससह काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या.
****
नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असलेल्या शिवशाही बसला काल अचानक आ�� लागली. चांदोरी शिवारात शिंपीटाकळी फाट्याजवळ काल दुपारी ही घटना घडली. गाडीमधून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालक आणि वाहकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं, कोणीही जखमी झालं नाही.
****
0 notes
harishmarathiblog · 11 months
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 11 months
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 11 months
Text
शाळेच्या गेटवर अभिजीत पुन्हा दिसला , मुलीच्या वडिलांनी हटकलं तर..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुर इथे समोर आलेला असून इयत्ता दहावीतील मुलीला सतत मेसेज करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुलीच्या वडिलांनी जाब विचारला म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे . आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अभिजीत पवार ( राहणार सोलापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes