Tumgik
#गोपीचंद पडळकर बातम्या
marathinewslive · 2 years
Text
“राहुल गांधीचा पराभव होऊ शकतो तर तुम्ही….”; गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला
“राहुल गांधीचा पराभव होऊ शकतो तर तुम्ही….”; गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला
बारामतीत २०२४ साली परिवर्तन होईल. भाजपाचा २०२४ ला येथे गुलाल उधळणार आहे. राहुल गांधींसारख्या केंद्रीय नेतृत्वाचा पराभव होऊ शकतो. तुमचा पक्ष तर काँग्रेस एवढा देशभर पसरलेला नाही आहे. काही मोजक्या जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम चालते. अति आत्मविश्वास चांगला नाही, असा टोला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे पदघम वाजू लागले…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे – गोपीचंद पडळकर
सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे – गोपीचंद पडळकर
सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे – गोपीचंद पडळकर “शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु ”, असंही बोलून दाखवलं आहे. “सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत असून सत्तेविना ते कामच करु शकत नाहीत. शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु आहे.” अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३० कोटी नागरिकांना आरोग्य कवच
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
      आणि
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग आणि सात्विक जोडी अंतिम फेरीत दाखल
****
आयुष्मान भारत - प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३० कोटी आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आली आहेत. या योजनेद्वारे वंचित घटकातल्या कुटुंबांना उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच दिलं जातं. देशभरातल्या १० कोटीहून अधिक गरीब कुटुंबापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा उद्देश आहे.
****
देशातल्या ९ ते १४ वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक HPV लसीकरण मोहीम राबवणार असल्याचं वृत्त खोट आणि दिशाभूल करणार आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात HPV लसीकरण सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जगाचा भारताकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदलला असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ‘भारताचा भौगोलिक राजकारणातील उदय’ या विषयावर काल नागपूर इथं वसुधैव कुटुंबकम उपक्रमात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्‍य अशा सर्व क्षेत्रात भारत बदलत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.
****
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचं काल पहाटे पुण्यातल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. वयाच्या आठव्या वर्षापासून संगीत साधना सुरू केलेल्या प्रभाताई प्रतिभावंत गायिका, संगीतकार, लेखक आणि प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध होत्या. हिंदी आणि इंग्रजी भाषेतून त्यांनी अकरा पुस्तकांचं लेखन केलं होतं. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्या आकाशवाणीच्या संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या तसंच आकाशवाणीच्या मराठी आणि हिंदी भाषा विभागाच्या 'अ' श्रेणीच्या कलाकारही होत्या. छत्रपती संभाजीनगर इथं नोव्हेंबर महिन्यात 'पद्म फेस्टिव्हल' मध्ये प्रभा अत्रे यांची प्रकट मुलाखत झाली होती. प्रभा अत्रे यांचे कुटुंबीय अमेरिकेत असल्याने त्यांच्या पार्थिव देहावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रभा अत्रे यांनी आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत नविनतेचा अंगीकार करत भारतीय संगीत मोठ्या उंचीवर नेल्याचं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर, प्रभा अत्रे यांच्या निधनानं एक स्वरतपस्विनी काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
मराठा समाजाला इतर मागास वर्ग-ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल बीड इथं झालेल्या ओबीसी एल्गार सभेत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.   
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३० वा नामविस्तार दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठात ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर महात्मा गांधी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांचं व्याख्यान होणार आहे. नऊ गुणवंत विद्यार्थींना आज सुवर्णपदक देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची वाढती संख्या समाधानकारक असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं हृदय रोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन डॉ. कराड यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातून शंभर तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.                                       ****
विकसित भारत संकल्प यात्रेचं काल प��भणी शहरात पारदेश्वर मंदिर परिसरात स्वागत करण्यात आलं. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी इथले लाभार्थी अनिता मोघे, अनुराधा काळे आणि सवित्रा यादव यांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली...
बाईट - अनिता मोघे, अनुराधा काळे आणि सवित्रा यादव जि.परभणी
विकसित भारत संकल्प यात्रेत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात मुरूम इथं मुख्याधिकारी सचिन भुजबळ तसंच लाभार्थ्यांच्या हस्ते फीत कापून या यात्रेतल्या चित्ररथाचं उदघाटन करण्यात आलं. उमरगा इथं या यात्रेत काल विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
****
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांची जोडी अंतिम फेरीत दाखल झाली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी कोरियाई जोडीचा २१-१८, २२-२० असा पराभव केला.
****
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज इंदूर इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. 
****
गोव्यात घेण्यात आलेल्या वर्ड प्रोसेसिंग स्पर्धेमध्ये बीड इथल्या प्राचार्य डॉ.प्रिती पोहेकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. डिसेंबर महिन्यात दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्या पश्चिम विभागातून सहभागी होणार आहेत. ऑलिंपिकच्या धर्तीवर अबिलिम्पिक राष्ट्रीय संघटनेच्या वतीने या स्पर्धा घेतल्या जातात.
****
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज बीड जिल्ह्यात परळी इथं नमो चषक २०२४ अंतर्गत मॅरेथॉन तसंच व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहेत. या दोन्ही स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
****
जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं प्‍लास्‍टीक बंदीसंदर्भात गेल्या दोन दिवसांत सुमारे शंभर दुकांनांची तपासणी  करुन  एकूण ११० किलो प्‍लास्टिक जप्त करण्‍यात आलं.
या प्रकरणी नऊ आस्‍थापना तसंच दुकानदारांना प्रत्‍येकी पाच हजार रुपये दंड या प्रमाणे एकूण ४५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. 
****
भारतीय लिपी-शिल्पांमध्ये स्त्रियांचं महत्व विशद केलं असल्याचं मत डॉ महेंद्र कदम यांनी व्यक्त केलं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने, छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदच्या न.शे.पोहनेरकर व्याख्यानमालेत ते काल बोलत होते. आज या व्याख्यानमालेत डॉ. कदम हे स्त्री जाणिवेच्या आधुनिक कवितेतील पेच या विषयावर आपलं मत मांडणार आहेत.
****
परभणीच्या गंगाखेड पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसह अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी २५ कोटी ५५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते काल या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं.
****
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रित्यर्थ नांदेड जिल्ह्यात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यामध्ये उद्या १५ जानेवारीपासून सुक्ष्म सिंचन संच विक्री पश्चात सेवा पंधरवाडा मोहीम राबवण्यात येणार आहे. पंधरवाडा मोहीमे अंतर्गत २०२१-२२ ते २०२३-२४ या तीन वर्षात लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मोफत विक्री पश्चात सेवा दिली जाणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: 'ओबीसी आरक्षणावर एमव्हीए सरकार कधीच गंभीर नव्हते' भाजप नेते पडळकर यांचा टोला
महाराष्ट्र: ‘ओबीसी आरक्षणावर एमव्हीए सरकार कधीच गंभीर नव्हते’ भाजप नेते पडळकर यांचा टोला
महाराष्ट्र भाजप नेते गोपीचंद पडळकर. प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कठोर परिश्रम करत नसल्याची टीका महाराष्ट्र भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आज म्हणजेच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र भाजप नेते गोपीचंद पडळकर (भाजप नेते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले हे पवार कुटुंबियांचं…”, गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले, “शरद पवार राज्यातले…”
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले हे पवार कुटुंबियांचं…”, गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले, “शरद पवार राज्यातले…”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करुन हे सरकार आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी टोला मारला होता. त्याला आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजापाने मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं, हे पवार कुटुंबीयांचे दुख आहे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; म्हणाले, “विधानसभेला डिपॉझिट वाचलं…”
निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; म्हणाले, “विधानसभेला डिपॉझिट वाचलं…”
भाजपाचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका होती. रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली. या लंकेची लंका जाळायला येथे बरीच लोक आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर आता निलेश लंकेंनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निलेश लंके म्हणाले, “आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजे. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन टीका करता. मात्र,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gopichand Padalkar : सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
Gopichand Padalkar : सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
Gopichand Padalkar : सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची याची रचना केली होती. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. तसा आदेश जयंत पाटील यांनी पोलिसांना दिला असल्याचं देखील त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. सांगली – सरकार गेलेलं…
View On WordPress
1 note · View note
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 07 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
लष्कर, नौदल आणि वायुदल अशा तीनही संरक्षण दलांमधील माजी अधिकारी, सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जाणाऱ्या 'ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे' निमित्त मुंबईत संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नरिमन पॉइंट इथं आज सकाळी राज्यपाल रमेश बैस या संचलनात सहभागी झाले. यावेळी तीनही सेनादलांमधील आजी आणि माजी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
****
देशाच्या अर्थव्यवस्थेत सनदी लेखापालांचा सहभाग महत्वाचा असून ते आर्थिक विकासाचा कणा आहेत, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. मुंबईत भारतीय सनदी लेखापाल संस्था- आय.सी.ए.आय चा पुरस्कार सोहळा काल पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम् बिर्ला यांना राज्यपालांच्या हस्ते सीए हॉल ऑफ फेम पुरस्कारानं आणि दिवंगत सीए राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर प्रेरणादायी नेतृत्व श्रद्धांजली - सीए हॉल ऑफ फेम या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशातल्या ६२ छावणी परिषदांपैकी मध्य प्रदेशातल्या महू छावणी परिषदेचा प्रथम क्रमांक आला आहे. येत्या ११ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महू छावणी परिषदेला २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका, सासवड, लोणावळा नगरपालिकांना देखील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गौरवण्यात येणार आहे.
****
इतर मागासवर्गीय-ओबीसी प्रवर्गात अन्य जातींचा समावेश करू नये, या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यात नरसी इथं ओबीसी महामेळावा होणार आहे. या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, तसंच प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार विनय कोरे, गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत १३ हजार ८०६ जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव निकाली काढण्यात आले. जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांनी जातपडताळणीसाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून करण्यात आलं आहे. समितीकडे २६२ प्रस्ताव त्रुटी पूर्ततेविना प्रलंबित असून अर्जदारांना त्याची माहिती कळवण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामातल्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के अग्रिम पीक विम्यापोटी मंजूर रकमेपैकी १३० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित  करण्यात आले आहेत. विमा योजने अंतर्गत जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी सर्व ९३ महसूल मंडळात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मंजूर करण्यात आली होती. यावर्षी प्रथमच केंद्र शासन  निर्देशाप्रमाणे आधार प्रणालीद्वारे योजनेच्या संकेतस्थळावरून नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जात आहे.
****
नांदेड इथं आज सावित्री-रमाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बुद्धिस्ट रिसर्च फाउंडेशनतर्फे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन दुपारी तीन वाजता माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून सुषमा अंधारे यांची उपस्थिती राहणार आहे. महोत्सवात सावित्रीबाई कदम यांना सावित्री-रमाई जीवनगौरव, तर अनुसया पिंपळे यांना माता रमाई आंबेडकर विशेष सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
पुण्याजवळ मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेत येत्या १२ ते १४ जानेवारीदरम्यान जागतिक साखर उद्योगातली शाश्वतता, आव्हानं आणि संधी या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत जागतिक स्तरावरील ऊस आणि साखर उद्योगाला चालना देणाऱ्या कृषी, तसंच तांत्रिक विषयाशी निगडित एकंदर ६३ व्याख्यानं होणार आहेत. ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड यांच्यासह २७ देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, अडीच हजार उद्योजकदेखील या परिषदेला हजेरी लावणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी साडे सहाला प्रोझोन मॉलमधल्या आयनॉक्स चित्रपटगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, विशेष पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती राहील. यावेळी विजेत्या चित्रपट आणि लघुपटांना पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ अ फॉल या फ्रेंच चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाची सांगता होईल, असं महोत्सवाचे समन्वयक नीलेश राऊत यांनी सांगितलं.
****
नांदेडहून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस तिच्या नियोजित वेळेपेक्षा साडे पाच तास उशिरानं धावत आहे. सकाळी साडे नऊ वाजता नांदेडहून प्रस्थान करणारी ही रेल्वे आज दुपारी अडीच वाजता सुटेल, असं कळवण्यात आलं आहे.
****
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये दोन दिवस तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·      राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता
·      मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी
·      विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत-केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड
·      यंदाचा पद्‌मविभूषण गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर
आणि
·      जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा
सविस्तर बातम्या
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं काल राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे एक हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा अग्रीम संदर्भात आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांसाठी एक हजार ९५४ कोटी रुपये वाटपाला मंजुरी मिळाली आहे, यापैकी आतापर्यंत ९६५ कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. उर्वरित रक्कम वितरणाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसंच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणबाबत स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. काल जालना जिल्ह्यात अंबड इथं भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केलं. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधितांना दाखले द्यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल कोल्हापूर इथं सभा घेतली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहे, सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. सांगली, विटा तसंच इस्लामपूर इथंही जरांगे पाटील यांच्या काल जाहीर सभा झाल्या.
****
दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी संसदेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं बोलत होते.
****
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ लवकरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरू होईल, या यात्रेतून विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. कृषी, ग्रामविकास, अदिवासी विकास विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करुन घेण्यात यावी. आशा, अंगणवाडी सेविका,  नागरी सुविधा केंद्र यांची मदत घेऊन नोंदणीचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.कराड यांनी या बैठकीत दिले. योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात सात प्रचार रथ येणार असून, ग्रामपंचायतस्तरावर सुकाणू अधिकारी नेमले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाबासह सिकलसेल संदर्भातील तपासणीही यावेळी करण्यात आली.
****
मध्यप्रदेश विधानसभेच्या सर्व २३० विधानसभा जागांसाठी तर छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या ७० जागांसाठी काल मतदान झालं. मध्यप्रदेशात ७६ पूर्णांक २२ टक्के, तर छत्तीसगढमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं अमर हबीब यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.
****
ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ. शरद हेबाळकर यांना श्रीराधादामोदर प्रतिष्ठानचा श्रीदासगणू पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सव्वा लाख रुपये असं आहे. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीला येत्या १२ डिसेंबर रोजी पंढरपूर इथं हा पुरस्कार हेबाळकर यांना प्रदान केला जाईल.
****
धाराशिव इथं ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल ६५ किलो वजनाच्या गादी गटात कोल्हापूरच्या सोनबा इंगळे याने पहिला, सोलापूरच्या अनिकेत मगर याने दुसरा तर वर्ध्याच्या विनायक मोळे याने तिसरा क्रमांक पटकावला. माती गटाच्या काही कुस्त्या आजच्या सत्रात होणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या ११ तालुक्यातली साडे नऊशेहून अधिक गावंही टंचाईग्रस्त जाहीर झाली आहेत.
****
जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. आमदार कैलास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबर रोजी ही दिंडी निघणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात होणार आहे. या मोहिमेत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत,  असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज छत्रपती संभाजीनगर इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग पदासाठी पूर्व परीक्षा होत आहे. जिल्ह्यात नऊ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९६ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३८८अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून आज आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी ही गाडी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठं स्थापन करण्यास शासनाची मान्यता
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याच्या प्रमाणात गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढ
मराठा आरक्षण ओबीसीतून देऊ नये-ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेची मागणी
आणि
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचा आंदोलनाचा इशारा
****
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचं आज राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण करण्यात आलं. राज्याला एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने या अहवालातून ३४१ शिफारशी केल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत विविध विभागांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्यात आला असून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्यण मंत्रिमंडळाने घेतला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर इथल्या सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे १ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
****
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९० साली प्रति हेक्टर ३२ टनांहून अधिक माती वाहून गेली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ६२ टन ७०० क्विंटलवर पोहोचल्याचं प्राध्यापक पेन्नन चिन्नसामी आणि वैशाली होनप यांनी केलेल्या अभ्यासात आढळलं. महाराष्ट्रात ९७ टक्क्यांनी जमिनीची धूप वाढल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे.
****
मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही; मात्र हे आरक्षण ओबीसीतून देऊ नये, अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथं आज झालेल्या भटके, विमुक्त, ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांच्यासह, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, आमदार आशिष देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी या सभेला मार्गदर्शन केलं. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन संबंधित दाखले द्यावे, धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आदी मागण्या या सभेतून करण्यात आल्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यात विटा आणि सांगली इथं जाहीर सभा घेतली. सर्वांनी एकजुटीने शांततेने आंदोलन करावं, असं आवाहन करतानाच, आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी या सभेतून दिला.
****
दरम्यान, मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत विधेयक संमत होण्याची गरज मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर इथं बोलत होते. लोकसभेत असं विधेयक मांडण्यात यावं, यासाठी आपण राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असून, हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करणार असल्याचं माणिकराव शिंदे यांनी सांगितलं.
****
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह मुंबईत शिवाजी पार्क इथं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर��पण करून अभिवादन केलं. शहरात शिवसेनेच्या विविध शाखांमधूनही बाळासाहेबांच्या स्मृतींना आंदरांजली वाहण्यात आली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी किनवट तालुक्यातल्या मांडवी आणि जवरला या गावात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. उज्ज्वला योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, सुकन्या योजना आदी योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभागाकडून मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीसह सिकलसेल तपासणीही करण्यात आली.
****
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६२ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात येत्या २० नोंव्हेबर पासून सोलापूर इथं होणार आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी होणार असल्याचं सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषन चवरे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी आणि एकूण ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या २५ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. आठ तालुक्यातील या २५ महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
****
जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेने दिला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर इथं न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव नागरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील २०२० पासूनची पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार कैलास पाटील, शिवसेनासह संपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
****
सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातले शेतकरी नेते राजेंद्र मोरे हे येत्या २४ नोव्हेंबर रोजी औसा तालुक्यातल्या मातोळा ते किल्लारी पायी दिंडी काढणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात ८० टक्के पीक हे सोयाबीनचं घेतलं जातं. मात्र सोयाबीनला मिळणारा आताचा दर उत्पादन खर्च बघता अत्यल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेत आरोग्य पथकाद्वारे २५ लाख ६५ हजार ९५८ नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, तपासणीत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचं निदान झाल्यास नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, येत्या १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्हयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत स्‍वच्‍छता उपक्रम राबवावा, असं आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन कक्षाने केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यात रिधोन इथं ही घटना घडली. सुरेश कळमकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतात काम करत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, जखमी अवस्थेत त्यांना बुल़डाणा इथं ��ुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीदर-पंढरपूर-बीदर, आदिलाबाद- पंढरपूर-आदिलाबाद, नांदेड-पंढरपूर-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वे काचीगुडा लालगढ काचीगुडा ही विशेष रेल्वे चालवणार आहे. ही गाडी काचीगुडा इथून शनिवार १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी सुटणार असून निजामाबाद, नांदेड, पूर्णा, अकोला, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे सोमवारी दुपारी लालगढला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार दिनांक २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी लालगढ इथून रात्री पावणेआठ वाजता निघणार असून याच मार्गाने गुरूवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास काचीगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
‘म्हाडा’तर्फे राज्यात वर्षभरात १२ हजार ७२४ सदनिका प्रस्तावित.
फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
आरबीआय दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करणार.
आणि
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या कनिष्ठ अभियंता, लिपिकाला लाच घेताना अटक.
****
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या वर्ष २०२३-२४ साठी १० हजार १८६ कोटी ७३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणातर्फे मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे या आर्थिक वर्षात १२ हजार ७२४ सदनिका बांधण्याचं प्रस्त���वित असून छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १ हजार ४९७ सदनिका, मुंबईत २ हजार १५२, कोकण मंडळाअंतर्गत ५ हजार ६१४, पुणे मंडळाअंतर्गत ८६२, नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ तर अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचं बांधकाम प्रस्तावित आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची आज नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं या संबंधी माहिती दिली आहे. प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख तर प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपीचंद पडळकर, अनिल परब, विलास पोतनीस, अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी आणि कपील पाटील यांना या समितीवर नियुक्त करण्यात आलं असल्याचं सचिवालयानं कळवलं आहे.
****
देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या पाच हजार तिनशे रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल दोन हजार आठशे रुग्ण बरे झाले असून सध्या पंचवीस हजारांहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक पंच्च्याहत्तर शतांश टक्के आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एक हजार नऊ पेक्षा अधिक लस मात्रा आज देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २२० कोटी ६६ लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे. त्यात २२ कोटी ७२ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज दुपारपर्यंत २३५ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९६ लाख ५९ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक लसमात्रा घेतली आहे.
****
१४ फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे पाच हजार ३०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत. इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं मुंबईत आयोजित ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेत ही माहिती देण्यात आली. फ्रेंच कंपन्यांना महाराष्ट्रात वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, याद्वारे दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत, असं फ्रान्सचे वाणिज्य दूत ज्यों मार्क सिरे-शार्ली यांनी यावेळी सांगितलं. भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फ्रेंच कंपन्यांचं सहकार्यही नक्कीच मोलाचं ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा आज भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केली. सध्या, ठेवीदार आणि लाभार्थींना अशा ठेवी शोधण्यासाठी अनेक बँकांच्या संकेत स्थळांवर जाऊन ठेवीं बाबत माहिती शोधावी लागते. दावा न केलेली ठेव म्हणजे १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठेवीदाराकडून पैसे काढणं किंवा पैसे न काढणं म्हणजेच वापरात नसलेलं खातं निष्क्रिय मानलं जातं. अलीकडे, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सुमारे ३५ हजार कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. या संदर्भातल्या परवाना किंवा इतर कोणत्याही नियामक मंजुरीची प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आणखी एक केंद्रीकृत घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. या उपायामुळं नियामक प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता येईल आणि व्यवसाय करणं सुलभ होईल, असं दास म्हणाले.
****
फेम, अर्थात हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि वापर वाढवण्याच्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, गेल्या ४ वर्षात केंद्र सरकारनं फक्त ५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याचं निरीक्षण संसदेच्या संबंधित समितीनं नोंदवलं आहे. या योजनेअंतर्गत ५ वर्षात १५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निश्चित केलं होतं. मात्र गेल्या ३१ डिसेंबरपर्यंत फक्त सुमारे ८ लाख वाहनांची निर्मिती झाली असल्याच्या या समितीच्या अहवालात म्हटलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी, सर्व संबंधितांशी चर्चा करुन एक योजना तयार करावी, असं आग्रही मत या समितीनं नोंदवलं आहे.
****
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीनं सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. ते आज मुंबईत भारतीय जनता पक्ष स्थापना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथंही पक्षाच्या विभागीय कार्यालयात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पक्ष स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादाचा, देशाच्या सर्वांगीण विकासाचा, देशसेवेचा संकल्प करणारा पक्ष असल्याचं सावे यावेळी म्हणाले. ‘भारतीय जनता पक्ष - एक दृष्टिक्षेप’ या विषयावर क्रांती चौक इथं छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही सावे यांच्या हस्ते झालं. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष या प्रवासात आतापर्यंत झालेले राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यकाळात झालेल्या पक्ष विस्ताराची माहिती या प्रदर्शनात आहे.
****
हनुमान जन्मोत्सव आज ठिकठिकाणी मोठ्या भक्तीभावानं साजरा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध मंदिरांत महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. खुलताबाद इथल्या भद्रा मारोती मंदिरात सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करुन हनुमान जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेतले कंत्राटी कनिष्ठ अभियंता शेख मोईनुद्दीन शेख नईम आणि कनिष्ठ लिपिक निखिल गायकवाड यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज अटक केली. आधार केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेची शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाता इथं सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजेपासून हा सामना खेळला जाणार आहे. काल गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं राजस्थान रॉयल संघाचा पाच धावांनी पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या उद्योजकांनी उत्कृष्ट लघू उद्योग पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केलं आहे. लघू उद्योग घटकाच्या उत्पादनाचा दर्जा उत्तम राहावा आणि स्पर्धात्मक वातावरण निर्मितीच्या दृष्टीनं राज्य शासनातर्फे उत्कृष्ट लघुउद्योग घटकांची निवड करून त्यांना पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप असून या पुरस्कारासाठी एक जानेवारी २०२१ च्या अगोदर स्थायी लघू उद्���ोग नोंदणीकृत तसंच उद्यम नोंदणीकृत आणि गेल्या दोन वर्षापासून सलग उत्पादनात आहेत असे लघू उद्योग घटक पात्र आहेत. व्यावसायिकांनी योग्य त्या कागदपत्रांसह २८ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन उद्योग महाव्यवस्थापकांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात कृषी आधारित १४ उपप्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून सुमारे २२ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. राज्यात शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ‘स्मार्ट’ राबवण्यात येतो. या अंतर्गत हे अनुदान असून या माध्यमातून गोदाम, स्वच्छता प्रतवारी प्रकल्प आणि डाळ कारखाना या उपप्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याचं प्रकल्प अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. मुंबईत बोरिवली इथल्या वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचं आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
विरोधी पक्ष नेते, विरोधकांना देशद्रोही म्हटलं नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव.
चिंचवड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांच्याकडे मोठी आघाडी.
आणि
इंदूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताविरुद्ध विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर ७६ धावांचं आव्हान.
****
विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हकक्कभंगाची सूचना दाखल केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज विधान परिषदेत, विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
नवाब मलिक हा देशद्रोही आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दाऊद बरोबर ज्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. त्याला मी देशद्रोही म्हटलेलं आहे. पुन्हा मी देशद्रोही म्हणेल. पण यामध्ये अजितदादांना देशद्रोही म्हटलेलं नाही. त्या देशद्रोह्याला पाठिशी आपण घालतात. त्याचा राजीनामा मागत नाही म्हणून बरं झालं आपण आम्हाला महाराष्ट्रदोही म्हणालात तर आपल्या बरोबर आमचं चहा पिणं टळलं बरं झालं याच्यामध्ये माझं काय चूक आहे.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला किंवा विरोधकांना देशद्रोही म्हटलेलं नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवायचा की नाही याबद्दल निर्णय देण्यात येईल असं उपसभापती नीलम गोर्हे यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणणं हा सरकारचा अपमान असल्याचं सांगत, भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेत्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य अशोभनीय असल्याचं दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडताना सांगितलं.
****
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांनी राऊत यांच्या विरोधात आज विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. यासंदर्भात चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं असून हा हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येईल तसंच यासंदर्भात सात दिवसात राऊत यांच्याकडून लिखित खुलासा मागवण्यात येईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. संसदेच्या खासदारावर हक्कभंग दाखल झाल्यास अध्यक्ष किंवा सभापतींकडे पाठवण्याची प्रथा असल्याचं त्यांनी यावेळी सदनात सांगितलं.
****
चिंचवड विधानभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. त्यांनी पस्तीसाव्या फेरीनंतर आघाडी कायम ठेवली आहे. जगताप यांना १ लाख ३१ हजार ४६४ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे यांना ९६ हजार १७५ मते तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४३ हजार १७० मते मिळाली आहेत. जगताप यांचं एकूण मताधिक्य ३९ हजार २८९ मतांचं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले –
माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या. आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेच्या मनामध्ये एकदा एखादा निश्चय त्यांनी केला की या कुठल्याही गोष्टीला अर्थ राहत नाही. जनतेच्या मनामध्ये ��त्ता ज्या प्रकार हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, ते जनतेला आवडलेलं नाही. निश्चितपणे याला आत्ताचे सत्ताधारी पक्ष विचार करतील अन्‌ त्यांना विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही.
धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
****
न्यायालयाच्या निकालानुसार येत्या तीन महिन्यांत ���ाज्यात उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदं पदोन्नतीनं भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भारतीय जनात पक्षाचे गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात, यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते. या अनुदानासाठी २ वर्षांच्या आतल्याच चित्रपटाने अर्ज करावा तसंच यापुढे प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथक नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक अनुषंगानं लक्षवेधी उपस्थित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनानंतर या विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं देसाई म्हणाले.
****
विधानपरिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी प्रवीण दरेकर, मुख्य प्रतोदपदी भाई गिरकर आणि प्रतोदपदी प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आल्याचं उपसभापती नीलम गोर्हे यांनी आज सभागृहात जाहीर केलं.
****
राज्याच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या संदर्भातली पुढील सुनावणी आता १४ मार्च रोजी होणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं, निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया बदलण्याचे निर्देश देण्याचा निकाल, हा लोकशाहीला जिवंत ठेवणारा असल्याचं सांगत या निकालाचं स्वागत करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शिवसेना पक्षाबद्दलचे निर्णय देतांना, आयोगानं दबावाखाली निर्णय दिला असून निवडणूक आयुक्तांकडून अन्याय झाला असल्याचं ते यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
****
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्यानं स्थापन हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी केलेलं विधान विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती मात्र, राऊत यांच्या विधानाचा विग्रह न करता ऐकल्यास, विधानाचा अर्थ स्पष्ट होतो असंही त्यांनी या संदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावरुन नमूद केलं आहे. हक्कभंगाची मागणी करणाऱ्या सदस्यांचाच हक्कभंग समितीत समावेश असणं हे, तक्रारदारालाच न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासारखं असून यामुळे न्यायाची अपेक्षा कशी करता येईल असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
****
भारतानं इंदूर इथं सुरू तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ७६ धावांचं माफक आव्हान ठेवलं आहे. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर चषक मालिकेमध्ये आज दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारानं यामध्ये सर्वाधिक ५९ धावा केल्या. नेथन लायन यानं ६४ धावांमध्ये आठ गडी बाद केले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात कालच्या चार बाद १५६ धावांवरुन पुढं खेळताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १९७ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजानं चार तर रविचंद्र अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. प्रारंभीच्या दोन कसोटी सामन्यांत विजय मिळवून भारतानं या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू - ढेंगळी पिंपळगाव - मानवत रोड दरम्यान रेल्वे रुळाचं काम करण्यासाठी परवा शनिवारी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा – गोपीचंद पडळकर
अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा – गोपीचंद पडळकर
अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा – गोपीचंद पडळकर मुंबई ः अहमदनगरचे (Ahmednagar) नाव अहिल्यानगर (AhilyaNagar) करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहून नामांतर करण्याचे म���हटले आहे. पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावर टीका केली असून नामांतरासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'गोपीचंद पडळकर आणि आम्ही पागल माणसं, दोघे राज्यात क्रांती करणार'
‘गोपीचंद पडळकर आणि आम्ही पागल माणसं, दोघे राज्यात क्रांती करणार’
‘गोपीचंद पडळकर आणि आम्ही पागल माणसं, दोघे राज्यात क्रांती करणार’ सांगलीतील कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत असताना चौफेर फटकेबाजी केली. तसंच व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. सांगलीतील कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत असताना चौफेर फटकेबाजी केली. तसंच व्हायरल होत…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी गृहराज्यमंत्री दिलीप पाटील यांच्यावर निशाणा साधला, विचारले- धनगर समाजातील महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?
महाराष्ट्र: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी गृहराज्यमंत्री दिलीप पाटील यांच्यावर निशाणा साधला, विचारले- धनगर समाजातील महिलांवरील अत्याचार कधी थांबणार?
भाजप नेते गोपीचंद पडळकर (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) धनगर समाजातील मुलीचे पालक तिच्या अपहरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पाडकर यांनी केला आहे. महाराष्ट्र (महाराष्ट्रभाजप नेते आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटीलधनगर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कदाचीत आम्हा बहुजनांना तुम्ही तुमच्या सारखाच काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार.
कदाचीत आम्हा बहुजनांना तुम्ही तुमच्या सारखाच काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार.
कदाचीत आम्हा बहुजनांना तुम्ही तुमच्या सारखाच काकाचा शकुनी हुजऱ्या समजत असाल, गोपीचंद पडळकर यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपाचे नेते यांच्यात सतत शाब्दिक चकमक सुरू असते. दोन्ही बाजूचे नेते सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. याच आरोप-प्रत्यारोप नाट्याचा पुढचा अंक रंगलाय तो शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये. संजय राऊत यांनी…
View On WordPress
0 notes