Tumgik
#आकाश क्षेपणास्त्र
varunrajkalse · 2 years
Text
Agni 5 cha Dhamaka
Agni 5 cha Dhamaka
अग्नी ५ चा धमाका…!  २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या अग्नि-५ (Agni 5) या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनं भारताची वैज्ञानिक क्षमता आणि संरक्षण सिध्दता या दोन्ही क्षेत्रांतील आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवलं. या क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताहेत डॉ.काशिनाथ देवधर. स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा : संपुर्ण स्वदेशी तंत्राने बनलेल्या अग्नि-५ (Agni 5)  च्या नुकत्याच पार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
***
*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. भावपूर मालवाहतूक मार्गिका प्रकल्प, रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन, वाराणसी - नवी दिल्ली वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ, वाराणसीतल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देणाऱ्या आणि या सर्व ठिकाणांसाठी  एकत्रित प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध असलेल्या संकेतस्थळाचा प्रारंभ आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.  स्वरवेद महामंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर ते काशी खासदार क्रीडा स्पर्धेतल्या विजेत्यांशी, तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
****
दरम्यान, पंतप्रधानांनी काल वाराणसीमध्ये नमो घाट इथं काशी तमिळ संगमम् च्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं. ३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या काशी तमिळ संगममम् मध्ये तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधले चौदाशे मान्यवर सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी कन्याकुमारी-वाराणसी काशी तामिळ संगमम् एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला, तसंच विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेतला.
****
दुर्मिळ अशा प्रतिकार क्षमतेच्या कमतरतेचा आजार असलेल्या एका लहान मुलावर भारतात पहिल्यांदाच, अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दिल्ली छावणी इथल्या लष्कराच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. या आजाराचा सामना करणारी लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी यामुळे आशेचा नवा किरण उगवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भारतीय हवाई दलाच्या अस्त्रशक्ती उपक्रमांतर्गत काल जमीनीवरुन हवेत मारा करु शकणाऱ्या आकाश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलं आहे. गे क्षेपणास्त्र एकाचवेळी चार लक्ष्यं भेदू शकतं.
****
पुणे इथं गेले पाच दिवस सुरु असलेल्या ६९व्या सवाई गंधर्व भिमसेन संगीत महोत्सवाची काल सांगता झाली. काल श्रीनिवास जोशी, डॉ. पौर्णिमा धुमाळे, सुहास व्यास या दिग्गज गायकांनी आपली कला सादर केली. भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या गायनाची ध्वनिचित्रफित लाऊन महोत्सवाचा शेवट करण्यात आला.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#DRDOUpdates | डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचं मोठं यश; ‘QRSAM’च्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वी
#DRDOUpdates | डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचं मोठं यश; ‘QRSAM’च्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वी
#DRDOUpdates | डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचं मोठं यश; ‘QRSAM’च्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वी चांदीपूर (ओडिशा) :- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर एकात्मिक परिक्षण केंद्रावरून शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या जमीन ते आकाश मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र (QRSAM) प्रणालीच्या सहा उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतल्या. (DRDO & Indian Army successfully conduct six…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
पाकिस्तान, चीन सीमेवर ‘आकाश’ होणार तैनात  हवाई घुसखोरी रोखण्याची भारताची तयारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पाकिस्तान आणि चीनच्या दिशेकडून होणारी हवाई घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्य डोंगराळ भागात आकाश क्षेपणास्त्र तैनात करणार आहे. संरक्षण मंत्रालय सैन्याच्या या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देणार आहे. 10 हजार कोटी रुपयांच्या निधीतून 15000 फूटांपेक्षा अधिक उंचीवरील भागांमध्ये आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेच्या दोन रेजिमेंट तैनात केल्या जातील. आकाश क्षेपणास्त्राची नवी प्रणाली अधिक प्रभावी आहे. ही यंत्रणा लडाखमध्ये तैनात करण्याची योजना आहे. या भागात तैनात केलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मारक पल्ल्यात पाकिस्तान तसेच चीन या दोघांच्याही सीमा असणार आहेत. आकाश प्राईमच्या दोन ��ेजिमेंट स्थापन केल्या जाणार आहेत. आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेची विकसित आवृत्ती सैन्याच्या ताफ्यात सामील आहे. सैन्याच्या प्रस्तावावर संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत हे लडाखमधून परतल्यावर ही बैठक आयोजित होणार आहे. डीआरडीओकडून निर्मिती आकाश क्षेपणास्त्र प्रणाली डीआरडीओने विकसित केली आहे. सैन्यासाठी प्रस्तावित दोन्ही रेजिमेंटसाठी उपकरणांचा पुरवठा करण्याचे कंत्राट विदेशी कंपन्यांना दिले जाणार होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत आकाश क्षेपणास्त्राला प्राधान्य देण्याची सूचना केली होती. या सूचनेनंतर सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने वायुदलाच्या सात स्क्वाड्रन्साठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱया आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीला मंजुरी दिली होती. #tarunbharatnews #tbdsocialmedia #indianborder #DRDO #akash #stopairattacks (at New Delhi) https://www.instagram.com/p/B36KGrBhCKj/?igshid=397r8d3l0xqs
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
9 July 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yyacdb55 चालू घडामोडी (9 जुलै 2019) बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश : पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे. अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे. तर ग्लिस 3470 बी (जीजे 3470 बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा कमीआहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधून काढले आहेत. तसेच 2018 मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे. आपल्या दीर्घिकेतील 80 टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे 3470 बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा 318 पट जड आहे. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी 3470 बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व 20 ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे. तेजस एक्स्प्रेस ठरणार देशातील पहिली खाजगीरित्या चालणारी रेल्वे : केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. तसेच रेल्वेने 100 दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे विभागास संघटनांचा विरोध देखील सहन करावा लागत आहे. तर रेल्वे विभाग दिल्ली- लखनऊ व्यतिरिक्त दुसऱ्या 500 किलोमीटर अंतराच्या मार्गची देखील निवड करत आहे. या मार्गावर दुसरी खासगी रेल्वे चालवली जाणार आहे. तेजस एक्स्प्रेसला चालवले जाण्याची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. मात्र नव्या वेळापत्रकाबरोबर या रेल्वेला अशातच आणल्या गेले आहे. अनेक दिवसांपासून दिल्ली-लखनऊ रेल्वेची प्रतिक्षा होती. ही रेल्वे आता उत्तर प्रदेशमधील आनंदनगर रेल्वे स्थानकावर उभा आहे. जिला ओपन बिडींग प्रोसेसनंतर खासगी चालकाकडो सोपवले जाईल. भारताचं घातक अस्त्र ‘नाग’ दिवसाच नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा : नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे. तसेच दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. 1980 च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आलीआहेत. राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख : टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तर 19 वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत. हिमा दासने दोन सुवर्ण पदाकांवर कोरले नाव : भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दिस हिने चार दिवसांत भारताला दुसरे सुवर्ण प��क मिळवून दिले आहे. तर पाच जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेंकदामध्ये 200 मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली आहे. वीके विस्मयाने 24.06 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत दुसरे स्थानपटकावले आहे. दिनविशेष : शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता. सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता. सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 02 April 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा.
भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन करावं-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं निधन.
आणि
छत्रपती संभाजीनगर इथल्या दंगलप्रकरणी आतापर्यंत २८ आरोपींना अटक.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
या महाराष्ट्रातील, देशातील जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून सावरकरांचा आपमान कोणीही खपवून घेणार नाही. याची सुरुवात या गौरव यात्रेमधून सुरु झालेली आहे. प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं काम आपण केलं आहे. असा कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये सुरु राहणार आहे. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे.
मुंबई इथं आज दादर इथल्या सावरकर सदनातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून आज सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होत आहे. ही यात्रा मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्यासह अनेक मान्यवर नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान माजी मंत्री सुभाष देसाई यांनी काल या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, या सभेला मोठा जनसमुदाय येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या सभेच्या पार्श्वभूमीवर आज शहरातून वाहनफेरी काढण्यात आली.
****
शास्त्रज्ञांनी भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देश तसंच समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या 'वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप- वाईस 2023 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिद्ध झालेले तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसंच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय संशोधनाला महत्त्व नसल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संशोधनातील नव-नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
भारतानं संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत एक विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे. भारतानं ८५ हून अधिक देशांना सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीची निर्यात केली आहे. गेल्या ६ वर्षात देशाची या क्षेत्रातली निर्यात १० पट वाढली असून सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. देशाला संरक्षण सामुग्री उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेलं, असंही त्यांनी सांगितलं.
 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही हे यश महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रातली निर्यात सतत वाढत राहील असंही ते म्हणाले. देशातल्या शंभरहून अधिक कंपन्या सध्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. देशातून ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, रडार, पिनाक रॉकेट आणि लाँचर आदींची निर्यात होत आहे.
****
इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटनेनं पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहिम आज कर्नाटकात यशस्वीरित्या पार पाडली. चित्रदुर्ग इथल्या चाचणीतळावर आज सकाळी आरएलव्ही एलव्हीएक्स वायू दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे साडेचार किलोमीटर उंचीवरून ही चाचणी घेण्यात आली. गती, समुद्र सपाटीपासूनची उंची अशा विविध दहा निकषांवर ही चाचणी यशस्वी ठरली आहे. 
****
नांदेड इथं गोदावरी नदीवरच्या बंदा घाटावर काल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समता पर्वाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशनही मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून १ एप्रिल ते १ मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात या समता पर्वाच्या निमित्तानं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेलाही प्रारंभ झाला.
****
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं आज गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे हेाते. मराठवाड्यातील नामांकित प्लास्टिक सर्जन म्हणून ते प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- घाटीच्या माजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचे ते पती होत. येळीकर यांच्या पार्थिव देहावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी किराडपुरा इथं झालेल्या दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकारांशी बोलत होते. सायबर सेलच्या मदतीनं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दंगलीतल्या हल्लेखोरांची ओळख पटवून अटक करण्यात येईल. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली आहे. त्यातील २८ जणांना अटक केली असून काही लोक फरार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
श्री क्षेत्र पंढरपूर इथं आज चैत्री यात्रेच्या निमित्तानं श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरं समितीच्या वतीनं गाभाऱ्यात सुंदर आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. या काळात भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
****
अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दोन दिवसात संपत आहे. तरी उर्वरित जागा देखील बिनविरोध करुन निवडणूक टाळण्याची मागणी सभासदांमधून होत आहे.
****
भारतची बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम फेरीत तिचा इंडोनेशियाच्या ग्रोगोरिया मारिस्का तुनजुंग हिने २१-८, २१-८ असा पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता.
जुन्या पेन्शन योजनेसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीचा सरकारचा निर्णय.
छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार.
आणि
सोळाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला थोड्या वेळातच प्रारंभ.
****
राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.
****
राज्यात जुन्या पेन्श��� योजनेसाठी १४ ते २० मार्च या कालावधीत संप केलेल्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे. तसंच संपकाळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी विनंतीपत्र दिले असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा निकाल गुजरात उच्च न्यायालयानं दिला आहे. पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा मुख्य माहिती आयोगाचा आदेशही या न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद केला. पंतप्रधानांच्या पदव्यांमध्ये लपवण्यासारखे काही नसले तरी विद्यापीठाला माहिती जाहीर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. लोकशाहीत पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती डॉक्टरेट असेल किंवा निरक्षर असेल, यामुळे काहीही फरक पडत नाही. तसेच या माहितीत कोणतेही जनहित गुंतलेलं नाही, असंही मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं.
****
सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या, १२ डब्ल्यू एल आर ‘स्वाती’ रडारच्या खरेदीसाठी, संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. ९ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक रकमेच्या या करारानुसार सुधारित क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक, सहाय्यक उपकरण आणि वाहनांची खरेदी केली जाणार आहे. आकाश शस्त्र ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओनं ती विकसित केली आहे. सुधारित आकाश शस्त्र प्रणालीच्या आणखी दोन तुकड्या देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय लष्करासाठी खरेदी करण्याची योजना आहे.
****
येत्या १७ ते १९ मे दरम्यान पहिली जागतिक पर्यटन क्षेत्रातली आर्थिक गुंतवणूक परिषद नवी दिल्लीत होणार आहे. देशी आणि परदेशी गुंतवणुकदारांना पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल, असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल दोन दिवसीय पर्यटन चिंतन समंलेनाचा समारोप केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
****
राज्यात आज ४२५ जणांना कोविडचा संसर्ग झाला आहे. तर ३५१ रुग्ण संसर्गमुक्त होवून घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १४ टक्के आहे. दरम्यान, आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने वर्तवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितल आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज मुंबईत पत्रकार परिषद घेत, ही सभा होणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज सभेच्या नियोजित ठिकाणी सांस्कृतिक मंडळ मैदानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या सभेमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचा अहवाल जर संबंधित यंत्रणांनी दिला, तर सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. प्रशासन सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं महाजन यांनी सांगितलं.
****
शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुळे यांनी ट्वीटरवरून हे मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
****
प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषीपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
****
सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळणार असून एकूण ७० सामने होणार आहेत. देशभरातल्या एकूण १२ शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र य��वं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवत आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालूक्यात ३०० हेक्टर जमिनीवर कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती केली जाणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.
***
२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. 
***
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आकाश शस्त्र प्रणाली अंतर्गत शस्त्रास्त्र खरेदीसाठी भारत डायनेमिक्स लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. सुमारे नऊ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या या करारान्वये वायूसेनेसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक तसंच अन्य उपकरणं खरेदी केली जाणार आहेत. उत्तरी सीमेवर तैनात सैन्यदलासाठी ही खरेदी केली जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं भारतीय शिपयार्ड्ससोबत केलेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ११ अत्याधुनिक समुद्री टेहळणी जहाजं आणि सहा क्षेपणास्त्र वाहक जहाजांसाठी हा करार करण्यात आला. हे पाऊल आत्मनिर्भरतेला चालना देईल आणि विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मदत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केला आहे. या करारामुळे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाला गती मिळाली असल्याचं त्यांनी नमूद केलं.
***
देशात काल तीन हजार नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल १३ हजार ९० रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. सध्या देशात जवळपास १५ हजार रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७८ शतांश टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत २२० कोटी ६५ लाख नागरीकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे.
***
प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषिपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचं, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
***
नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशानं शासन हा उपक्रम राबवत आहे.
***
सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. वर्ष २०१८ नंतर प्रथमच ही स्पर्धा घरच्या आणि बाहेरच्या मैदानांवर होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलामध्ये गुजरात टायटन्स आण�� चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे.
//************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्ली इथं दाखल होणार आहेत. नवी दिल्लीत होणार्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत, स्वदेशी अर्जुन टॅंक, नाग क्षेपणास्त्र, के 9 वज्र आणि आकाश क्षेपणास्त्रांचं संचलन, कर्तव्य पथावर सादर करणार आहेत. या संचलनात भारतीय सेनेचे सहा वायु आणि नौदल सेनेचे एक-एक असे आठ दल सहभागी होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं, मुंबई इथं आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या प्रादेशिक परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशासनासाठी सातत्यानं प्रयत्न करत असून, ई-गव्हर्नन्स ही सुशासनाची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज या परिषदेचा समारोप होणार आहे.
****
भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून आयआयटी मद्रासने, भरोस ही स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली आहे. केंद्रीय इलेकट्रॉनिक्स आणि माहिती आणि प्रसारण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत या प्रणालीचा आरंभ केला. भरोस ही प्रणाली गोपनीयतेवर केंद्रीत ऑपरेटिंग प्रणाली असून, ती अत्यंत गोपनीयता बाळगावी लागणाऱ्या तसंच कठोर सुरक्षा मानके असलेल्या संस्थाना उपलब्ध करून दिली जाईल.
****
राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशात मुलींना प्रोत्साहन आणि संधी देण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. मुलींच्या अधिकारांचं आणि शिक्षणाचं महत्व तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवणं हा देखील या दिनामागचा उद्देश आहे. देशात मुलींच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या सहाव्या पुष्पात विद्यार्थी, पालक तसच शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९७ वा भाग असेल.
****
आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि हिंगोलीतल्या आखाडा बाळापूरमधल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालय यांच्या वतीनं, हिंगोली जिल्ह्यात आजादी मशाल यात्रेला काल प्रारंभ झाला. आखाडा बाळापूर मधल्या हुतात्मा स्मारक इथं स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांना अभिवादन करून या आजादी मशाल यात्रेला सुरवात झाली असून, ती कळमनुरीकडे रवाना झाली.
****
मतपत्रिकेद्वारे होणाऱ्या मतदान पद्धतीच्या अभिरूप मतदानाच्यावेळी तयार केलेली चित्रफित इतर जिल्ह्यास देखील उपयोगी ठरेल, असं, औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक यंत्रणेतल्या प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक पूर्वतयारीचा आढावा काल चन्ने यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक प्रशिक्षणप्रसंगी करण्यात आलेलं प्रात्यक्षिक, मतदान यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात जिल्हा एड्स प्रतिबंध आणि निमंत्रण पथक यांच्या सहकार्याने काल एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी कलावंतांनी एड्स संदर्भात जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.
****
वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी तिरंगी मालिकेत काल भारतीय संघानं वेस्ट इंडिजवर ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं स्मृती मानधनाच्या नाबाद ७४ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर वीस षटकात १६७ धावा केल्या. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ १११ धावातच सर्वबाद झाला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले याआधीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
 ****
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
9 July 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y45m2jcp चालू घडामोडी (9 जुलै 2019) बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश : पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे. अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे. तर ग्लिस 3470 बी (जीजे 3470 बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा कमीआहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधून काढले आहेत. तसेच 2018 मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे. आपल्या दीर्घिकेतील 80 टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे 3470 बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा 318 पट जड आहे. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी 3470 बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व 20 ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे. तेजस एक्स्प्रेस ठरणार देशातील पहिली खाजगीरि��्या चालणारी रेल्वे : केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. तसेच रेल्वेने 100 दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे विभागास संघटनांचा विरोध देखील सहन करावा लागत आहे. तर रेल्वे विभाग दिल्ली- लखनऊ व्यतिरिक्त दुसऱ्या 500 किलोमीटर अंतराच्या मार्गची देखील निवड करत आहे. या मार्गावर दुसरी खासगी रेल्वे चालवली जाणार आहे. तेजस एक्स्प्रेसला चालवले जाण्याची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. मात्र नव्या वेळापत्रकाबरोबर या रेल्वेला अशातच आणल्या गेले आहे. अनेक दिवसांपासून दिल्ली-लखनऊ रेल्वेची प्रतिक्षा होती. ही रेल्वे आता उत्तर प्रदेशमधील आनंदनगर रेल्वे स्थानकावर उभा आहे. जिला ओपन बिडींग प्रोसेसनंतर खासगी चालकाकडो सोपवले जाईल. भारताचं घातक अस्त्र ‘नाग’ दिवसाच नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा : नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे. तसेच दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. 1980 च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आलीआहेत. राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख : टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तर 19 वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत. हिमा दासने दोन सुवर्ण पदाकांवर कोरले नाव : भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दिस हिने चार दिवसांत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तर पाच जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेंकदामध्ये 200 मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली आहे. वीके विस्मयाने 24.06 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत दुसरे स्थानपटकावले आहे. दिनविशेष : शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता. सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक र��मभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता. सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2017 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा. **** राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात महागाई दरात सातत्यानं घट झाल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. महागाईबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना हे उत्तर देताना त्यांनी तुलनात्मक आकडेवारीही दिली आहे. २०१४ मध्ये पाच पूर्णांक नऊ टक्के इतका असलेला ग्राहक मूल्य महागाई दर ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन पूर्णांक सात टक्क्यांवर आला असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. **** चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरअंतर्गत पाकिस्तानात निर्माण होत असलेल्या तीन प्रमुख रस्ते प्रकल्पांचा निधी काही काळासाठी रोखण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. या कामातल्या कथित भ्रष्टाचारांच्या वृत्तानंतर चीननं हा निर्णय घेतला असून, याचा पाकिस्तानातल्या रस्ते प्रकल्पांवर मोठा परिणाम होणार आहे. **** मायक्रोब्लोगिंग माध्यम ट्विटरनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेता आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे चार कोटी एक्केचाळीस लाख फॉलोअर्स सह लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर असून, तीन कोटी पंचाहत्तर लाख फॉलोअर्ससह मोदी दुसर्ऱ्या क्रमांकावर असल्याचं ट्विटरनं काल जाहीर केलं आहे. **** बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज सकाळपर्यंत पोर्ट ब्लेयर शहरात पंचाण्णव मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे.हा कमी दाबाचा पट्टा येत्या अट्ठेचाळीस तासात अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. **** भूपृष्ठावरून आकाशात मारा करणाऱ्या आकाश या भारतीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. काल ओडिशातल्या चंडीपूर इथे ही चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून आकाशात मारा करणारं कुठल्याही प्रकारचं क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता आता भारतानं मिळवली आहे.या क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश करण्यात येत आहे. **** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. औरंगाबाद शहरात डॉक्टर आंबेडकर यांच्या भडकल गेट इथल्या पुतळ्याला विविध पक्षसंघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे.तर, या दिनाच्या औचित्यानं लातूर इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकसेवा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जालना इथल्या नियोजित सीड पार्ककरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जालना परिसरात एकशे तीस एकर जमीन विकसित करून,बियाणे उद्योगांच्या उभारणीकरता उपलब्ध करून द्यावी, असा आदेश राज्य शासनानं जारी केला आहे.ही जमीन महामंडळानं उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे,महाबीज,बीज प्रमाणीकरण यंत्रणा, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ आणि कृषी विभाग,यांनी बियाणे उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेशही शासनानं जारी केला आहे. **** गडचिरोली जिल्ह्यातल्या सिंगानूर वनक्षेत्रात पोलिसांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. **** राज्यातल्या साधा यंत्रमाग धारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जाच्यावरच्या व्याजात पाच टक्के सवलत अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.दुष्काळ आणि मंदीमुळे अडचणीत आलेल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या पात्र यंत्रमागधारकांसाठी ही सवलत अनुदान योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे. **** बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर आणि नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलै आणि ऑगस्ट २०१६ मध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यासाठी शासनानं जाहीर केलेलं अनुदान लाभार्थ्यांना मिळण्याला सुरुवात झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक़ खाते क्रमांक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आत्तापर्यंत दिलेले नाहीत त्यांनी ते त्वरित द्यावेत, असं आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केलं आहे. ऑक्टोबर्, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्या साठी सरकारनं जाहीर केलेलं अनुदानही लवकरच लाभार्थ्यांच्या बँकखात्यांमध्ये जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. **** जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात गिरजा-पूर्णा नदीपात्रातून सात हजार ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. तहसीलदार योगिता कोल्हे यांच्यासह पंधरा अधिकाऱ्यांच्या पथकानं काल संध्याकाळी ही कारवाई केली. जप्त वाळूसाठ्याची किंमत दोन कोटी ८० लाख रुपये आहे *****
0 notes