Tumgik
#विशाल आदित्य सिंग
loksutra · 2 years
Text
बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीची जड लक्षणांसह कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह
बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळीची जड लक्षणांसह कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह
निक्की तांबोळी कोरोना पॉझिटिव्ह : अभिनेत्री निक्की तांबोळी पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. बिग बॉस 14 मध्ये अंतिम फेरीत सहभागी झालेली अभिनेत्री निक्की तांबोळी हिने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला गंभीर लक्षणांसह कोविड-19 पॉझिटिव्ह झाला आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. मी आलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –24 October 2019 Time 11.00 to 11.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –२४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ११.०० वाजता **** राज्य विधानसभा निवडणुकीतील निकालांचे कल हाती येत आहेत. भाजप शिवसेना महायुती १७८ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी ८९ जागांवर आघाडीवर आहे. वंचित बहुजन आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे. अन्य उमेदवार १९ जागांवर पुढे आहेत. . सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले हे दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील या मतदारसंघात आघाडीवर आहेत. **** औरंगाबाद मध्य मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना चौथ्या फेरीअखेर दहा हजार २८२ मतांची आघाडी मिळाली आहे. औरंगाबाद पश्चिममधे दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय शिरसाट पाच हजार ८७३ मतांनी आघाडीवर आहेत. कन्नड मतदार संघात शिवसनेचे उदय सिंग राजपूत आठ हजार ९६९ मतांनी आघाडीवर आहेत. औरंगाबाद पूर्व मध्ये तिसऱ्या फेरी अखेर एमआयएमचे डॉ.अब्दुल गफार कादरी १७ हजार २४ मतांनी आघाडीवर आहेत. सिल्लोड मधे शिवसेनेचे अब्दुल सत्तार सतरा हजार ४०३ मतांनी आघाडीवर आहेत. पैठण मतदार संघात पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे संदिपान भुमरे एक हजार ४११ मतांनी आघाडीवर आहेत. फुलंब्री मतदार संघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे हरिभाऊ बागडे तीन हजार ३२० मतांनी आघाडीवर आहेत. वैजापूर मतदार संघात शिवसेनेचे विजय बोरनारे एक हजार २९८ मतांनी तर गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब सहा हजार ७१६ मतांनी आघाडीवर आहेत. **** जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे २८६ मतांनी आघाडीवर आहेत. बदनापूर विधानसभा मतदासंघात पहिली फेरी अखेर भाजपचे नारायण कुचे हे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. जालना मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर ३९० मतांनी आघाडीवर आहेत. **** लातूर जिल्ह्यात अहमदपूर मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मोहनराव पाटील आघाडीवर आहेत.भारतीय जनता पक्षाचे विनायकराव पाटील यांना त्यांनी मागं टाकलं आहे. निलंगा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर आहेत.लातूर ग्रामीणमधून कॉंग्रेसचे धीरज देशमुख साडे अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. **** बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर हे ५८ मतांनी पुढे आहेत केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नमिता मुंदडा या अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत. बीड मधील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे भाजपच्या पंकजा मुंडें यांच्यापेक्षा साडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. **** उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे कैलास पाटील हे १५११ मतांनी आघाडीवर आहेत. उमरगा लोहार मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे १७ हजार १८९ मतांनी आघाडीवर आहेत लोहा मतदारसंघातून शेकापचे श्मामसुंदर शिंदे आघाडीवर आहेत तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर आहेत परंडा तानाजी सावंत आघाडीवर आहेत. कळमनुरी विधानसभा ��तदारसंघात शिवसेनेचे संतोष बांगर हे ३५ हजार ८३५ मतांनी आघाडीवर आहे, नाशिक मध्य मधून भाजपच्या देवयानी फरांदे ७०९० मतांनी आघाडीवर आहेत शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल हे आघाडीवर आहेत **** परभणीच्या गंगाखेड मतदारसंघातून शिवसेनेचे विशाल कदम तर जिंतूरमधून भाजपाच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत. जऴगाव ग्रामिण मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत. दक्षिण सोलापूरमधे भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धऩ मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदीती तटकरे आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामिण मनसेचे पाटील आघाडीवर आहेत. सातारा जिल्ह्यातल्या फलटण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हण आघाडीवर आहेत. सातारा जिल्ह्यातल्या दक्षिण कराड मतदार संघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेच्या सुमनताई आर आर पाटील आघाडीवर आहेत. तर इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील आघाडीवर आहेत. अकोल्यातून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर आहेत. **** सोलापूर जिल्ह्यातल्या ११ विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील, मोहोळमधून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर, पंढरपूरमधून सुधाकरपंच परिचारक, बार्शीतून दिलीप सोपल तर अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आघाडीवर आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. **** नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे १८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर आहेत. ****
0 notes
loksutra · 2 years
Text
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 19 जून रोजी अनेक मोठ्या बातम्यांनी सिनेमा आणि टीव्हीवर लक्ष वेधून घेतले आहे. लॉरेन्स विश्नोईच्या टार्गेट लिस्टमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव होते. करण जोहरकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा कट होता. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एक फोटो समोर आला आहे. यानंतर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन ‘डॉन 3’मध्ये एकत्र दिसणार असल्याची अटकळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
विशाल आदित्य सिंगला लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे, मधुरिमा तुलीमुळे तिचा प्रेमावर विश्वास?
विशाल आदित्य सिंगला लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे, मधुरिमा तुलीमुळे तिचा प्रेमावर विश्वास?
विशाल आदित्य सिंग लिव्ह-इन रिलेशनशिपला प्राधान्य देत आहे. बिग बॉस स्टार्स मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग हे त्या टीव्ही जोडप्यांपैकी एक आहेत ज्यांची प्रेमकथा कधीही पूर्ण होऊ शकली नाही. मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. मधुरिमा तुलीपासून वेगळे झाल्यानंतर विशाल आदित्य सिंगने सना मकबूलला डेट करायला सुरुवात केली. विशाल आदित्य सिंग मात्र याबाबत कधीच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –04 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०४ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; काल एका दिवसात एक हजार ४२३ उमेदवारांचे अर्ज दाखल ** सर्व पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन; भारतीज जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांचे उर्वरित जागांवरचे उमेदवार घोषित ** राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार- जयंत पाटील आणि ** विशाखापट्टनम क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात तीन बाद ३९ धावा **** राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभर जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यात विविध मतदारसंघांमध्ये काल एक हजार ४२३ उमेदवारांनी एक हजार ९६९ उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितलं. उर्वरित उमेदवार आज आपले अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदार संघांत काल एकूण तीनशे सत्तावन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे अब्दुल गफ्फार कादरी, फुलंब्री मतदार संघातून महायुतीचे हरिभाऊ बागडे तर महाआघाडीचे कल्याण काळे, औरंगाबाद मध्य मतदार संघातून भाकपचे अभय टाकसाळ, एमआयएमचे नासेर सिद्धिकी, औरंगाबाद पश्चिममधून महायुतीचे संजय शिरसाट तर वैजापूरमधून महायुतीचे विजय बोरनारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून भाजपचे मोहन फड, परभणीतून शिवसेनेचे राहुल पाटील, गंगाखेडमधून शिवसेनेचे विशाल कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुसुदन केंद्रे, जिंतूर - सेलुमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे, तर समाजवादी पक्षाचे दिलावर जमालसाब यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदार संघातून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल, घनसावंगीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे तर शिवसेनेचे हिकमत उढाण, भोकरदनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे तर बदनापूरमधून रुपकुमार चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. बीड जिल्ह्यात परळीतून महायुतीच्या पंकजा मुंडे तसंच महाआघाडीचे धनंजय मुंडे, बीडमधून महायुतीचे जयदत्त क्षीरसागर, यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदार संघातून महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर, हदगावमधून महायुतीचे नागेश पाटील आष्टीकर, किनवटमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष नाईक, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेच्या राजश्री पाटील, नायगावमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण, यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. लातूर शहर मतदार संघातून महाआघाडीचे अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा मतदार संघातून महायुतीचे ज्ञानराज चौगुले, तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकर चव्हाण, तर महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील, परंडातून महायुतीचे तानाजी सावंत, तर आघाडीचे राहुल मोटे, उस्मानाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हिंगोली जिल्ह्यात वसमतमधून महायुतीचे जयप्रकाश मुंदडा, कळमनुरीतून महायुतीचे संतोष बांगर, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संतोष टार्फे, वसमतमधून शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे, हिंगोलीमधून काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. लोकसभेच्या सातारा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे श्रीनिवास पाटील यांनीही काल उमेदवारी अर्ज दाखल केला. **** शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर मधून महायुतीचे दिलीप माने, महाआघाडीच्या प्रणिती शिंदे, उत्तर सोलापूर मधून महायुतीचे विजय देशमुख, दक्षिण सोलापूरमधून महायुतीचे सुभाष देशमुख, पंढरपूर इथून राष्ट्रवादीचे भारत भालके तसंच शिवसेनेच्या बंडखोर शैला बोरसे, कराड उत्तर मतदार संघातून महाआघाडीचे पृथ्वीराज चव्हाण तर महायुतीचे डॉ अतुल भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी मतदार संघातून महायुतीचे शिवाजी कर्डिले, अकोले मतदारसंघातून महायुतीचे वैभव पिचड, कर्जत जामखेड मधून महाआघाडीचे रोहित पवार, सातारा विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे दीपक पवार, सांगलीतून महायुतीचे सुरेश खाडे, जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदार संघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी तर जामनेर मतदार संघातून महायुतीचे गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. **** भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती तसंच रिपब्किन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं काल उर्वरित मतदार संघातल्या उमेदवारांची नावं घोषित केली. भारतीय जनता पक्षानं चौथी यादी जाहीर केली. यात शिरपूरमधून काशिराम पवार, रामटेक - मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली - परिणय फुके, तर मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेशसिंग ठाकुर यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार नाही, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथं कार्यकर्त्यांशी बोलत होते. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं २० उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मतदार संघातून संतोष कोल्हे, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधून डॉ मधुसूदन केंद्रे, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधून बाळासाहेब आजबे, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून पंकज भुजबळ, जळगाव शहर - अभिषेक पाटील, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहेरी मतदार संघातून काँग्रेस पक्षानेही दीपक आत्राम यांना उमेदवारी दिलेली आहे. **** आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानंही काल २५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद पश्चिमसाठी प्रदीप त्रिभुवन, औरंगाबाद पुर्व - शिवप्रसाद पगार, सिल्लोड - सोयगाव - अनिल पालोदे, फुलंब्री - सुधाकर शिंदे, वैजापूर - ज्ञानेश्वर घोडके, पैठण - जयाजीराव सुर्यवंशी, उत्तर नांदेड - संदीप पांडे, तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून विजय राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** भारतीय रिपब्लीकन पक्ष आठवले गट महायुतीत विधानसभेच्या सहा जागा लढवत असून, काल त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघातून आमदार मोहन फड, माळशिरस - विवेक गुजर, फलटण - दिगंबर आगाव, नायगाव - राजेश पवार, भंडारा - अरविंद भालाधरे, तर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून गौतम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. **** काँग्रेस पक्षानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघाचे उमेदवार बदलले आहेत. पक्षानं काल जाहीर केलेल्या चौथ्या यादीत सिल्लोडमधून प्रभाकर पालोदकर यांची उमेदवारी रद्द करुन कैसर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातही मोहन सिंग यांची उमेदवारी रद्द करुन उदेनसिंग पडवी यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधार काँग्रेसनं आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगावमधून माधव पाटील जवळगावकर आणि नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचं सरकार आल्यावर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतला जाईल, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदार संघात राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात पक्षाकडे आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पाटील यांनी यावेळी टीका केली. **** दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं वातावरण पाहता परिवर्तन होईल, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं. लोक ज्यावेळी नाराज असतात तेव्हाच कलम ३७० आणि राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उचलले जातात, अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल गुन्ह्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मात्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी होती, असं ते म्हणाले. **** दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या विशाखापट्टणम इथ सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या २० षटकांत तीन गडी बाद ३९ धावा झाल्या आहेत. डीन एल्गर २७ धावांवर खेळत असून भारताकडून रविचंद्रन अश्विननं दोन तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला. त्याआधी भारतानं आपला पहिला डाव सात गडी बाद ५०२ धावांवर घोषित केला. सलामीवीर मयंक अग्रवालनं २१५ तर रोहित शर्मानं १७६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिका अद्याप ४६३ धावांनी पिछाडीवर आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची काल पाचव्या माळेनिमित्त मुरली अलंकार विशेष महापूजा मांडली होती. यामध्ये सिंह या वाहनावर आरुढ होऊन तुळजाभवानी माता बासरी वाजवत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०२ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** �� भाजप - शिवसेना युतीचं जागावाटप निश्चित; उमेदवारांची पहिली यादी जाहीर  मराठवाड्यात विविध मतदार संघातून कालपर्यंत ७८ उमेदवारी अर्ज दाखल  ॲट्रोसिटी कायद्यातल्या तरतुदी शिथील करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द आणि  राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आज दीडशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन **** विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जागावाटप निश्चित झालं असून, भाजप १४६ तर शिवसेना १२४ जागा लढवणार आहे. मित्रपक्षांना अठरा जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही पक्षांनी काल आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या. भाजपानं काल एकशे पंचवीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं पक्षाचे सरचिटणीस अरूण सिंग यांनी काल दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार अतुल सावे, गंगापूर - प्रशांत बंब, फुलंब्री - हरिभाऊ बागडे, परळी - पंकजा मुंडे, परतूर - बबनराव लोणीकर, निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील, भोकरदन - संतोष दानवे, बदनापूर - नारायण कुचे, हिंगोली - तानाजी मुटकुळे, मुखेड - तुषार राठोड आणि भोकर मतदारसंघातून बापुसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून तर शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षानं विद्यमान बारा आमदारांना उमेदवारी दिली नसल्याचं अरुण सिंग यांनी सांगितलं. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची नावं मात्र या पहिल्या यादीत नाहीत, मात्र खडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढच्या यादीत आपलं नाव असेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गंगाखेड इथं टाळ मृदुंग वाजवून आत्मक्लेष आंदोलन केलं. **** शिवसेनेनंही काल सत्तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरनवे, परभणी - डॉ.राहूल पाटील, गंगाखेड - विशाल कदम, बीड – जयदत्त क्षीरसागर, नांदेड दक्षिण - राजश्री पाटील, मुरूड - महेंद्र दळवी, हदगाव - नागेश अष्टीकर, देगलूर - सुभाष साबणे, तर उमरगा - लोहरा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबाद मध्यमधून शिवसेनेनं माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना एबी फॉर्म दिल्याचं जैस्वाल यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. **** काँग्रेसनं ५२ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मराठवाड्यात हिंगोलीतून भाऊराव पाटील, परतूर सुरेशकुमार जेथलिया, जालना - कैलास गोरंट्याल, लातूर ग्रामीण - धीरज देशमुख, तर उमरगा विधानसभा मतदारसंघातून दिलीप भालेराव यांना उमेदवारी दिली आहे. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं २७ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत नवगिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** संभाजी ब्रिगेडनं काल पंधरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेडच्या किनवट-माहूर मतदारसंघातून विशाल शिंदे, बीड - राहुल वायकर तर जालना जिल्ह्यातल्या मंठा परतूर मतदारसंघातून राजीव मोरे यांना उमेदवारी दिल्याचं प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितलं. **** मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून उमेदवारी देण्यात आली आहे. **** मराठवाड्यात विविध मतदार संघातून कालपर्यंत ७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह जिल्ह्यात आठ उमेदवारांनी काल १० अर्ज दाखल केले. जिल्ह्यातून आतापर्यंत १४ अर्ज दाखल झाले आहेत. बीड इथं, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यासह दहा जणांनी काल बारा अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून दोन, तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्यासह अकरा उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यातून काल सहा उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले, जिल्ह्यात आतापर्यंत १५ अर्ज दाखल झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदार संघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी काल अर्ज दाखल केला. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण १८ अर्ज दाखल झाले आहेत. सातारा इथं, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी काल अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथून बबनराव पाचपुते यांनी, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपकडून, तर कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांनी आणि इस्लामपूर मधून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल उमेदवारी अर्ज दाखल केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातल्या तरतुदी शिथील करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निर्णय न्यायालयानं काल रद्दबातल ठरवला. मार्च २०१८ मधे सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठानं या कायद्यातल्या तरतुदी शिथील केल्या होत्या. त्यावर फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारनं तसंच इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं काल हा आदेश दिला. **** पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी या बँकेचं आधीचं व्यवस्थापक मंडळ आणि हाऊसिंग लिमिटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड - एचडीआयएल या कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या प्रशासकाच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्ह्याच्या कटाचा, तसंच बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्या संदर्भातल्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरु ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबादल ठरवली होती, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि राजकारण सोडून द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. **** राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती. यानिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसंच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही आज जयंतीनिमित्त आदरांजतली अर्पण करण्यात येत आहे. स्वच्छता एक सेवा' या उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांना एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून करून पर्यावरणाच्या रक्षणात यो��दान देण्याची शपथ दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे गांधी जयंतिनिमित्त नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर महाश्रमदानाचा कार्यक्रम होणार आहे. **** औरंगाबाद इथं शहागंज परिसरातल्या महात्मा गांधी पुतळा परिसरात प्रार्थना आणि अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरात रेल्वे स्थानकानजिक उभारलेल्या महात्मा गांधी सर्वोदय भवनाचा शुभारंभ आज होणार आहे. या निमित्तानं येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत विविध विषयांवर व्याखान होणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘फिट इंडिया’ अंतर्गत दौड आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून सकाळी साडे सात वाजता या दौडला सुरुवात होईल. **** मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पध्दतीत बदल करण्याचं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विजय दिवाण यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं, गांधीजींच्या शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्याचा पाणी प्रश्न’ या विषयावर बोलत होते. मराठवाड्यात उपलब्ध पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी हे ऊसासाठी वापरलं जातं, त्यामुळे कमी पाण्यावर येणारी ज्वारी, बाजरी, मका या सारखी पिकं घेणं गरजेचं असल्याचं प्रा. दिवाण यांनी सांगितलं. जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मराठवाड्यातल्या एक लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र सिंचन व्यवस्थेअभावी पाच जिल्ह्यातल्या अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्रालाच याचा लाभ होत असल्याची खंत दिवाण यांनी व्यक्त केली. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०२ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज ** विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिंलेडरच्या दरात ६२ रुपये ५० पैशांनी घट ** भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला प्रारंभ; अन्य पक्ष नेत्यांना आता भारतीय जनता पक्षात प्रवेश नाहीः मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण ** विधान परीषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीसाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल; आज छाननी आणि ** औश्याचे माजी आमदार विधीज्ञ शिवशंकरअप्पा उटगे यांचं निधन **** मान्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. काल दिल्लीतून मान्सूनच्या उत्तरार्धाचा अंदाज जाहीर करण्यात आला. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे. **** स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ किलो दोनशे ग्राम वजनाच्या सिंलेडरची किंमत ५७४ रुपये ५० पैसे अशी झाली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या दरात १०० रुपये ५० पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरच्या दरात एकूण १६३ रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या निवेदनात म्हटलं आहे. **** भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला काल अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेच्यामाध्यमातून मुख्यमंत्री राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या दिडशे विधानसभा क्षेत्रातून जवळपास साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.राज्यातला दुष्काळ संपवण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरूकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केलं. अन्य पक्षातून येणाऱ्या नेत्यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. **** विधानपरिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार अंबादास दानवे, कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून भवानीदास कुलकर्णी, शिवराज्य बहुजन पक्षाचे विशाल नांदरकर तर माजी नगरसेवक शाहनवाज खान, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद, नंदकिशोर सहारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज सकाळी ११ वाजता या अर्जांची छाननी केली जाईल. पाच ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून १९ ऑगस्टला मतदान होईल. **** मातंग समाजासाठी राज्य सरकारनं पंचवीस हजार घरं दिली असून आणखी पंचवीस हजार घरं लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकीट प्रकाशन समारंभात बोलत होते. राज्य सरकार मातंग समाजाला एक लाख घरं देणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लातूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आमदार अमित देशमुख, महापौर सुरेश पवार यांच्यासह सार्वजनिक जंयती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यानी पुष्पहार घालुन अभिवादन केलं. औरंगाबाद शहरातही विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मान्यवरांनी साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी साठे यांच्या पुर्ण��कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जयंती उत्सव समितीच्यावतीनं सकाळी शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहर आणि जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयं आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाले. **** लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त काल विधानभवनात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना अभिवादन केलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ऑगस्ट १९२० रोजी स्थापन झालेल्या औरंगाबाद शहरातल्या बलवंत वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवाला काल सुरवात झाली. यावेळी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचकांची सभा घेण्यात आली. बलवंत वाचनालय शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी शासनातर्फे दोन लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा सहायक ग्रंथालय संचालक हुसे यांनी अध्यक्षीय भाषणात केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे. **** शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा काल लातूर इथं पोहोचली. लातूर इथं त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते आज नांदेड इथं जनतेशी संवाद साधणार आहेत. काल जिल्ह्यातल्या मुक्रामाबाद इथं ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. **** वयोमानानुसार उमेद राहिली नसल्यामुळे उस्मानाबाद इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आपण होऊ इच्छित नसल्याचं प्रसिद्ध साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणारे एक पत्रक त्यांनी जारी केले आहे. **** सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तीन पूर्णांक एक रिस्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का होता. **** लातूर जिल्ह्यातले औश्याचे माजी आमदार विधीज्ञ शिवशंकरअप्पा उटगे यांचं काल निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. औसा नगर पालिकेचे नगराध्यक्ष, किल्लारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मनोरंजन क्लबचे संस्थापक अध्यक्ष, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदं त्यांनी भूषवली होती. मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर औसा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. **** प्रसिद्ध कवी गझलकार अनिल कांबळे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या कांबळे यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची सहाशेहून अधिक गाणी स्वरबद्ध झाली आहेत. अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. **** राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या वतीनं, लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारींवर, येत्या नऊ ऑगस्ट रोजी, उस्मानाबाद इथं सुनावणी घेतली जाणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांसमोर ही सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीसाठी तक्रारदारांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे तक्रारी नोंदवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मुधोळ - मुंडे यांनी केलं आहे. **** अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करण्याची वृत्ती ठेवली तर सर्वसामान्यांची कामं मार्गी लावणं शक्य असल्याचं मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केलं आहे. महसूल दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव आयुक्त केंद्रेकर यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपण लोकसेवक असल्याची जाणीव दृढ करून सर्वांनी जनसामान्यांची काम प्राधान्यानं करावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** लातूर शहरातली मालमत्ता कर वसुली तात्काळ थांबवण्यासाठी नागरिक हक्क कृती समितीनं काल महापालिका इमारतीच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पूर्वीप्रमाणेच कर स्वीकारावा तसंच व्याज, दंड आकारू नये अशी मागणी करणार निवेदन समितीनं उपायुक्तांना दिलं. दरम्यान, महापालिकेनं केलेली कर आकारणी योग्य असून नागरिकांनी थकबाकी आणि चालू कर भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेनं केलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आठ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात ४० हजार दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद क्षमतेनं पाणी दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नागमठाण, गंगापूर, वलवडी, दारणा, पालखेड आणि कडवा धरणातून हे पाणी येत आहे, असं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं. **** निझामाबाद - पंढरपूर - निझामाबाद प्रवासी रेल्वेगाडी आजपासून २७ सप्टेंबर पर्यंत पूर्ववत करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीच्या कामामुळे ही रेल्वे २७ सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आली होती. दरम्यान, पंढरपूर-निझामाबाद हि प्रवासी गाडी आज काही तांत्रिक कारणास्तव धावणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागान कळवलं आहे. ****
0 notes