Tumgik
#एका लखानी
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यार शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरीकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं, न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने नव्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
****
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयाने तीन ते सहा मे दरम्यान १२ वेगवेगळ्या घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे सहा किलोहून जास्त बजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार, अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल चार वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर ४ जण जखमी झाले.
मेहकर- जालना रस्त्यावर किनगाव राजा जवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला.
अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तर चिखली - जालना रस्त्यावर मालवाहक गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला.
****
व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाब्रा यांनी मिश्र दुहेरीच्या ३५ वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीने देखील सुवर्ण पदक जिंकलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे  शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
hindidailynews2020 · 4 years
Text
कोरोनावायरस फंड के लिए एकजुट हुईं बी-टाउन की ये 3 सशक्त महिलाएं
कोरोनावायरस फंड के लिए एकजुट हुईं बी-टाउन की ये 3 सशक्त महिलाएं
[ad_1]
तीनों पेशेवरों ने अलग-अलग कई बार काम किया है, लेकिन इस बार वे अपनी प्रतिभा का उपयोग एक नेक कार्य के लिए कर रही हैं.
By : आईएएनएस | 17 May 2020 07:13 AM (IST)
Tumblr media
हिरल भाटिया, लेखा गुप्ता और एका लखानी जैसे नाम शायद आपके लिए ज्यादा मायने नहीं रखते हों, भले ही आप कट्टर बॉलीवुड प्रेमी क्यों न हों. लेकिन, ये तीनों वे शख्सियत हैं जो हमारी फिल्मों और…
View On WordPress
0 notes
Text
Hiral Bhatiya Lekha Gupta And Eka Lakhani To Raise Fund For Coronavirus
https://theindianewstoday.com/hiral-bhatiya-lekha-gupta-and-eka-lakhani-to-raise-fund-for-coronavirus/ Hiral Bhatiya Lekha Gupta And Eka Lakhani To Raise Fund For Coronavirus
0 notes