Tumgik
infertilitygyan · 2 years
Link
0 notes
infertilitygyan · 2 years
Text
women-and-health
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते,ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयी आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे.समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय कारणानुसार वीस ते तीस वर्षं हे वय प्रसूतीसाठी योग्य असते. पूर्वी प्रत्येक स्त्रीला पाच ते सहा वेळा बाळंतपणाच्या दिव्यातून जावे लागत होते. घरगुती बाळंतपणात कधी मातेचा जीव जात असे.आता शस्त्रक्रिया मध्ये रक्तस्राव झाला तर रक्त पुरवण्याची सोय असल्याने माता मध्ये माता मृत्यु व बाल मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग या आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे.
आज महिला चुल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत.घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.शहरातील सुमारे तीस टक्के महिलांना स्तनाचा कॅन्सरचा धोका आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत.
स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी आरोग्यविषयक उपक्रम जागरुकपणे राबविल्यास अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीसच्या आत त्यांना त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न राहता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.
महिलांचा आहार
सध्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण,शिक्षण,सरकारी नोकरी या सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरांमध्ये स्वतःकडे किती हिरिरीने पाहतात, स्वतःच्या आरोग्य,आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्ध्या आयुष्य स्वयंपाक घरात जात असले तरी सर्वांचे जेवण झाल्यानंतर उरेल तेच खायच आणि काही वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून संपवायच,या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसाव्या शतकात देखील बाहेर येत नाहीये.
Read More 
0 notes