Tumgik
#राज्यस्तरीय बातम्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत डॉ.वृषाली पाटील यांना तिहेरी मुकुट
राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत डॉ.वृषाली पाटील यांना तिहेरी मुकुट
राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत डॉ.वृषाली पाटील यांना तिहेरी मुकुट जळगाव : प्रतिनिधी राज्यस्तरीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्हा संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेत जिल्हा व्हेटरन्सच्या डॉ. वृषाली पाटील, डॉ. सारंगा लोखंडे, चेतना शहा, सुनिल रोकडे, डॉ. संदीप पाटील, कीर्ती मुणोत हे खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांत विशेष निरीक्षकांची नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी आज चंद्रपुरात प्रचार सभा
वंचित बहुजन आघाडीची बीड इथून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा हंगामातला पहिला विजय
राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फड ठरली महाराष्ट्र केसरी
आणि
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं सांगता
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं, महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून तर भारतीय पोलिस सेवेतले निवृत्त अधिकारी एन.के. मिश्रा यांची पोलिस श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे विशेष निरीक्षक राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकतेनुसार संवेदनशील तसंच समन्वयाची गरज असलेल्या भागांना भेट देतील, असं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २५४ ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रं असावीत यावर भर दिला असून, प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रंही असणार आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त ३० मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. राज्यात यंदा एकूण सहा लाख ४ हजार १४५ इतके दिव्यांग मतदार आहेत.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्‍थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचार सभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरोघरी जाऊन प्रचार, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थळावर सुरुवातीच्या २० दिवसांमध्ये तब्बल ७३ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर, १० हजाराहून अधिक अर्ज रद्द तर ११ हजार २०० अर्ज नामंजूर झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा आज चंद्रपुरात महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी होत आहे. या सभेच्या दृष्टीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विदर्भातल्या पाच मतदार संघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रवाना होणार आहेत. आठवले हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएचे राष्ट्रीय स्तरावरचे स्टार प्रचारक आहेत. दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत संसदेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडक यांना जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले उपस्थित राहणार असून, त्याच दिवशी दुपारी मुंबईत चैत्यभूमी इथं ते बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीने बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
निवडणूक कामकाजात सजगता आणि सकारात्मकता आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात काल दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काल सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जागृतीसाठी सायकल फेरी काढली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसच मतदान शांततेत पार पडावं, यासाठी जिल्ह्यात ७ मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
श्रोतेहो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा २९ धावांनी पराभव करत या मालिकेतला आपला पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकात ८ बाद दोनशे पाच धावाच करू शकला. दहा चेंडूत नाबाद ३९ धावा आणि एक बळी घेणारा रोमारिओ शेपर्ड सामनावीर ठरला.
दरम्यान, लखनऊ इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटस संघानं गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. लखनऊ सुपर जायंटसनं दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करतांना गुजरात टायटन्सचा संघ १८ षटक पाच चेंडूत सर्वबाद झाला. पाच बळी घेणारा यश ठाकूर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना काल पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-२ असा पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला तिसरा सामना पर्थ इथंच १० एप्रिलला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फडने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला, तर पिंपरी - चिंचवडची प्रगती गायकवाड उपविजेती ठरली. छत्रपती संभाजीनगरच्या श्रृंखला रत्नपारखीने ६८ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुवर्ण पदक पटकावलं. कुस्तीगीर संघटना आणि नरेंद्रजी अग्रवाल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुण्यात बालेवाडीच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड झाली आहे. हे मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत राहील.
****
हिंगोली जिल्ह्यात संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं काल सांगता झाली. काल दुपारी कीर्तनानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या तीन दिवस चाललेल्या या यात्रेत संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा, प्रवचन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमांत भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाल्याचं दिसून आलं.
****
नांदेड शहरात काल जिल्हा पोलीस दलातर्फे सद्‌भावना फेरी काढण्यात आली. विविध धर्मांचे धर्मगुरू तसंच एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
सार्वत्रिक निवडणुक कार्यात दिव्यांगत्वाचं भांडवल करत कुणीही गैरप्रकार करू नयेत, अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक आठवले यांनी याबाबत एक निवेदन निवडणुक आयुक्तांना पाठवलं आहे.
****
मराठवाड्यातले पहिले प्‍लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं, डॉक्टर अविनाश येळीकर-सर्जन गरीबांचा, मैत्र जीवांचा या गौरव ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत, प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचं प्रकाशन झालं. उपस्थित मान्यवरांनी डॉ येळीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील २२ केंद्रांवर काल घेण्यात आली. या परीक्षेला ८ हजार १०५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 
****
आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त जनजागृती म्हणून नाशिक इथं काल गोदावरी नदीच्या काठावर पाच हजार सहाशे २५ चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्त्व सांगतानाच त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता, आरोग्यासाठी उपयुक्तता, आदी संदेश देण्यात आला.
****
हवामान
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढच्या २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
news-on · 4 years
Text
पीककर्ज वाटपातील त्रुटी कळवा, उपाययोजना सूचवा! 
पुणे – राज्यातील  पीककर्ज वाटपातील सध्याच्या त्रुटी काय आणि त्यावर काय उपाययोजनांची गरज आहे, हे राज्यस्तरीय समितीला कळविण्याचे आवाहन या समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सर्व जिल्हा बँकांना केले आहे. याबाबत सर्व जिल्हा बॅंकांना पत्र पाठविण्यात आले आहे. यासाठी बॅंकांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कार्तिकी पाटीलला कांस्यपदक
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कार्तिकी पाटीलला कांस्यपदक
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कार्तिकी पाटीलला कांस्यपदक जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कार्तिकी पाटील हिने 48 ते 50 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकवत कांस्यपदक मिळवले. याबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेतर्फे कार्तिकी पाटीलचा पालक विकास पाटील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार
एस.टी.च्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन
एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा समारोप
आणि
उडान योजनेअंतर्गत नांदेड इथली विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून पूर्ववत
****
आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग उद्या जाहीर करणार आहे. उद्या दुपारी नवी दिल्लीत होणारी ही पत्रकार परिषद समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं ट्वीटरवर दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बॅंकेनं निवडणूक रोख्यांची सर्व माहिती परवा आयोगाला दिली. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी झालेल्या आणि वठलेल्या निवडणूक रोख्यांची माहीती बॅंकेनं दिली आहे.
****
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचं, खडसे यांनी सांगितलं. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या कन्या रोहिणी खडसे यासुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ क���ण्यात आला. याअंतर्गत विविध शासकीय योजनांद्वारे घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी महिला बचतगटाला प्रति बचतगट एक लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजना तसंच स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये कर्जासाठी दोन हजार रुपये तर २० हजार रुपये कर्जासाठी चार हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल. आज ७० हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
एस.टी महामंडळाच्या एलएनजी इंधनावरील वाहन रुपांतर प्रकल्पाचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं. एलएनजी रूपांतरणामुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६ हजार प्रवासी वाहनं आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा डिझेलवर केला जातो. टप्प्याटप्प्याने एस.टी महामंडळातील सर्व वाहनं एलएनजी इंधनावर रुपांतरित करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान निधी अकरा हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीनुसार वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबवण्यात येते. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील ५० कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्यात येईल. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार सन्माननिधीची रक्कम संबंधित पत्रकारांच्या बँक खात्यात जमा होईल.
****
वस्त्रोद्योग विभागाच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार, विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही या प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सर्व नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट - विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित, एकोणीसाव्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य २०२३-२४ युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. प्रख्यात अभिनेत्री तथा लेखिका सोनाली कुलकर्णी या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युवकांनी स्वतःला ओळखावं आणि कोणाला हरवण्यापेक्षा कलेतला आनंद जाणून घ्यावा, असा सल्ला, त्यांनी युवकांना दिला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या ११ मार्चपासून पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात २४ विद्यापीठांच्या आठशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी तीस कला प्रकारात आपली कला सादर केली. स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'उडे देश का आम आदमी' अर्थात उडान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड इथून विमानसेवा पूर्ववत होत आहेत. नांदेड- हैद्राबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही दोन विमानं ३१ मार्चपासून नियमितपणे सुरू होणार असून, बंगळुरू-नांदेड-जालंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
****
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक पुरस्कार २०२१-२२ या वर्षासाठी, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेस तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विलास चंदने यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी चौकडे तसंच संचालक विलास चंदने यांनी हा पुरस्कार स्वीकारला
****
लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज दिव्यांग मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरी आणि चित्ररथाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पाणी, तसंच वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे, तसंच निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपच्या माध्यमातून अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. दिव्यांगाच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळावी अशी मागणी पर्यटन जनजागृती संस्थेच्या ��तीने करण्यात आली आहे. आज धाराशिव इथं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं.
****
नांदेड इथं ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील भोगाव इथले रहिवासी दाजीबा शंकरराव गाढे आणि त्यांचा मुलगा गोपीनाथ गाढे हे दोघे दुचाकीवर नांदेडला जात असताना, आसना नदीच्या पुलावर हा अपघात झाला, या दोघांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वर्ग-१, वर्ग-२ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि पदव्य���त्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य सरकारने १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निवासस्थानांच्या बांधकामाला लोकसभा निवडणुकीनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरचा मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
सामाजिक न्याय विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळाव्याचं आयोजन 
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून, रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशभरातल्या सुमारे ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण काल पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांमध्ये लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना तसंच जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'सह, १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १८ नवीन रेल्वेमार्ग, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, आणि चार रेल कोच रेस्टॉरंट आदी ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे तर जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि लातूर इथं खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. जालन्यातल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'मुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं आज सकाळी लोकार्पण होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवणारी ही योजना, देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
भारतीय स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांसंबंधीची सगळी माहिती काल निवडणूक आयोगाकडे सोपवली. ही माहिती आपल्या संकेतस्थळावर १५ मार्च च्या संध्याकाळपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगालाही दिले आहेत.
****
औषधी उत्पादक कंपन्यांनी औषध वितरणासाठी आचार समिती तसंच एकसमान संहिता निश्चित करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या कंपन्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देऊ नये, औषधांचे मोफत नमुने फक्त डॉक्टरांनाच दिले जावेत, असे निर्देशही सरकारनं दिले आहेत.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण झालं. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये जालन्याचे शिवाजी गवई, छत्रपती संभाजीनगरचे धोंडिरामसिंह राजपूत, छत्रपती संभाजीनगर इथलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण विकास मंडळ, लातूर जिल्ह्यातली क्रांतिसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि लातूर इथल्याच शिवकृपा समाज सेवा मंडळ या व्यक्ती तसंच संस्थांचा समावेश आहे.
****
आदिवासी हे देशाचे खरे मालक असून, या देशातल्या जल, जंगल आणि जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा असल्याचं, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं भारत जोडो न्याय यात्रेत बोलत होते.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४३ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यातले १२ उमेदवार आसाममधले, मध्यप्रदेश आणि राजस्थानातले प्रत्येकी १०, गुजरात सात, उत्तराखंडमधले तीन, तर एक उमेदवार दमण आणि दीवमधला आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळच्या राळेगाव इथं पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं, या वेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज स्वनिधी से समृद्धी मेळावा होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात ३३ हजार पथ विक्रेत्यांना दहा हजार रुपयांचं कर्ज आणि परिचय पत्र वितरीत करण्यात येणार आहे.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावंत तरुण खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर सांगितलं. शास्त्रीय चाचण्या आणि निकषांच्या आधारावर या खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
****
राज्य शासनाच्या क्रीडा आ��ि युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं, उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतल्या सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात मानवत इथं ॲग्रीपीव्ही संशोधन प्रकल्पाचं काल उद्घाटन करण्यात आलं. जी आय झेड ही जर्मन संस्था, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ॲग्रीपीव्ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पीक लागवड या दोन्‍ही बाबी शक्‍य होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी यावेळी दिली.
****
बीड जिल्हा उद्योग परिषदेच्यावतीनं काल घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ३५ उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या कराराची एकूण किंमत ६५८ कोटी रुपये असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर शहरातल्या मालमत्ताधारकांसाठी कर थकबाकीवरचं व्याज माफ करणारी योजना महापालिकेनं जाहीर केली आहे. नागरिकांनी येत्या ३१ तारखेपूर्वी थकित कर एकरकमी भरून ही सवलत घ्यावी, असं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं काल चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला. १३ गुन्ह्यातला ३१ लाखाहून अधिक रुपयांचा हा मुद्देमाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं. पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या, नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचं भूमिपूजन, काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं. या रस्त्याच्या सुधारणेचं काम काही शेतक-यांनी मोबदल्याच्या कारणावरून विरोध केल्यानं प्रलंबित होतं, आमदार पाटील यांनी त्यातून मार्ग काढत, हा प्रश्न मार्गी लावला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातला कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख याला तीन हजार रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. अनुदानावर मंजूर झालेल्या रोटावेटर आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाले. रस्त्यावर उभ्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकी धडकून हा अपघात झाला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल अशाच एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिका-यांनी हे आवाहन केलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन-पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूरची मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी तसंच जालन्याच्या गतीशक्ती टर्मिनलचं लोकार्पण
देशभरातल्या प्रतिभावंत क्रीडापटूंसाठीच्या कीर्ती योजनेची घोषणा
आणि
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण विजेतेपद
****
भारतीय रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षांत सर्वसमावेशक परिवर्तन झालं असून रेल्वेचा विकास हा सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रेल्वे आणि मेट्रो कोचसह वंदेभारत रेल्वे कोचसुद्धा तयार होणार आहेत. लातूर शहराजवळ चिंचोलीराववाडी इथे नवीन एमआयडीसी परिसरातल्या ३५० एकर जागेवर ही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
दक्षिणमध्य रेल्वेनं जालन्याजवळ दिनेगाव इथं उभारलेल्या 'गती शक्ती कार्गो टर्मिनल'चंही पंतप्रधानांनी आज लोकार्पण केलं. जालना इथं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सुविधेमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विदेशात जाईल, तसंच जालन्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं उद्या सकाळी उद्घाटन केलं जाणार आहे.
****
पंतप्रधानांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातल्या एकूण ५०६ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १५० एक स्थानक एक उत्पादन दुकानं, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौर पॅनेल, १८ नवीन रेल्वेमार्ग आणि रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण किंवा गेज रुपांतरण, १२ गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, बडनेरा इथली वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे इथली वंदे भारत बोगी देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, पाच जनऔषधी केंद्रं, चार रेल कोच रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.
****
दरम्यान, आज राजस्थानातल्या पोखरण इथे भारत शक्ती या कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी अवलोकन केलं. या कार्यक्रमात देशाच्या तीनही संरक्षण दलांच्या स्वदेशी शस्त्र प्रणालींची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. पोखरण आज पुन्हा एकदा भारताच्या स्वयंपूर्णतेचा साक्षीदार बनलं आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी सेनादलांचा गौरव केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, पीएम सूरज या राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. पी एम सूरज ही एक सामाजिक सशक्तीकरण योजना असून, यातून, देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वंचित समाजघटकांच्या विकासासाठी विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ५२५ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून याच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, सोलापूर, अहमदनगर, हिंगोली आणि चंद्रपूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए लागू करण्यात आला असून, पात्र व्यक्तींना नागरिकत्वासाठी अर्ज करण्याकरता केंद्रीय गृहमंत्रालयानं इंडियनसिटिझनशिपऑनलाईन डॉट एनआयसी डॉट इन, पोर्टल सुरू केलं आहे. इच्छुक व्यक्तींना ॲपवरूनही अर्ज करता यावा, यासाठी सीएए-२०१९ हे मोबाईल ॲपही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचं गृहमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, या कायद्याला आव्हान देणारी याचिका इंडियन युनियन मुस्लीम लीगनं सर्वोच्च न्यायलयात दाखल केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
****
भाजपचे नायब सिंह सैनी यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहरलाल खट्टर यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांचा जननायक जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातली साडेचार वर्षांची युती संपुष्टात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे या पक्षातून बाहेर पडले आहेत. समाज माध्यमावर एक संदेश देत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
****
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागच्या चार वर्षातले ३९४ पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपआपल्या निवासस्थानी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विधान भवनातही महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉक्टर विलास आठवले यांनी चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ‘खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' अर्थात कीर्ती योजनेची घोषणा केली. विविध क्रीडा प्रकारातल्या प्रतिभावान युवा खेळाडूंचा देशाच्या सगळ्या भागांतून शोध घेणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. प्रतिभावान खेळाडूंच्या निवडीसाठी शास्त्रीय चाचण्या आणि निकष ठरवले जाणार असून, देशात केवळ महिला खेळाडूंना प्रशिक्षण देणारी दोन केंद्रं सुरू करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.
****
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं उदगीरच्या तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं. पुणे आणि सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य तसंच कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या एकूण ८६ महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपयांपैकी २३७ कोटी रुपयांचं वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आलं आहे. यातल्या सुमारे साडेतीन हजार लाभार्थींची बँक खाती आधारशी जोडलेली नसल्यामुळे सुमारे पावणेतीन कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात वर्ग होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी संबंधितांशी संपर्क साधावा आणि आपलं आधारपत्र बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मंगल कार्यालयाच्या मालक तसंच चालकांनी लग्नकार्य आणि शुभ प्रसंगांमध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात मतदानाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं आहे.
****
मुंबईत पश्चिम बोरिवली इथे एका पंचवीस मजली निर्माणाधीन इमारतीच्या सोळाव्या मजल्यालगतच्या लोखंडी सांगाड्यावरून पडल्यामुळे तीन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला. आज दुपारी एकच्या सुमाराला हा अपघात झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिला सबलीकरणाच्या माध्यमातूनच देशाची प्रगतीपथावर वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार नमो दीदींना ड्रोन वाटप
लातूरच्या रेल्वे बोगी निर्मिती कारखान्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेशी निगडित ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्या लोकार्पण आणि उद्‌घाटन
आणि
शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
****
भारतानं आज मिशन दिव्यास्त्र- या अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उडाण चाचणी घेतली. स्वदेशी तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या मल्टीपल इन्डीपेन्डन्टली टार्गेटेबल रि-एन्ट्री व्हेईकल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही चाचणी घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
महिला सबलीकरणाच्या माध्यमातूनच कोणताही देश प्रगतीपथावर वाटचाल करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आज नवी दिल्ली इथं आयोजित सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते एक हजार नमो ड्रोन दीदीजना ड्रोन देण्यात आले. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून एक कोटींपेक्षा अधिक महिला लखपती दीदी झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी बचत गटांना पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. महिला बचत गटांनी ग्रामीण पायाभूत विकासात आणि एकूणच ग्रामीण विकासात मोलाचं योगदान दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दहा वर्षात बचत गटांचा केवळ विस्तारच झाला नाही तर ९८ टक्के बचत गटांची बँक खाते उघडण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, राज्यातल्या रेल्वेशी निगडित ८५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण तसंच उद्‌घाटन होणार आहे. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, नांदेड रेल्वे विभागातील दिनेगाव, जालना येथील ड्राय पोर्ट, अमलाखुर्द ते खंडवा गेज परिवर्तन तसेच आदिलाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, नगरसोल, हिंगोली आणि वाशिम रेल्वे स्थानकावरील एक स्थानक-एक उत्पादन या स्टॉल्सचा समावेश आहे. यासह बडनेरा इथल्या रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रांचाही यात समावेश आहे. पंतप्रधान दहा वंदे भारत रेल्वेंना दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. लातूरचा रेल्वे बोगी कारखाना महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रो रेल्वेचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोच यांची निर्मिती केली जाणार आहे.
****
भारतीय स्टेट बँकेने, उद्या, १२ मार्च रोजीपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचे आदेश देत यासंदर्भातील रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला १३ मार्चपर्यंत जाहीर करण्यास सांगितले होते. परंतु, निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत वेळ द्यावा अशी मागणी एसबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. तसेच निवडणूक आयोगाने १५ मार्चपर्यंत ही सर्व माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
****
शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासह बीडीडी गाळेधारक आणि झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. तसेच बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुल देणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारणे, वस्तू आणि सेवा कर विभाग म्हणजेच जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता देणे, विधि आणि न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना राबवणे, अयोध्येला महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड खरेदी हे निर्णयही घेण्यात आले. याशिवाय राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता देणे, राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प उभारणे, उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिणवाहिनी मार्गिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. मुंबई किनारी रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे. नरिमन पॉइंटपासून दहिसर-विरारपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा मार्ग म्हणजेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्प होय.
****
राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था तसंच कृषि उत्पन्न बाजार समित्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट अभ्यासगटाच्या शिफारशी शासनास सादर करण्यात आल्या. किमान आधारभूत किंमतीबाबत, राज्यातील कृषि पणन विभागाचे बळकटीकरण आणि पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करणं, राज्यातील कृषि पणन व्यवस्थेत भविष्याचा वेध घेणे, या महत्त्वाच्या शिफारशी शेतकरी हित केंद्रबिंदू मानून अभ्यासगटाने सादर केल्या आहेत.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या दुपारी नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे- मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर- ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. याठिकाणीच इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. अर्थतज्ज्ञ, लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन मतदान केंद्रांवरील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा येथील स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसंच जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथील पाच मतदान केंद्रांची पाहणी करून केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईनं इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सीबीएसईने वारंवार स्मरणपत्र देऊनही काही शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्पाची कामे, आंतरिक मुल्यांकन, आंतरिक ग्रेड कालमर्यादेत पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार विनंती केल्यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून समाज आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणाली द्वारे बैस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या नाट्य सभागृहात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची उपस्थिती होती.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिला शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच कोणताही देश पुढे जाऊ शकतो, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात ते आज बोलत होते. नमो ड्रोन दिदींनी सादर केलेली कृषी ड्रोन प्रात्यक्षिकं त्यांनी पाहिली. देशभरातल्या विविध ११ ठिकाणांहून नमो ड्रोन दिदी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी, एक हजार नमो ड्रोन दिदींना, ड्रोन हस्तांतरित केले. विविध क्षेत्रात महिलांनी मिळवलेल्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, एकविसाव्या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व देशातल्या महिला करु शकतात, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी, नारी शक्तीचा गौरव केला.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या ८५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यामध्ये लातूर इथला रेल्वे बोगीबांधणी कारखाना, बडनेरा इथली रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा, पुण्यातली वंदे भारत कोच देखभाल दुरुस्ती कार्यशाळा, रेल्वे स्थानकावरची जनऔषधी केंद्रं, रेल कोच उपाहारगृहं, सुमारे दीडशे वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल, आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्याबरोबरच पंतप्रधान, देशभरातल्या विविध ठिकाणांवरुन सुरु होणाऱ्या दहा वंदे भारत गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
लातूरचा हा रेल्वे बोगी कारखाना हा महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला चौथा कारखाना आहे. या कारखान्यातून रेल्वे बोगीसह मेट्रोचे कोच तसंच वंदेभारत रेल्वेचे कोचही तयार केले जाणार आहेत.
****
भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची, भारतीय स्टेट बँकेची मागणी, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बॅंकेला, उद्या १२ मार्चला कामकाजाची वेळ संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयानं निवडणूक आयोगाल��� देखील, १५ मार्चपर्यंत एसबीआयकडून आलेली निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यास सांगितलं आहे.
****
यंदाचा ऑस्कर सोहळा अमेरिकेत लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये आज पार पडला. या सोहळ्यात सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले. यावेळी ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत टिना टर्नर, मॅथ्यू पेरी आणि इतर अनेक जणांची नावं या यादीत होती.
****
मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड म्हणजेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या, वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिणवाहिनी मार्गिकेचं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या किनारी रस्त्याला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय इंद्रधनुष युवा महोत्सवाचं उद्घाटन आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणलीच्या माध्यमातून झालं. विद्यार्थ्यांनी अभ्यासासह कला क्रीडा आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशासाठी तसंच समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य करावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. येत्या १५ तारखेपर्यंत चालणार्या या महोत्सवात, २४ विद्यापीठांचे ८७५ कलावंत सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या प्रारंभी आज सकाळी विद्यापीठ परिसरात शोभायात्रा काढण्यात आली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथल्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज पाहणी केली. लोहा इथल्या पाच मतदान केंद्रांना देखील भेट देऊन त्यांनी, आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले.
****
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 04 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा` उपक्रमाची पारितोषिकं घोषित
राज्यासह देशभरात तीन दिवसांच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरच्या अपघातात नांदेड इथल्या चौघांचा मृत्यू
आणि
उदगीर इथं येत्या आठ ते १२ मार्च दरम्यान स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन
****
राज्यातल्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा` उपक्रमाची पारितोषिकं, काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषित केली. शासकीय शाळा गटात प्रथम पारितोषिक वाशिम जिल्ह्यातल्या साखरा जिल्हा परिषद शाळेला, द्वितीय रायगड जिल्ह्यात हेदवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला, तर तृतीय पारितोषिक सांगली जिल्ह्यात घालेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेला जाहीर झालं आहे. खाजगी शाळा गटात प्रथम क्रमांक नाशिक जिल्ह्यातल्या एस्पेलियर हेरिटेज स्कूल, द्वितीय पुणे जिल्ह्यातल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन आणि तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर इथल्या भोंडवे पाटील शाळेनं पटकावला आहे. उद्या मुंबईत या पारितोषिकांचं वितरण होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत, 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमांत, एक लाख तीन हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या होत्या.
****
"शासन आपल्या दारी" हा उपक्रम लोकाभिमुख असून, सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणं, हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कल्याण इथं काल शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याण मधल्या विविध विकासकामांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. राज्य सरकारला केंद्र सरकारचं मोठं पाठबळ असून, त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीनं होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेशातल्या कल्याण आणि तळोजा या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जोडण्याच्या दृष्टीनं, मेट्रो मार्ग १२ च्या कामाचा शुभारंभ देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
****
सर्वांना दृष्टी आणि श्रवणाची क्षमता प्राप्त झाल्याशिवाय विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होणार नाही, असं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत काल जागतिक श्रवण दिनानिमित्त गरीब आणि गरजू कुटुंबातल्या २५० लहान मुलामुलींना मोफत श्रवणयंत्रांचं वाटप राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकारानं तसंच सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाल���. पाच वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिलं.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यासह देशभरात तीन दिवसांच्या लसीकरण मोहीमेला, काल सुरुवात झाली. या मोहीमेअंतर्गत राज्यभरातल्या पाच वर्षांखालच्या एक कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना, पोलिओचा डोस दिला जात आहे. राज्यातल्या ८९ हजार २९९ केंद्रांवर, दोन लाख २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं, ही मोहीम राबवली जात आहे.
धाराशिव इथं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या मोहिमेचं ८० टक्के उद्दीष्ट काल साध्य झालं.
परभणी शहरात या मोहीमेचं महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते, बालकांना पोलिओ डोस पाजून उद्घाटन करण्यात आलं. शहरात लसीकरणासाठी दहा फिरती पथकं नियुक्त करण्यात आली होती. ५६ हजार बालकांना काल पोलिओ लस देण्यात आली.
नांदेड इथं जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाळाला लस पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
हिंगोली इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या हस्ते लहान मुला मुलींना पोलिओचा डोस देण्यात आला. जालना, लातूर, बीड जिल्ह्यातही अनेक बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. आजपासून नऊ मार्च पर्यंत घरोघरी जाऊनही लसीकरण करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं आज, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, तसंच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, या कार्यक्रमाला उपस्थित असतील. हा टप्पा सुरु झाल्यानं ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी ही प्रवासी वाहतूक, तसंच शिर्डी, अहमदनगर आणि नाशिकमधल्या सिन्नर तसंच इगतपुरी परिसरातल्या शेतकऱ्यांची, मुंबईच्या दिशेनं होणारी मालवाहतूक सुलभ आणि जलद होईल. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावरच्या ७०१ किलोमीटर मार्गापैकी, वाहतुकीसाठी उपलब्ध मार्ग ६२५ किलोमीटरचा होणार आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पाच मार्चला अकोला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या दौर्यावर येणार आहेत. अकोला इथला दौरा आटोपून त्यांचं संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन होईल. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे.
****
प्रत्येक मतदारसंघातून शेकडो मराठे उमेदवारी अर्ज भरतील, असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे काल संवाद दौऱ्यावर निघाले असता, जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभेसाठी एकेक मतदारसंघातून शेकडो फॉर्म भरले जातील, त्यामुळे मग निवडणूकांचं काय होईल, त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असंही ते म्हणाले.
****
नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यंदा पहिल्यांदा मतदान करणारी छत्रपती संभाजीनगर इथली मधुमिती सौंदनकर हिनं मतदान करणार असल्याचा संकल्प केला,
****
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ऊसाचा ट्रक आणि चारचाकीमध्ये झालेल्या अपघातात नांदेड इथल्या चौघांचा मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला. हे पाच जण तुळजापूर इथं देवदर्शनासाठी जात असताना काल पहाटेच्या सुमारास, आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात असलेल्या कारनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
नांदेड शहरातल्या उत्तर भागात काल संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूगर्भातून आवाज येत असल्यानं या भागातले नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता एक पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. दहा किलोमीटर परिघ क्षेत्रात हा भूकंप जाणवला असल्याची माहिती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंप मापक केंद्रानं दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं येत्या आठ ते १२ मार्च दरम्यान स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. उदगीर शहरातल्या तालुका क्रीडा संकुल मैदानावर ही स्पर्धा होणार असल्याची माहिती, राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
****
नाशिक जिल्ह्यात येवला इथल्या मुक्तीभूमीच्या परीसरात राज्य शासनाच्या १५ कोटी रूपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या, बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्राचा लोकार्पण सोहळा, काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. गौतम बुद्ध यांची शिकवण आणि प्रेरक विचार प्रत्येकानं आत्मसात केले पाहिजे, तसंच समाजात रूजवले पाहिजे, असं भुजबळ यावेळी म्हणाले.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर इथल्या उपकेंद्राचं उद्घाटन, काल पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालं. उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेलं प्राधान्‍य विचारात घेऊन, औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेलं मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचं काम, विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावं, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
****
जळगाव इथल्या जिल्हा रुग्णालयातली मदर मिल्क बँक, काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचं, पाटील यांनी या वेळी सांगितलं. शिशुंना आईचंच दूध मिळावं या दृष्टीनं, मदर मिल्क बँक, जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचं, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा काल उत्साहात, भक्तिभावानं पार पडला. १४६ व्या प्रकटदिन उत्सवाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली होती. या सोहळ्यानिमित्त संस्थानात विविध दिंड्यांमध्ये सुमारे ४७ हजार वारकरी येऊन गेले. संपूर्ण जिल्हाभरातल्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.
****
धाराशिव इथं काल झालेल्या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातली प्रलंबित एक हजार ११७ आणि दावापूर्व चार हजार २९५ प्रकरणं, तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. विविध प्रलंबित दिवाणी स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये दंड वसूल करण्यात आला.
****
मुंबईत रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईनं तामिळनाडूविरुद्ध २०७ धावांची आघाडी मिळवली आहे. सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवस अखेर मुंबईनं आपल्या पहिल्या डावामध्ये नऊ बाद ३५३ धावा केल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पाणीपुरवठ्यासंबंधी छत्रपती संभाजीनगर शहराचं हीत लक्षात घेऊन मार्ग काढला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर बोलत होते. शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी सोलरवर चालणारे पंप देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दिल्या जात असलेल्या निधीत समाधानकारक रित्या वाढ केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
दरम्यान, गंगापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज पवार यांच्या हस्ते झालं. मिटमिटा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत. 
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर जिल्हा दौर्यावर असून, अहमदपूर इथं तीन हजार ९४६ कोटी रुपये किंमतीच्या सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या १२२ कोटी रुपये किंमतीच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन देखील गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.
****
लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मनोहर जोशी यांनी आपल्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी केलेलं कार्य नेहमीच स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं आहे, अशी भावना व्यक्त करुन राज्यपाल रमेश बैस यांनी यांनी जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मनोहर जोशी यांचा पार्थिव देह मुंबईत त्यांच्या विवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 
****
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमातील शिफारशींनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. अनुभवाच्या आधारे, मूल्यांकनाचा प्रकार सर्व शाळांमध्ये इयत्ता नववी ते १२ वीच्या इयत्तांसाठी स्वीकारावा का, याविषयी मंडळ निर्णय घेणार आहे. या प्रयोगात कौशल्य, विश्लेषण, सर्जनशील विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतांचं मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.
****
देशातून सिकलसेल आजाराचं उच्चाटन करण्यासाठी वेगानं काम करण्याचे निर्देश, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिलेआहे. काल मुंबईत आरोग्य क्षेत्रासाठी केंद्राकडून प्राप्त निधी, विविध योजनांच्या प्रगतीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सिकलसेल निर्मुलनासाठी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर तपासणी वाढवण्यात यावी, गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीमध्ये सिकलसेल आजाराची तपासणी सक्तीची करण्यात यावी, यासोबतच क्षयरोगाच्या उच्चटनासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना पवार यांनी दिल्या. 
****
राज्यातले बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचं गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. केंद्र शासनाच्‍या  २०१८ च्या अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन २०२० च्या अहवालानुसार तो १६ झाला आहे. तसंच २०२० च्या अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून, महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचं नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचं लक्ष्य गाठलं आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा कसोटी क्रिकेट सामना आजपासून रांची इथं सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या ५ बाद १५० धावा झाल्या होत्या. आकाश दीपनं तीन, तर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा आज सुरु होत आहे. पहिला सामना बांगळुरु इथं मुंबई इंडियन्स आणि ���िल्ली कॅपिटल्स संघादरम्यान होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत पाच संघादरम्यान एकूण २२ सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्चला दिल्लीत होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
शिवजयंतीचा आज राज्यभरात उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन
कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता
काँग्रेस नेत्या, माजी मंत्री रजनी सातव यांचं निधन
      आणि 
राजकोट कसोटीत भारताचा इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यभर उत्साह असून, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा होणार आहे. त्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार असून शिवरायांचा पाळणा आणि अन्य कार्यक्रमही होतील. किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गडावर अकराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातल्या घराघरात साजरा करतानाच, जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचं आवाहन करुन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं मध्यरात्री १२ वाजता शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली. शहरातल्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात शिवप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी केली. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जोगदंड यांचं, रयतेचे राजे छत्रपती शिवराय, या विषयावर व्याख्यान होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ११ ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहनांसाठी गोपाळ टी पॉइंट ते सिल्लेखाना चौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक हा रस्ता बंद राहणार आहे. तस�� सिडको परिसरातही एन १२, टीव्ही सेंटर, बळीराम पाटील चौक, बजरंग चौक या मार्गावरची वहातूक बंद असेल. सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठवाड्यात सर्वत्र शिवजयंतीनिमित्त दुचाकी रॅली, ध्वजारोहण, शिवगीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने काल झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीला मान्यता दिली. यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातली अधिसूचना लवकरच संबंधित मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल, अशी माहिती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या दहा वर्षात भाजप सरकारच्या काळात कांदा प्रश्नावर अनेक तोडगे काढण्यात आले असून, कांद्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. 
दरम्यान, निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचं, या निर्णयातून स्पष्ट झाल्याचं सांगून, विखे पाटील यांनी, केंद्र सरकारचे आभार मानले.
****
काँग्रेस नेत्या, राज्याच्या माजी मंत्री रजनी सातव यांचं काल नांदेड इथं अल्पशा आजाराने निधन झालं, त्या ७६ वर्षांच्या होत्या.
रजनी सातव यांनी १९८० साली कळमनुरी विधानसभा निवडणूक जिकूंन राजकीय कारकिर्दिला सुरुवात केली होती. राज्याच्या आरोग्य मंत्री, महसूल आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहिलं. सलग दोन वेळा त्यांनी कळमनुरी विधानसभेचं नेतृत्व केलं. १९८७ साली त्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष झाल्या, तसंच १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहीलं. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत. रजनी सातव यांच्या पार्थिव देहावर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. नवी मुंबईत वाशी इथं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळाव्यात ते काल बोलत होते. अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणार्या विविध योजनांची पवार यांनी यावेळी माहिती दिली.
****
राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला आजपासून सुरुवात होत आहे. चार मार्चपर्यंत चालणार्या या मोहिमेत शासकीय रुग्णालय, किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेच्या रुग्णालयात ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या पवित्र गोदावरी नदीची ‘गोदा आरती’ कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला. आता या गोदा आरतीसाठी ११ प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट पथदिवे, तसंच एलईडी आणि विद्युतीकरण अशी कामं वेगानं करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीच्या वतीनं आज मुंबईत चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेश होणार आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातले प्रतिनीधी, तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.  
****
राजकोट इथं झालेल्या तिसर्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवशी भारताने दुसरा डाव ४३० धावांवर घोषित करुन, इंग्लंडसमोर ५५६ धावांचं लक्ष्य ठेवलं. या डावात यशस्वी जयस्वालनं नाबाद २१४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १२२ धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजानं पाच, कुलदीप यादवनं दोन, जसप्रित बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात ११२ धावा आणि दोन बळी, तर दुसर्या डावात पाच बळी घेणारा रविंद्र जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.
****
मलेशिया इथं आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं प्रथमच विजेतेपद पटकावलं आहे. काल या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला.
****
नांदेडमध्ये सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी समारोप होणार आहे.
दरम्यान, महोत्सवात नंदगिरी किल्ल्यावर आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला काल नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट दिली. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आयटीआय परिसरात भव्य शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन काल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर तालुक्यात निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले,  बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबिय उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या नांदेड- वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाला कालपासून सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातल्या मनाठा इथं रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांनी भूमीपूजन करुन या कामाला सुरुवात केली. एकूण २८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचं काम येत्या तीन वर्षात होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतरच आंदोलन थांबेल - मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं
विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे छत्रपती संभाजीनगर इथं जनजागृती
आणि
राजकोट कसोटीत आजच्या दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात २०७ धावा, भारत २३८ धावांनी आघाडीवर
****
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयोगाचे सदस्य उपस्थित होते. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल, तसंच या करता येत्या २० फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवसेनेचं दोन दिवसीय महाअधिवेशन आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु झालं. मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकार सकारात्मक असून, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नव्यानं देण्यात येणारं मराठा आरक्षण, हे ज्यांच्या कोणत्याही कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत, अशांनाच दिलं जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तत्पूर्वी कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना केलं. ते म्हणाले -
सरकार पूर्ण सकारात्मक आहे. पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठ�� समाजाला टीकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असतांना ओबीसी समाजावर, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कायम आहे. त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे. हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल, त्यावर चर्चा होईल. आता याच्यामध्ये मी जरागेंना पण आवाहन केलेलं आहे, की सरकार जेव्हा सकारात्मक असतं, त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी सकाळीच त्यांना आवाहन केलंय, की सरकार पूर्ण पॉझिटीव्ह आहे. पॉझिटीव्ह निर्णय घेतंय. पॉझिटीव्ह भूमिका आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं.
****
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपला कुठलाही विरोध नाही, मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, असं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शुक्रे समितीने १५ दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचं सर्वेक्षण केलं, जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचं सर्वेक्षण देखील पूर्ण करून घेण्यात यावं, अशी मागणी भुजबळ यांनी केली.
****
मराठा समाजाचं मागसलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत सादर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोणावळ्यात काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. हा अहवाल त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
****
दरम्यान, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी २० फेब्रुवारीच्या आत करा, तरच आंदोलन थांबेल, असा इशारा, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात जाळपोळ करू नका, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज मराठा समाज बांधवांनी जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं ग्रामीण भागातल्या शंभर बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी आज जालना इथं पत्रकार परिषद घेऊन, राज्य सरकारच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर टीका केली. राज्य सरकार येत्या अधिवेशनात नवीन कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देणार असेल तर ही समाजाची फसवणूक होईल, त्यामुळे सरकारने अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव घेऊन तो मंजुरीकरता केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला नसल्याचं लाखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढा आदी ठिकाणी देखील रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वसमत ते परभणी मार्गावर खांडेगाव पाटीवर अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस अडवून, प्रवाशांना खाली उतरवत पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसंच शिरडशहापूर नजीक दोन बसेसवर दगडफेक झाल्यानं हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी आज बससेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे दिवभरात या आगारांच्या जवळपास ९३२ फेऱ्या रद्द झाल्या. बसस्थानक, आगारांमध्ये पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. सकाळपासूनच बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मराठा आंदोलकांनी आजपासून विविध जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात आलं.
****
मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसून, डान्स-बार चालक तक्रारदाराला धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरु असलेल्या अशा डान्स-बार वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुंबईत जारी केलेल्या निवेदनात केली आहे.
****
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता, असं मत इतिहास अभ्यासक सुभदा भालेराव यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित स्वामी रानानंद तीर्थ व्याख्यानमालेत त्या आज बोलत होत्या. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या ज्येष्ठ महिला स्वातंत्र्यसेनानींची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****
रथसप्तमीनिमित्त आज तुळजपूरच्या तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. यानिमित्त आज तुळजापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात प्रकाश नगरमध्ये पोहोचली. यावेळी नागरीकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेत नोंदणी केली. तसंच अनेकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातल्या ढाणकी नगर पंचायत क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान राजकोट इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात दोन बाद २०७ धावा झाल्या. तत्पूर्वी भारतानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. रोहीत शर्मानं १३१, रविंद्र जडेजानं ११२, सरफराज खाननं ६२, ध्रुव जुरेलनं ४६ धावा केल्या. भारत सध्या २३८ धावांनी आघाडीवर आहे.
****
जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यानुसार २० फेब्रुवारी पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, २३ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं लातूर तहसील कार्यालयानं कळवलं आहे.
****
जुनी पेन्शन आणि आठव्या वेतन आयोगाचं गठन यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद मध्ये धुळे जिल्ह्यातले कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात एक तास वॉक आऊट करून, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी केली.
****
जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातल्या ओझरखेडा इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू बनवणाऱ्या कार��ान्यावर छापा टाकून एकाला अटक केली. या कारवाईत ४६ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना मोठ्य��� प्रमाणात रोजगारच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं लातूर इथं २४ फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतानं सर्व प्रकारच्या संकटात खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीचा उत्तमपणे सामना केला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाम मधील गुवाहाटी इथं यासंबंधी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गेल्या दहावर्षात देशातली परिस्थिती बदलली असून देशातली वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानानांच्या हस्ते यावेळी ११ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकासकामांचं उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळं या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताच्या चार गडी बाद १८० धावा झाल्या आहेत. आजच्या खेळात रोहीत शर्मानं १३, यशस्वी जैस्वाल १७, श्रेयस अय्यर २९ तर रजत पाटीदारनं ९ धावा केल्या. शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा शुभमन गिल ८८ आणि अक्षर पटेल २४ धावांवरुन पुढे खेळत आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन २ तर रेहान अहमदनं आणि टॉम हार्टलीनं भारताचा प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात भारतानं ३२३ धावांची आघाडी घेतली आहे.   
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय पॅराऑलिंपिक समिती बरखास्त केली आहे. निर्धारीत वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल तसंच मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला आहे. पॅराऑलिंपिक समितीची यापूर्वीची निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. येत्या २८ तारखेला नवीन समितीच्या स्थापनेसाठी निवडणूक घेण्यात येईल असंही क्रीडा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं सुरु असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. संमेलनाच्या काल दुसऱ्या दिवशी इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रुढ झाला नाही अशी खंत, मराठी साहित्यात विनोदाचे गांभिर्याने चिंतन होणं आवश्यक आहे या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यातले बळीरामपूर इथले सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांचं पार्थिव आज सकाळी बळीरामपूर इथं आणण्यात आलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या मूळ गावी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सैनिक महेंद्र अंबुलगेकर यांना ३१ जानेवारी रोजी अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना वीरमरण आलं होतं.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रव्यापी गाव चलो अभियानाचं उद्‍घाटन पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल हिमाचल प्रदेशमध्ये केलं. या अभियानात ७ लाख गावांना भेटी देण्यात येणार असून, अभियानात पक्षाचे ३० लाख कार्यकर्ते सहभाग नोंदविणार आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात या अभियानाची सुरुवात जयभवानीनगर इंथून आज सकाळी करण्यात आली.
****
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषद शाळेच्या डीपीवर वीज दुरुस्तीचे काम करत असतांना अचानक विजेचा धक्का लागून खांबावरुन खाली पडल्यानं महावितरण कर्मचाऱ्याचा जागीचं मृत्यू झाला. आज सकाळी अकरा वाजेदरम्यान ही घटना घडली. जितेंद्र गज्जलवार असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
****
संत नामदेव यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित्त नांदेडमध्ये आज राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. या संमेलनात नानक साई संस्थेच्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत.
****
नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या पिवळ्या चिमण्यांची शिकार करुन विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना भंडारा जिल्ह्यात पवनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८४ मृत चिमण्या जप्त करण्यात आल्या आहेत.
****
आज जागतिक कर्करोग दिवस. कर्करोगाबद्दल माहिती आणि जगजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना या जीवघेण्या आजारापासून वाचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. २०२२ मध्ये या रोगामुळं जगात नऊ कोटी ७० लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये हिमवर्षाव सुरू असल्यामुळं श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या ७ विमानांचं उड्डाणं आज रद्द करण्यात आलं. तसंच इतर विमानेही उड्डाणाच्या प्रतिक्षेत उभी आहेत. संपूर्ण श्रीनगर शहराला बर्फवृष्टीनं पांढरी शुभ्र चांदर पांघरली असल्याचं यासंबंधीत वृत्तात म्हटलं आहे. तसंच रस्त्यांवरून होणारी वाहतुकही एकाच मार्गानं सुरू आहे. त्यामुळं वाहनचालकांना गाडी सुरक्षीपणे चालविण्याच्या सुचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात आज आणि उद्या ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुलांचं सामर्थ्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्पर्धा मित्रांशी न करता स्वत:शी करावी, प्रतिभावंत मित्रांचा द्वेष करण्यापेक्षा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कधीतरी कुटुंबातच नकळत विकृत स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात हे टाळलं पाहिजे, कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये, असं ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी शिक्षकांशी देखील संवाद साधला, मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले. शिक्षक -विद्यार्थी नातं पहिल्या दिवसापासून निरंतर दृढ होत गेलं पाहिजे, हे नातं दृढ असेल तर परीक्षेत तणाव निर्माण होणार नाही, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी थेट संवाद जपला तर तणाव निर्माण होणार नाही, अभ्यासक्रमापलिकडे जाऊन नातं विकसित केलं तर जीवनातल्या अडचणींना मुलांना तुमची आठवण येईल, असं पंतप्रधानांनी शिक्षकांना उद्देशून सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी भारत मंडपम इथं प्रदर्शनाची पाहणी केली.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर इथं श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचं ऐतिहासिक स्वरुप कायम ठेवून ही तालीम देशातली दर्जेदार तालीम बनवणार असून, यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. इथल्या मल्लांची आणि वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह त्यांनी परिसराची पाहणी केली.
****
मराठी भाषा आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित  व्हावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं काल मराठी भाषा विभागाच्या वतीनं आयोजित दुसर्या विश्व मराठी  संमेलनात ते बोलत होते. जर्मन, चीन यासारखे देश मातृभाषेचा आग्रह धरतात, त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या देशातले तज्ञ घडवतात. आपल्याकडेही तसं होणं आवश्यक असून, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचं काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार असून, त्याचबरोबर विविध उपक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचं जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी दिली.
****
नाशिक इथं राज्यस्तरीय नागरी बँक असोसिएशनच्या परिषदेचा समारोप काल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सहकार विद्यापीठ स्थापन करण्यासह इतर अनेक ठराव करण्यात आले. या परिषदेत बँकिंग नियम कायदा आणि नागरी सहकारी बँका तसंच नागरी सहकारी बँकांसाठी पालकत्वाची भूमिका अशा विषयांवर परिसंवाद पार पडले.
****
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाची एक दिवसीय आढावा बैठक आज लातूरमध्ये होत आहे.  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष बांधणीसाठी ही बैठक असल्याचं कॉंग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातूरमध्ये नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहणार असल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक कालिदास माने यांनी दिली. तीन दिवस चालणार्या या शिक्षक साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, थोर लेखक, सुप्रसिद्ध वक्ते आणि कवी यांचं विवेचन ऐकायला मिळणार आहे.
****
चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत काल महाराष्ट्र संघानं पदकांचं शतक पूर्ण करत, पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम राखलं. महाराष्ट्राने भारोत्तोलन, जलतरण, कुस्ती आणि नेमबाजीत पदकांची लयलूट केली. एकाच दिवसात जलतरण क्रीडा प्रकारात सात पदकं पटकवण्याची ऐतिहासिक कामगिरी राज्याच्या जलतरणपटूंनी केली. जलतरणामध्ये आदिती हेगडे हीने दुहेरी सुवर्णपदक तर रीले प्रकारातही महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी केली. कुस्तीमध्ये सुमित भास्कर, नेमबाजीत ईशा टांकसाळे, आणि टेबलटेनिसमध्येही महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केलं आहे. भारोत्तोलनात साईराज परदेशीनं राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. मूळच्या मनमाड इथल्या साईराजनं ८१ किलो वजनी गटात हा विक्रम नोंदवला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत ३७ सुवर्ण, ३२ रौप्य, आणि ४० पदकांसह एकूण १०९ पदकं जिंकली आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने ऊसाच्या मळीवर ५० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मळी हे उसाचं अतिरिक्त उत्पादन असून, अल्कोहोल निर्मितीसाठी त्याचा वापर होतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना काढली असून, येत्या गुरुवारपासून हे निर्यात शुल्क लागू होईल.
दरम्यान, सरकारने रिफाइन्ड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क साडे सतरा टक्क्यांवरून साडे बारा टक्के केलं होतं, हीच सवलत ३१ मार्च २०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यतेलांवरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्ध होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं होणार्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री आज रवाना झाले, त्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचं ब्रॅण्डिंग झालं पाहिजे, यासाठी दावोस इथं चांगली संधी आहे. आज जगभरातले लोक महाराष्ट्राकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहत असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० लोकांच्या शिष्टमंडळाचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मंदिर आणि पुजास्थळांची स्वच्छता अभियानानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम सुरु असून, हे केवळ स्वच्छता अभियान नसून यामुळे मन देखील प्रसन्न होतं, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. शरद पवार गटाने अजित पवार यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटातले काही आमदार आज आपलं म्हणणं मांडणार आहेत.
****
राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन काल मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होत असून, रस्ता सुरक्षा ही काळाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आणावं,  असं आवाहन भुसे यांनी  केलं.
****
बीड इथंही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या उपस्थितीत काल रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाहतूकीचे नियम हे आपल्या सर्वांसाठी असून, ते पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. शहरातून वाहतूक नियम जागृतीद्दल विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
****
बीड इथल्या पंचायत समितीच्या कार्यालयातला ग्रामसेवक हरीभाऊ केदार याला एका खासगी इसमासह तीन हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. दुधाळगट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन गायींची नोंद घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
खामगाव-जालना रेल्वेमार्ग त्वरित सुरू करावा या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं रेल्वे आंदोलन समितीच्या वतीनं दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.
****
मराठा आरक्षणाविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तहसील कार्यालयावर मराठा समाजाच्या वतीने आज बैलगाडी रॅली काढण्यात आली. शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासह इतर मागण्यांचं निवेदन तहसिलदारांना देण्यात आलं.
****
निराधारांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या १९ जानेवारीला लातूर सह बुलडाण्यात रेल रोको आंदोलनाचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात औसा तहसील कार्यालयावर काल तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत्या २४ तारखेपर्यंत ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत, मोबाईल व्हॅनमधून फिरत्या लोकअदालतीचं आयोजन, करण्यात आलं आहे. ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर यांनी केलं आहे.
****
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये आज तापमान नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. या हंगामात पहिल्यांदा पारा दहा अंशाच्या खाली आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes