Tumgik
#चेतन साळुंखे
inshortsmarathi · 5 years
Photo
Tumblr media
‘डान्स प्लस 4’ च्या मंचावर केतकी माटेगावकर केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप आतुर असतात.असेच काहीसे डान्स प्लस 4 च्या मंचावरही पाहायला मिळाले. डान्स प्लस ४ च्या मंचावर प्रत्येक आठवड्‌याला ह्या स्पर्धकांना नियमितपणे त्यांच्यासाठी प्लस असणाऱ्या व्यक्ती भेट देत असतात, मात्र ह्या आठवड्‌याला चेतन साळुंखे त्याला भेटायला आलेल्या केतकीला पाहून थक्कच झाला. विशेष म्हणजे केतकी माटेगावकर टीम पुनितमधील चेतन साळुंखेला भेटायला आली होती कारण तो तिचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्या मोबाईल वॉलपेपरवरही केतकीचाच फोटो आहे. त्याच्या डान्स परफॉर्मन्सनंतर पुनित त्याच्याशी केतकीबद्दलच बोलत होता आणि तिने मागच्या बाजूने सरप्राईज एंट्री घेतली. तिला पाहून चेतनला खूपच आनंद झाला. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पाहताना त्याला त्याच्या डोळ्‌यांवर विश्वासच बसत नव्हता.केतकीने चेतनसाठी एक खास गिफ्टही आणले होते. महत्वाच्या बातम्या – Photos: अन् सुप्रिया सुळे मराठमोळा लूक पाहण्यासाठी क्षणभर आसुसल्या खड्डे न बुजवणाऱ्या ठेकेदाराला जेलमध्ये टाकायच का?; नितीन गडकरींचा उद्विग्न सवाल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले तरच आम्ही भाजपासोबत जाऊ – मनोहर जोशी राहुल गांधीनी ‘या’ कारणांमुळे काँग्रेस नेत्याची केली कानउघडणी
0 notes