Tumgik
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
"शारदीय नवरात्रोत्सव".... आज चौथा माळ www.Chhayavrutta.in मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस , नवरात्री उत्सव सर्व ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज आपण मनमाड येथील छोटा गुरुद्वारा मागील श्री सप्तशृंगी माता मंदिर पाहुया , श्री सप्तशृंगी मंदिर परिसर हा शांत आणि प्रसन्न असुन नवरात्री मध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. #chhayavrutta #navratri #saptashrungi https://www.instagram.com/p/CU2CNOxN2_T/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
"शारदीय नवरात्रोत्सव".....आज तिसरी माळ www.Chhayavrutta.in मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस असुन अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे. आज आपण शहरातील इंडियन हायस्कुल जवळ असलेल्या 52 नंबर परिसरात असणाऱ्या श्री धिंगाण परिवार यांची कुलस्वामिनी असलेली श्री कालिका माता मंदिराचे दर्शन घेऊया , श्री धिंगाण परिवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराच्या परिसरामध्येच श्री कालिका मातेचे मंदिर बांधुन मातेची सेवा करत आहे.दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करून श्री कालिका मातेचा विशेष असा शृंगार करण्यात येत असतो.शहरातील अनेक भाविक हे नवरात्री काळामध्ये श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. #navratri #chhayavrutta #kalikamata https://www.instagram.com/p/CUzgdMxt2Ab/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
गौरी-गणपती निमित्ताने हिंगमिरे परिवाराची आकर्षक सजावट.... www.Chhayavrutta.in मनमाड : ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते. मनमाड येथील विवेकानंद नगर येथे राहणारे हिंगमिरे परिवार यांनी गौरी-गणपती निमित्ताने आपल्या घरी आकर्षक अशी सजावट केली आहे. सुंदर रंगीत फुले , पाण्याचा कारंजा आणि विद्युत रोषणाई करून गौराई साठी सुंदर अशी आरस बनवलेली आहे. श्री हिंगमिरे परिवार हे दरवर्षी गौरी-गणपती निमित्ताने विविध कल्पकतेने सजावट करत असतात. #gauriganpati #ganpatibappa #bappamorya #morya https://www.instagram.com/p/CTwul6dNTB8/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
काकडे परिवाराकडून गौरी पुजन संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड :गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व आहे . गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी वाजत गाजत या गौरींना घरात आणले जाते .असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. येथील काकडे परिवाराकडुन त्यांच्या निवासस्थानी सहपरिवार गौरी पुजन संपन्न झाले. यावेळी महालक्ष्मीच्या मुखवट्यांची सुंदर अशी सजावट करून छान अशी आरस सजवण्यात आली. गौरी गणपतीला नेवैद्य दाखवुन सुवसनिणींना हळदी-कुंकु देऊन प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी काकडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. #gauriganpati #morya #ganpatibappa #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwuaMDNZG5/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
देवकी हॉस्पिटल तर्फे प्रा.नितीन लालसरे यांचा सत्कार.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.रवींद्र राजपुत , डॉ. विजय राजपुत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.पुनम राजपुत यांच्या तर्फे मनमाड शहराचे भुमीपुत्र नामदार मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकार प्रा. श्री नितीनजी लालसरे यांचा देवकी हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला. डॉ. रविंद्र राजपुत यांनी मनमाड शहर तसेच नांदगाव , चांदवड ,येवला तालुक्यातील अनेक गरजु रुग्णांना नाशिक आणि मालेगाव येथे मिळणाऱ्या सुविधा अत्यंत अल्पदरात मनमाड शहरात उपल्ब्ध करून दिल्याचे संगितले.सत्काराला उत्तर देतांना प्रा.श्री लालसरे यांनी राजपुत परिवाराला रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन वाटचाल करत असल्याचे सांगितले , तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांचा समावेश करण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या एन. आय.सी. यु. , सेन्ट्रलाइज्ड ऑक्सिजन युनिट , व्हेंटिलेटर बेड्स इत्यादी सुविधांची प्रा. लालसरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व राजपुत परिवारास उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwt_2xN-fv/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
गायकवाड परिवाराचा घरगुती गणेशोत्सव.… www.Chhayavrutta.in मनमाड : आज गणेशोत्सवाचा 4 दिवस आज आपण मनमाड येथील साई कॅफे आणि साई कॉस्मेटिकचे संचालक श्री गायकवाड परिवार यांच्या येथील बाप्पा पाहुया... श्री गायकवाड परिवार यांनी आपल्या येथे बाप्पाची सुंदर अशी इको फ्रेंडली सजावट केली असुन , कागदाचा आणि पुठ्याचा वापर करून झाडाचा सुंदर देखावा तयार केला आहे.प्रसन्न स्वरूपातील बाप्पाची मुर्ती स्थापन केली आहे. #bappa #ganpatidecoration #ganpatibappa #chhayavrutta #morya #gaikwad #manmad https://www.instagram.com/p/CTwtvO7tKOZ/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील दत्त मंदिर रोड येथील श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाकडुन रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले. सध्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थितीचा विचार करून अनेक सार्वजनिक गणेश मंडळे हे सरकारने केलेल्या आव्हानानुसार यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करत आहे.याचाच विचार करून श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या वतीने समाजाच्या हिताचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये मनमाड शहरातील 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली , रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना गणेश मंडळाच्या वतीने सन्मान पत्र , झाडाचे रोप आणि कापडी पिशवी देऊन गौरविण्यात आले.या रक्तदान शिबिराचे उद्धाटन हे मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंहजी आणि शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या कडुन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रुद्र हनुमान गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. #blooddonation #bappa #ganpatibappamoraya #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwtO6tt03P/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
सानप परिवाराचा घरगुती गणेशोत्सव.… www.Chhayavrutta.in मनमाड : आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस आज आपण मनमाड येथील बजरंग टेंट अँड डेकोरेशनचे संचालक श्री सानप परिवार यांच्या येथील बाप्पा पाहुया... श्री सानप परिवार यांनी आपल्या येथे बाप्पाची सुंदर अशी फुलांची आकर्षक सजावट केली असुन , प्रसन्न स्वरूपातील बाप्पाची मुर्ती स्थापन केली आहे. https://www.instagram.com/p/CTwtATrtlMy/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
कलाकार साहिल साळसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातुन साजरा केला गणेशोत्सव....
कलाकार साहिल साळसकर यांनी रांगोळीच्या माध्यमातुन साजरा केला गणेशोत्सव….
मनमाड : अनेक भाविक हे आपल्या विविध कल्पकतेने आणि कलाकारीतुन गणेशोत्सव साजरा करत असतात. मनमाड येथील कलाकार श्री साहिल साळसकर यांनी मनमाडचे आराध्यदैवत श्री निलमनी गणेशाची सुंदर अशी रांगोळी काढुन गणेशोत्सव साजरा केला. श्री साळसकर हे नेहेमीच आपल्या कलेच्या माध्यमातुन सण आणि उत्सव साजरे करत असतात.
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
chhayavrutta · 3 years
Text
श्री पाटील परिवार यांचा घरगुती गणेशोत्सव....
श्री पाटील परिवार यांचा घरगुती गणेशोत्सव….
मनमाड : आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरी सुंदर अशी गणपती बाप्पांची सजावट करून स्थापना केली आहे ,पुढील दहा दिवस आपण शहरातील नागरिकांच्या घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. आज आपण मनमाड येथील सचिन चायनीजचे संचालक श्री नितिन पाटील यांच्या येथील बाप्पाचे दर्शन घेऊ या , श्री नितीन पाटील यांचा 14 वर्षांचा मुलगा श्री वैष्णव नितीन पाटील याने स्वतः पेपर न्यापकीन पासुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years
Text
मनमाड शहरात बाप्पाचे भक्ती-भावाने आगमन.....
मनमाड शहरात बाप्पाचे भक्ती-भावाने आगमन…..
मनमाड : मनमाड शहरात आणि परिसरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असुन , अनेक बाल-गोपाल आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात वाजतगाजत स्वागत केले आहे. यंदाच्या वर्षी देखील गणेशोत्सवार कोरोनाची सावट असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे मर्यादित स्वरूपात गणेश उत्सव साजरे करत आहे.घरगुती गणेश उत्सव नागरिक आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. शहरातील मनाचा गणपती श्री निलमणी गणेश मंदिर , गोदावरी…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
श्रीकृष्णाचे चित्र झाडाच्या पानावर रेखाटून साजरी केली गोकुळाष्टमी.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील कलाकार श्री साहिल साळसकर यांनी झाडाच्या पानावर श्रीकृष्णाचे चित्र रेखाटून पर्यावरणपुर्वक गोकुळाष्टमी साजरी केली. कलाकार श्री साहिल साळसकर हे नेहेमीच अनेक प्रसंगी वेगवेगळे चित्र , रांगोळी आणि कलाकृती साकारत असतात.गोकुळाष्टमी निमित्ताने त्यांनी निसर्गाने दिलेल्या साधनांचा वापर करून पर्यावरणपुर्वक गोकुळाष्टमी साजरी करण्याचे ठरवले होते.झाडाच्या पानावर नैसर्गीक रंगांचा वापर करून श्री कृष्णाचे चित्र रेखाटले. https://www.instagram.com/p/CTPN7GMtwMZ/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.... www.Chhayavrutta.in मनमाड :- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे भारतीय हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील क्रीडा विभागाद्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्या सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी मनमाड शहरातील नामवंत पत्रकार बंधूंना आमंत्रित करून त्यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करून मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत दिली जाणारी व्यायाम शाळा अनुदान रुपये पाच लाख रुपये साहित्य महाविद्यालयास प्राप्त झाले.या अत्याधुनिक जिमखान्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभाग उपप्राचार्या सौ. ज्योती पालवे, क्रिडा संचालक प्रा. दिनेश कराड, प्रा. महेंद्र वानखेडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.पी.व्ही.परदेशी,प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://www.instagram.com/p/CTPNToqt_69/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉ.असो. च्या ओपन लाईन शाखेच्या नविन कार्यकारिणीची निवड.... www.Chhayavrutta.in मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा ची बैठक झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष व भुसावळ मंडल अध्यक्ष सुधीरभाऊ जंजाले, भुसावळ मंडल सचिव आर.सी.रावल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड आदी उपस्थित होते. यावेळी ओपन लाईन शाखा ची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष-प्रदिपभाऊ गायकवाड उपाध्यक्ष-सम्राट गरुड सचिव-चेतन अहिरे कोषाध्यक्ष-रत्नदिप पगारे आदी ची निवड एकमताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नदीप पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव धिवर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन दिपक बागुल, राहुल केदारे, वसंत सोनवणे, राहुल केदारे, अंबादास मोरे आदी ने केले. https://www.instagram.com/p/CS12EvntP8n/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे मुलांना स्पोर्ट्स शुज चे वाटप... www.Chhayavrutta.in मनमाड : 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त मनमाड शहरातील भगवान महर्शी वाल्मिकी क्रीडांगण येथे भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी सराव करणाऱ्या ११ मुलांना रोटरी क्लब मनमाड तर्फे स्पोर्ट्स शूज श्रीमती लक्ष्मी बाई सत्यप्रकाश शर्मा ह्यांचे तर्फे क्लब सचिव श्री. कौशल शर्मा यांच्या हस्ते देण्यात आले. मनमाड रोटरी क्लब हे नेहेमीच समाजासाठी वेग-वेगळे उपक्रम राबवत असते , याचाच एक भाग म्हणुन भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न आणि सराव करणाऱ्या मुलांना भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा एवढाच ह्या या मागचा उद्देश ठेऊन या मुलांना स्पोर्ट्स शुजचे रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे वाटप करण्यात आले. मनमाड रोटरी क्लब मधील सदस्य श्री. आनंद लोढा , श्री. अनुप ओचानी , श्री. लवकुमार माने , श्री. राजेंद्र पवार यांनी ह्या मुलांसाठी शुज साठी मोलाचे योगदान दिले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लब चे अध्यक्ष श्री. डॉ.भूषण शर्मा , श्री. अनिल दादा काकडे , श्री. गुरुजीतसिंग कांत , श्री.सुभाष गुजराथी सर , श्री. देवराम सदगीर , श्री. आनंद काकडे ह्यांनी प्रयत्न केले . https://www.instagram.com/p/CS12B8ttEn5/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
स्वातंत्र्यदिना निमित्त डायमंड सामाजिक संस्थेकडुन महापुरुषांना अभिवादन.... www.Chhayavrutta.in मनमाड : येथील डायमंड सामाजिक संस्था आणि डायमंड ग्रुप कडुन 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , क्रांतीवीर वसंतराव नाईक , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डायमंड सामाजिक संस्थेद्वारे नेहेमी अनेक उपक्रम राबवुन सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रम साजरे केले जात असतात , सध्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थिती मुळे आणि शासनाच्या आदेशांचे व नियमांचे पालन करून यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिना निमित्ताने कुठल्याही सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता आपल्या भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान महापुरुषांना अभिवादन करून यंदाचा वर्षीचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष श्री रत्नदीप पगारे ,कार्याध्यक्ष श्री केतन जाधव , सचिव श्री दीपक केदारे, खजिनदार श्री फिरोज पठाण, सह-खजिनदार श्री अविनाश चांगटे, उपाध्यक्ष श्री नरेश उगले ,श्री पी. इ .श्री मधे साहेब , उपाध्यक्ष श्री प्रवीण शार्दूल ,श्री निकम साहेब , श्री मंगेश जगताप आदी सदस्य उपस्थित होते. https://www.instagram.com/p/CS119EuNEdA/?utm_medium=tumblr
0 notes
chhayavrutta · 3 years
Photo
Tumblr media
रुद्र हनुमान मित्र मंडळाकडुन स्वातंत्र्य दिना निमित्त वेटलिफ्टिंग खेळाडूंचा सत्कार.... www.Chhayavrutta.in मनमाड : ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस ( अमृत महोत्सवी वर्ष ) संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मनमाड शहरात देखील ठिक ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम पार पडले . आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनी दुग्ध शर्करा योग जुळून आला , म्हणजेच मनमाड शहरातील जय भवानी व्यायाम शाळेचे खेळाडू यांनी पंजाब पतियाळा येथे राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या ,ह्या स्पर्धामध्ये मनमाड शहरातील खेळाडू यांनी उज्वल असे यश संपादन करून विविध वजनी गटात सुवर्ण पदक , रौप्य पदक , कांस्य पदक अशी दिमाखदार कामगिरी करत मनमाड शहराचे नाव देखील मोठे केले. याचाच एक भाग म्हणून मनमाड येथील दत्त मंदिर रोड येथील श्री. रुद्र हनुमान मित्र मंडळातर्फे आकांशा किशोर व्यवहारे ४० किलो वजनी गटात - सुवर्ण पदक ,पूजा राजेश परदेशी ५९ किलो वजनी गटात - कांस्य पदक ,संध्या भास्कर सरोदे ७१ किलो वजनी गटात - रौप्य पदक ,मुकुंद संतोष आहिरे ५५ किलो वजनी गटात - रौप्य पदक, धनश्री विनोद बेदाडे ५९ किलो वजनी गटात - चौथा क्रमांक या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक श्री. प्रवीण व्यवहारे सर यांच्या उपस्थित येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे भारत मातेचे पुजन करून सर्वांचा जाहीर सत्कार उपस्थित मान्यवर श्री. प्रदनेश खांदाट , श्री. मकरंद कुलकर्णी , श्री. पंकज खताळ , श्री. अनिरुद्ध तोंडे यांच्या हस्ते करण्यात आला आणि प्रवीण व्यवहारे सरांचा सत्कार मंडळाच्या सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या कार्यक्रमास श्री. विकास दादा काकडे यांनी सूत्र संचालन करून उपस्थितांसमोर ���पले विचार मांडले आणि श्री. प्रवीण व्यवहारे सरांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला . हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी प्रयत्न केले . https://www.instagram.com/p/CS11xAoNGCi/?utm_medium=tumblr
0 notes