Tumgik
ajitakhadke · 4 years
Text
छत्तीसगढ़ी खाद्य संस्कृति
छत्तीसगढ़! रामायणातला दक्षिण कोसल! रामाला उष्टी बोरं देऊन प्रेमाने जिंकणारी शबरी इथलीच! शबरीसारखीच इथली माणसं साधी, प्रेमळ! अगदी तशीच इथली खाद्य संस्कृति! फारसं तेलतूप किंवा मसाले न वापरताही अत्यंत चवीष्ट आणि तब्येतीलाही चांगलं असलेलं जेवण कसं बनवावं ते इथल्या लोकांकडून शिकावं.
छत्तीसगढ़ला "धान का कटोरा" म्हणतात. विविध प्रकारचा सुवासिक तांदूळ इथे तयार होतो, त्यामुळे खाद्य पदार्थांचा मुख्य घटक तांदूळ, वेगवेगळ्या डाळीही वापरतात. तेल मुख्यतः सरसोंचं वापरल्या जातं. साखरे ऐवजी गूळच वापरल्या जातो. रोजचं जेवण वरण भात भाजीचं, पोळी फारशी खात नाहीत. भाज्या घरामागच्या परसात, ज्याला कोला म्हणतात त्यात लावलेल्या असतात, शिवाय प्रत्येक गावात ४-५ तरी तलाव असतात त्यातले मासेही जेवणात वरचेवर असतातच.
Tumblr media
उन्हाळ्यात इथल्या भीषण गर्मीत थंडावा देणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे बोरेबासी, याला बंगाल व ओडिसात पाँता भात किंवा पाखाल भात म्हणतात हा चक्रधर स्वामींनाही आवडायचा असा उल्लेख दुर्गाबाई भागवतांनी आपल्या "खमंग" या पुस्तकात केला आहे. सकाळी शिजवलेला भात पाणी घालून ठेवायचा, संध्याकाळी त्यात दही, मीठ टाकून कांद्या बरोबर खायचा, ह्याला बोरे म्हणतात व रात्री शिजवलेला भात पाणी टाकून ठेवला व सकाळी खाल्ला कि बासी म्हणतात. याशिवाय नाश्त्याचे पदार्थ म्हणजे चीला (तांदूळ पिठाची धिरडी) ह्यात. मीठ, मिरची घालून नुनहा चीला व गूळ घालून गुरहा चीला बनवितात. या शिवाय फरा (हा ही मीठ घालून खारा व उसाच्या रसात शिजवून गोड बनवितात) अंगकार रोटी (तांदूळाचे पीठ पोळीच्या कणिकेप्रमाणे भिजवतात तापलेल्या तव्यावर पळसाची पाने ठेवून त्यावर हे पीठ थापतात त्यावर पुन्हा पाने ठेवून खमंग भाजतात) चौसेला म्हणजे तांदूळ पीठाची पुरी वगैरे अनेक पदार्थ आहेत. या धिरड्यांबरोबर किंवा फराबरोबर पताल म्हणजे टोमॅटोची चटणी खाल्ली जाते.
हरेली किंवा हरियाली अमावास्या इथला एक महत्वाचा सण आहे, त्या दिवशी मालपुव्यासारखे बबरा चीला हे पक्वान्न बनविल्या जाते. पोळा हा ही मोठा सण असतो, त्या दिवशी मीठी खुरमी बनवितात. हा पदार्थ हाताने बनविलेल्या शंकरपाळ्यांसारखा असतो. बिहारच्या प्रसिध्द छठ़ पूजेसाठी बनविल्या जाणारा ठेकुआ साधारण असाच असतो. होळी, दिवाळीत कुसली (करंज्या नागपूरच्या भागात संक्रांतिला तिळाच्या करंज्या म्हणजे कोसल्या बनविल्या जातात) ठेठरी म्हणजे बेसन व तांदूळ पिठाची कडबोळी, खुरमी, पपची म्हणजे गुळाच्या पाकातले शंकरपाळे वगैरे पदार्थ करतात. याशिवाय आइरसा, देहरौरी, पिडिया, हे गोड पदार्थ ही प्रसिध्द आहेत.
लग्नात केवचनीया हे परंपरागत लाडू करतात. यात तांदूळाचे पीठ तुपावर खमंग परतून गुळाच्या पाकात टाकून, लाडू वळतात. हा फार कौशल्याचा प्रकार आहे. याशिवाय मुली बरोबर द्यायच्या फराळाच्या सामानात छींट चे लाडू आत पैसा घालून ठेवतात. मुलीला दिवस राहिले कि सातव्या महिन्यात तिला कुसली व पपची खाऊ घालतात. उडदाच्या डाळीचा वडा, ज्याला बरा म्हणतात, तो सुखदुःखाचा साथी मानल्या जातो कारण लग्न, सणवार अशा मंगल प्रसंगीही हा बनवितात तसेच मृत्यूभोज च्या वेळीही बनवितात. इढहर हा उडदाची डाळ, कोचई पत्ता म्हणजे अळूची पाने व दही याने बनविल्या जाणारा पदार्थ; तसेच अशाच प्रकाराचा डुबकी कढ़ी हे पदार्थ ही जेवणाची शोभा वाढवितात
इथल्या भाज्या व खास करून पालेभाज्या हा एक वेगळाच विषय आहे. अगदी छत्तीसगढ़च्या छत्तीस भाज्या प्रसिध्द आहेत. काही भाज्या जसे कोलियारी, चरोटा (टाकळा), चारपनिया खास पावसाळ्याच्या सुरूवातीला येतात व पोटासाठी चांगल्या असतात. यातलीच खेडा भाजी प्रसिध्द आहे. "मथुराका पेढा और छत्तीसगढ़ का खेडा" ही म्हण प्रसिध्द आहे. मी तेव्हा छत्तीसगढ़ला नवीनच आले होते. आम्ही कोरब्याला  N.T.P.C. Colony मधे राहत होतो इथे मला वेगवेग��्या राज्यांमधून आलेल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या छत्तीसगढ़ी लोक तुलनेने कमी होते. मला बाजारातल्या वेगवेगळ्या भाज्या पाहून बनविण्याची इच्छा व्हायची. मी खेडा भाजी बनवायला घेतली, मोठी मोठी जाड हिरवी देठं असलेली ही पालेभाजी बनविण्याची रीत मी भाजीवालीलाच विचारली, पानांबरोबर देठही बारीक चिरून टाकले, भाजी अगदी छान दिसत होती, मात्र पहिला घास घेताच माझी चूक लक्षात आली भाजी देठांसकट चांगली शिजली असली तरी देठं शेवग्यांच्या शेंगेप्रमाणे असल्याने गिळता येत नव्हती. त्यानंतर मात्र चार लोकांना विचारल्याशिवाय इथल्या भाज्या बनवायच्या नाहीत असं मी ठरवलं आणि त्याचा मला फायदाच झाला. आता मी बहुतेक सगळ्या भाज्या बनविते आणि त्या सगळ्यांना आवडतात. पोई, करमेता, शेवग्याची पानं, बर्रा भाजी (करडई) या सारख्या भाज्या नुसत्या तेलावर लसूण मिर्ची बरोबर परततात. 
काही भाज्या चण्याची भिजवलेली डाळ घालून करतात. गोहार भाजी ही ही एक विशेष भाजी आहे ही लसोढा म्हणजे भोकराची अगदी बारीक फळं असतात, यात बरोबरीने दही किंवा काही आंबट टाकावे लागते, यात कांदा, लसूण व काही मसाले टाकतात याची चव मांसाहाराप्रमाणे असते असे म्हणतात (कारण  मी  शाकाहारी आहे). या शिवाय करील म्हणजे कोवळे बांबू मात्र आता बांबूचे उत्पादन कमी झाल्याने यावर बंदी आली आहे. पुटु म्हणजे बटन मश्रुम, अनेक प्रकारचे मश्रुम प्राचीन काळापासून वापरीत. आता मात्र आधुनिक पध्दतिने मश्रुम उगवतात. सुरण, मिट्टी आलू सारखे अनेक कंद, यांच्या जेवणात असतात. फळं म्हटल्यास जंगलातील मिळतिल तीच म्हणजे आवळे, बोरं, सीताफळं, जांभळं, चार (चारोळ्यांची फळं), विलायती चिंच वगैरे मात्र आता छ.ग. सरकार व केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी फल उत्पादनाचे प्रयोग होत आहेत.
वाळवणाचे किंवा बेगमीचे पदार्थ म्हणजे बिजौरी किंवा रखिया बडी,यात उडदाची डाळ भिजवून वाटतात व त्यात पांढर्या कोहळ्याचा कीस, मीठ, मिरची, तीळ वगैरे घालून छोट्या वड्या घालून वाळवतात. नंतर या भाजीत घालतात. तसेच धानाच्या लाह्या धुवून त्यात मीठ मिरची, कोथिंबीर व शिजलेला साबुदाणा घालतात व छोट्या वड्या घालून वाळवतात. यांना तळून खातात. याशिवाय बोरं वाळवून बोरकूट, कैर्या वाळवून आमचूर करतात. आंबाडीची फुलं व मोहाची फुलं वाळवून कारणपरत्वे त्यांचा वापर करतात. तसेच बर्याच भाज्याही वाळवून पावसाळ्याची बेगमी करून ठेवतात.
मी स्वतः शाकाहारी असले तरी इथला एक पारंपारिक पदार्थ सांगावासा वाटतो तो म्हणजे बांस किंवा बांबू चिकन, यात धणे, जीरे, आले, मिरची, लसूण पाट्यावर वाटायचे कढईत लोणी टाकून हा मसाला छान भाजायचा मग दही, टमाटर घालून परतायचे मग चिकनचे तुकडे घालून थोड्या वेळ ठेवायचं नंतर हे मिश्रण पोकळ बांबूत भरून त्याच्या दोन्ही कडा भिजवलेल्या कणकेने बंद करायच्या आता हा बांबू मातीच्या भांड्यात ठेवायचा त्याच्या सभोवार गोवर्या, लाकडं, कोळसे रचून पेटवायचे बांबू काळा झाला कि बाहेर काढायचा चिकन तयार! बस्तरमधली लाल मुंग्यांची चटणीही प्रसिध्द आहे.
एका विशेष पदार्थाबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते, तो म्हणजे तीखुर! (curcuma angustifolia) हा हळदीच्या जातीचा कंद आहे व अतिशय औषधी आहे, मात्र आता हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मी जबलपुरची, तिथल्या प्रसिध्द बडकुलच्या जिलेबी ला दीडशे वर्षांची परंपरा आहे व ती जिलेबी खवा व या तीखुरच्याच संयोगाने बनते, हे जेव्हा मी वाचलं तेव्हा आपल्या पूर्वजांबद्दल आदर वाटला होता, तेव्हा जबलपुरजवळ नरसिंहपुर येथे हा कंद मिळायचा, आता छ.ग. सरकार "संजीवनी" या आपल्या वनोपज (जंगलातिल पदार्थ) विकणार्या दुकानातून ह्या कंदाची पावडर विकते कारण याला स्वच्छ करणे कठिण असते. याला ८-१० वेळा धुवून खाली राहिलेला स्टार्च उपयोगात आणतात. बस्तरचे आदिवासी यात पाणी व मध टाकून घेतात, ज्यामुळे उन्हाळ्यात लू लागत नाही. याच्यापासून बर्फी व शिरा बनवितात, जो उपासाला चालतो.
दोन छत्तीसगढ़ी रेसिपीज देत आहे.
इढहर 
साहित्य: 1वाटी भिजवून वाटलेली उडदाची डाळ,आले, मिरच्या, कोथिंबिरीची वाटलेली गोळी, अर्धा किलो दही, मीठ धणेपूड, हळद, मोहरी, तेल, कडीपत्ता, बेसन, अळूची २-३ पाने.
कृति: अळूची पाने धुवून चिरणे व उडदाच्या वाटलेल्या डाळीत मिसळून हलके होईपर्यंत फेटणे, त्यात मीठ व वाटलेला मसाला घालणे मग तेलाचा हात लावलेल्या कुकरच्या डब्यात ठेवून शिटी न लावता दहा मिनिटे उकडणे, थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून तळून घेणे. दुसरीकडे कढीची तयारी करणे, दह्यात बेसन पाणी, मीठ घालणे, तेलाची फोडणी करून, त्यात हळद, कडीपत्ता, धणेपूड घालून उकळल्यावर वड्या सोडणे. यात टोमॅटोही घालतात.
फरा
साहित्य: एक वाटी तांदूळाचे पीठ, २-३ हिरव्या मिर्च्या, २-३ सोललेल्या लसूण पाकळ्या,फोडणीसाठी तेल, मोहरी हिंग, अर्धा वाटी भात.
कृति: मिर्च्या लसूण बारीक चिरावे. भात व तांदूळाचे पीठ मीठ घालून एकत्र मिसळून गोळा करावा. त्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटाला तेलाचा हात लावून त्यावर एक एक गोळा ठेवून त्याला लांब वातीसारखा आकार द्यावा असे सगळ्या गोळ्यांचे करावे. नंतर फोडणीसाठी तेल तापवून मिरची, लसणाचे तुकडे व मोहरीची फोडणी करावी, त्यात अंदाजाने सगळे फरा बुडतिल एवढे पाणी घालावे, पाण्याला चांगली उकळी आली कि एक एक फरा सोडावा. पूर्ण पाणी आटले कि गॅस बंद करावा, टोमॅटोच्या चटणी सोबत द्यावे ही कृति माझ्या मैत्रिणीने सांगितली, फरा इडलीपात्रात उकडून नंतर फोडणी ही देतात. मात्र हा फरा फारच कोरडा होतो.
अशी ही छत्तीसगढ़ची संपन्न खाद्य संस्कृति! अजूनही इथे बर्याच गावांमधे तांदूळाचे पीठ करायला ढेंकीचा वापर होतो, चटणी वाटायला पाटा वरवंटा आणि मातीच्या भांड्यांचा पदार्थ शिजविण्यासाठी वापर होतो (अर्थात् हे मी गावांमधलं सांगते आहे) त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद किंवा "मिट्टी  की  सौंधी  खुशबू" असते. इथे बिलासपुर, रायपुर सारख्या शहरांमधे माॅल संस्कृति आली आहे, कोरबा, अंबिकापुर, जगदलपुरसारखी शहरं झपाट्याने बदलत आहेत. तरीही केवळ छत्तीसगढ़ी खाणं मिळणारी रेस्टाॅरंट्स जवळ जवळ नाहीतच. शहरांमधे चहाच्या टपरीपासून स्टार हाॅटेल्स पर्यंत कुठेच माझ्या माहितीत तरी छत्तीसगढ़ी पदार्थ मिळत नाहीत फक्त स्टेशन किंवा एखाद्या टपरीवर देहाती बरा मिळतो.
आनंदाची गोष्ट इतकीच कि मागच्या वर्षी ४ युवकांनी मिळून "द कॅफे कॅटल" हे केवळ छत्तीसगढ़ी पदार्थांचं रेस्टारंट सुरू केलं, पण मी आत्ता काही दिवसांपूर्वी इथे गेले तेव्हा दुसरेही फास्ट फुडचे पदार्थ त्यांना ठेवावे लागतात असं कळलं तरीही फरा, चीला आणि त्यांचे अनेक प्रकार त्यांनी ठेवले आहेत आणि सगळेच छान आहेत, सजावटही साजेशी आहे. दोन तास आधी ऑर्डर दिली तर छत्तीसगढ़ी जेवणही मिळते.
रायपुर ��ा राजधानीच्या ठिकाणी राज्याच्या संस्कृति विभागातर्फे २६ जानेवारी २०१६ ला इथलं पारंपारिक खाणं जपलं जावं म्हणून "गढ़  कलेवा" हे रेस्टाॅरंट सुरू केलं आहे. सरगुजा व बस्तरच्या कलाकारांनी आपल्या शिल्पकलेने ह्याला सजवलं आहे. इथे जवळ जवळ ३५-३६ छत्तीसगढ़ी खाद्य पदार्थ मिळतील. इथली आणखी विशेषता म्हणजे पदार्थ फूलकांसा या परंपरागत धातूच्या भाड्यांमधे वाढले ज़ातात व पॅकिंगसाठी पानाचे द्रोण व पत्रावळी वापरल्या जातात. छत्तीसगढ़ मध्य प्रदेश सोबत असताना मागासलेलं प्रदेश होतं, १ नोव्हेंबर २००० साली हे स्वतंत्र राज्य झालं लोकांचा न्यूनगंड कमी होऊ लागला आपले पदार्थही पौष्टिक, चवीष्ट आहेत असा विश्वास वाटू लागला सोशल मिडियानेही यात भर घातली म्हणून आता कोणीही अभिमानाने म्हणू शकतो कि "छत्तीसगढ़ी खईखजाना सबले बढ़िया".
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
बाहुली घर
दिवाळी जवळ आली कि मला ते घर फार आठवतं जबलपुरच्या माझ्या शाळेच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच होतं. सुबकसं, चुन्याने रंगविलेलं,पण त्याही पेक्षा आकर्षक होतं,त्या घराच्या अंगणात असलेलं माती विटांनी बांधलेलं दुमजली  खेळघर किंवा बाहुलीघर.
या घरात जबलपुरला मिळणारी मातीची खेळभांडी ठेवल्या जात. पणत्या पेटवल्या जात, आणि वर एक सुंदरसा कागदी कंदील लटकविल्या जाई. माझ्या मोठ्या बहिणीच्या आठवणीतही आमच्या मोठ्या अंगणात बांधलेली  घरकुलं आहेत माझ्या आठवणीतही घरकुल, त्याच्या समोरची रांगोळी, घरकुलावरची पणत्यांची रांग आणि त्याच्याजवळ बांबूला लटकविलेला कागदी कंदिलआणि त्यात आईने पहाटे ठेवलेली पेटतीपणती अगदी चित्रासारखी समोर येते. नंतर मात्र काही वर्षांनी मला ही घरं कुठेच दिसली नाहीत, नाही म्हणायला मातीची खेळभांडी लाल, गुलाबी, हिरवे  असे अभ्रकाचे चमचमते रंग घेऊन विकायला येत.
Tumblr media
अशीच  वर्षे सरत गेली, दिवाळीचं रूप बदलत गेलं, माझी मुलं थोडी मोठी झाल्यावर या घरकुल किंवा किल्ल्याचा प्रयोग करून पाहिला पण तेव्हा सुट्टया नसणे, परीक्षांचे दिवस या मुळे फार काही जमले नाही. पण हे घर मनांत घर करून होतं. या बद्दल माहिती मिळवायची होती, मात्र फारसं वाचनात आलं नाही. दरम्यान च्या काळात इंटरनेटचा प्रवेश झाला आणि गुगल वरून कितीतरी प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. या घराबद्दलचा शोध सुरू होताच जबलपुरच्या जवळ म्हणून मी बुंदेल खंड बद्दल वाचू लागले कदाचित ते घर ज्यांचं होतं त्यांची भाषा मला बुंदेली वाटली असावी, मी बुंदेलखंड, तिथली दिवाळीची पध्दत असं बरंच शोधत गेले, पणकुठेच काही उल्लेख ही मिळत नव्हता.  
आणि अचानक एक दिवस जयदीप शेखर यांचा कभी कभार हा ब्लाॅग वाचनात आला आणि त्यात या घराला घरौंदा किंवा हटरी किंवा घरकुंडा म्हणतात हे समजले. आणखीन ही ब्लाॅग्ज वाचले, माझ्या बिहार व झारखंडच्या मैत्रिणींशी बोलले कारण ही घरकुलाची प्रथा प्रामुख्याने बिहार व झारखंड मधे आहे हे लक्षात आले. आपल्या मातीशी जोडणारी ही प्रथा सुरू झाली ते प्रभु रामचंद्रांचं लंकाविजयानंतर अयोध्येत आगमन झालं तेव्हापासून ! त्यांच्या आगमनाने अयोध्देतली घरं चैतन्यमयी झाली याचीआठवण म्हणून ही प्रथा सुरू झाली. दिवाळीच्या काही दिवस आधी घरातल्या अविवाहित मुली माती, विटा, लाकडांचे तुकडे गोळा करून दोन किंवा तीन मजली घर, गच्ची, जिना असं सारं बनवितात. यात मुलेही मदत करतात. मुली त्यांना हवे तसे घरकुल बनवितात, सजवितात.
दिवाळीच्या दिवशी या घरासमोर रांगोळी काढतांत. मातीची खेळणी, खेळण्यातलं जातं, चूल,  इतर भांडी यांच्यात साळीच्या लाह्या व बत्तासे भरतात, ही प्रसाद भरलेली खेळणी या घरात ठेवली जातात, संध्याकाळी आधी या घराची पूजा होते, त्यानंतर मुख्य घरातली पूजा होते. मात्र आता ही प्रथा हळुहळु लोप पावते आहे. मातीच्या जागी बाजारातून थर्माकोल, टीन, पुठ्ठा यांनी बनविलेली घरं आणल्या जातात. कारण आजकाल माती ही मिळत नाही आणि मातीत हात घालायलाही कोणाला आवडत नाही. पटना आणि बिहारच्या काही शहरात याच्या स्पर्धाही  होतात. तसेच विदर्भाच्या काही गावांमधेही घरकुंड केले जातात, त्यात अगदी विहीर वगैरेही दाखवतात.
माझ्या मते  यातला धार्मिक पक्ष बाजूला ठेवला तर निदान ज्यांना शक्य आहे, त्यांच्या साठी मुलांची निसर्गाशी ओळख करून देण्याची सुंदर संधी आहे, यात मुलं स्केल, रंग, पोत कितीतरी बाजूंनी आपली कल्पनाशक्ती वापरू शकतात.
क्रुत्रिम डाॅल हाऊसवर हजारो रुपये खर्चण्यापेक्षा असं नैसर्गिक घरकुल कुणालाही आवडेल.
0 notes
ajitakhadke · 4 years
Link
परवा गुलाबजाम चित्रपट पाहिला, विशेष म्हणजे त्यात मराठी पारंपरिक पदार्थांचे जाणवून दिलेले महत्व खूपच आवडले. आपल्या पातळ भाज्या, उसळी, चटण्या कोशिंबिरी सारंच कसं चविष्ट आणि आरोग्यदायी.. प्रसादाचा शिरा, उकडीचे मोदक, थालीपिठ किती नावे घ्यावीत. भारतातल्या प्रत्येक राज्यातले पारंपारिक भोजन आरोग्यपूर्णच आहे..  
मराठी पदार्थांची लोकप्रियता खूप व्यापक आहे.  मराठी  पदार्थांवर मी लिहलेला लेख share करीत आहे  वाचून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
0 notes
ajitakhadke · 4 years
Link
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
साथी क्रोशिया - भाग 2
इंटर नेट के आ जाने से, धीरे धीरे बहुत कुछ बदलता गया, मैंने क्रोशिया के विषय में कब से खोजना शुरू किया, यह तो याद नहीं लेकिन पहली web site ,जिसने मुझे क्रोशिया का व्यापक संसार दिखाया, वह अभी तक याद है। Chrochet central free patterns.com इस एक ही साईट पर नवजात शिशु के कपडों से लेकर बडों के कपडों तक और drawing room से लेकर bathroom तक हर कमरे के लिए क्रोशिया के नमूने थे इसके अलावा ज्वेलरी, बॅग्ज इत्यादी बहुत सी वस्तुएॅं थी।
Tumblr media
नेट से ही मैने क्रोशिया का इतिहास जाना।
क्रोशिया का उद्गम कहाॅं से हुआ, इस विषय में अलग अलग विचार है, कुछ शोधकर्ताओं के अनुसार चीन से इसकी शुरुआत हुई, और तिबेट के रास्ते ये अरेबिया होता हुआ स्पेन पहुॅंचा, तो अन्य विद्वानों के अनुसार यह युरोप से शुरू हुआ। वैसे यह बहुत प्राचीन कला है, परंतु इसका विकास सोलहवीं सदी से होने लगा, क्रोशे का क्रो शब्द फ्रेंच भाषा से आया है,जिसका अर्थ होता है, हुक ! फ्रेंच भाषा में इसे क्रोशे लेस व इग्लैंड ���ें चेन लेस कहा जाता था। इटाली मे इसे नन् लेस या नन् वर्क कहते थे, क्योंकी क्रिश्चन नन्स चर्च के लिए उपयोग में आने वाले वस्र क्रोशिया का उपयोग कर बनाती थी। 
शुरू में क्रोशिया fisher net के लिए, hunting के लिए काम में लाया जाता था। विक्टोरियन काल में गाउन्स, वेडिंग गाउन्स, बास्केट्स, टेबल क्लाॅथ आदि बनाते थे। वर्तमान समय में स्कल्प्चर्स भी क्रोशिया से बनाए जाते है। धीरे धीरे क्रोशिया के नमूने, स्टीचेस, धागे सब में बदलाव होता गया, और अब अधिक विकसित रूप में हम क्रोशिया को देखते है।
अब यह केवल स्त्रियों तक ही सीमित नहीं है, वरन् अनेक पुरूष भी इसमें रूची ले रहे है। Jonah's Hands यह face book page एक ऐसे बच्चे की कहानी बताता है, जिसने बहुत ही कम उम्र से क्रोशे करना शुरू किया और जल्दी ही उसमें पारंगत हो गया। 70 और 80 के दशक में यू पिन की शाॅल, पोंचो, साडी पर टाॅंके जाने वाले फूल आदि का बडा चलन था, यह भी क्रोशिया के साथ ही किया जाता था,बाॅबी निटर या फ्रेंच निटर, जिससे लेस बनाई जाती है, यह भी क्रोशिया की मदद से ही किया जाता है। लूम निटर, ब्रुम स्टिक, इनकी मदत ले कर क्रोशा के नायाब नमूने बनाए जाते है।
प्लास्टिक थैलियों का अपसाइकलिंग भी क्रोशा  द्वारा अच्छेसे होता है।
प्रदूषण से घिरे वर्तमान समय में हम विभिन्न प्राक्रुतिक  रेशों का जैसे कपास, नारियल, जूट आदि का उपयोग कर क्रोशा से विभिन्न उपयोगी वस्तुएॅं बना सकते है। हस्तकला की वस्तुओं का अपना महत्व है,भारत में यह कला भले ही अंग्रेजी मिशनरी लाये हो, लेकिन भारतीय कलाकार अपने अंगभूत हस्तकौशल्य से इसे नयी उॅंचाई पर पहुॅंचा सकते है।
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
निसर्ग आपल्या जवळचा
निसर्ग आपल्या घरात 
 तिची बोटं पटापट चालत होती. केळीच्या  सोपटात  टपोरी मोगर्याची  फुलं  आणि  मधे मधे अबोलीची  फुलं  घालून  तिचा  गजरा  पूर्ण  झाला ,  तिने  तो  ताज्या  केळीच्या  पानात   बांधून मला दिला जणू काही सार्या  निसर्गाचा  सुवास  माझ्या हातात सामावला. वस्तू  बनविण्यापासून पॅकिंग पर्यत कुठेच कृत्रिमतेचा  अडथळा  नाही.
Tumblr media
आणि  मला  आठवलं  माझ्या लहानपणी  तरी  कुठे  होती  कृत्रिमता,  ना  वस्तूत  ना पॅकिंगमधे ,आमच्या  जबलपुरला  घराजवळच  "गोविंद  भंडार" होतं, बंगाली  मिठाईचं दुकान!  मिठाई  किंवा  दही  मातीच्या पसरट  भांड्यात  मिळायचं,  भांड्याच्या  तोंडाला  पळसाचं  पान  ज्यूटच्या  दोरीने पक्कं  बांधून  त्याच  दोरीचं  हॅडल  केलेलं,  सायकलला  बांधून नेलं  तरी  काय बिशाद  एकही थेंब  सांडेल तर! आज  मात्र  गोविंद  भंडार  जमीनदोस्त  झालंय,  त्याच्या  समोरचा  माझा  आवडता  कदंब  त्याची  चेंडूसारखी  फुलं  घेऊन  केव्हाच  नाहीसा  झालाय. या  दुकानाबरोबरच  मला  आठवतंय  आमच्यावेळेस  चाटही  पळसाच्या  पानातच  मिळायची  आणि  कुल्फीही,  चमचे  म्हणजे  तासलेल्या  बांबूच्या  पसरट  काड्या,  स्वच्छताही   राखली जायची  आणि  हे  गायींचं  खाणंच  असल्याने  परिसरही  स्वच्छ  राहत  होता. 
 हे  सारं  आठवायचं  कारण म्हणजे  आज 5 जून  पर्यावरण  दिन!  सकाळपासूनच  कार्यक्रमांची  रेलचेल  राहील,  प्रभातफेरी,  भाषणं,  निरनिराळया  स्पर्धा  असं सारं साग्रसंगीत  होईल,  कदाचित भीषण  दुष्काळाच्या  पार्श्वभूमिमुळे  या  दिवसाचं  महत्व जास्त अधोरेखित होईल,  पण  दुसर्या दिवसापासून  ज्यांना  दुष्काळाची  झळ बसली नाही  असे  माझ्यासारखे  लोक  सारं  विसरतिल  आणि  आपल्या दिखाऊ,कृत्रिम  जगात  मश्गूल  होतिल!
मात्र  आपण वेळीच जागे झालोनाही   तर  आपल्यालाही   झळ  बसणारच   आहे.  पाणी  बचत, ऊर्जा बचतीबद्दल   बरंच   बोलल्या  व  लिहिल्या  गेलं  आहे, बचतीचे  ते  सारे   उपाय   तर प्रत्येकाने   करायलाच   हवेत  पण  त्याबरोबरच   आपण   निसर्गाजवळ जा यला हवे  याचा अर्थ   केवळ   निसर्गात  फिरणे  असा नाही   तर  आपण   घरात  ज्या   वस्तू   वापरतो   त्या   जास्तीत   जास्त   निसर्गाजवळ   जाणार्या   असाव्या.आपली कुठलीही  कृति  पर्यावरणाचा   नाश   करणारी नसावी.
अगदी  साधे   उदाहरण  म्हणजे थंड  पाण्यासाठी   माठाचा  वापर  करणे,  लोखंडी  कढया,पळ्या किंवाबीडाचा  तवा वापरणे, पाणी  साठविण्यासाठी   तांब्याचा   वापर  करणे, प्लास्टिकचा   वापर  पूर्णपणे  थाबविणे   ही   यादी   बरीच  मोठी  होऊ शकते. ओल्या  कचर्याचे  खत   किंवा   बायो  गॅस  म्हणून  उपयोग  आणि  सौर  ऊर्जेचा  जास्तीत   जास्त   वापर  यावरही प्रत्येकाने  जमेल  तसा  अंमल  करायला  हवा. खरं  तर   आपल्यापैकी  प्रत्येकालाच   निसर्ग   आवडतो.  त्यामुळे आपली  जीवनशैली  निसर्गानुकूल  करणे   आपले  कर्तव्यच   आहे,मात्र  जाहिराती, बाजार   आणि   आपल्या  आजूबाजूचे  लोक  यांचा  इतका दबाव   असतो   कि   इच्छा  असूनही   आपण  प्रयत्न  करीत नाही, मात्र   आता  आपल्याला    विवेकाने   वागायला   लागेल.कायचुकीचे    आणि   काय  बरोबर  हे   आपल्यालाच   ठरवायचे  आहे. खरे तर  अगदी  धिम्या गतीने  का  होईना   पण   पर्यावरणविषयक   जागृती  होते  आहे  सोशल  मिडियावर  शहरी शेती   किंवा   शाश्वत  जीवनपध्दती   असे   समूह   तयार  होत  आहेत, दुष्काळाविरूध्द  लढणारे  नाम फाउंडेशनचे  काम  सगळ्यांसमोर  आहेच तेव्हा  प्रत्येकाने  आपला  खारीचा  वाटा  उचलायला  हवा. 
 गेली  25-30मी छत्तीसगडमधे राहते  आहे,  इथल्या  लोकांमधे  कृत्रिमता नव्हतीच  कारण  निसर्गही   त्यांच्यापासून  वेगळा  नव्हता  त्यांची  खाद्यसंस्कृती,  नृत्ये,  गाणी  सण  सारं  काही  निसर्गाच्या  जोडीनच,त्यांची  एक   छोटीशी  परंपरा  च  छत्तीसगडी   लोकांबद्दल  बरेच  काही  सांगून जाते. नवीन पीक   आले  कि  पहिल्या भाताच्या   काही   लोब्यांचे  दांडे   एकमेकात  गुंफून  वेगवेगळ्या  भौमितिक रचना   केल्या   जातात   त्या   घरासमोरच्या   आडव्रा  बांबूवर  लावल्या   जातात,  पक्षी  त्यावर बसून   खाली लोंबत   असलेले   दाणे   खातात , पहिला   घास पक्षांसाठी  अशी  सुंदर  परंपरा   आहे. इथल्या  प्रत्येक   गावात  4, 5 तरी  तलाव  असतातच  आणि  आत्ता  काही वर्षंपर्यंत  गावकरीच  ते  स्वच्छ  करीत  मात्र  गेल्या  काही  वर्षांत  परिस्थिती  खूपच  बदलली  आणि  दुष्काळाच्या झळांनी  हे  राज्यही  होरपळून  निघाले.
खरं  तर  निसर्गाशी  मैत्री  करत  जगणे  फारसे  कठीण नाही असे  मला  वाटते, कारण विविधतेने  नटलेल्या  आपल्या देशात  धान्ये, फळे, भाज्या  यांची  जैवविविधता  तर  प्रचंड  आहेच  पण आपल्याकडील   हस्तकला, विणकामाच्या  विविध  पध्दती, चित्रकला, भित्तीचित्रकला, भूमिअलंकरण, हे सारेच  इतके  संपन्न  आहे  कि  यांचा  योग्य उपयोग  करून  आपण  आपले  जीवन  तर  सुंदर  करणारच  शिवाय  या  हस्तकारागिरांचीही  स्थिती  सुधारेल  आणि  हे  सारं  पर्यावरणाचे  काहीही  नुकसान  न करता. आपण  जितके  निसर्गाजवळ  जातो  किंवा  आपली  जीवनपध्दती  निसर्गाला  अनुकूल  करतो  तितके  आपण  आतून शांत  होत  जातो  आपल्या  गरजा  आपोआप  कमी  होत  जातात,  आपल्या  ऋषी,मुनींनीसांगितलेलं  अध्यात्म  हेचनाही का?
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
साथी क्रोशिया (भाग 1)
बचपन से माॅं के बुनते हाथों को देखते आयी थी, घर परिवार, बच्चे, नौकरी, सब कुछ सम्हालते हुए माॅं, बुनाई के लिए  समय कैसे निकालती थी, मुझे आज भी आश्चर्य होता है । माॅं के बनाए  स्वेटर, स्कार्फ, शाॅल में अभी भी गर्माहट है। लेकिन मुझे आकर्षण था, माॅं ने अपनी शादी के शुरूआती दिनों में धागेसे बनाए क्रोशे के थालपोश व मेजपोश का!
Tumblr media
घर में पूजा या कुछ खास अवसर पर बडे से लोहे के बक्से से इन्हे बाहर निकाला जाता, धो कर, कलफ कर इनकी खूबसूरती और बढाई जाती. फिर पूरा घर इस धवल और बारीक कारीगरीसे सॅंवर जाता. मुझे इनमें से एक अभी भी याद है, बीच में लाल, नीले रंग ले कर अनन्नास जैसा दिखनेवाला नमूना! (यहीं pineapple stitch थी, यह बाद में पता चला।)
मैं क्रोशा सीखने के लिए उत्सुक थी, ऐसे ही बारीक नमूने बनाने की जल्दी थी मुझे! तब माॅं ने भी समय निकाला और कक्षा छटवीं की परिक्षाएॅं समाप्त होते ही मेरे क्रोशा काम का श्री गणेश हुआ। मुझे जल्दी से जल्दी बारीक धागेसे काम करना था, लेकीन जब तक मुझे besic stitches नहीं आयी, तब तक माॅं ने धैर्य पूर्वक ऊन से ही सिखाया। अगली दो तीन गर्मी की छुट्टीयाॅं क्रोशा के बॅग, मॅट्स बनाने में ही गुजरी, जो अभीतक मैने सहेज कर रखे है।
उस जमाने में इंटरनेट तो था नहीं, क्रोशिया पर पुस्तकें है या नही यह भी मैं नहीं जानती थी, ऐसे में मुझे धागे की दुकान में क्रोशिया पर कुछ पुस्तकें दिखी,  इनमें से एक मैं खरीद लायी, यह अंग्रेजी में थी, घर आ कर पुस्तक के नमूने बनाने की मैं कोशिश करने लगी, लेकिन क्रोशिया की शब्दावली (जैसे ट्रेबल, पिकाॅट,पाॅपकाॅर्न स्टिच) यह मेरे लिए नयी थी, डिक्शनरी में भी यह शब्द नहीं मिले. हार कर मैं ने पुस्तक और क्रोशा दोनों को कुछ दिनों तक विराम दिया।
कुछ ही महिनों में घर में नियमित आनेवाली पत्रिका मनोरमा का क्रोशिया विशेषांक आया, जिससे मेरी समस्या हल हुई।इस अंक में शुरूआत में ही क्रोशिया की international vocubalary पूरे विवरण सहित दी गयी थी, जिससे मुझे बहुत आसानी हुई, मैंने पत्रिका से तथा पुस्तक सेअलग अलग नमूने बनाएॅं। यह विशेषांक तथा क्रोशिया की वह पुस्तक मैंने आज भी सम्हाल कर रखी है। काॅलेज के दिनों में फिर क्रोशा के लिए समय ही नहीं मिला।
क्रोशा मेरा सच्चा साथी तब बना, जब मैं शादी कर के अमलाई पेपर मिल काॅलनी जैसी छोटी सी जगह पर आयी। यहाॅं मैं ने शाॅल, स्वेटर जैसी कुछ चीजें बनाई।मेरे पडोस में जो महिला रहती थी, उनकी माॅं को भी बुनाई का शौक था, तथा उन्होंने धर्मयुग पत्रिका में आने वाले महिला जगत के पन्नों को एकत्र कर बाइंड किया था, इसमें मुझे क्रोशा के अनेक नमूने मिले। यहीं, मैंने  जिनको क्रोशिया सीखने की इच्छा थी, उनको  क्रोशिया सिखाया।
तीन चार वर्ष पश्चात हम कोरबा आ गए, यहाॅं मेरे सास ससुर भी सेवा निव्रुत्ति के पश्चात हमारे साथ रहने आए, मेरी सासू माॅं बुनाई में निष्णात थी, तथा एक कुशल शिक्षिका भी थी, उनसे बहुत कुछ सीखने मिला। यहीं रहते हुए मेरे पास क्रोशिया की दो चार मराठी पुस्तकें हो गई, और  उन से मैने अलग अलग stitches, क्रोशिया के  international symbols, diagram देख कर नमूना बनाना, जैसी बहुत सी चीजें सीखी।
यहीं के पुस्तकालय में मुझे niddle craft की संपूर्ण guide मिली, जिससे मुझे क्रोशिया और उससे संबंधित अन्य tools जैसे यू  पिन, फ्रेंच निटर आदि से संबंधित जानकारी मिली।
यहीं रह कर मैं ने अध्यापन कार्य किया, तब, बस से आने जाने, बस की प्रतिक्षा करने के समय क्रोशिया ही मेरा साथी होता था। धीरे धीरे क्रोशिया के अलावा पेपर क्राफ्ट, पेपर मेशी, बागवानी और अन्य विधाओं में भी मेरी रुची थी ही वह बढने लगी, लेकिन साथ में क्रोशिया भी चलता रहा।
इसी समय इंटरनेट का हमारे जीवन में प्रवेश हुआ और मेरे लिये जैसे अलीबाबा थी गूफा खुल  जा सिम सिम कहते हुए खुल गई।
क्रोशिया का यह संसार कितना विश्वव्यापी है, यह तभी ज्ञात हुआ, इसे विस्तार में अगली पोस्ट में लिखूॅंगी।  
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
‘पद्मश्री’च्या निमित्ताने
आ. गोदावरी दत्त आणि बुलू इमाम यांना ‘पद्मश्री’ जाहीर झालं, तेव्हा या दोघांच्या कामांची चाहती म्हणून यांच्या कलेची ओळख मराठी मनाला करून द्यावी, असं तीव्रतेने वाटलं ­­­म्हणून हा लेखन प्रपंच.
‘लोककला’ म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात मी मधुबनी चित्रशैलीतील चित्र पाहिल्याचं आठवतं. १९७०च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या ‘धर्मयुग’ साप्ताहिकात मधुबनी शैलीतील चित्र व लेख आल्याचं आठवतं. घरात वडिलांना चित्रकलेची आवड व ते चांगली चित्रं काढत असल्याने दिनानाथ दलाल व रघुवीर मुळगावकर यांनी मासिकांच्या मुखपृष्ठांवर काढलेल्या चित्रांचा बराच मोठा संग्रह घरी होता. बाकी ही आजूबाजूला मी जी चित्रं पाहत होते त्यापेक्षा हे मधुबनी शैलीतील चित्र खूप वेगळं तरीही छान आणि परिणामकारक असलेलं मला आजही स्वच्छ आठवते.
Tumblr media
हे सारं आठविण्याचं कारण म्हणजे, मधुबनी शैलीतील एक तपस्वी कलाकार गोदावरी दत्त यांना वयाच्या जवळ जवळ नव्वदीत ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला . खरंतर या चित्रकलेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्या ‘पद्मश्री’सारख्या सन्मानाच्या कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत. एका सच्चा कलाकारासारख्या त्या त्यातही आनंदी व समाधानी आहेत. गोदावरी दत्त यांचा जन्म १९३० मधे दरभंगा जिल्ह्यातील बहादुरपुर गावी झाला. त्यांची आई सुभद्राकुमारी या स्वत: मधुबनीच्या चित्रकार होत्या. त्यांची आईच त्यांची कलागुरू होती. आईच्या अर्ध्या तयार चित्रांवर त्यांनी काम केले तरी, आई न रागवता त्यांना प्रोत्साहन देई, म्हणूनच आपण चित्रं काढू लागलो व आईच्या आशीर्वादाने व प्रोत्साहनानेच आपण इथवर पोहोचलो अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
त्यावेळेस बिहारमध्ये मुलींच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात नव्हते. परंतु, त्यांच्या आईची इच्छा असल्याने त्यांनी व त्यांच्या बहिणीने थोडेफार शिक्षण घेतले. लग्नानंतर त्या मॅट्रिक झाल्या. त्यांचे लग्न रांटी येथील उपेंद्र दत्त यांच्याशी झाले. सासरी आल्यावर ही त्यांची चित्रकला सुरूच होती. ही चित्रे मुख्यत: विवाहप्रसंगी काढली जात, तसेच ‘कोहबर’ची (लग्नानंतर वर-वधू राहतात ती खोली) विशिष्ट चित्रे त्या काढत. तेव्हा मधुबनी प्रामुख्याने भिंतीवर काढली जात असली तरी, काही चित्रे कागदावरही काढल्या जात. हळूहळू गोदावरी छान चित्रं काढतात, हे साऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं. हा १९६४-६५ चा काळ असावा. तेव्हा भास्कर कुळकर्णी व उपेंद्र महारथी हे दोघे तज्ज्ञ लोकचित्रकारांच्या शोधात त्यांच्या गावी आले. त्यांनी गोदावरीशी संपर्क केला. परंतु, तेव्हाच्या पडदा प्रथेमुळे त्या परपुरूषाशी बोलू शकत नव्हत्या. त्यांनी आपलं व आपल्या आईचं काही काम दाखवले, जे त्यांना आवडलं त्यांनी यालाच मोठ्या आकारात करायला सांगितले. परंतु, त्याला गोदावरींनी नकार दिला. कारण, पैसे घेऊन चित्र काढणे तेव्हा चांगले मानले जात नसे. लग्न झाल्यावर त्यांच्या पतीने बनारस हिंदू विद्यापीठातून एम.ए. केले व ते नेपाळला नोकरी करू लागले. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे गोदावरींचे त्यांच्या बरोबर जाणे योग्य मानले जात नव्हते. पती वर्ष-दोन वर्षांनी एकदा येत. त्यांना एक मुलगाही झाला. मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर पतींचे म्हणणे पडले की, गोदावरी पुढे शिकल्या तर त्यांना बरोबर नेता येईल. सासरी संयुक्त कुटुंब होते. सगळ्यांनुमते त्यांनी माहेरी राहून शिक्षण घेणं योग्य होईल, असे ठरले. गोदावरी माहेरी राहिल्या. शिक्षण सुरू करून मॅट्रिक झाल्या. मात्र, सासरी आल्यावर त्यांना कळले की, नेपाळला पतींनी दुसरे लग्न केले. हा त्यांच्यावर मोठाच आघात होता. कारण, अशा स्त्रीची समाजाकडून उपेक्षाच होत असे. मात्र, योगायोगाने त्याच वेळेस तेव्हाचे रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा हे मिथिला (मधुबनी)चित्र कलेला पुढे आणण्य��साठी व तिला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी पुपुल जयकरांच्या सहाय्याने मुंबईत पहिल्यांदा या चित्रकलेचे प्रदर्शन भरवले. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे मधुबनी गावात हस्तकलेचे सेंटर उघडल्या गेले. तिथे गोदावरींना बोलाविण्यात आले.
या कलेच्या प्रसिद्ध कलाकार सीतादेवी आणि जगदंबा देवींतर्फे गावागावांत या कलेचा प्रचार करणे सुरू झाले. दुसऱ्या वर्षी जगदंबा देवींना ‘पद्मश्री’ मिळाले. हे पाहून गोदावरींना उत्साह आला. त्याही आपल्या आयुष्यातल्या रिकामपणाला दूर करू इच्छित होत्या. तसे त्या घराबाहेर निघून काम करण्याचे श्रेय त्या ओडिशाचे तेव्हाचे असिस्टंट डायरेक्टर एच. पी. मिश्रांना देतात. त्या चित्रे काढून त्यांना देत व ते ती विकून पैसे आणून देत. घरचे ही साथ देत होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९७० ते ७७ त्यांना बिहार सरकारची सात बक्षिसं मिळाली. त्या ऑर्डरवर काम करीत. जपानचे हासेगावा म्युझियमचे डायरेक्टर होते, त्यांनी गोदावरींची काही चित्रं जपानमध्ये प्रदर्शित केली. पण ही हातांनी काढली आहेत यावर लोकांचा विश्वास बसेना. म्हणून ते गोदावरींना डेमो द्यावा म्हणून घेऊन गेले. गोदावरींनी अर्धनारी नटेश्वराचे चित्र काढले. हासेगावांनी त्यातले त्रिशूळ व डमरू वेगळे व बऱ्याच मोठ्या आकारात काढून मागितले. गोदावरींनी ही मागणी पूर्ण केली. तेव्हा त्या सात वेळा जपानला गेल्या. त्या सहा महिने भारतात व सहा महिने जपानला राहत. आज ही चित्रे जपानच्या मिथिला म्युझियमची ओळख आहेत. यातला डमरू आठ फूट लांब व सात फूट रूंद आहे. याशिवाय गोदावरी फ्रान्स, जर्मनी वगैरे देशातही गेल्या.
भारतात मात्र त्यांची कुठलीच चित्रं कोणत्याही म्युझियमध्ये नव्हती, खूप प्रयत्नांनंतर त्यांचे बारा बाय अठरा फुटांचे ‘कोहबर’ हे चित्र बिहार म्युझियममध्ये ठेवल्या गेले. सरळ रेषा, सौम्य रंग अशी त्यांच्या शैलीची विशेषता आहे. त्यांनी आपल्या नातींना तर तयार केलेच आहे, शिवाय बऱ्याच लोकांना त्यांनी ही कला शिकवली आहे. बिहार सरकार या कलेच्या विकासासाठी बरेच प्रयत्न करीत असले तरी, गोदावरी दत्तांच्या ‘पद्मश्री’ने या प्रयत्नांना अजून चालना मिळेल. लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड येथे २०११ चा ‘गांधी शांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ मिळविणारे बुलू इमाम यांना ही २०१९ चा ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. ३१ ऑगस्ट, १९४२ ला जन्मलेल्या बुलू इमामांची खूप व्यापक ओळख आहे. कोलकाता हायकोर्टचे वरिष्ठ न्यायाधीश व बॅरिस्टर,१९१८ला राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले सैय्यद हसन इमाम यांचे बुलू हे नातू. याशिवाय ते पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ता आहेत, झारखंडचा अश्मयुगीन इतिहास शोधून तो जपणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ आहेत, झारखंडची विलयाला जाणाऱ्या खोवर व सोहराइ चित्रकलेचा प्रसार करणारे, ती चित्रकला भिंतीवरून कागदावर आणणारे कलाकार ही आहेत. याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत.
बुलू इमामांची कहाणी ही विलक्षण आहे. १९६० आणि १९७० च्या दशकात नरभक्षक वाघांना मारणारे बुलू १९७९ मध्ये ब्रिटिश लेखक व प्रवासी असलेल्या मार्क षंड यांच्याबरोबर हत्तीवरून प्रवास करत असताना, त्यांना ते दक्षिण बिहारचं दाट जंगल कोळशाच्या खाणीसाठी नष्ट होताना दिसलं. यामुळे केवळ तिथल्या पर्यावरणाचाच नाश होत नव्हता, तर तिथे राहणारे अनेक आदिवासी समूह विस्थापित होणार होते, त्यांची हजारो वर्षांची संस्कृती नष्ट होणार होती. त्यांना जंगलामधून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तर नष्ट होणार होत्याच, त्याशिवाय आदिवासी ज्यांची पूजा करत ते megaliths (महापाषाण किंवा स्मारकशिला) ज्यातील काही तर इ.स.पू २००० च्या पूर्वीचे होते, ते ही नष्ट होण्याची भीती होती. त्याच क्षणी बुलूंनी शिकार सोडून तिथली संस्कृती वाचविण्याचा व्रण केला. पूर्वी शिकारीनिमित्त बुलूंचं तिथल्या म्हणजे आताच्या झारखंडचा भाग असलेल्या अनेक गावांमधे जाणे-येणे होते. त्यांच्या पत्नीशी आदिवासी समाजातील आहेत. त्यांनी नार्थ करणपुरा व्हॅली इथल्या ओपन कास्ट माइन (विवृत खाण) विरोधात संघर्ष सुरू केला. त्याच वेळेस हत्ती व वाघांसाठी जंगलात कोरिडोर असणे केवढे गरजेचे आहे याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या संस्कृती रक्षणाच्या या प्रयत्नांमुळे १९८७ला त्यांना National trust for Art and Culture या N.G.O.चे क्षेत्रीय संयोजक नेमण्यात आले. १९९१ मध्ये बुलूंना तिथल्या इस्को पर्वतांमधे पहिलं शैलचित्र आढळलं. त्यानंतर त्यांनी जवळ जवळ ५००० वर्षांपूर्वीची अनेक शैल किंवा पाषाणचित्र नॉर्थ करणपुरा व्हॅलीत शोधली. त्यानंतर त्यांनी पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुगाततील स्थाने शोधली. काही बौध्द पुरातात्त्विक स्थानेही शोधली.
झारखंडमध्ये स्त्रिया वर्षातून दोन वेळा पूर्ण घर सारवतात. एकदा पावसाळा संपला की सोहराई पर्वाच्या वेळेस व दुसऱ्यांदा जानेवारीनंतर लग्नासारख्या मंगल प्रसंगासाठी. दोन्ही वेळेस वेगवेगळी भित्तीचित्रे काढली जातात. सोहराईच्या वेळेस काढली जाणारी चित्रे ‘सोहारी कला’ व विवाहप्रसंगी काढली जाणारी चित्रे ‘खोवर’ म्हणवली जातात. ही चित्रे स्थानिक लाल, काळी, पिवळी व पांढरा माती वापरून काढली जातात. यात जंगलातील फुले, पाने, वनस्पती, प्राणी यांचे चित्रण असते. बुलू इमामांना प्रागैतिहासिक शैलचित्रे व ही ‘सोहराई’ व ‘खोवर’ चित्रे याच्यात एक संबंध दिसून आला. १९९३ मध्ये त्यांनी आदिवासी स्त्रियांची सहकारी समिती स्थापन केली व या कलेचा प्रसार सुरू केला. त्यांनी ही चित्रे कॅनव्हासवर काढून घेतली व या चित्रांची प्रदर्शने जगभर भरवू लागले. ते आपल्याबरोबर कलाकारांनाही घेऊन जात व प्रेक्षकांशी ‘सोहराई’ कलेचं प्रात्यक्षिक दाखवित. हे करीत असतानाच ते अश्मयुगीन दगडांची हत्यारे, बौध्दकालीन मूर्ती इत्यादी कोळी करीत होते. या सगळ्यांचा संग्रह त्यांनी हजारीबाग येथे संस्कृती संग्रहालयात सुंदर रीतीने केला आहे. संस्कृती हे बुलूंचे सांस्कृतीक संचित आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
बुलूंनी झारखंडवर ‘Antiquarian Remains Of Jharkhand’ हे पुस्तकदेखील लिहिले आहे. येणाऱ्या काळात संस्कृती संग्रहालय शोधार्थींसाठी, अभ्यासकांसाठी, कलाकार, पुरातत्त्व शास्त्राचे अभ्यासक या साऱ्यासाठी व सामान्य जनांसाठीदेखील एक आदर्श संस्था व्हावे म्हणून बुलू प्रयत्नशील आहेत. तर अशा या दोन ‘पद्मश्री’प्राप्त व्यक्ती, त्यांचे ‘पद्मश्री’ त्यांच्यासाठी नाहीच, ते तुमच्या आमच्यासाठी आहे. खरंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात दोघांनीही अपार कष्ट केले आहेत. घरदार सोडून महिनोंमहिने जपानसारख्या देशात राहणे गोदावरींना नक्कीच सोपे गेले नसेल. पण कलेच्या प्रसारासाठी त्यांनी ते आनंदाने केले. बुलू इमामांना मी एका मुलाखतीत त्यांनी जमविलेल्या नमुन्यांची काचेची कपाटं स्वत: पुसताना पाहिले. आपल्या आवडत्या क्षेत्रावर दोघांचंही मनापासून प्रेम आहे.
भारत एक विविधतेने नटलेला देश आहे, ही विविधता भाषेपासून तर लोककलांपर्यंत दिसून येते. इथल्या लोककला निसर्गाशी एकरूप झालेल्या आहेत. मग ती वारली, मांडना, गोंड, कच्छची लिप्पन कला किंवा उत्तर कर्नाटकच्या शिमोग्याची हासे चित्तर असू दे, रंग काढायचा पृष्ठभाग, रंग, कुंचले सारं काही निसर्गातूनच घ्यायचं आणि त्यालाच अर्पण करायचं. वेगवेगळी फुले-पाने, माती , दगड रंग देतात. बांबू, विविध प्राण्यांचे केस, पिसं कुंचले बनविण्याच्या कामी येतात. चित्र काढायला भिंत असतेच पण कागदावर काढायला हातकागद किंवा लाकडाच्या फळ्यांना माती, शेण लावून पृष्ठभाग तयार करता येतो. मात्र आता लोककलेचा प्राण हरवत चालला आहे.
जागोजागी उगवणाऱ्या आर्ट क्लासेसमध्ये भरमसाठ फी घेऊन कृत्रिम रंग, कृत्रिम सामान वापरले जाते आणि प्रदूषणात अजून भर टाकली जाते. मी १०-१५ वर्षांपूर्वी मुंबईत वारली पेंटिंग शिकले. त्याची बॉर्डर प्लास्टिक पेंटची करायला सांगितले. तेव्हापासून या सगळ्यांकडे लक्ष जाऊ लागले आणि पर्यावरणाबद्दल, सौंदर्य दृष्टीबद्दल समाजाला जागृत करणे किती गरजेचे आहे याची जाणीव झाली. खरंतर या चित्रांमधे खोल अर्थ दडलेला असतो. जसं ‘खोवर’ चित्र हे विवाहाच्या वेळेस काढल्या जाते, त्यामुळे हा ‘कोहबर’चा अपभ्रंश असावा असे वाटेल पण तसे नाही , ‘खोवर’ चित्रांमध्ये पूर्ण घर आधी काळ्या मातीने सारवतात, मग पांढऱ्या मातीने सारवून छोट्या कंगव्याने चित्र कोरतात. ‘खोह’ म्हणजे ‘गुहा’ व ‘वर’ म्हणजे वधूवरांमधला वर. ही पूर्ण चित्र विधी जननशास्त्रावर आधारली आहे. या चित्रांमधले प्राणी-पक्षी चितारण्याचा अर्थ आदिवासी त्यांना आपल्यापेक्षा वेगळे समजत नाहीत अशा रितीने या लोककलांकडे पाहण्याची योग्य दृष्टी विकसित करणे हे खरं आपल्यासाठी आव्हान आहे. आ. गोदावरी दत्त आणि बुलू इमाम यांना ‘पद्मश्री’ जाहीर झालं, तेव्हा या दोघांच्या कामांची चाहती म्हणून यांच्या कलेची ओळख मराठी मनाला करून द्यावी, असं तीव्रतेने वाटलं ­­­म्हणून हा लेखन प्रपंच.
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
काॅंथा... एक प्रेमळ कलाविष्कार
जुन्या वापरलेल्या पण स्वच्छ धुतलेल्या मऊ, मुलायम सूती साडी किंवा धोतरापासून बनविलेल्या दुपट्यात शांत निजलेल्या बाळाला पाहून ज्या भावना मनात दाटतात, अगदी तशाच काहीश्या भावना, काॅंथा भरतकामाचे नमूने बघतांना येतात. कारण प्रत्येक काॅंथा वस्राला आई, आजी, आजोबा किंवा कुणातरी मायेच्या माणसाचा स्पर्श असतो. अर्थात् हे मी काॅंथा वस्त्राच्या मूळ स्वरूपाबद्दल सांगते आहे, आधुनिक काॅंथाने बरंच रूप बदललं आहे.
Tumblr media
मला आठवतंय, काॅलेजला असताना प्रत्येक प्रांताच्या भरतकामाचे नमूने तयार करायचे होते, तेव्हा आमच्या शिक्षिकेने आवर्जून सगळ्यांना वापरलेली पांढरी सूती साडी किंवा धोतराचे तुकडेच आणायला सांगितले, आणि जोपर्यंत सगळ्या मुलींजवळ जुनं, वापरलेलं कापड गोळा झाले नाही, तोपर्यंत त्यांनी शिकवायला सुरूवात केली नाही.
मूळ काॅंथा हा पांढरी वापरलेली सूती साडी किंवा धोतराचे एकावर एक चार पाच थर देऊन, त्या सर्व थरांना जोडणार्या धावदोर्याच्या टाक्याचा उपयोग करून तयार केला जातो. थोडक्यात आपल्या महाराष्ट्रात तयार होणारी गोधडी, किंवा इतर प्रांतांतील कथरी, गुदडी याच, बंगालसारख्या कलाप्रेमी प्रांतात काॅंथाच्या रूपात विकसित झाल्या.
काॅंथा कलेचा इतिहास जरी खूप प्राचीन असला, तरी बंगाली साहित्यात पाचशे वर्षांपूर्वीच्या क्रुष्णदास कविराज यांच्या श्री श्री चैतन्य चरित्राम्रुत या पुस्तकात काॅंथाचा उल्लेख आढळतो. 1928 मधे कवी जसीमुद्दीन यांनी नक्षीकाॅंथार मठ (नक्षी काॅंथाचे मैदान) ही प्रसिध्द रचना लिहिली. यात लोककथेच्या अनुषंगाने काॅंथाबद्दल उल्लेख आहे. काॅंथाच्या उगमा बद्दल ही अनेक कथा आहेत, त्यांतील कांतिलिपांची कथा प्रसिध्द आहे. जे चौर्यांशी (84) सिध्द प्रसिध्द आहेत, त्यांतील एक कांतिलीप होते, त्यांना कुठलीही वस्तू वाया जाऊ देणे आवडत नसे, ते लोकांनी टाकून दिलेले चिंध्यांचे तुकडे गोळा करीत व शिवीत, एकदा कुशल दख्खिनींची व त्यांची भेट झाली त्यांचा छंद पाहून त्यांना दख्खिनींनी सुईदोरा व कापडाचे तुकडे यांची कला शिकविली, पुढे कांतिलिपांनी अनेक कलाक्रुति तयार केल्या. त्यांच्या नावावरून याला काॅंथा म्हणू लागले.
अगदी सुरुवातीला काॅंथा पांढर्या पार्श्वभूमीवर लाल, निळे व काळे रंग वापरून केला जाई, त्यानंतर  पिवळे, हिरवे, गुलाबी व अन्य रंग वापरू लागले. बहुतेक करून साडीच्या बाॅर्डरचे धागे काढून ते वापरीत. काॅंथा हा बहुधा घरातल्यां साठीच केल्या जाई. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा घरातच बसावे लागे,तेव्हा हे काम अधिक प्रमाणात केले जाई.
काॅंथामधे मुख्यत: धावदोराच वापरला जातो, यालाच काॅंथा स्टीच ही म्हणतात. याशिवाय रफू टाका, हेलोबिन स्टीच, चटई स्टीच वगैरे वापरल्या जातात.आधुनिक काॅंथामधे काश्मिरी व सॅटिन स्टीच ही वापरली जाते.
काॅंथापासून केवळ दुपटी किंवा पाघरूणां शिवायही अनेक प्रकार बनविल्या जात.
1 पांघरूण किंवा लेप 2 पूजेसाठी बसण्यास आसनं 3 आरसीलता, जी अरूंद पिशवी सारखी असते, ज्यात छोटा आरसा, कंगवा, कुंकू वगैरे ठेवू शकतो. याला बांधण्यासाठी गोंडा असतो. 4 बटुआ थैली, ही पान किंवा पैसे ठेवण्यासाठी असते. 5 गिलाफ, 6 कुराण ठेवण्याचे कव्हर 7 नमाज साठी आसन 8 गालिचा 9 रूमाल 10 उश्यांची कव्हर्स इत्यादी.
आधुनिक युगात बेडशीट्स, वाॅल हॅंगिंग्ज, कुशन कव्हर्स, पर्स���स, ज्वेलरी बाॅक्सेस, साड्या वगैरे वस्तू तयार करतात. काॅंथा कपड्यांच्या डिझाइन्स मधे कमळ, चंद्र, सूर्य, स्वस्तिक, मासे, बोटी, वगैरे अनेक प्रकार असतात तसेच बाॅर्डरही तर्हेतर्हेच्या असतात. जसे लहरदार, भाताच्या लोंब्या, वाहणारे पाणी, खजुराचे पान वगैरे.
काॅंथा ही एक लोककला आहे, आणि या कला जातपात, धर्म या सगळ्या बंधनातून मुक्त झालेल्या असतात. ही कला भारतात प.बंगाल, आसाम, त्रिपुरा या प्रदेशात जशी दिसते तशीच बांगला देशातही मैमनसिंह (प्रसिध्द लेखिका तस्लिमा नसरीन चे गाव), राजेशाही, जस्सौर सारख्या भागातही दिसते.
जपान मधल्या सशिको या भरत कामाच्या कलेतही काॅंथा स्टीचचा प्रभाव जाणवतो, कदाचित बौध्द भिक्षुंमार्��त हिचा प्रसार झाला असावा. माझ्याजवळ द. आफ्रिकेतील दोन नमूने आहेत, हे ही काॅंथाने प्रभावित आहेत. काॅंथाच्या वस्तू घरात असणे हे वैभवाचे प्रतिक मानलं जाई, टाकाऊ वस्तूलाही सुंदरतेचा साज चढविणे ही आपली संस्क्रुति!
भारतातल्या या सुंदर कलेने तिचं कलावैभव असंच जपत रहावं.
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
सोनाबाई- एक निसर्ग कविता
छत्तीसगढ़ मधला सरगुजा जिल्हा हिरव्यागार निसर्गाने नटलेला, त्यातलं अंबिकापुर जवळचं पुहपुटरा गाव, त्यात राहणार्या सोनाबाई रजवार! रजवार भित्तीचित्रकलेच्या जन्मदात्या. जेव्हा त्यांनी पहिल्याने माती हातात घेतली तेव्हा त्यांनाही माहित नव्हते कि ही माती त्यांना साता समुद्रापार घेऊन जाईल.
पुहपुटरा जवळच्या केनरापाराचं त्यांचे माहेर, सात बहिण भावंडातिल ही एक, १४ व्या वर्षी लग्न करून सासरी आली, सासू नव्हतीच. सासरे ही लवकरच गेले, शेतीच्या वाटण्या झाल्याआणि होलीराम म्हणजे नवर्यान  शेताच्याजवळ घर बांधायचे ठरवले म्हणजे तसं गावाबाहेरच.
घर आकार घेऊ लागलं, पण नवर्याच्या विक्षिप्त आणि संशयी स्वभावामुळे सोनाबाई घरातच अडकून पडल्या. संपूर्ण एकांतवास कुणाशीही हसणे बोलणे नाही. मग एक दिवस विहिरी जवळची माती त्यांनी हातात घेतली आणि तीच त्यांचे जगणं झाली. घराच्या भिंती आणि छत उभं होतं, पण केवळ तेवढ्याने घर होत नसतं. घराला सुघड बनविणे सुरू झाले.
Tumblr media
सरगुजा भागात  शेणामातीच्या भिंतीवर पांढर्या छुईमातीने सारवतात व सारवण ओलं असतानाच बोटांनी सरळ, आडव्या, नागमोडी रेषा काढतात आणि टप्प्याटप्प्याने भिंत पूर्ण करतात.  याला "छोहा लिपाई" म्हणतात. यातच जणू त्यांना आपल्या आयुष्याचं सार गवसलं.
तर्हेतर्हेच्या आक्रुत्या बनू लागल्या.दरम्यान त्यांच्या मुलाचा दारोगा रामचा जन्म झाला त्याच्यासाठी सोनाबाई तर्हेतर्हेची खेळणी बनवू लागल्या. मांजर, कुत्रा, वाघ, माकड त्याच्या नाना लीला  बाहुल्यावगैरे बरंच काही.
त्यांच्या कल्पनेला रोज नवीन धुमारे फुटत. नुसती खेळणी बनवून त्या थांबत नव्हत्या तर घरात त्याची रचनाही केली जाई, कुठे वेलीवर माकड झोके घेई तर कुठे कोनाड्यात क्रुष्ण मुरली वाजवी.
हळुहळु घराच्या सार्या खोल्या सुंदर चित्रांनी भरल्या. छत्तीसगढ़ च्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी नवीनच कल्पना मनांत आली. बांबूच्या पातळ कामट्या गोल वळवून त्यावर माती व भाताच्या तुसाच्ं मिश्रण लावून त्यांना जोडून सुंदर जाळीकाम होऊ लागलं, त्यावर सुंदरमूर्ती विराजमान होऊ लागल्या, आणि हे सारं ही पंचक्रोशीच्या बाहेरही न पडलेली शाळेचं तोंडही न पाहिलेली स्त्री करत होती हे विशेष.
हळुहळु त्यांचा एकांतवास संपला, गावकरी घरी येऊ लागले हे काम पाहून थक्क होऊ लागले. त्याच दरम्यान म्हणजे १९८३ मधे भोपाळला भारत भवन हे लोककला व समकालीन कलांचं म्यूझियम होऊ घातलं होतं त्यासाठी लोककलाकारांचा शोध घेणे सुरू होते, काही लोक ज्यात प्रसिध्द चित्रकार ज्योती भट होते ह्याच कामासाठी अंबिकापुर ला आले होते, तिथे त्यांना सोनाबाईंविषयी कळले, ते सगळे पुहपुटर्याला आले व सोनाबाईंचे काम पाहून थक्क झाले.
भारतभवनमधे त्यांना व त्यांच्या मुलाला (कारण तोही आता कलाकार होता) सन्मानाने बोलावण्यात आले, त्यांच्या कलाक्रुती नेण्यात आल्या १९८३ मधे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. मग तुलसी सन्मानाने नावाजण्यात आले.
शासनातर्फे त्यांनी आपली कला अनेकांना शिकवली, २००७ मधे अमेरिकेतील प्रसिद्ध समाजशास्रज्ञ व मानववंश शास्त्रज्ञ स्टीफ़ेन ह्यूलर भारतात आले , सोनाबाईंबद्दल कळताच ते पुहपुटर्याला आले, सोनाबाईंना भेटून  ते अत्यंत प्रभावित झाले, त्यांच्या पुढाकाराने सेन डिएगो येथे सोनाबाईंच्या कलाक्रुतिंची प्रदर्शनी लावली, ती सार्यांनाच फार आवडली. त्यांनी सोनाबाईंवर पुस्तक लिहिले, डाॅक्यूमेंटरी काढली.
सोनाबाई आता या जगात नाहीत, पण त्यांनी सुरू केलेल्या रजवार कला अजून विस्तारत त्यांचा मुलगा, सून इतर शिष्य ठिकठिकाणी कार्यशाळा घेतात व ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. सोनाबाईंसारख्या लोककलाकारांबद्दल विचार करताना मला नेहमीच हा प्रश्न पडतो कि ती कुठली अंत:प्रेरणा असते, जी अगदी अभावात आणि प्रतिकूल परिस्थिति तहीअसामन्य काम करून जाते. सोनाबाईंचे काम रंग, ब्रश शिवाय अडले नाही. त्यांनी पाने, फुले, मसाले, दगड, माती यांपासून रंग बनविले, तर बांबू पासून त्यांचे ब्रश बनले.
अश्या ह्या सोनाबाई सच्चा कलाकार होत्या, एवढे मानसन्मान, धन संपत्ती मिळून ही त्या अतिशय साध्याच राहिल्या. आजूबाजूच्या निसर्गाशी त्या इतक्या एकरूप झाल्या होत्या कि जणू त्याच निसर्ग होत्या.
आताच्या या संक्रमण काळात तर मला सोनाबाईं सारख्या स्त्रियांचे विशेष कौतुक करावेसे वाटते.
कुठलीही कुरकुर न करता प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत सर्जनशील राहणं सोपं नसतंच.
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
निसर्ग सखा
आता कोरोना चे दिवस आहेत, नव्हे को रोना चेच दिवस आहेत. जग हे बंदिशाला, गाण्या प्रमाणे सगळ्यांना अनुभव येतो आहे. दिवसभर त्याच बातम्या ऐकून आणि त्याच बद्दल बोलून लोक कंटाळली आहेत.
पण निसर्ग मात्र सुखावला आहे, सगळ्यांची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते आहे, टीव्हीवर केव्हा  फेसबुक'वर फोटोमध्ये का होईना फुलांचा सडा झाडांखाली पडलेला दिसआहे, कुठे मोर नाचत आहेत तर कोकिळे ची कुहुकुहु नागपूर सारख्या शहरातही ऐकू येते आहे.
Tumblr media
निसर्ग सखा नद्या स्वच्छ होतात आहेत समुद्रातल्या माशाऺनाही नवजीवन मिळाले आहे.आपली पृथ्वी नक्कीच मोकळा श्वास घेत असेल.
अर्थात हेच दिवस आहेत आपल्या आत्मपरीक्षणाचे, बाहेर लॉक डाऊनअसताना अनेकांना आहे घरात आहे त्या सामानात भागवण्याची सवय लागली असेल आणि असं जगताना आपण किती कमीत कमी सामानात जगू शकतो हेही लक्षात आलं असेल, कोणतीही वस्तू वाया न घालविण्याची सवय लागली असेल.
अशीच आपली जीवन पद्धती हळूहळू पर्यावरणानुकूल बनू शकते. जंगलं राखली गेली जोपासली गेली तर किती तरी वस्तू जंगलातूनचमिळू शकतातशेतकर्‍यांना जोडधंदे ही मिळू शकतात.
अगदी साधं दोऱ्यांचे उदाहरण घेतलं तरी कापूस नारळाचा काथ्या, अंबाडी, केकताड अशी अनेक उदाहरणे देता येतील, प्लास्टिकचे ऑर्गनायझर स किंवा टोपल्या वापरण्यापेक्षा बांबू, वेत, रिसायकल पेपर, शिंदी सारख्या वनस्पती, यांचा अनेक कलात्मक तऱ्हेने उपयोग करता येईल, यान पासून बनवलेल्या वस्तू मजबूतही असतील आणि पर्यावरणानुकूल ही.रानभाज्यांची चळवळ हळूहळू वाढते आहे, यात तज्ञ लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या आसपासच्या रानभाज्यांची ओळख.. शहरी लोकांना करून द्यायला हवी.
आपल्या जवळ छोटीशीही जागा असेल किंवा टेरेस असेल तर त्यात शोभेची फुलझाडं न लावता पुदिना कढीपत्ता सारख्या वनस्पती लावण्याची चळवळही शहरी भागांमध्ये  जोमात सुरू आहे.मध्ये मी हिंगणबेट या वनस्पती बद्दल वाचले, या वनस्पतीची फळे रिठा शिकेकाई ही साबणाला पर्याय होऊ शकतात आणि त्यात थोडे  संशोधन करून वेगवेगळ्या साबणाना पर्याय तयार होऊ शकतातमध्य प्रदेशातील धारचा राजा भोज याच्या काळात कमळाच्या देठापासून कागद बनविला जात असे, त्याही पूर्वीच्या काळात कागदाचे कापडाचे अनेक प्रकार असतात आणि ते सारे नैसर्गिक साधना पासूनच बनवीत.
असा नैसर्गिक साधनांचा उपयोग करणं म्हणजे आदिम युगात जाणं नव्हे, उलट आता उपलब्ध टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त पर्यावरणानुकूल शैली जगू शकतो, गरज आहे ती आपली मानसिकता बदलण्याची आणि निसर्गाला सखा मानण्याची.
निसर्गावर कुरघोडी करण्याची इच्छा नसेल तर निसर्ग नेहमीच आपल्याबरोबर असेल.
0 notes
ajitakhadke · 4 years
Text
जगन्नाथाचा भात --------------ओरिसा
ओरिसा म्हटले कि आधी डोळ्यांसमोर येते चार धामांतिल एक धाम असलेली जगन्नाथ पुरी, नंतर कोणार्कचं सूर्यमंदिर, चिल्का लेक, भुवनेश्वर अगदी ओडिसी नृत्य ही आठवतं पण ओरिसाची खाद्य संस्कृती एकदम आठवत नाही, कारण आपली ओळखच नसते या संस्कृतीशी! पण इतर राज्यांप्रमाणेच इथली खाद्य संस्कृतीही संपन्न आहे. जगन्नाथाचा भात जग पसरे हात या म्हणीतूनच ही संस्कृती व्यक्त होते, जगभरातील लोकं पुरीला येतात आणि हा महाप्रसाद घेऊन तृप्त होतात.
ओरिसाची खाद्य संस्कृती ही माझ्यासाठी एक स्मरण यात्रा आहे, कारण मी ओरिसामधे राहिलेनाही पुरी, भुवनेश्वर, तालचर, राऊरकेला,संबलपुर अशी मोजकीच ठिकाणं फार पूर्वी पाहिली आहेत. मात्र इथल्या खाद्य जीवनाशी माझे जिव्हाळ्याचे बंध जोडले गेले, ते माझ्या शेजारणीमुळे! जवळ जवळ तीस वर्षांपूर्वी मी म.प्र.तल्या अमलाई पेपर मीलच्या काॅलनीत लग्न करून आले आणि मला शेजारीण मिळाली, बेहरा काकींसारखी प्रेमळ, गृहकृत्यदक्ष, नीटनेटकी उडिया अन्नपूर्णा!
Tumblr media
मी या आधी कधीही न पाहिलेल्या भाज्यांची त्यांनी ओळख करून दिली. कुठलीही वेगळी भाजी बनविली की आमच्या घरी त्याचा नमुना येईच. पोईची भाजी मी त्यांच्याकडेच पहिल्याने खाल्ली. मश्रूम, बांबू शूट्स, बहाल फूल (भोकराची फुलं), आणि कितीतरी भाज्या त्या बनवित, आणि नुसत्या शिजवतच नव्हे तर क्वार्टरच्या छोटेखानी अंगणात त्यांनी कितीतरी भाज्या, पालेभाज्यांची लागवड केली होती. भाज्यांच्या साली, देठं वाया न घालविता,त्यापासून कंपोस्ट करण्याचे धडेही त्यांनीच मला दिले.
काकींकडचा मला आवडलेला पहिला ओडिया पदार्थ म्हणजे "डालमा"!तुरीची डाळ आणि कच्ची पपई, बटाटा, कच्चं केळं, वांगं, शेवग्याची शेंग,बीन्स, भोपळा, कांदे, टोमॅटो या भाज्या वापरून बनविलेला हा पदार्थ, आहार आणि पोषण हा विषय शिकून नुकत्याच संसाराला लागलेल्या मला पौष्टिक ही वाटला आणि तसा तो आहेही. यात मसालेही जास्त नसतात.
आपल्या आश्वीन म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला त्यांचा गजलक्ष्मी पूजा किंवा कुमार पूजा हा सण असतो, या दिवशी कुमारी मुली सकाळी स्नान करून नवे कपडे घालून सूर्याची पूजा करतात दिवसभर पारंपारिक गाणी,नाच ,गप्पागोष्टी यात आनंदाने वेळ घालवितात व रात्री चंद्राची पूजा करतात. या दिवशी बरेच पदार्थ बनवून लक्ष्मी देवीला भोग लावल्या जातो. एक वर्ष काकींना बरे नसल्याने मीच प्रसादाचे जेवण काकींच्या मार्गदर्शनाखाली बनविले, त्यात मला खूप शिकायला मिळाले.त्यातील काहींची आठवेल तशी माहिती देते आहे.
मंडा पीठा-म्हणजे आपले उकडीचे मोदकच!फक्त सारण भरले कि आपल्या सारख्या कळ्या न घेता गोल, चपटा आकार करून उकडतात. मला मोदकाचा हा भाईबंद पाहून जसे आश्चर्य वाटले तसेच आता ओडिया मुली शिक्षण,नौकरीच्या निमित्ताने पुण्याला आल्या कि मंडा पिठाचा सुबक भाईबंद पाहून वाटते. मी सारण म्हणून भाजलेल्या जवसाची पूड व गूळ यांचे मिश्रण भरून केलेला मंडा पिठा ही खाल्ला आहे आणि मला तरी तो आवडला.
एंदुरी पिठा-यात हळदीच्या पानावर इडलीचं बॅटर घालतात त्यावर ओलं खोबरं, पनीर,गूळ यांचं शिजवलेलं मिश्रण घालतात त्यावर पुन्हा इडलीचं बॅटर घालून इडलीप्रमाणेच उकडतात.
चकुली पिठा-हा पिठा म्हणजे डोसेच! फक्त त्यात उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त असतं व त्याला जास्त फरमेंट करत नाहीत.
काकींकडे दाक्षिणात्य लोकांकडे असतो तसा मोठा दगडी रूब्बा होता, त्यावर त्या डाळ आणि तांदूळ वाटत व काळ्या वाटाण्याची घुघनी म्हणजे उसळी बरोबर जाळीदार पण अगदी मुलायम चकुली पिठा आमच्या कडे पाठवित.
चितउ पिठा- हा म्हणजे केरळ मधे केलं जाणारं अप्पमच! अप्पम कढई सारख्या अप्पम पात्रात केले जातात तर चितउ पिठा तव्यावर केला जातो. या शिवाय गोड म्हणून तांदूळाची खीर केलेली आठवते. काकी गोड पदार्थात खाण्याचा कापूर घालीत, बर्याच जणांना हा वास आवडत नाही.
डोळ्यांसमोर येतात त्या मागच्या अंगणात चुलीवर (तेव्हा गॅस कनेक्शन मिळायला अडचण यायची व सिलेंडर ही जवळ जवळ 30 कि.मी.वर असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून आणावा लागे)हसतमुखाने स्वयंपाक करून सगळ्यांची रसना तृप्ती करणार्या काकी! त्या बनवत असलेलं बोराचं लोणचंही त्यांच्यासारखं जमलं नाही!
आम्ही जवळपास 3 वर्षं अमलाईला होतो,त्यानंतर N.T.P.C.colony कोरबा हा आमचा नवा पत्ता झाला, इथेही काही उडिया मैत्रिणी झाल्या. त्या सगळ्या ओडिसाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या होत्या त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं कि ओडिया खाद्य संस्कृतीही प्रत्येक भागात वेगळी आहे. गोपालपुर, चांदीपुर सारख्या समुद्रकिनार्या जवळच्या भागांमधे मस्याहार प्रमुख आहे तसे साधारण बंगाली लोकांएवढेच मस्याहाराचे प्रमाण आहे. (बेहरा काकीही मस्याहारी होत्या पण मी शाकाहारी असल्याने त्याबद्दल कधी फारसे विचारले नाही)
बारीपदासारखे पश्चिम बंगालला जवळ असलेल्या भागात आणि एकूणच ओडिसाच्या खाद्य संस्कृतीवर बंगालचा प्रभाव जाणवतो, जसे सरसोंचे तेल वापरणे किंवा फोडणीसाठी पंच फोरन किंवा पंच फुटान (ज्यात मोहरी,मेथी,कलौंजी,जीरेआणि बडीशेप असते) चावापर करणे. गोड पदार्थांमधे छेन्याचा जास्त वापर वगैरे.मलकानगिरी किंवा कोरापुट सारख्या आंध्रला लागून असलेल्या जिल्ह्यांत चिंच,कढीपत्त्याचा जास्त वापर आढळतो.
सुंदरगढ़,झारसुगुडा सारख्या छत्तीसगढ़ व झारखंडला लागून असलेल्या भागात तिथल्या खाद्य संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. रायगडा सारख्या भागात दाट जंगल आहे, साहजिकच तिथे आदिवासी म्हणजे जंगलावर अवलंबून असलेली खाद्य संस्कृती आहे.
पाखाल भात आणि ओडिसाच्या खास डेलिकसीज् सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. ओडिसा मधेही खूप गर्मी पडते, अशा गर्मीत पाण्यात भिजवून ठेवलेला भात दही,मीठ घालून कांद्या बरोबर खाल्ला तर गर्मी बरीच सुस���्य होते.याच्याबरोबर कैरीची चटणी टोमॅटो वगैरे ही खातात, तसेच पाखाल दिवस ही साजरा केला जातो.
पोडा पिठा ही खास dish आहे आणि हा पिठा बर्याच वेगवेगळ्या पध्दतींनी बनवितात. ओडिसात आषाढाचे सुरुवातीचे तीन दिवस पृथ्वी ऋतुमती होते अशी कल्पना करून "रज उत्सव"साजरा केल्या जातो. या उत्सवाचा प्रमुख पदार्थ असतो पोडा पिठा!
हा बनविण्यासाठी सारख्या प्रमाणात तांदूळ व उडदाची डाळ 5-6 तास भिजवतात मग डाळ अगदी बारीक व तांदूळ थोडे जाडसर वाटतात. वाटलेले डाळ तांदूळ एकत्र करून अगदी किंचित् मीठ घालून ठेवतात. 5-6तासांनी पीठ फरमेंट झालं कि त्यात खोवलेला नारळ, थोडे नारळाचे तुकडे,किसमिस,काजू वेलची पावडर व तांदूळ डाळीच्या प्रमाणात गूळ किंवा साखर मिसळून चांगले फेटून तूप लावलेल्या बेकिंग डिशमधे बेक करतात.
छुंचीपत्र पिठा ही अशीच आणखी एक डेलिकसी,यात डोश्याचं पीठ आणखी पातळ करतात.गरम तव्यावर पातळ मलमलच्या कापडाने हे पीठ एकदा उभे व एकदा आडवे क्रासच्या आकारात लावतात व मध्यभागी ओले खोबरे व गुळाचे शिजवून थंड केलेले सारण ठेवतात व त्यावर चारी बाजू फोल्ड करतात. मग अगदी काळजीपूर्वक प्लेटमधे काढतात.हा पदार्थ मला बराचसा पाटीशाप्ता या बंगाली पदार्था सारखा वाटतो.
या प्रमाणे केवळ तांदूळाचे पीठ किंवा पीठ, ओले खोबरे,गूळ किंवा साखर या पदार्थांपासून पानी मंडा अरसा पिठ असे आणिक ही पदार्थ आहेत. थोडक्यात ओरिसाची खाद्य संस्कृती अगदी संपन्न आहे, गरज आहे ती तिला ओरिसा बाहेरच्या राज्यांपर्यंत पोहचविण्याची.
1 note · View note